Mpsc-Upsc चा "राज" मार्ग

Mpsc-Upsc चा "राज" मार्ग Way to Destiny

युवकांच्या कर्तबगारीला आकार देणे हे `मनविसे'चे प्रमुख ध्येय . तरूण पिढीला दोष देत स्वत:ची शेखी मिरविण्यात काही प्रतिष्ठित नेते धन्यता मानतात म्हणूनच `मनविसे'ने तरूणांना एकत्र आणून त्यांच्या गुणांना संधी देणार्‍या उत्तोमोत्तम कार्यक्रमांची मालिका गुंफली.

महाराष्ट्राच्या उभारणीसाठी विधायक तरूणांचा संच हवाच होता, तो निर्माण करण्याचे धाडस `मनविसे'ने केले.
तरूण वर्गाला विकासाच्या नवनवीन वाटा उपलब्ध कर

ूण देण्यासाठी `मनविसे' सातत्याने राबत आहे. त्या कार्यामागे प्रेरणा आहे तरूणांचे लाडके नेते `राजसाहेब ठाकरे' यांची. `जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया' या त्यांच्या एकाच वाक्याने युवकांची मने भारली. तमाम तरूण `मनविसे'च्या झेंडयाखाली एकवटला.

त्यामुळेच १ ऑगस्ट २००६ म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी दिनी `मनविसे' या लोकमान्य विद्यार्थी संघटनेची स्थापना करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आदित्य राजन शिरोडकर आणि सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली अर्चित मोहन जयकर यांची. पेशाने वकील असलेले अर्चित जयकर आपल्या कर्तबगारीने संघटनेत लोकप्रिय झाले. आदित्य राजन शिरोडकर यांनी अवघ्या २२ व्या वर्षी संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. गोड स्वभाव आणि संघटन चातुर्यामुळे त्यांनी संघटनेचा पाया मजबूत केला.

शांत, संयमी स्वभाव आणि वेळ पडल्यास आक्रमक रूप धारण करणारे आदित्य शिरोडकर थोडक्या अवधीतच विद्यार्थीप्रिय ठरले. स्वत: विद्यार्थी असल्याने व सर्वांना बरोबर घेऊन मार्ग काढण्याच्या स्वभावामुळे `मनविसे' महाराष्ट्राच्या कानाकोपेयात जाऊन पोहोचली. काही दिवसांतच आदित्य शिरोडकर व अर्चित जयकर या दोघा तरूणांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढीत `मनविसे'चे पदाधिकारी नेमले व राजसाहेबांच्या विचारांनी भारलेला एक भला मोठा संघच निर्माण केला. काही महिन्यातच या संघाने मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या चार महानगरात `बॉल डान्स्' ही भव्य स्पर्धा सहजच यशस्वी करून दाखविली. त्यामुळे विद्यार्थी नेतृत्वाच्या क्षितिजावर या `आदित्याचा' विजय झाला.

बॉल डान्स्, फोकस करीयर फेअर, महाराष्ट्र धर्म या व अशा एकाहून एक सरस कार्यक्रमांची मालिकाच `मनविसे'ने गुंफली.
विधायक कार्याची ही श्रुन्खला जोडता जोडता `मनविसे'चा सैनिक डोळसपणे आणि जागरूकपणाने शिक्षण क्षेत्रातील सावळया गोंधळाकडे नजर रोखून होता. एस.एस.सी. परीक्षेतील प्रन पत्रिकांचा गोंधळ साध्या सरळ विद्यार्थ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारे रॅगिंग, कलिना विद्यानगरीत अनिधिकृतपणे उभारलेली झोपडपट्टी आणि विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या राक्षसी शिक्षण संस्था यांना हा सैनिक प्रखरपणे विरोध करत राहिला.

मनविसे ही अन्यायाविरूद्ध लढणारी विद्यार्थी संघटना आहे. अन्याय, अत्याचार, शैक्षणिक भ्रष्टाचार याविरूद्ध `मनविसे'ने आपली वज्रमुठ आवळली आहे. संघटना स्थापन झाल्यापासून अवघ्या दोनच वर्षात भल्याभल्यांना कापरे भरावे असा तिचा नावलौकीक पसरला आहे. `सज्जनांना हात आणि दुर्जनांना लाथ' हे संघटनेचे ध्येय आहे `भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा' ही संतांची शिकवण `मनविसे'ने अंगिकारली आहे.

संघटना आता आकार घेऊ लागली आहे. मार्गात येणारे अडथळे पार करीत सुसाट वेगाने जाणारे हे वादळ आता थांबणार नाही. निशाण फडकवीत जयघोष करीत हे वादळ पुढेच जाणार . तरूणांच्या लढवय्या राजसाहेबांनी घेतलेला महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा ध्यास पूर्ण होईपर्यंत लढतच राहणार . हाच आमचा व्रतनिचय आहे

06/12/2013
Tentative Schedule of Competitive Examination in 2014
16/11/2013

Tentative Schedule of Competitive Examination in 2014

Address

Virar
401303

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mpsc-Upsc चा "राज" मार्ग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mpsc-Upsc चा "राज" मार्ग:

Share

Category



You may also like