12/05/2022
कृषी मित्र इव्हेंटस (मुंबई)द्वारे विनंती करतो की ऑक्टोबर २०१९ ला ऍग्रो इंडिया २०१९ नावाने कृषी प्रदर्शन भरवण्यात आले होते. या कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादामुळे या वर्षी कृषि विभाग व कृषिमित्र द्वारे "बीज महोत्सव २०२२” या नावाने माननीय श्री.संदीपानजी भुमरेसाहेब(पालकमंत्री,यवतमाळ) यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उदघाटन करण्याचे ठरले आहे.
“बीज महोत्सव २०२२” चे उद्देश ऍग्री सीड्स कंपन्यांना जून मधल्या पेरणीच्या आधी सर्व नव नवीन सीड्स कंपन्यांची माहिती होईल, त्या बरोबर इतर पेस्टीसाईड, फर्टीलायझर,शेती विषयक औजारे या कंपन्यांना कडून माहिती व मार्गदर्शन या कार्यक्रमा द्वारे ५०ते ७५ हजार शेतकऱ्यांच्या उपस्थित मिळेल.
मागील व या वर्षी शेता मधील शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकविलेल्या शेतमालाचे उत्पादन ज्वारी, तुर डाळ , गहू, नाचणी, इतर कड धान्य थेट ग्राहकांपर्यंत पोहचण्याकरिता धान्य महोत्सव असणार.
ग्रामीण भागातील शेतकरी महिला बचत गट व इतर उत्पादनांचे स्टॉल ठेवण्यात येईल.शेतकऱ्यांजवळ उतम प्रकारचे पशुपक्षी या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात येणार आहे. व त्यांना योग्य बक्षीस देण्यात येईल.या कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा,चर्चासत्रे,तंत्रज्ञान विषयक माहिती मिळेल आणि सरपंच परिषद ,प्रगतीशील शेतकऱ्यांचा गौरव,उत्कृष्ट महिला बचतगटांचा गौरव, सांस्कृतिक कार्यक्रम व गौरव करण्यात येईल.
कृषी मित्र इव्हेंटस ही कंपनी शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी अग्रेसर असते.11 वर्षा पासून भव्य राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे व्यवस्थापन केले आहे.