शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी,पुणे

  • Home
  • India
  • Pune
  • शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी,पुणे

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी,पुणे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी,पुणे, Performance & Event Venue, 273 Kasba Peth, Pune.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणिसेवा मित्र मंडळ, पुणे आयोजित।। पुणे कीर्तन महोत्सव ।।वर्ष १५ वे३,४,५ डिसेंबर २०२३अयोध्ये...
04/12/2023

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि
सेवा मित्र मंडळ, पुणे आयोजित
।। पुणे कीर्तन महोत्सव ।।
वर्ष १५ वे
३,४,५ डिसेंबर २०२३
अयोध्येतील श्रीराम मंदिर पुनर्निर्माणानिमित्त
।। श्रीरामकथा ।।
सोमवार दि. ४ डिसेंबर २०२३
विशेष सन्मान -
ह.भ.प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे
मा.डॉ. केशवचैतन्य कुंटे
मा. आकाश मावळे

कीर्तनकार - ह.भ.प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे

सायं ठीक ६.०० वाजता
स्थळ - ऐतिहासिक लाल महाल, कसबा पेठ, पुणे

सर्वांनी आवर्जून या..

मनःपूर्वक धन्यवाद!

आपली नम्र,
कु. अक्षदा वि. इनामदार
समन्वयक, पुणे कीर्तन महोत्सव २०२३

Aacharya Shahir Hemantraje Mavale
Seva Mitra Mandal - सेवा मित्र मंडळ

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणिसेवा मित्र मंडळ, पुणे आयोजित।। पुणे कीर्तन महोत्सव ।।वर्ष १५ वे३,४,५ डिसेंबर २०२३अयोध्ये...
03/12/2023

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि
सेवा मित्र मंडळ, पुणे आयोजित
।। पुणे कीर्तन महोत्सव ।।
वर्ष १५ वे
३,४,५ डिसेंबर २०२३
अयोध्येतील श्रीराम मंदिर पुनर्निर्माणानिमित्त
।। श्रीरामकथा ।।
आज उद्घाटन समारोह!
उद्घाटक -
मा.डॉ. प्रवीण दबडघाव
( प्रांत कार्यवाह रा.स्व.संघ पश्चिम महाराष्ट्र )
मा. राजकुमार अगरवाल
( अध्यक्ष श्री. महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, पुणे )

कीर्तनकार - ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर, पुणे

सायं ठीक ६.०० वाजता
स्थळ - ऐतिहासिक लाल महाल, कसबा पेठ, पुणे

सर्वांनी आवर्जून या..

मनःपूर्वक धन्यवाद!

आपली नम्र,
कु. अक्षदा वि. इनामदार
समन्वयक, पुणे कीर्तन महोत्सव २०२३
Aacharya Shahir Hemantraje Mavale
Seva Mitra Mandal - सेवा मित्र मंडळ

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे सेवा मित्र मंडळ, पुणे आयोजित।। पुणे कीर्तन महोत्सव २०२३ ।।वर्ष १५ वेअयोध्येतील श्रीरा...
02/12/2023

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे
सेवा मित्र मंडळ, पुणे आयोजित
।। पुणे कीर्तन महोत्सव २०२३ ।।
वर्ष १५ वे
अयोध्येतील श्रीराम मंदिर पुनर्निर्माणानिमित्त
।। श्रीरामकथा ।।
३ ते ५ डिसेंबर २०२३, सायं ६ वाजता.
स्थळ - ऐतिहासिक लाल महाल, कसबा पेठ, पुणे ११

तिन्ही दिवसांची एकत्र पत्रिका पाठवत आहोत.
प्रवेश विनामूल्य.

आपणा सर्वांना अगत्याचे निमंत्रण!
कृपया ही पोस्ट अधिकाधिक कीर्तन श्रोत्यांपर्यंत पोहचवावी ही नम्र विनंती..

