Prarambh

Prarambh Pandit ji, pooja vidhi and all other needs for the pooja and havan at your home. We serve you at you
(3)

"चला वंदु गुरूराया..जे जे आपणासी ठावे,ते दुसऱ्यासी देई,शहाणे करून सोडी,सकळ जना..तो ची गुरू खरा,आधी चरण तयाचे धरा..गुरुपौ...
03/07/2023

"चला वंदु गुरूराया..
जे जे आपणासी ठावे,
ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करून सोडी,
सकळ जना..
तो ची गुरू खरा,
आधी चरण तयाचे धरा..
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!"

आषाढी एकादशी
29/06/2023

आषाढी एकादशी

International Yoga day
21/06/2023

International Yoga day

आज संकष्टी चतुर्थीPRARAMBHThe Divine StartLIKE👍🏻 FOLLOW🚩SHARE📢
07/05/2023

आज संकष्टी चतुर्थी

PRARAMBH
The Divine Start
LIKE👍🏻 FOLLOW🚩SHARE📢

PRARAMBHThe Divine StartLIKE👍🏻 FOLLOW🚩SHARE📢
07/05/2023

PRARAMBH
The Divine Start
LIKE👍🏻 FOLLOW🚩SHARE📢


आज नृसिंह जयंतीवैशाख शु.१४
04/05/2023

आज नृसिंह जयंती
वैशाख शु.१४

PRARAMBHThe Divine StartLIKE👍🏻 FOLLOW🚩SHARE📢
26/10/2022

PRARAMBH
The Divine Start
LIKE👍🏻 FOLLOW🚩SHARE📢

रेणुका माता*PRARAMBH*The Divine Start*LIKE👍🏻 FOLLOW🚩SHARE📢*माता पार्वतीने कुळन देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे न...
04/10/2022

रेणुका माता

*PRARAMBH*
The Divine Start
*LIKE👍🏻 FOLLOW🚩SHARE📢*

माता पार्वतीने कुळन देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानल्या गेलेल्या जमदग्नी ऋषीसोबत तिचे लग्न झाले.
सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती. राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे मागणी केली, मात्र ती फेटाळली. तेव्हा जमदग्नी पुत्र परशुराम आश्रमात नसल्याची संधी साधून सहस्त्रयर्जुनाने आश्रमावर हल्ला केला. जमदग्नीला ठार केले आणि कामधेनू हिरावून नेली. त्यानंतर पुत्र परशुराम तेथे आला. हा प्रकार पाहून त्याने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली.
पित्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कोरी भू‍मी हवी, म्हणून तिच्या शोधार्थ कावडीच्या एका पारडयात जमदग्नीतचे पार्थिव आणि दुस-या पारडयात माता रेणुकेला बसवून रानोमाळ भटकत अखेर तो माहूर गडाला आला. तेथे श्री दत्तात्रेयाने कोरी भूमि दाखविली. येथेच पित्यावर अंत्यसंस्कार कर, असे सांगितले.
परशुरामाने बाण मारुन मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्का्र केले. त्या वेळी माता रेणुका सती गेली. सती गेलेल्यान मातेच्या विरहाने परशुराम दुःखी झाला. तोच आकाशवाणी होऊन,तुझी आई जमिनीतून वर येईल. फक्त तू डोळे मिटून तिचे स्मरण कर, डोळे उघडून पाहू नको,असे सांगण्यात आले. परंतु परशुरामची उत्सुकता शिगेला पोचल्याने त्याने लवकरच डोळे उघडून पाहिले. तोपर्यंत रेणुका मातेचे मुखच वर आले होते. हीच तांदळा स्वरुपातले मुख असलेली माहूरची रेणुका होय.

