Sachin Gund

Sachin Gund Event Manegar and Social worker

 #प्रशांतमामातुपे   #वाढदिवसशुभेच्छाआपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!आमचे मार्गदर्शक -मित्र .. सहकारी  .. उतुंग अष्...
16/11/2023

#प्रशांतमामातुपे #वाढदिवसशुभेच्छा
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आमचे मार्गदर्शक -मित्र .. सहकारी .. उतुंग अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे धनी .. मोठ्या विचारांचा राजा माणूस.. सर्वांचे लाडके रोट्रियन..बाश्री क्रिकेट संघाचे मालक..हडपसर चे उमदे नेतृत्व आदरणीय श्री प्रशांत(मामा) तुपे आपणास वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा ..

सामाजिक कार्याची आवड आणि खेळातही आवडीमुळे काढलेली सवड.. आणि त्यातच आपुलकी आणि प्रेम जपनारा..दिलखुलास आणि जीवाला जीव देणारा स्वभाव .. क्या बात है.. खरच दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस...

या वयातही आर्थिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील कामाचा झपाटा पाहिला आम्ही थक्क होऊन जातो.
अखंड ऊर्जेचा स्रोत व सामाजिक ,कला व क्रीडा क्षेत्रावर प्रेम करणारा आमच्या दिलदार तरुण मित्रास वाढदिवसा च्या खुप खूप हार्दिक शुभेच्छा..!

असेच मैत्रीच्या नात्यावर प्रेम करत रहा ..कायम निरोगी राहा, आंनंददायी असेच खेळत रहा! कधीच निवृत्त होउ नका. ही आई जगदंबे चरणी प्रार्थना ..पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!

श्रद्धा नगर मित्र मंडळाच्या वतीने 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा..झेंडावंदनाच्या ...
15/08/2023

श्रद्धा नगर मित्र मंडळाच्या वतीने 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा..
झेंडावंदनाच्या प्रसंगी माझी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त प्रभारी श्री जालिंदर भाऊ कामठे, आमदार चेतन दादा तुपे , मा.आमदार योगेश अण्णा टिळेकर, कोंढवा पोलीस स्टेशन वरिष्ठ अधीक्षक माननीय श्री संतोष सोनवणे,नगरसेविका रंजनाताई टिळेकर,
नगरसेविका सौ संगीता ताई ठोसर , नगरसेवक श्री जगताप, सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश भाऊ कामठे, सामाजिक कार्यकर्ते श्री संदीप नाना बधे, सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत शेठ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील कामठे,पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष श्री दीपक बाबा कामठे, सामाजिक कार्यकर्ते ,श्री अनिल शेठ कामठे, श्री महेश अण्णा कामठे, श्री सागर शेठ कामठे, श्री धीरज मरळ, श्री स्वप्निल कामठे.. आधी मंडळींनी सध्या नगर मित्र मंडळ सदिच्छा भेट दिली त्याबद्दल मंडळाच्या वतीने सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ंचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय भारत

 #वाढदिवसशुभेछा आमचे जिवलग मित्र .. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस .. ग्रेट माणूस..उत्कृष्ट क्रिकेटर -विकेट टेकर बॉलर श...
25/06/2023

#वाढदिवसशुभेछा

आमचे जिवलग मित्र .. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस .. ग्रेट माणूस..उत्कृष्ट क्रिकेटर -विकेट टेकर बॉलर श्री सागर भाऊ कामठे पाटील आपणास वाढदिवसाच्या खुप खूप हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला नेहमीच - शांती, प्रेम आणि उत्तम आरोग्याच्या खूप शुभेच्छा. तु जसा कायम उत्साही खेळाडू आहे तसा येणारा प्रत्येक दिवस चैतन्यमय, उस्ताहपूर्ण,सुंदर आणि आल्हादायक जावो ! मित्रा तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
👌🤝👍🍫..🎂🍫🍫🍫🎊🎊🎉🎉

 #वाढदिवसशुभेच्छा  श्री अमोल काळभोर  पिसोळी गावचे युवा नेतृत्व, आमचे लाडके मित्र ,सामाजिक ,राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात आ...
15/06/2023

