MIND Mirror Services Pvt.Ltd.

  • Home
  • MIND Mirror Services Pvt.Ltd.

MIND Mirror Services Pvt.Ltd. We look forward to contribute service at global level including talented workforce and ensuring conti
(1)

30/05/2020
     -safety   संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन झूम मीटिंगमध्ये आज कोल्हापूरचे आरटीओ इन्स्पेक्टर माननीय श्री.प्र...
18/05/2020

-safety
संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन झूम मीटिंगमध्ये आज कोल्हापूरचे आरटीओ इन्स्पेक्टर माननीय श्री.प्रदिप शिंगारे सर ‘कोरोना कालावधीत रस्त्यावर वावरताना घ्यावयाची काळजी’ याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तरी आज सायंकाळी पाच वाजता खालील लिंक वर टाईप करून झूम मिटिंगमध्ये सहभागी व्हावे,ही विनंती.
युवक कल्याण कक्ष, कोल्हापूर.
https://us04web.zoom.us/j/9671627994?pwd=REVTOGd1d3pGd3JLdUNNVjlMdlBSQT09

  चला मातृदिनाच्या निमित्ताने आईला थोडीशी मदत करूया....*सुरक्षा व सन्मान*कोव्हिड-१९  या संकटाशी लढताना आपण आजाराशी लढतोय...
10/05/2020


चला मातृदिनाच्या निमित्ताने आईला थोडीशी मदत करूया....
*सुरक्षा व सन्मान*
कोव्हिड-१९ या संकटाशी लढताना आपण आजाराशी लढतोय, आजारी माणसांशी नाही. आज प्रत्येक घरांमध्ये काम करणारी कामवाली बाई अडचणीत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक सोसायटी व अपार्टमेंटमध्ये त्यांचा प्रवेश बंद केलेला आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाबरोबरच आपल्या घरामध्ये सुरक्षित व वैद्यकीय प्रमाणित घरकाम करणारी महिला असावी, ही प्रत्येकाची गरज झालेली आहे. ऊर्जा फाउंडेशन व माईंड मिरर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एकत्रितपणे ज्या ज्या ठिकाणी गरज आहे, त्या सर्व अपार्टमेंट आणि सोसायटीमध्ये सुरक्षित,प्रशिक्षित आणि प्रमाणित घरकाम करणाऱ्या महिला उपलब्ध करून देणार आहेत.यांना आवश्यक सुरक्षा किट,मास्क, हेड कॅप,हॅन्ड ग्लोज दिलेले असेल. त्यांची वैद्यकीय तपासणी केलेली असेल, काम करण्यापूर्वी अन् काम केल्यानंतर घ्यावयाच्या काळजीचे पूर्ण प्रशिक्षण दिलेले असेल. अशी सुरक्षित घरकाम करणारी व्यक्ती प्रत्येक कुटुंबाला गरजेची वाटते. ते पुरवण्याचे काम आम्ही करीत आहोत. तरी आपण आपली प्रशिक्षित,सुरक्षित घरकाम करणाऱ्या महिलेची गरज असल्यास आमच्याकडे नोंदणी करावी, ही विनंती.
संपर्क : 85304 91919, 7720015456
*आजवर आपल्याला सेवा देणाऱ्या व्यक्तीला सन्मान देण्याची हीच ती वेळ!*

02/12/2019
02/12/2019
For booking can contact Mind Mirror services 8530491919
27/11/2019