साभार :- अशोककाका कुलकर्णी
Image internet

🌹 *देवी नामावली* 🌹*PRARAMBH*The Divine Start*LIKE👍🏻 FOLLOW🚩SHARE📢*॥ अथनामावली ॥आदिशक्तये । महादेव्यैन । अंबिकायै । परमेश...
03/10/2022

🌹 *देवी नामावली* 🌹
*PRARAMBH*
The Divine Start
*LIKE👍🏻 FOLLOW🚩SHARE📢*

॥ अथनामावली ॥
आदिशक्तये । महादेव्यैन । अंबिकायै । परमेश्वर्यै । ईश्वरै । योगिन्यै । योगायै । सर्वभूतेश्वर्यै । जयायै विजयायै ॥१०॥ शांभव्यै । शक्त्यै । बाह्म्यै । ब्रह्मांडधारिण्यै मोहिन्यै । मोहरूपायै । महामायायै । माहेश्वर्यै । लोकरक्षणायै । दुर्गायै ॥२०॥ भक्तचिंतामण्यै । मत्यै । सिध्यै । मर्त्यै । महालक्ष्म्यै । सर्वसिद्धिप्रदायै । मंत्रमूर्त्यै । महाकाल्यै । सर्वमूर्त्रिस्वरूपिण्यै । वेदमूर्त्यैं ॥३०॥ वेदवर्त्यै । वेदांगायै । अव्यहारिण्यै । आद्यायै । भवगंत्यै । अरोध्ये । रुद्राण्यै । रुइरूपिण्यै । नारायण्यै । नारसिंहै ॥४०॥ नागयज्ञोपवीतिन्यै । शंखचक्रगदाधारिण्यै । जटामुकुटशोभिन्यै । अप्रमाणायै प्रमाणायै । आदिमध्यावसनायै । पुण्योदयायै । पुण्यकीर्त्यै । स्तुताय ॥५०॥ विश्वमात्रे । विशालाक्षायै । गंभीरायै । करुणान्वितायै । कालरात्रयि । कामसिद्धै । कमलायै । पद्मवासिन्यै । मात्रे मातंगिन्यै ॥६०॥ चंडमुडवधायै । धात्र्यै । दैत्यदानवनाशिन्यै । मोघद्योत्ये । मेघमालायै । सिद्धै । मनोयोगिन्यै । सत्त्वधारिण्यै । आत्मज्योत्ये । परमज्योतिषे ॥७०॥ सर्वज्योत्यै । स्वरूपिण्यै । सहस्रमूर्त्यै । सावर्ण्यै । आयुर्लक्ष्म्यै । धनुर्लक्ष्म्यै । विद्याक्ष्म्यै । विचक्षणायै । सर्वलक्ष्मिपदारूपायै । क्षीरार्णववासिन्यै ॥८०॥ वागैश्वर्यै । वाक्सिद्धायै । अज्ञानघायै । गोचर्यै । बलायै । परमकल्याणै । भानुमंदलवासिन्यै । अव्यक्तायै । व्यक्तरूपायै । अनंतरूपिण्यै ॥९०॥ चंद्राननायै । चंद्रजटायै । चंद्रमंडलमंडितायै । भैरव्यै । परमनंदायै । अनंतायै । अपराजितायै । ज्ञानदेव्यै । ज्ञानवर्तायैं । ज्ञानमूर्त्यै ॥१००॥ कलावत्यै । स्मशानवत्यै । चामुंडायै । घोर दारिद्र्यनाशिन्यै । महिषासुरघ्न्यै । सर्वरक्षायै । ह्रियै । श्रियै । महाकाल्यै । महालक्ष्म्यै । महासरस्वत्यै । श्रामहाकाल्यै महालक्ष्म्यै । महासरस्वत्यैनमः ॥
इति नामावली समाप्तः ॥

*साभार :- अशोककाका कुलकर्णी*
Image internet

*सरस्वती स्तोत्रम्* *PRARAMBH*The Divine Start*LIKE👍🏻 FOLLOW🚩SHARE📢*श्रीगणेशाय नमः ॥ श्र्वेतपद्मासना देवि श्र्वेतपुष्पोप...
02/10/2022

*सरस्वती स्तोत्रम्*

*PRARAMBH*
The Divine Start
*LIKE👍🏻 FOLLOW🚩SHARE📢*

श्रीगणेशाय नमः ॥
श्र्वेतपद्मासना देवि श्र्वेतपुष्पोपशोभिता ।
श्र्वेताम्बरधरा नित्या श्र्वेतगन्धानुलेपना ॥ १ ॥
श्र्वेताक्षी शुक्लवस्रा च श्र्वेतचन्दन चर्चिता ।
वरदा सिद्धगन्धर्वैर्ऋषिभिः स्तूयते सदा ॥ २ ॥
स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीम् ।
ये स्तुवन्ति त्रिकालेषु सर्वविद्दां लभन्ति ते ॥ ३ ॥
या देवी स्तूयते नित्यं ब्रह्मेन्द्रसुरकिन्नरैः ।
सा ममेवास्तु जिव्हाग्रे पद्महस्ता सरस्वती ॥ ४ ॥
॥ इति श्रीसरस्वतीस्तोत्रं संपूर्णम् ॥