#वाढदिवसशुभेच्छा

श्री अमोल काळभोर

पिसोळी गावचे युवा नेतृत्व, आमचे लाडके मित्र ,सामाजिक ,राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमटविणारे, दक्षिणात्य चित्रपटात अभिनेता म्हणून अगदी हुबेहूब शोभणारे- स्टायलिश स्टार, मनमिळावू स्वभावाचे, बाणेदारपणा आणि रुबाबदार व्यक्तिमत्व असणारे,
आमच्या चांडाळ चौकटी ग्रुपचे चाणक्य म्हणून ख्याती असलेले श्री अमोल काळभोर यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..
आयुष्य फक्त जगू नये,
तर ते साजरे केले पाहिजे
हा वारसा घेवून आयुष्य जगणारे आमचे लाडके मित्र अमोलदादा 🎂💥🎉
तुमच्या सारखा चांगला मित्र मिळणे
म्हणजे कोळशाच्या खाणीत हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तेरे जैसा यार कहा..कहा ऎसा यारना..याद करेगी दुनिया..
तेरा मेरा अफसाना.. मित्रा वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
तुला उत्तम आरोग्य, सुख, शांती लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना!🎂💥.🎂💥🎉.

 #मनःपूर्वक #अभिनंदन*आमचे जिवलग मित्र अनिल कामठे यांनी नवीन महिंद्रा XUV 700 गाडी घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक...
23/05/2023

#मनःपूर्वक #अभिनंदन

*आमचे जिवलग मित्र अनिल कामठे यांनी नवीन महिंद्रा XUV 700 गाडी घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन...🎁💐🚘*

आमचे जिवलग मित्र युवा उद्योजक, भिवरी वि.का.वि. सोसायटीचे माजी चेअरमन #श्री_नवनाथशेठ_कटके यांचा आज वाढदिवस #आंपणास_वाढदिव...
17/05/2023

आमचे जिवलग मित्र युवा उद्योजक, भिवरी वि.का.वि. सोसायटीचे माजी चेअरमन
#श्री_नवनाथशेठ_कटके यांचा आज वाढदिवस
#आंपणास_वाढदिवसाच्या__मनःपूर्वक__हार्दिक_हार्दिक_शुभेच्छा..!!!!! 💞🎂🎁🍫 #शुभेच्छुक - #सचिन गुंड आणि_मित्र_परिवार.

 #वाढदिवसशुभेछा (एकसष्टी) सौ जयश्री सुरवसेचार दिवस दिसलो नाही तरी..अगदी आवरजून..कारे सच्या.. कुठ होता ..दिसला नाय लय दिव...
15/04/2023

#वाढदिवसशुभेछा (एकसष्टी) सौ जयश्री सुरवसे

चार दिवस दिसलो नाही तरी..अगदी आवरजून..कारे सच्या.. कुठ होता ..दिसला नाय लय दिवस .. हे वाक्य पण एकदम आपुलकीने बोलणारी... भेटल की.. काय अध्यक्ष म्हनुन अगदी तोंडभरून कौतुक करणारी ... छोट्या छोट्या गोष्टीत शाबासकीची थाप देणारी ... कामधंद्याची हमखास चौकशी करणारी... विश्वासान कुठलीही गोष्ट मन मोकळे करून बोलणार.. मनमिळावू स्वभाव आणि नेहमी दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती .. छोट्या छोट्या गोष्टीतून .. अगदी जिवाभावाची असणारी .. आमची लाडकी सुरवसे मावशी ..
या वयातही अगदीं एखाद्या तरुणीला सुद्धा लाजवेल इतका कामाचा जोश ! पापड, पापड्या कुरडया, शेवया, चकल्या, वेगवेगळी पीठ .. बनवायची .. बनवून झाली की विकायची .. आणि हे सगळ करत असताना कुठही कामाचं शिन कधीही दिसणार नाही, कधीही कसलीही चिडचिड बोलण्यातून वागण्यातून जाणवणार नाही .. या वयातही तुमच्या कामाचा उत्साह आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची जाणिव अजिबातच करू देत नाही.
कितीही संकट आली ,कितीही आव्हानं आली ,तरी
ढगमगायच नाही, आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला कसे सामोरे जायचे हे खरच तुमच्याकडून शिकले पाहिजे …संसार करण सोप्प नसतंच ..पण अपार कष्टातून जिद्दीतून संसाराचा मळा फुलवला आणि स्वप्नील, बंडु आणि ताई सारखी सुसंस्कृत, सुशिकक्षित आणि जबाबदार आणि यशस्वी मुले घडविली हे नक्कीच आमच्या सांरख्या पिढीला प्रेरणा देत राहील..