For booking can contact Mind Mirror services 8530491919

21/11/2019
21/11/2019

*महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि ऊर्जा फौंडेशन, संचलित 'युवक कल्याण कक्ष' मार्फत खासबाग कोल्हापूर येथील शाखेमध्ये* मला कर्ज मिळेल का? ह्या विषयावर *श्री.भूषण कोळेकर (जेष्ठ बँकिंग व्यवस्थापक,पुणे)* मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. *स्वतः व्यवसाय किंवा उद्योग करताना माझा व्यवसाय नेमका कोणता आहे? त्याचा व्याप किती आहे? त्यासाठी लागणारे कर्ज किती आहे? सदर कर्ज मी किती वर्षात फेडू शकेल? व हा व्यवसाय करण्यासाठी माझ्याकडे किती भांडवल आहे? ह्या पंचसूत्री त्यांनी आपल्या विचारातून मांडली.* व्यवसायवाढी साठी कर्ज व कौशल्य ह्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे असणे खूप महत्त्वाचे असून, *'कर्ज घेणे ह्यात काहीही कमीपणा नाही तर कर्ज बुडवणे हे कमीपणाचे आहे. त्यामुळे आपला व्यवसाय वाढवण्याचे स्वप्न बाळगताना तुमचं स्किल किती आहे व त्यासाठी कर्ज किती लागणार आहे, ह्याचे गणित बांधता आले पाहिजे. कर्ज व्यवस्थापनात विक्री व खर्च ह्याचा ताळमेळ बसवता आला पाहिजे, असे प्रतिपादन श्री. कोळेकर ह्यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले *सत्यजित पाटील(संचालक, साहिल इंडस्ट्रीज, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, कागल,कोल्हापूर) यांनी उद्योजकीय कौशल्यामध्ये वेळेचे महत्व, दूरदृष्टी, संयम, निर्णयक्षमता यांचे महत्त्व सांगितले. मा. श्री. शंकर लाड (बी फ्लाय हायजीन)* ह्यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *यशवंत शितोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र)* हे होते, तर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक *प्रणोती शितोळे (संचालिका, माइंड मिरर सव्हिर्सेस प्रायव्हेट लिमिटेड)* ह्यांनी केले व उपस्थितांचे आभार *स्नेहल चव्हाण (संचालिका, माइंड मिरर सव्हिर्सेस प्रायव्हेट लिमिटेड)* ह्यांनी मानले. कार्यक्रमाचे सर्व *संयोजन माइंड मिरर सव्हिर्सेस प्रायव्हेट लिमिटेड,कोल्हापूर ह्यांच्यामार्फत करण्यात आले.*

17/11/2019

व्यवसाय वृद्धी आणि कर्ज व्यवस्थापन

माणूस हा स्वप्ने पाहतो व त्याला स्वप्नात उतरवण्यासाठी अनेकविध प्रयत्न करत असतो, प्रबळ इच्छाशक्ती व जिद्द ही प्रत्येकाकडे असते. पण स्वप्ने प्रत्यक्षात उतरवताना जेवढी जिद्द व ताकद लागते तेवढेच त्यासाठी अर्थसाहाय्यही लागते. चाकोरीबद्ध नोकरीत न अडकता, स्वतःचा उद्योग व व्यवसाय असेल तर माणसाला चांगल्या रीतीने विकास साधता येतो, पण हा उद्योग व्यवसाय एवढ्या सहजरित्या करता येणे शक्य नसते. कारण ह्यासाठी लागते ते 'भांडवल', यासाठी आपल्याला कोण कर्ज देईल का?, 'कोणत्या बँकेत त्यासाठी आपल्याला जावे लागेल?' किंवा 'कर्ज मिळवण्यासाठी काय काय करावे लागेल?', ' बँकेत गेल्यावर नेमका संवाद कसा साधायचा असतो',असे एक ना अनेक प्रश्न आपल्या डोक्यात घोळायला लागतात. नेमकी सुरूवात कुठून करावी हेच कळत नाही. 'आपल्या स्वप्नांच्या प्रवासात योग्य अर्थ प्राप्तीचे मार्ग मिळावेत' हा उद्देश साधून *ऊर्जा फौंडेशन संचलित युवक कल्याण कक्ष कोल्हापुर* यांच्यामार्फत
*श्री. भूषण कोळेकर(जेष्ठ बँकिंग व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया,पुणे)* यांचे *'व्यवसाय वृद्धी आणि कर्ज व्यवस्थापन'* ह्या विषयावर *दिनांक २० नोव्हेंबर* रोजी *दुपारी ४ वाजता* मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे, तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून, कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

👉🏻कार्यक्रमाची वेळ
*दुपारी ४ वाजता*
👉🏻पत्ता-
*ऊर्जा फौंडेशन ( युवक कल्याण कक्ष)*बाल गोपाळ, तालीम मंडळ जवळ खासबाग मैदान कोल्हापूर*
👉🏻संपर्क
*📞 ०२३१२६४३३७७*
*📞७७२००१५४५५.* look forward to create value base company and to exceed customer expectations.

Mind Mirror Services Are Available In Kolhapur.    &
04/11/2019

Mind Mirror Services Are Available In Kolhapur.
&

Address


Opening Hours

Monday 10:30 - 17:00
Tuesday 10:30 - 17:00
Wednesday 10:30 - 18:30
Thursday 10:30 - 17:00
Friday 10:30 - 18:30
Saturday 10:30 - 18:30

Telephone

+918530491919

Alerts

Be the first to know and let us send you an email when MIND Mirror Services Pvt.Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MIND Mirror Services Pvt.Ltd.:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Opening Hours
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Event Planning Service?

Share