*साभार :- अशोककाका कुलकर्णी*
Image internet

योगेश्वरी देवी*PRARAMBH*The Divene Start*LIKE👍🏻 FOLLOW🚩SHARE📢*श्री योगेश्वरी ही अंबानगरीचे एक भूषण आहे. तसे पहिले तर अंब...
01/10/2022

योगेश्वरी देवी

*PRARAMBH*
The Divene Start
*LIKE👍🏻 FOLLOW🚩SHARE📢*

श्री योगेश्वरी ही अंबानगरीचे एक भूषण आहे. तसे पहिले तर अंबानगरीने साहित्यिक व सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्रीय मनाला अभिमान वाटावा अशी अनेक भूषणे धारण केली आहेत. मराठीचे आद्यकवी श्री मुकुंदराज व मराठी साहित्याचे नवकोट नारायण संत कवी दासोपंत यांचे समाधिस्थान ही त्यापैकी दोन उल्लेखनीय आहेत. अंबानगरीचे महत्व या कारणामुळे अतोनात वाढले असून प्राचीन काळी ही नागरी इतर नगरांना बुशन भूत ( नगर भूषण भवः ) होऊन बसली होती.योगेश्वरीचे शक्तिपीठ असल्यामुळे तर तिला पवित्र तीर्थस्थानाचे स्वरूप प्राप्त झाले होते व आजही ते कायमच आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपरयातून तिच्या दर्शनासाठी यात्रेकरूंची सारखी रीघ लागलेली असते.येगेश्वरी ही सर्वांचीच देवता असली तरी विशेषतः कोकणस्थ लोकांची ती कुलस्वामिनी आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, गोवा इत्यादी दूरदूरच्या ठिकाणाहून कोकणस्थ कुटुंबे भक्तिभावाने तिचे दर्शनास येत असतात. महाराष्ट्रात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, सप्तशृंगी ही देवीची मुख्यपीठे आणि अनेक उपपिठे असली तरी अंबेच्या नावाने प्रसिद्ध असलेली अंबाजोगाई हे एकच एक शक्तिपीठ अस्तित्वात आहे. अंबाजोगाई शहराला जसे अंबेचे शक्तिपीठ असण्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचप्रमाणे योगेश्वरी देवीला देखील इतर ठिकाणांच्या देवीपेक्षा एक खास वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे, देवीच्या भक्तीचे व्रत घेणारांना ( आराधी होणारांना ) परडी आणि पोत यांचा व्रतांचे प्रमुख चिन्ह म्हणून स्वीकार करावा लागतो. योगेश्वरी देवीने आपल्या हातात जी निरनिराळी आयुधे धारण केली आहेत, त्यात तिने एका हातात पत्र (परडी) धारण केल्याचा उल्लेख रुद्र्यामलखंडातील देवीच्या स्तवनाचे श्लोकात दिला आहे.
इतर शक्तीपिठाच्या ठिकाणी असलेल्या कोणत्याही देवीच्या हातात तिच्या भक्तांनी स्वीकार केलेले हे आयुध (पात्र) दिसून येत नाही. योगेश्वरी देवीचे हे एक वैशिष्ट्य मुद्दाम उल्लेख करण्यासारखे आहे. योग साधनेत मग्न असलेल्या या देवीने हे चिन्ह धारण करणे योग्यच आहे आणि भक्तांनी सुद्धा आपले आयुष्य अशाच प्रकारे योग साधनेत घालवावे असा त्यांचा उद्देश असावा.
योगिनी हृद्यदिपिकेत योगिनीचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे. पार्वतीच्या शक्ती अंशाने उत्पन्न झाल्यावर जगताला प्रकाशभूत होणाऱ्या आणि ब्रम्हा, विष्णु, महेश आणि देवता यांच्या मध्ये अंतर्भुत असलेल्या लहान मोठ्या पंचभौतिक परमाणुयुक्त चैतन्य शक्तीला योगिनी असे संबोधतात. योगीनीमध्ये प्रमुख किंवा योगिनीच्यावर अधिपत्य करणारी देवता ती योगेश्वरी होय. या प्रमाणे योग साधनेला प्राधान्य देणारी देवी म्हणून योगेश्वरी नाव प्रचारात आले असावे.
योगेश्वरी देवीच्या स्थापनेचा काळ भारतात आदिशक्तीची उपासना सुरु झाली. तेव्हापासूनचा धरण्यास हरकत नाही. आता आदि शक्तीची उपासना केव्हापासून सुरु झाली ते पहावयाचे असेल तर आपणास ऋग्वेद कालाइतके मागे जावे लागेल. तरीपण इतिहास संशोधकांचा तर्क कठोर विचारसरणीप्रामाणे असे अनुमान करण्यात येते की, शैव वैष्णव शक्ती इत्यादी धर्मपंथातील उपाय देवतांचा समन्वय घडवून आणणारी पंचायतन पूजा राजघराण्याच्या उत्तर काळात सुरु झाली असावी. हे अनुमान मान्य केले तर सुमारे दीड हजार वर्षापूर्वी मुर्तिस्थापनेच्या काळापासूनच योगेश्वरी देवीची स्थापना झाली असावी. असे समजण्यास हरकत नाही.