आपली नम्र,
कु. अक्षदा वि इनामदार
समनव्ययक , पुणे कीर्तन महोत्सव २०२३
🙏🏻🙏🏻🙏🏻
Aacharya Shahir Hemantraje Mavale
Seva Mitra Mandal - सेवा मित्र मंडळ

।। शृंखला शाहिरी रचनांची ।।पोवाडा - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांचा कार्यगौरव..https://youtu.be/Rf4pX...
11/10/2023

।। शृंखला शाहिरी रचनांची ।।

पोवाडा - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांचा कार्यगौरव..
https://youtu.be/Rf4pXMAPIIA

२०१७ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातील प्रतिथयश अशा संगीत महोत्सवात आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांचा शाहिरी कार्यक्रम प्रस्तुत झाला होता. त्या वेळी ट्रस्ट च्या कार्यगौरवावर लिहिलेला पोवाडा खास आकर्षण ठरला होता.
तोच पोवाडा, तेच २०१७ सालचे दृष्यचित्रण श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांच्या सौजन्याने खास आपल्या चॅनेलवर सुरू असलेल्या शाहिरी रचनांच्या शृंखलेतील दहावे पुष्प म्हणून प्रसारित करत आहोत..

रचनाकर्ते व सादरकर्ते -
आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे व सहकारी
उपक्रम आवडल्यास जरूर सर्वांपर्यंत व्हिडीओ पोहचवा!

Aacharya Shahir Hemantraje Mavale

पोवाडा - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांचा कार्यगौरव..२०१७ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनि....

।। शृंखला शाहिरी रचनांची ।।पुण्याचा पोवाडा..https://youtu.be/Wu1PgWvS3zIजे स्वतःला पक्के पुणेकर समजतात अशांनी तर ऐकाच - ...
11/09/2023

।। शृंखला शाहिरी रचनांची ।।

पुण्याचा पोवाडा..
https://youtu.be/Wu1PgWvS3zI

जे स्वतःला पक्के पुणेकर समजतात अशांनी तर ऐकाच - आणि हो टीकाकारांनी सुद्धा!

शाहिरी रचनांमधून वीरांच्या पराक्रमाचा इतिहास सांगितला आहेच पण याच परंपरेत स्थान वर्णनाचे सुद्धा पोवाडे रचले गेले आहेत. अशाच या 'आपल्या पुण्यावरचा' हा पोवाडा..

आज ११ सप्टेंबर २०२३. गुरुवर्य शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या पंचवीसाव्या स्मृतिदिनानिमित्त सुरू असलेल्या या शाहिरी रचनांच्या शृंखलेतील नववे पुष्प!

शृंखलेतील नववे पुष्प :
पुण्याचा पोवाडा..

रचनाकर्ते व सादरकर्ते :
आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे व सहकारी

यु-ट्यूब व्हिडिओची लिंक :
https://youtu.be/Wu1PgWvS3zI

ही परंपरा जतन व्हावी यासाठी हा उपक्रम सुरू आहे.
उपक्रम आवडल्यास कृपया आपल्या परिचितांना लिंक जरूर पाठवावी!

Aacharya Shahir Hemantraje Mavale

Punyacha Powada ( पुण्याचा पोवाडा )Written & Performed by :Aacharya Shahir Hemantraje P. MavaleLead Vocal -Aacharya Shahir Hemantraje P. MavaleBacking Vocals...

https://youtu.be/R-F1hvLYHrgकै. शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या '९४ व्या' जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!कै. शाहीररत्न किसन...
18/08/2023

https://youtu.be/R-F1hvLYHrg

कै. शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या
'९४ व्या' जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

कै. शाहीररत्न किसनराव हिंगे यांचे १९८८ सालचे अत्यंत दुर्मिळ दृष्यचित्रण!

जरूर ऐका..
आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राइब करा.


Aacharya Shahir Hemantraje Mavale

कै. शाहीररत्न किसनराव हिंगे यांचे १९८८ सालचे अत्यंत दुर्मिळ दृष्यचित्रण..१९८८ साली शाहीर हिंगे यांचे गुरू कै. शाह....

आंतरशालेय पोवाडा गायन स्पर्धा २०२३ अत्यंत उत्साहात संपन्न!बुधवार दि. १६ ऑगस्ट २०२३ रोजी शाहीररत्न किसनराव हिंगे जयंती नि...
17/08/2023