व्हावं तुम्ही शतायूषी, व्हावं तुम्ही दीर्घायुषी, ..आयुष्यात सुखदुःखाचा वारा झेलत तुम्ही साठी पार केलीत… माझी एकच इच्छा तुमच्या भावी आयुष्यासाठी आता पुढील आयुष्य असंच जोमाने साजरं करा तुमच्या आयुष्यात असच सुख समृदधि येत राहो. …61 व्या वाढदिवसाच्या खुप खूप हार्दिक शुभेच्छा..

आमचे जिवलग मित्र .. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस .. श्री अभिजित कापरे आपणास वाढदिवसाच्या खुप खूप हार्दिक शुभेच्छा!  त...
15/04/2023

आमचे जिवलग मित्र .. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस .. श्री अभिजित कापरे आपणास वाढदिवसाच्या खुप खूप हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला नेहमीच - शांती, प्रेम आणि उत्तम आरोग्याच्या खूप शुभेच्छा. तु जसा कायम तरुण आहे तसा येणारा प्रत्येक दिवस चैतन्यमय, उस्ताहपूर्ण,सुंदर आणि आल्हादायक जावो ! मित्रा तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !

भारतरत्न, भारतभूषण, दलितांचे कैवारी ,समाज उभारणी साठी  शिक्षणावर भर दिला पाहिजे  ,शिक्षण हे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ...
14/04/2023

भारतरत्न, भारतभूषण, दलितांचे कैवारी ,समाज उभारणी साठी शिक्षणावर भर दिला पाहिजे ,शिक्षण हे
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते प्राशन करणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ही जाणीव ज्यांनी रंजल्या गांजल्याना करून दिली , स्वातंत्र्य समता व बंधुत्व यांना प्राधान्य देणारे ,ज्यांचे विचार व सिद्धांत जगाला मार्गदर्शक,प्रेरक आहेत, असे महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपणा सर्वांना खुप खूप शुभेच्छा !!

 #वाढदिवसशभेच्छा.  श्री अनिल बाळा कामठे तुला वाढदिवसाच्या खुप खूप हार्दिक शुभेच्छा ...मेरी जिंदगी सवारी , मुजको गले लगाक...
14/03/2023

#वाढदिवसशभेच्छा.

श्री अनिल बाळा कामठे तुला वाढदिवसाच्या खुप खूप हार्दिक शुभेच्छा ...

मेरी जिंदगी सवारी , मुजको गले लगाके,
बैठा दिया फलख पे मुझे खाक से उठा के
यारा तेरी यारी को ...
मैने तो खुदा जाना.. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना ...

मित्रांनो खर खरं सांगू माझ्या आयुष्यामध्ये मैत्री या नात्याला फार वेगळं स्थान आहे ... आपल्या घर परिवारामधे आपल्या नात्यांना जितके महत्व आहे तितकेच महत्व या मैत्रीच्या नात्याला आहे ..

आपण म्हणतो की आरे तो हयचा लांगोटी यार तो त्याचा लंगोटी यार ... पण खऱ्या अर्थाने आज 35 वर्ष निखळ मैत्रीचं नातं ज्या मित्राने जपल तो हा माझा जिवलग बाळा .. माझा खरा मित्र..

अगदी लहान पणी चडीवर शाळेत जाण्यापासून ते कॉलेज ला असताना पोरींच्या मागे फिरण्यापासून ते अनेक मग तो कोरोना असो की कुठली कुणाबरोबर झालेली भांडण असोत किंवा कुठलीही आर्थिक अडचण- अडीअडचणीत एकमेकांना साथ देत आयुष्यात अनेक गमती जमती अनुभवत इथपर्यंत चा हा निखळ , निस्वार्थी मैत्रीचा प्रवास... म्हणजे तेरी मेरी यारी ... गेली दुनियादारी..

प्राध्यापक श्री अनंत राऊत यांच्या कवितेच्या सुरुवातीला मी त्यांच्या तोंडून ऐकलं होतं

आरश्या सारखा एक मित्र असला पाहिजे
जीव हा ज्याच्यामुळे दुःखात हसला पाहिजे
अंतराळी जसा ईश्वर राहतो एकटा असा
गुप्त एखादा तयाला मित्र असला पाहिजे..