*साभार - अशोककाका कुलकर्णी*
Image source internet

*॥ श्री महालक्ष्म्यष्टकम् ॥**PRARAMBH*The Divine  Start*LIKE👍🏻FOLLOW🚩 SHARE📢* श्री गणेशाय नमः नमस्तेस्तू महामाये श्रीपिठ...
29/09/2022

*॥ श्री महालक्ष्म्यष्टकम् ॥*

*PRARAMBH*
The Divine Start
*LIKE👍🏻FOLLOW🚩 SHARE📢*

श्री गणेशाय नमः नमस्तेस्तू महामाये श्रीपिठे सूरपुजिते । शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ १ ॥ नमस्ते गरूडारूढे कोलासूर भयंकरी । सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ २ ॥ सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी । सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥३ ॥ सिद्धीबुद्धूीप्रदे देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनी । मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ४ ॥ आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी । योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ५ ॥ स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे । महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ६ ॥ पद्मासनस्थिते देवी परब्रम्हस्वरूपिणी । परमेशि जगन्मातर्र महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ७ ॥ श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते । जगत्स्थिते जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ८ ॥ महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेत् भक्तिमान्नरः । सर्वसिद्धीमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥ ९ ॥ एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनं । द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्य समन्वितः ॥१०॥ त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रूविनाशनं । महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥
॥इतिइंद्रकृत श्रीमहालक्ष्म्यष्टकस्तवः संपूर्णः ॥

Image : internet

🌹 *श्रीदुर्गा स्तोत्र (मराठी)* 🌹*PRAMBH* The Divine Start*Like Follow Share*श्रीगणेशाय नमः । श्री दुर्गायै नमः । नगरांत ...
28/09/2022