आंतरशालेय पोवाडा गायन स्पर्धा २०२३ अत्यंत उत्साहात संपन्न!
बुधवार दि. १६ ऑगस्ट २०२३ रोजी शाहीररत्न किसनराव हिंगे जयंती निमित्त शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने 'आंतरशालेय पोवाडा गायन स्पर्धा २०२३' अतिशय उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेचे हे ९ वे वर्ष होते. एकूण २५ संघांनी या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली.
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी संस्कार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री मा. श्री. अभिजीतदादा गोखले, संस्कार भारती पश्चिम प्रांत महामंत्री मा. श्री. सतीश कुलकर्णी, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या कार्याध्यक्षा मा. सौ. संगीता हे. मावळे आणि अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून युवा संगीतकार द्वय 'हर्ष - विजय' यांनी काम पाहिले. त्याचबरोबर सुप्रसिद्ध अभिनेत्री नुपूर दैठणकर यांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे ;
छोटा गट :
प्रथम क्रमांक : पोदार इंटरनॅशनल स्कुल, आंबेगाव, पुणे
द्वितीय क्रमांक : ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, सदाशिव पेठ, पुणे
तृतीय क्रमांक : न्यू. इंग्लिश स्कुल रमणबाग, पुणे

मोठा गट :
प्रथम क्रमांक : रेणुका स्वरूप प्रशाला, पुणे
द्वितीय क्रमांक : मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे
तृतीय क्रमांक : आहिल्यादेवी प्रशाला, पुणे

लक्षवेधी सादरीकरण : अभिनव इंग्लिश स्कुल ( सी. बी. एस. ई )

विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

वीररसाने भारून गेलेले वातावरण, फेटे बांधलेल्या, बाराबंदी घातलेल्या, नऊवारी साडी नेसलेल्या ३०० हुन आधिक विद्यार्थ्यांची रेलचेल, सादरीकरणांमधील चढाओढ आणि शाळेला बक्षीस मिळवून देण्यासाठी चाललेली प्रत्येक विद्यार्थ्याची तळमळ हीच पोवाडा गायन स्पर्धेतील सार्थकता!

धन्यवाद.


Aacharya Shahir Hemantraje Mavale

स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🙏🏻🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻🙏🏻https://youtu.be/VIKkgRcvQAkराजधानी दिल्ली, संगीत नाटक अकादमी ...
15/08/2023

स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
🙏🏻🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻🙏🏻
https://youtu.be/VIKkgRcvQAk

राजधानी दिल्ली, संगीत नाटक अकादमी आणि माझा पोवाडा..
ऐकूयात स्वातंत्र्य दिन विशेष अनुभव कथन आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांचे..

लिंक वर क्लिक करा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राइब जरूर करा!

मनःपूर्वक धन्यवाद.

Aacharya Shahir Hemantraje Mavale

आचार्य अत्रे यांना पोवाडा आणि रंगावलीतून मानवंदना शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी चा पुढाकार ; अत्रे यांची १२५ वी जयंती.जन्...
13/08/2023

आचार्य अत्रे यांना पोवाडा आणि रंगावलीतून मानवंदना शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी चा पुढाकार ; अत्रे यांची १२५ वी जयंती.

जन्मुनी मराठी मुलखात, झाले विख्यात, ठेवा लक्षात,
प्र.के.अत्रे माहीर जगताला,
संयुक्त महाराष्ट्र लढा लढला,
शाहिराला विसर नाही पडला…
अशा शब्दांत आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी आचार्य अत्रे यांच्यावरील स्वरचित पोवाडा विद्यार्थ्यांसमोर सादर केला. आचार्य अत्रे यांना शाहिरांनी पोवाडयातून आणि रंगावली कलाकारांनी रंगावलीतून आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे, राष्ट्रीय कला अकादमी पुणे आणि न्यू एज्युकेशन सोसायटीची आगरकर प्रशाला यांच्या वतीने संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे अग्रणी व आगरकर प्रशालेचे संस्थापक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने प्रशालेत आचार्य अत्रे यांच्या भव्य रांगोळीचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी न्यू एज्युकेशन सोसायटीचे डॉ. गिरीश धडपळे, विश्वास कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता लोणकर आदी उपस्थित होते. अरुण कुमार बाभूळगावकर, अक्षदा इनामदार, डॉ. मृणालिनी दुसाने, प्रतीक यादव, होनराज मावळे (हार्मोनियम), मुकुंद कोंडे (ढोलकी) यांनी साथसंगत केली. राष्ट्रीय कला अकादमीचे अमर लांडे यांनी रंगावली साकारली.
महाराष्ट्र गौरव प्र. के. अत्रे यांच्या प्रतिमा पूजनानंतर त्यांच्या जीवन गौरवपर आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी रचलेला पोवाडा सादर केला. यावेळी शाहिरांनी पोवाडयाद्वारे आचार्य अत्रे यांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला. पोवाडा लिहिलेली प्रतिमा शाळेला भेट देण्यात आली.

