
06/05/2025
शिवसेवा प्रतिष्ठान आयोजित आणि पंचरत्न लॉन्स प्रायोजित रील स्पर्धेच्या* विजेत्यांचा सत्कार समारंभ शिवालय, नरिमन पॉईंट येथे मोठ्या उत्साहात पार पडला. एकूण ₹३०,००० रोख बक्षिसे, ट्रॉफीज आणि प्रमाणपत्र देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला. इतक्या जोशपूर्ण व क्रिएटिव्ह कलाकारांबरोबर काम करून आनंद झाला आणि भविष्यातही अशाच उत्तम संधी मिळाव्यात हीच अपेक्षा! या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री. जगदीश कोळी (पंचरत्न लॉन्स) यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. या स्पर्धेचा हा पहिलाच वर्ष होता आणि पुढील वर्षी ही स्पर्धा आणखी भव्य, आकर्षक आणि मोठ्या प्रमाणात पार पडणार आहे! सर्व सहभागींचे मन:पूर्वक आभार!