🌹 *श्रीदुर्गा स्तोत्र (मराठी)* 🌹

*PRAMBH*
The Divine Start
*Like Follow Share*

श्रीगणेशाय नमः । श्री दुर्गायै नमः ।
नगरांत प्रवेशले पंडुनंदन । तो देखिले दुर्गास्थान ।
धर्मराज करी स्तवन । जगदंबेचे तेधवा ॥ १ ॥
जय जय दुर्गे भुवनेश्वरी । यशोदा गर्भ संभवकुमारी ।
इंदिरा रमण सहोदरी । नारायणी चंडिकेंऽबिके ॥ २ ॥
जय जय जगदंबे विश्र्व कुटुंबिनी । मूलस्फूर्ति प्रणवरुपिणी ।
ब्रह्मानंदपददायिनी । चिद्विलासिनी अंबिके तू ॥ ३ ॥
जय जय धराधर कुमारी । सौभाग्य गंगे त्रिपुर सुंदरी ।
हेरंब जननी अंतरी । प्रवेशीं तू आमुचे ॥ ४ ॥
भक्तह्रदयारविंद भ्रमरी । तुझे कृपाबळे निर्धारी ।
अतिगूढ निगमार्थ विवरी । काव्यरचना करी अद् भुत ॥ ५ ॥
तुझिये कृपावलोकनेंकरुन । गर्भांधासी येतील नयन ।
पांगुळा करील गमन । दूर पंथे जाऊनी ॥ ६ ॥
जन्मादारभ्य जो मुका । होय वाचस्पतिसमान बोलका ।
तूं स्वानंदसरोवर मराळिका । होसी भाविकां सुप्रसन्न ॥ ७ ॥
ब्रह्मानंदे आदिजननी । तव कृपेची नौका करुनि ।
दुस्तर भवसिंधु उल्लंघूनी । निवृत्ती तटां जाइजे ॥ ८ ॥
जय जय आदिकुमारिके । जय जय मूलपीठनायीके ।
सकल सौभाग्य दायीके । जगदंबिके मूलप्रकृतिके ॥ ९ ॥
जय जय भार्गवप्रिये भवानी । भयनाशके भक्तवरदायिनी ।
सुभद्रकारिके हिमनगनंदिनी । त्रिपुरसुंदरी महामाये ॥ १० ॥
जय जय आनंदकासारमराळिके । पद्मनयने दुरितवनपावके ।
त्रिविधतापभवमोचके । सर्व व्यापके मृडानी ॥ ११ ॥
शिवमानसकनकलतिके । जय चातुर्य चंपककलिके ।
शुंभनिशुंभदैत्यांतके । निजजनपालके अपर्णे ॥ १२ ॥
तव मुखकमल शोभा देखोनी । इंदुबिंब गेले विरोनी ।
ब्रह्मादिदेव बाळें तान्ही । स्वानंदसदनी निजविसी ॥ १३ ॥
जीव शिव दोन्ही बाळकें । अंबे त्वां निर्मिली कौतुकें ।
स्वरुप तुझे जीव नोळखे । म्हणोनि पडला आवर्ती ॥ १४ ॥
शिव तुझे स्मरणीं सावचित्त । म्हणोनि तो नित्यमुक्त ।
स्वानंदपद हातां येत । तुझे कृपेनें जननिये ॥ १५ ॥
मेळवूनि पंचभूतांचा मेळ । त्वां रचिला ब्रह्मांडगोळ ।
इच्छा परततां तत्काळ । क्षणें निर्मूळे करिसी तूं ॥ १६ ॥
अनंत बालादित्यश्रेणी । तव प्रभेमाजी गेल्या लपोनि ।
सकल सौभाग्य शुभकल्याणी । रमारमणवरप्रदे ॥ १७ ॥
जय शंबरि पुहर वल्लभे । त्रैलोक्य नगरारंभस्तंभे ।
आदिमाये आत्मप्रिये । सकलारंभे मूलप्रकृती ॥ १८ ॥
जय करुणामृतसरिते । भक्तपालके गुणभरिते ।
अनंतब्रह्मांड फलांकिते । आदिमाये अन्नपूर्णे ॥ १९ ॥
तूं सच्चिदानंदप्रणवरुपिणी । सकल चराचर व्यापिनी ।
सर्गस्थित्यंत कारिणी । भवमोचिनी ब्रह्मानंदे ॥ २० ॥
ऐकोनि धर्माचे स्तवन । दुर्गा जाहली प्रसन्न ।
म्हणे तुमचे शत्रू संहारीन । राज्यीं स्थापीन धर्माते ॥ २१ ॥
तुम्ही वास करा येथ । प्रगटी नेदीं जनांत ।
शत्रू क्षय पावती समस्त । सुख अद् भुत तुम्हां होय ॥ २२ ॥
त्वां जें स्तोत्र केलें पूर्ण । तें जे त्रिकाल करिती पठन ।
त्यांचे सर्व काम पुरवीन । सदा रक्षीन अंतर्बाह्य ॥ २३ ॥
॥ इति श्रीयुधिष्ठिरविरचितं श्रीदुर्गा स्तोत्रं संपूर्णम् ॥

युधिष्ठिराने दुर्गादेवीचे स्तवन केले आणि युद्धांत विजय
मिळावा असा वर मागितला. देवी या स्तवनाने प्रसन्न झाली
व युधिष्ठिराला तूं युद्धांत विजयी होशील असा वर दिला.
पुढे देवीने असे सांगितले की, तूं केलेल्या या स्तोत्राचे जे
त्रिकाल पठन करतील त्यांचे मी रक्षण करीन
आणि त्यांच्या सर्व कामना पूर्ण करीन.