Aacharya Shahir Hemantraje Mavale

https://youtu.be/P2fXSefOVwE।। शृंखला शाहिरी रचनांची ।।आज ११ ऑगस्ट २०२३. गुरुवर्य शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या पंचवीस...
11/08/2023

https://youtu.be/P2fXSefOVwE
।। शृंखला शाहिरी रचनांची ।।

आज ११ ऑगस्ट २०२३. गुरुवर्य शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या पंचवीसाव्या स्मृतिदिनानिमित्त सुरू असलेल्या या शाहिरी रचनांच्या शृंखलेतील आठवे पुष्प!

शृंखलेतील आठवे पुष्प :
पोवाडा : १८५७ चे स्वातंत्र्यसमर

रचनाकर्ते व सादरकर्ते :
आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे व सहकारी

Aacharya Shahir Hemantraje Mavale

https://youtu.be/Y9tqLnHq-wQआणि मोदीजींनी मला 'घड्याळ' दाखवलं!२००३ साली शिवतृतीयेला किल्ले शिवनेरी येथे *शिवजयंती उत्सवा...
01/08/2023

https://youtu.be/Y9tqLnHq-wQ

आणि मोदीजींनी मला 'घड्याळ' दाखवलं!
२००३ साली शिवतृतीयेला किल्ले शिवनेरी येथे *शिवजयंती उत्सवाला मा. नरेंद्र मोदी प्रमुख अतिथी* म्हणून उपस्थित होते. त्यावेळी घडलेला हा प्रसंग!
ऐकूयात अनुभव कथन आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांचे..

लिंक वर क्लिक करा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा!


Aacharya Shahir Hemantraje Mavale

https://youtu.be/H7JK7qryuFsकारगिल आणि माझा पोवाडा..पंचवीस वर्षांपूर्वी अशी होती परिस्थिती..आज या पोवाड्याला पंचवीस वर्ष...
26/07/2023

https://youtu.be/H7JK7qryuFs

कारगिल आणि माझा पोवाडा..
पंचवीस वर्षांपूर्वी अशी होती परिस्थिती..
आज या पोवाड्याला पंचवीस वर्षे पूर्ण झाली!
ऐकूयात अनुभव कथन..
आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे यांचे.

लिंक वर क्लिक करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा!

मनःपूर्वक धन्यवाद.

Aacharya Shahir Hemantraje Mavale

रौप्यमहोत्सवी कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा..माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय माध्यमिक विभाग, सैनिक मित्र परिवार आण...
25/07/2023

रौप्यमहोत्सवी कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा..
माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय माध्यमिक विभाग, सैनिक मित्र परिवार आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २५ जुलै २०२३ रोजी कारगिल विजय दिवसाच्या पूर्वसंध्येला प्रशालेच्या गणेश सभागृहात कारगिल विजय दिवसाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. देशभक्तीने भारून गेलेल्या या वातावरणात आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी स्वरचित कारगिलचा रणसंग्राम हा पोवाडा गाऊन मुलांच्या मनात व सर्व उपस्थितांच्या मनात राष्ट्रभक्तीची मशाल चेतवली. या प्रसंगी कारगिल युद्धात प्रत्यक्षात युद्ध केलेल्या महावीरांपैकी निवृत्त नाईक मा. श्री. रमेश पुरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर निवृत्त ब्रिगेडियर मा. श्री. प्रसाद जोशी, मा. श्री. बंडोपंत कुलकर्णी, मा. श्री. मिलिंद कांबळे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. वासंती बनकर, सैनिक मित्र परिवार चे प्रमुख मा. श्री. आनंद सराफ आणि प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे उपस्थित होते. भारतमाता की जय अशा घोषणा देऊन मुलांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. पोवाडा ऐकताना आणि प्रमुख पाहुण्यांचे कारगिल युद्धातील अनुभव ऐकताना भावुक झालेले आणि राष्ट्रप्रेमाने भारावलेले चेहरे हीच आजच्या कार्यक्रमाची सार्थकता होय!
मनःपूर्वक धन्यवाद.

