28/03/2021
#मराठवाड्याच्या #संगीत #क्षेत्रातील #वैभव , #प्रसन्न #व्यक्तिमत्त्व, #बंदिशकार #जेष्ठ #संगीततज्ज्ञ, #गुरू #हरपले..😔🙏
आज आदरणीय पंडित नाथराव नेरळकर गुरूजी यांचे दुःखद निधन झाले,
भारत सांस्कृतिक मंत्रालय, संगीत नाटक अकादमीच्या #जीवन #गौरव पुरस्काराने सन्मानित आदरणीय गुरुवर्य पं. नेरलकर गुरुजी यांना औरंगाबाद येथे वृद्धापकाळाने देवाज्ञा झाली,
Shruti naad #संगीत #प्रतिष्ठान #लातूर तर्फे
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
🌼🌼🙏🙏😓
*मराठवाड्यातील जेष्ठ गायक तथा शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि भावसंगीतकार पंडित नाथराव नेरळकर यांचे औरंगाबाद येथे वृद्धापकाळाने निधन झाले.*
*पंडित नाथराव नेरळकर यांचा अल्पपरिचय.*
जन्म.११ ऑगस्ट १९३५ नांदेड येथे.
कृष्णनाथ गणपती नेरळकर ऊर्फ नाथराव नेरळकर यांचे वडील धर्माबाद येथील धनगिरिराज गिरणीत कार्यवाह म्हणून नोकरी करत असत. नाथराव यांचे काका धोंडोपंत यांना संगीताची आवड होती व ते मराठवाड्यातील गायनाचार्य पं.अण्णासाहेब गुंजकर यांचे शिष्य होते. त्यांच्या प्रोत्साहनाने १९४७ पासून कृष्णनाथही गुंजकरांच्या संगीतशाळेत गायन शिकू लागले. लवकरच त्यांनी गायनात प्राविण्य मिळवले. शालेय वयातच त्यांनी नकला, गाणी यांनी रंगभूमी गाजवायला आरंभ केला. त्यांनी १९५७ साली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची ‘संगीत विशारद’ ही पदवी ‘विष्णू दिगंबर पारितोषिका’सह मिळवली.
आरंभीच्या काळात कृष्णनाथ नेरळकरांनी ‘सौभद्र’, ‘शारदा’, ‘मानापमान’, ‘कुलवधू’, ‘सुवर्णतुला’, ‘देवमाणूस’, ‘देव नाही देव्हार्यादत’, ‘सोन्याचा कळस’ या संगीत नाटकांतून भूमिका व गायन यशस्वीपणे केले. त्यांंनी मराठी अभंग, गझल, भावगीते स्वरबद्ध करून त्यांचे ‘शाम-ए-गझल’सारखे कार्यक्रमही केले. मराठवाड्याखेरीज मुंबई, पुणे, कोल्हापूर, भोपाळ, बडोदा (वडोदरा), दिल्ली, कलकत्ता (कोलकाता), हैदराबाद, इ. ठिकाणच्या महोत्सवांत त्यांनी गायन केले. एच.एम.व्ही.ने त्यांच्या गायनाची ध्वनीफीत वितरित केली होती, तसेच महाराष्ट्र शासनाच्या ‘मराठवाडा मुक्ती संग्राम’, ‘साक्षरता अभियान’ अशा ध्वनीफीतसंचांसाठी त्यांनी संगीत दिग्दर्शनही केले. अनेक प्रचलित रागांसह कृष्णकल्याणसारख्या अप्रचलित रागांत व पंचमसवारीसारख्या अनवट तालांत त्यांनी ढंगदार बंदिशी बांधल्या असून त्या ‘मितवा’ या संग्रहातून प्रसिद्धही केल्या आहेत. प्रभाकर कारेकर, श्रीकांत देशपांडे, आरती अंकलीकर इ. कलाकारांनी त्या मैफलींतून सादरही केल्या आहेत.
कृष्णनाथ नेरळकरांनी नांदेड येथे १९६४ पासून संगीतसभांचे आयोजन सुमारे दहा वर्षे केले, मग औरंगाबाद येथे युवक महोत्सव सुरू केला. तेरखडे हे गाव सांगीतिक विकासासाठी दत्तक घेतले. त्यांनी मराठवाडा संगीत प्रसारक मंडळाची स्थापनाही केली.