*साभार-अशोककाका कुलकर्णी*
Image source internet

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिकेशरण्ये  त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते ।१।Image Source : internet
27/09/2022

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके

शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते ।१।

Image Source : internet

26/09/2022

या देवी सर्वभूतेषु शैलपुत्री रूपेणसंस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

.श्री गणेश जयंतीमाघ शुक्ल चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्...
04/02/2022

.
श्री गणेश जयंती

माघ शुक्ल चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी होय. या दिवशी गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते म्हणून श्री गणेशाची विधिपूर्वक पूजा करावी. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले, लाल फुले, दुर्वा वाहाव्यात. गणपती अथर्वशीषाचा पाठ करून नैवेद्य दाखवावा.

गणेश जयंतीला चंद्र दर्शन निषिद्ध मानले गेले आहे. या रात्री चंद्र दर्शन केल्याने चोरीचा आळ येऊ शकतो, मानसिक विकार उत्पन्न होऊ शकतात, अशी धारणा आहे.

साभार :पं. विजय विनायक पाठक
Image source internet
PRARAMBH the divine start
Wtsup 9324300748

 देवपूजा - एक मेडिटेशनपूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणारी लोकं होती. त्याची आठवण झाली.मग विचार करता क...
19/01/2022


देवपूजा - एक मेडिटेशन

पूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणारी लोकं होती. त्याची आठवण झाली.
मग विचार करता करता वाटलं किती सुंदर पद्धत आहे ना आपल्यात रोजच्या पूजेची.

माझ्या डोळ्यांसमोर पूर्वीचं एक छान चित्र ऊभं राहिलं. भल्या पहाटेच ऊठून सर्व स्त्रिया घरातलं दळण, स्वैपाकघरातली कामं, पाणी भरणं, लहान मुलांकडे लक्ष देणं वगैरे कामात मग्न असताना पुरूष मंडळी बाहेरच्या अंगणाची सफाई, चूल पेटवणं, बागेला पाणी देणं, गोठा सफाई, धारा काढणं वगैरे कामात गर्क आहेत.

सकाळची सर्व आन्हिकं ऊरकून शूचिर्भूत होऊन घरातले यजमान पूजेसाठी फुलं काढायला बागेत जातात. ऊगवतीची कोवळी किरणं अंगावर घेत, अनवाणी पायांनी, रंगीबेरंगी फुलांची शोभा निरखत पानाफुलांशी हितगूज करत निसर्गाचं अप्रूप मनात साठवत मनाला आल्हाददायक देणारा एक आनंददायी (आणि आरोग्यदायीही) सुंदर अनुभव.

फुलं घेऊन देवघरात आल्यावर सर्व देव (स्वत:) स्वच्छ घासलेल्या ताम्हनात काढून देवघराची स्वच्छता, देवांची ऊन पाण्याने अंघोळ, त्यांना लहान बाळांच्याच ममतेने आणि कोमलतेने (भक्तीने) स्वच्छ करून परत जागच्याजागी स्थानापन्न करतात.

एकतानतेने सहाणेवर चंदनाचं मऊ मुलायम सुगंधी गंध ऊगाळतात.

तुम्हाला तुमच्या चिंता, क्लेश, दु:ख, दैन्य सारं सारं काही विसरायला लावणारा हा अनुभव.
खऱ्या भक्तीभावनेत तल्लीन होऊन पूजा करताना 'तो' आहे माझ्या पाठीशी, हेही दिवस जातील, 'तो' समर्थ आहे, मी कशाला ऊगीच काळजी करू किंवा कशाला काही त्याच्याकडे मागू असा सार्थ विश्वास मनात जागतो.