कृष्ण आणि अर्जुन, दुर्योधन आणि कर्णा,सारखी मित्राच्या मनातील खोलभर असणारी भावना ज्याला कळाली. आजच्या युगात असा मित्र मिळणे दुर्लभ आहे मी खरा भाग्यवान आहे ज्याला असा मित्र मिळाला.

आमचे मित्र अनिल बाळा तुला वाढदीवसाच्या खुप खूप हार्दिक शुभेच्छा! तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत .. हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना ..

आमचे सहकारी  उपायुक्त पोलिस दल गुन्हे शाखा आदरणीय श्री अमोलजी झेंडे साहेब यांच्या  कार्यालयास  सदिच्छा भेट - मित्र परिवा...
11/03/2023

आमचे सहकारी उपायुक्त पोलिस दल गुन्हे शाखा आदरणीय श्री अमोलजी झेंडे साहेब यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट - मित्र परिवारा सोबत साहेबांना शुभेछा देताना- मी , आमचे मित्र अनिलशेठ कामठे , भिवरी गावचे चेअरमन वि.का.सेवा. सोसायटी.धोंडिबा शेठ कटके , श्री विकास आप्पा कामठे पाटील .

 . 🏏🏏🏏🏏 🏏👑👑👑👑👑❤️❤️कोंढवा स्पोर्ट्स क्लब आयोजित कोंढवा प्रीमियर लीग चॅम्पियन ट्रॉफी 2023 - कोंढवा ब्लास्टर संघ विजयी ..को...
08/03/2023

. 🏏🏏🏏🏏 🏏👑👑👑👑👑❤️❤️

कोंढवा स्पोर्ट्स क्लब आयोजित कोंढवा प्रीमियर लीग चॅम्पियन ट्रॉफी 2023 - कोंढवा ब्लास्टर संघ विजयी ..

कोंढवा स्पोर्ट्स क्लब ने आस्करवाडी येथील संमगीर स्पोर्ट्स मै दांनावर पाच सामन्यांच्या साखळी पद्धतीत कोंढवा ब्लास्टर संघाचा सचिन गुंड कर्णधार आणि अमोल काळभोर उपकर्णधार असताना कोंढवा ब्लास्टर संघाने ने कोंढवा वॉरियर्स संघावर मात करत फायनल चॅम्पियन ट्रॉफी 2023 चषकावर बाजी मारून विजयाचा बहुमान मिळविला .
💥🔥💥🔥💥
याला म्हणतात आनंद ! याला म्हणतात जल्लोष !
याला म्हणतात प्रेरणा ! याला म्हणतात कसब !
याला म्हणतात चिकाटी आणि जिद्द ! याला म्हणतात प्रयत्नांची पराकाष्ठा!
याला म्हणतात सामर्थ्य! याला म्हणतात एकीचे बळ!
याला म्हणतात अनुभव! याला म्हणतात शर्थ!
यालाच म्हणतात दुर्दम्य इच्छाशक्ती !!
या सगळ्याचा वापर करून टीम स्पिरीटच्या जोरावर यश खेचून आणंने यालाच विजय म्हणतात ..👍👍👍✌️✌️🔥🔥
आमच्या कोंढवा ब्लास्टर टीमच्या सर्व खेळाडूं सर्व - अमोल काळभोर , जय ललवाणी, प्रदीप कामठे , रमेश राठोड , विक्की जॉन , सोमनाथ घोमन , ऋषी कामठे, दत्ता सुरवसे ., नरेंद्र हसनाळे,गणेश (मॉडेल) कामठे, हसन,अमोल, क्षीरसागर,माणिक पाटील -आपल्या टीम साठी सर्व हेवेदावे बाजूला ठेवत- जे वैयक्तिक 100% योगदान दिले .. जे सांगिक एक्य दाखविले.. विशेष म्हणजे सर्वच टीमच्या खेळाडूंनी सामना जिंकावा म्हणून जी मोलाची कामगिरी केली त्याबद्दल सर्वांचे खरच कौतुक ,मनापासून आभार आणि जिंकल्याबदल अभिनंदन!🙏🙏🙏🙏

11/11/2021
25/10/2021
26/07/2021

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sachin Gund posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category


Other Event Planners in Pune

Show All

You may also like