Aacharya Shahir Hemantraje Mavale Anand Saraf MadhavSadashiv GolwalkarSchool

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी आयोजितआंतरशालेय पोवाडा गायन स्पर्धा २०२३ बुधवार दिनांक १...
23/07/2023

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी आयोजित

आंतरशालेय पोवाडा गायन स्पर्धा २०२३

बुधवार दिनांक १६ ऑगस्ट २०२३ रोजी

आधिक माहितीसाठी पोस्टर पहा, आजच संपर्क करा आणि आपल्या परिचित शाळांपर्यंत, शिक्षकांपर्यंत ही माहिती पोहचवा..

मनःपूर्वक धन्यवाद!

Aacharya Shahir Hemantraje Mavale Shahir Hemantraje Mavale

।। गर्जली मऱ्हाठी शाहिरी ।।आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे यांनी रचलेल्या निवडक २५ शाहिरी रचनांचा ग्रंथ.किंमत : १५०/- फ...
20/07/2023

।। गर्जली मऱ्हाठी शाहिरी ।।
आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे यांनी रचलेल्या निवडक २५ शाहिरी रचनांचा ग्रंथ.
किंमत : १५०/- फक्त..

पोवाडे म्हणायला सोपे असावेत हा हेतू घेऊन *क्यूआर कोड च्या माध्यमातून पोवाड्यांच्या चाली ऐकायला मिळणारा महाराष्ट्रातील पहिला शाहिरी ग्रंथ.
लवकरात लवकर आपली प्रत घ्या..

पोस्टर मध्ये गुगल पे नंबर आणि स्कॅनर सुद्धा दिला आहे!

आपल्या भरगोस प्रतिसादाबद्दल आभार..

Aacharya Shahir Hemantraje Mavale
Shahir Hemantraje Mavale

अतिशय अविस्मरणीय कार्यक्रम..सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन, महाराष्ट्र साहित्य परिषद आण...
18/07/2023

अतिशय अविस्मरणीय कार्यक्रम..
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्या संयुक्तविद्यमाने आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे रचित 'गर्जली मऱ्हाठी शाहिरी' या शाहिरी रचनांच्या ग्रंथावर दि. १८ जुलै २०२३ रोजी परिसंवाद संपन्न झाला. यावेळी प्रबोधिनीच्या महिला सेवाव्रतींनी महाराष्ट्र गीत व महाराष्ट्राची परंपरा या रचनांचे सादरीकरण केले. या प्रसंगी व्यासपीठावर मा. पांडुरंगजी बलकवडे, मा. मिलिंद जोशी, मा. रवींद्र शिंगणापूरकर, मा. सुनील भंडगे, मा. सौ सुनीताराजे पवार, मा. सौ माई आणि आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे हे उपस्थित होते.
शाहिरी क्षेत्रातील अनेक अभ्यासक, अनेक शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शास्त्रीय संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकार, अभ्यासू रसिक प्रेक्षक यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.
मनःपूर्वक धन्यवाद!

Aacharya Shahir Hemantraje Mavale

मनापासून अभिनंदन..🙏🏻🙏🏻    Aacharya Shahir Hemantraje Mavale
17/07/2023

मनापासून अभिनंदन..
🙏🏻🙏🏻
Aacharya Shahir Hemantraje Mavale

परिसंवादाला आपली उपस्थिती स्वागतार्ह आहे.
17/07/2023

परिसंवादाला आपली उपस्थिती स्वागतार्ह आहे.

।। शृंखला शाहिरी रचनांची ।।दि. ११ जुलै २०२३. गुरुवर्य शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या पंचवीसाव्या स्मृतिदिनानिमित्त सुरू...
12/07/2023

।। शृंखला शाहिरी रचनांची ।।

दि. ११ जुलै २०२३. गुरुवर्य शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या पंचवीसाव्या स्मृतिदिनानिमित्त सुरू असलेल्या या शाहिरी रचनांच्या शृंखलेतील सातवे पुष्प!

शृंखलेतील सातवे पुष्प :
पोवाडा : कारगिल रणसंग्राम..

रचनाकर्ते व सादरकर्ते :
आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे व सहकारी

यु-ट्यूब व्हिडिओची लिंक :
https://youtu.be/zYeo2Tjr-5g

उपक्रम आवडल्यास कृपया आपल्या परिचितांना लिंक जरूर पाठवावी!

Powada : Kargil Ransangram ( कारगिल रणसंग्राम )Written & Performed by :Aacharya Shahir Hemantraje P. MavaleLead Vocal -Aacharya Shahir Hemantraje P. MavaleBa...