चंदनाच्या गंधाचा मऊ स्पर्श, फुलांचे देखणे रंग आणि प्रकार, धूपाचा सुगंध, तेजाळलेले दिवे, वाहिली जाणारी अक्षत, दाखवला जाणारा नैवेद्य म्हणजे जणू टप्याटप्याने रंगत जाणारी महफिल.

ही पूजा पूर्ण केल्यानंतर ते सजलेलं, तेजाळलेलं, सुगंधित देवघराचं रूप डोळे भरून मनात साठवून डोळे मिटावेत आणि असा सुंदर दिवस दाखवल्याबद्दल त्या ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.

अशी ही साग्रसंगीत पूजा म्हणजे रस, रंग, गंध, स्पर्श या सर्व इंद्रियांद्वारे केली जाणारी साधनाच जणू. यात नादही येतोच की.

तुमचं मन जराही भरकटू नये आणि ईश्वरावर अढळ निष्ठा ठेवून समर्पित व्हायला मदत म्हणून धीरगंभीरपणे म्हटली जाणारी स्तोत्रं.

खरोखरच तुम्हाला सर्व नकारात्मक भावना विसरायला लावणारी. सकारात्मक भाव जागवून तुम्हाला सात्विक बनवणारी. तुम्हाला जास्त प्रेमळ, करूणामय आणि क्षमाशील बनवून तुम्हाला आत्मविश्वास प्रदान करणारी.
मी तुझ्या पाठीशी आहे. सर्व काही ऊत्तमच होईल' असा भक्कम विश्वास देऊ करणारी.हळूहळू तुमच्यातला अहं विसरायला लावणारी.... अशी ही रोजची पूजा.

ही बहुधा प्रत्येकाने स्वतंत्रपणे आपापली करणे अपेक्षित असेल का?
या वेळेस अंतर्मुख होऊन मौन राखून रोज परमेश्वराशी अद्वैत साधण्याचा प्रयत्न असेल का?

यात अमुक फुलं आहेत किंवा नाहीत म्हणून, चंदनाचं गंध हवं तसं किंवा हवं तितकं नाही म्हणून, मनासारखा नैवेद्य नाही म्हणून तुम्हाला राग येत असेल तर किंवा पूजा करताना तल्लीनतेने न करता मनात बाकीचे विचार किंवा इतरत्र लक्ष असेल तर मंडळी या पूजेचा तुम्हाला काही ऊपयोग होईल का?

पूजा ही कुणा बाहेरच्या 'देवाला' प्रसन्न करून घेण्यासाठी नाहीये, तर स्वत:मधील ईश्वराची अनुभूती घेण्याचा तो एक प्रवास आहे.

स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी आहे. दिवसाची सुरूवात सकारात्मक ऊर्जेने आणि ऊत्साहाने करायचा तो एक सहजसोपा आणि सुंदर मार्ग आहे.

source internet
Image google
PRARAMBH the divine start
Wtsup 9324300748

शाकंभरी पौर्णिमाशाकंभरी पौर्णिमा या दिवशी भारतातील विविध मंदिरात तसेच शाकंभरी देवीच्या मंदिरात देवीला विविध प्रकारच्या भ...
17/01/2022

शाकंभरी पौर्णिमा

शाकंभरी पौर्णिमा या दिवशी भारतातील विविध मंदिरात तसेच शाकंभरी देवीच्या मंदिरात देवीला विविध प्रकारच्या भाज्या आणि फळे अर्पण करतात.
असे म्हणतात की पृथ्वीवर शंभर वर्षे दुष्काळ पडला, त्यावेळी भक्तांनी आणि ऋषी-मुनींनी आदिशक्ती देवीचा धावा केला. आपल्या भक्तांच्या प्रार्थने ने प्रसन्न होऊन देवीने पावसाचा वर्षाव केला दुष्काळ संपून जमीन सुजला सुफला झाली आणि पृथ्वीवर अन्नधान्य तयार होऊ लागले. तेव्हापासून देवीच्या शाकंभरी या पोषण करणाऱ्या देवतेची शाक म्हणजे भाजी द्वारे पूजा करू लागले.