संगीत मैफलींच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलावंत नांदेडला येत आणि मितभाषी नाथरावांच्या प्रेमात पडत. या मितभाषी स्वभावामुळे, साहित्य व संगीत क्षेत्रातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, श्री. ना. पेंडसे, प्राचार्य राम शेवाळकर, हिराबाई बडोदेकर, गंगूबाई हनगल, पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, शोभा गुर्टू, किशोरी आमोणकर, पं. जितेंद्र अभिषेकी, संगीतकार यशवंत देव, हार्मोनियम वादक आप्पा जळगावकर, पं. जसराज, बकुळ पंडित, सुरेश वाडकर, झाकीर हुसेन यांच्यासारख्या दिग्गजांशी स्नेह आणि जिव्हाळा निर्माण झाला. नांदेडच्या वास्तव्यात नाथराव संगीत विशारद परीक्षेत देशभरात प्रथम आले आणि त्यांचा पं. विष्णू दिगंबर पलुस्कर सुवर्णपदकाने सन्मान झाला. प्रतिभा निकेतनमध्ये तेरा वर्षे संगीत शिक्षक, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, कोलकाता येथील रिसर्च अकादमीचे गुरुपद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संगीत विभागाचे प्रमुखपद भूषविले. पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सव, उज्जैन येथील कालिदास संगीत महोत्सव, संभाजीनगरातील वेरुळ महोत्सव, नामधारी संगीत महोत्सवाच्या मैफली नाथरावांनी गाजवल्या. पु. ल. देशपांडे आणि कुसुमाग्रज या दोघांशी नाथरावांचा खूप जिव्हाळा. मैफलीचे गायक, संगीतनट, संघटक, संगीत दिग्दर्शक व बंदिशकार अशी बहुआयामी ओळख असणार्याै नाथराव नेरळकरांचे खरे श्रेय गायनगुरू म्हणून अधिक होती. संगीत शिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द नांदेडच्या प्रतिभा निकेतन विद्यालयात (१९५२ ते १९७३) सुरू झाली. नंतर औरंगाबाद येथील सरस्वती भुवन महाविद्यालयात १९७३ पासून त्यांनी संगीत विभागाचे प्रमुख म्हणून कार्य केले. औरंगाबाद विद्यापीठात संगीत विभाग सुरू करून तो वाढवण्याचे श्रेय नाथरावांना आहे. त्यांनी नांदेड येथे अनंत संगीत विद्यालय (१९५६ ते १९७३) व औरंगाबाद येथे (१९७३ पासून आजवर) हिंदुस्थानी संगीत विद्यालय सुरू केले. नाथरावांनी गुरुकुल पद्धतीने शिष्यांचा सांभाळ करत विद्यादान केले. शिवदास देगलूरकर, चित्रा देशपांडे, शिवराम गोसावी, संदीप देशमुख, प्रियदर्शनी कुलकर्णी व शशांक मक्तेदार असे अनेक शिष्य त्यांनी घडविले, त्यांपैकी काहींनी राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला आहे. कोलकात्याच्या संगीत रिसर्च अकादमीनेही नाथरावांना मानद गुरू म्हणून पाचारण केले होते. नांदेड सेडून संभाजीनगरला स्थायिक व्हावे असा या दोन दिग्गजांचा नाथरावांना प्रेमळ सल्ला होता. हो-नाही करीत तो नाथरावांनी मानला. ५ जुलै १९७३ रोजी प्रतिभा निकेतनमधील संगीत शिक्षकाची नोकरी सोडली आणि संभाजीनगरात गोविंदभाईंनी त्यांना आपल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत सामील करून घेतले.
पंडित अण्णासाहेब गुंजकर यांची परंपरा चालविणारे धुरंधर कलाकार, अनेक शिष्य घडविणारे संगीत गुरू अशी पंडित नाथराव नेरळकर यांची ओळख होती.
नाथराव नेरळकरांना ‘श्रेष्ठ गायक-अभिनेता’ पुरस्कार , ‘कलादान’ पुरस्कार , ‘उत्कृष्टता’ पुरस्कार , ‘औरंगाबाद भूषण’, ‘चतुरंग’ प्रतिष्ठानचा पुरस्कार तसेच २०१४ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कार/ सन्मानांनी गौरविण्यात आले होते.संगीत नाटक अकादमीची फेलोशिप मिळवणारे नाथराव हे मराठवाडय़ातील पहिलेच कलावंत होत.
नाथरावांच्या पत्नी सुशीला यांनीही त्यांच्या सांगीतिक वाटचालीत हातभार लावला. नाथरावांचा संगीत वारसा अनंत नेरळकर (गायन), जयंत नेरळकर (गायन, हार्मोनिअम व तबलावादन) व हेमा उपासनी (गायन) ही त्यांची अपत्येही चालवत आहेत.
नाथराव नेरळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
* #संजीव_वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३