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे।। गुरुपूजन सोहळा २०२३ ।।सोमवार दि. ३ जुलै २०२३ रोजी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचा 'ग...
05/07/2023

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे
।। गुरुपूजन सोहळा २०२३ ।।
सोमवार दि. ३ जुलै २०२३ रोजी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचा 'गुरुपूजन सोहळा' संपन्न झाला.
प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे यांनी श्री दत्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्याचबरोबर 'नानिवडेकर-हिंगे-मावळे' या शाहिरी घराण्यातील मुळपुरुष कै. शाहीर म.ना. नानिवडेकर त्याचबरोबर घराण्याचा विस्तृत पातळीवर प्रचार, प्रसार करणारे द्रष्टे व आचार्यांचे गुरू शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्याही प्रतिमेचे पूजन केले.
यानंतर उपस्थित असणाऱ्या सुमारे १५० सेवाव्रतींनी गुरुपूजन केले व गुरूंप्रति श्रद्धाभाव व्यक्त करण्यासाठी विविध शाहिरी रचनांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाची काही क्षणचित्रे प्रसारित करत आहोत!

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे       ।। गुरुपूजन सोहळा ।।नानिवडेकर-हिंगे-मावळे शाहिरी घराण्याची गुरुपौर्णिमा..कै. शा...
02/07/2023

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे
।। गुरुपूजन सोहळा ।।
नानिवडेकर-हिंगे-मावळे शाहिरी घराण्याची गुरुपौर्णिमा..

कै. शाहीर नानिवडेकर आणि कै. शाहीर हिंगे यांच्या प्रतिमेचे पूजन व गुरूदक्षिणा समर्पण.
'शाहिरी दरबार'
शाहिरी रचनांचे सादरीकरण

प्रबोधिनीतील सर्व सेवाव्रतींना
( आजी - माजी प्रशिक्षणार्थींना )
आग्रहाचे निमंत्रण!

सोमवार दि. ३ जुलै २०२३
स्थळ : न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, कलाग्राम दालन, शनिवार पेठ, पुणे ३०
वेळ : सायं. ७.०० ते ९.००

आपले नम्र,
प्रबोधिनी शिष्य परिवार

निरंतर पोवाडा प्रशिक्षण वर्ग २०२३ उद्घाटन सोहळाउद्घाटन हस्ते : डॉ. पं. केशव गिंडेज्येष्ठ वेणूवादक व गुरूप्रमुख उपस्थिती ...
02/07/2023

निरंतर पोवाडा प्रशिक्षण वर्ग २०२३ उद्घाटन सोहळा
उद्घाटन हस्ते :
डॉ. पं. केशव गिंडे
ज्येष्ठ वेणूवादक व गुरू
प्रमुख उपस्थिती :
मा. श्री. मिलिंद कांबळे
नियामक मंडळ परिषद सदस्य
( डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे)
अध्यक्ष :
आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे
कार्यक्रमाची काही क्षणचित्रे प्रसारित करत आहोत.

।। शृंखला शाहिरी रचनांची ।।दिनांक ११ जून २०२३. गुरुवर्य शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या पंचवीसाव्या स्मृतिदिनानिमित्त सु...
12/06/2023

।। शृंखला शाहिरी रचनांची ।।

दिनांक ११ जून २०२३. गुरुवर्य शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या पंचवीसाव्या स्मृतिदिनानिमित्त सुरू असलेल्या या शाहिरी रचनांच्या शृंखलेतील सहावे पुष्प!

शृंखलेतील सहावे पुष्प :
पोवाडा : राजमाता जिजाबाई यांचा..

रचना :
कै. शाहीररत्न किसनराव हिंगे

सादरकर्ते :
आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे व सहकारी

यु-ट्यूब व्हिडिओची लिंक :
https://youtu.be/cESfXV1yl1A

उपक्रम आवडल्यास कृपया आपल्या परिचितांना लिंक जरूर पाठवावी!

Powada : Rajmata Jijabai ( राजमाता जिजाबाई )Written by - Late. Shahir Kisanrao HingePerformed by - Aacharya Shahir Hemantraje P. MavaleLead Vocal -Aacharya S...

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे आणिपुणे पीपल्स को.ऑप. बँक लि. पुणे आयोजित।। अखंड कीर्तनमाला २०२३ ।।दिनांक : १३ जून, म...
11/06/2023

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे आणि
पुणे पीपल्स को.ऑप. बँक लि. पुणे आयोजित

।। अखंड कीर्तनमाला २०२३ ।।

दिनांक : १३ जून, मंगळवार.
वेळ : सकाळी ८.०० ते रात्री ८.००
स्थळ : ऐतिहासिक लाल महाल, कसबा पेठ, पुणे ४११०११

निमंत्रण पत्रिका पाठवीत आहोत.
आपण नक्की या व कृपया पत्रिका इतरांनाही पाठवा!