साभार :पं. विजय विनायक पाठक
PRARAMBH the divine start
WTSUP 9324330748

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!     सर्व सणांची माहिती , धार्मिक विधी महिती, पुजासाहित्य आणि बरेच काही एका क्लिक वरत...
14/01/2022

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व सणांची माहिती , धार्मिक विधी महिती, पुजासाहित्य आणि बरेच काही एका क्लिक वरती, आजच पेज लाईक आणि शेअर करा व मिळावा सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वरती. Wtsup 9324300748

मकर संक्रांत पर्वकाळ   "तिळगुळ घ्या गोड गोड बोला"पौष शु.१२ शके १९४३ शुक्रवार दिनांक १४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १४.२९ व...
13/01/2022

मकर संक्रांत पर्वकाळ
"तिळगुळ घ्या गोड गोड बोला"

पौष शु.१२ शके १९४३ शुक्रवार दिनांक १४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १४.२९ वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आहे म्हणून मकर संक्रांतीचा उत्सव शुक्रवारी साजरा करावा.

मकर संक्रांत (पुजा मुहूर्त ) पुण्यकाल - दुपारी १४.२९ पासून सुर्यास्तापर्यंत आहे.

रवेः संक्रमणं राशौ संक्रान्तिरिति कथ्यते।
हिंदू कालगणनेच्या सौर पंचांगानुसार आणि साधारण इंग्रजी कालगणनेप्रमाणे १४ किंवा १५ जानेवारी या तारखेला प्रत्येक वर्षी मकर संक्रांत हा योग बनतो.

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत सूर्याच्या प्रवेशास 'संक्रांती' म्हणतात. खरे तर, मकर संक्रांतीमधील, 'मकर' हा शब्द मकर राशीचे प्रतीक आहे व 'संक्रांती' म्हणजे संक्रमण. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या दिवसाला 'मकर संक्रांती' म्हणतात.

या दिवसाचे कर्तव्य :
तीळमिश्रित पाण्याने स्नान करणे
तिळाचे उटणे लावणे,
तीळ भक्षण करणे ,
तीळ होम करणे,
तीळ तर्पण करणे ,
तिलदान करणे अशा सहा प्रकारे तिलाच उपयोग केल्यास पापांचा नाश होतो.

या वर्षी बालव करणावर संक्रांत होत असल्याने उक्त असलेले वाहनादी प्रकार या प्रमाणे आहेत
वाहन- वाघ
उपवाहन - घोडा
वस्त्रं - पिवळे
आयुध - गदा
तिलक - केशर
स्वरूप - कुमारी
सुवासाकरिता- जाईचे फुल
भक्षणासाठी- पायस
जाती- सर्प
आभूषण- मोती
वारनाव - मिश्रा
नाक्षत्र नाव- नंदा
प्रवासाची दिशा - उत्तरेकडून निघून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्येला पहात आहे.
सामुदाय मुहूर्त - ४५

पर्वकाळात ही कामे करू नयेत:
दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष-गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे
व काम विषय सेवन करु नये ...

पर्वकाळात स्त्रियांनी करावयाची दाने :
गाईला घास, नवीन भांडी, अन्न, तीळपात्र, तीळ, गुळ, सोने, भूमी, गाय, वस्त्रं, घोडा... यापैकी शक्य असेल ते यथाशक्ती दान करावे.

संकल्प
देशकालोच्चार करून "मम आत्मनः सकल पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्री सवितृ प्रीतिद्वारा सकलपापक्षयपूर्वकं स्थिर सौभाग्य कुलाभिवृध्दि धनधान्यसमृध्दि दीर्घायुः महैश्वर्य मंगलाभ्युदय सुखसंपादादि कल्पोक्त सिध्दये अस्मिन् मकरसंक्रमण पुण्यकाले दानमहं करिष्ये.

असा संकल्प करून जे दान द्यावयाचे ते द्यावे.

विशेष सुचना
दरवर्षी मकर संक्रांति संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशाप्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्रीय आधार नसतो, त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.

संदर्भ :- दाते पंचांग

साभार:- पं. विजय विनायक पाठक
Image source Google
PRARAMBH the divine start
Wtsup 9324300748

Address

Pune
412027

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+919324300748

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prarambh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prarambh:

Videos

Share

Category

प्रारंभ