।। शाहीर हिंगे स्मृतीदिन समारोह ।।दि. १ जून २०२३ गुरुवारसायं - ६.०० वाजता.स्थळ : सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर, प...
31/05/2023

।। शाहीर हिंगे स्मृतीदिन समारोह ।।

दि. १ जून २०२३ गुरुवार
सायं - ६.०० वाजता.
स्थळ : सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर, पुणे

प्रमुख उपस्थिती :
मा. डॉ. रवींद्र भारती
( सदस्य : संस्कार भारती अखिल भारतीय केंद्रीय कार्यकारिणी )
मा. आमदार रवींद्र धंगेकर
( कसबा विधानसभा मतदार संघ )
मा. महेश सूर्यवंशी
( कोषाध्यक्ष : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे )

कार्यक्रम पत्रिका सोबत पाठवत आहोत त्यात कार्यक्रमाविषयी अधिक तपशील पहायला मिळतील.

आपले नम्र,
श्री. अरुणकुमार के. बाभूळगांवकर
( सचिव : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी )
होनराज हेमंतराजे मावळे
( व्यवस्थापक : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी )

।। गर्जली मऱ्हाठी शाहिरी ।।शाहिरी रचनांचा ग्रंथरचनाकार : आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळेप्रकाशन सोहळा :शनिवार २७ मे २०२...
24/05/2023

।। गर्जली मऱ्हाठी शाहिरी ।।
शाहिरी रचनांचा ग्रंथ
रचनाकार : आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे

प्रकाशन सोहळा :
शनिवार २७ मे २०२३

कृपया दुपारी ३.३० ते ५.३० कार्यक्रमासाठी वेळ राखून ठेवा!

प्रकाशन हस्ते ?
सांगतो लवकरच!

शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचेच पट्टशिष्य आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे यांच्या निवडक २५ शाहिरी रचनांचा हा ग्रंथ प्रकाशित होत आहे..

आजच आपली प्रत नोंदवा!
बरोबर पाठवलेल्या पत्रकात बाकी तपशील आहेतच!

धन्यवाद.

आपला नम्र,
श्री. अरुणकुमार के. बाभूळगांवकर
सचिव : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे

20/05/2023

अवश्य या!

सप्रयोग विचार मंथनराष्ट्रीय कीर्तन व राष्ट्रीय शाहिरी यातील समन्वयसादरकर्ते :राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेआणिआचार्य ...
20/05/2023

सप्रयोग विचार मंथन
राष्ट्रीय कीर्तन व राष्ट्रीय शाहिरी यातील समन्वय

सादरकर्ते :
राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे
आणि
आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे

उद्या, सकाळी ९.३० वाजता!

सोबत पत्रिका सुद्धा पाठवतो आहे..

।। शृंखला शाहिरी रचनांची ।।आज ११ मे २०२३. गुरुवर्य शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या पंचवीसाव्या स्मृतिदिनानिमित्त सुरू अस...
11/05/2023

।। शृंखला शाहिरी रचनांची ।।

आज ११ मे २०२३. गुरुवर्य शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या पंचवीसाव्या स्मृतिदिनानिमित्त सुरू असलेल्या या शाहिरी रचनांच्या शृंखलेतील पाचवे पुष्प!

शृंखलेतील पाचवे पुष्प :
पोवाडा : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा..

रचना :
कै. शाहीररत्न किसनराव हिंगे

सादरकर्ते :
आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे व सहकारी

यु-ट्यूब व्हिडिओची लिंक :
https://youtu.be/Y51ttnOEOP8

उपक्रम आवडल्यास कृपया आपल्या परिचितांना लिंक जरूर पाठवावी!

Powada : Punnyashloak Ahilyabai Holkar ( पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर )Written by - Late. Shahir Kisanrao HingePerformed by - Aacharya Shahir Hemantraje P. Ma...

Address

273 Kasba Peth
Pune
411011

Telephone

+919422029247

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी,पुणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी,पुणे:

Videos

Share


Other Performance & Event Venues in Pune

Show All

You may also like