Greensignal

Greensignal Film & Theater...Entertainment & Event... Popcorn & Cold drink...a person to share with...

08/12/2023

Dive into a world where every frame tells a story. Green Signal Entertainment's showreel is a visual feast for the senses.

या वयातही प्रेझेंटेबल असणाऱ्या, सुंदर शर्मिला टागोर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
08/12/2023

या वयातही प्रेझेंटेबल असणाऱ्या, सुंदर शर्मिला टागोर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बंदिनी मधील तुरुंगातील डॉक्टर, हकीकत मधील सैनिक, अनुपमा मधील लेखक, सत्यकाम मधील एक नितीमान व्यक्ती, चूपके चुपके मधील मिश...
08/12/2023

बंदिनी मधील तुरुंगातील डॉक्टर, हकीकत मधील सैनिक, अनुपमा मधील लेखक, सत्यकाम मधील एक नितीमान व्यक्ती, चूपके चुपके मधील मिश्किल प्राध्यापक, शोले पासूनचा अँग्री यंग मॅन, मधल्या काळातील रोमँटिक भूमिका ते खतरोंके खिलाडी, हुकूमत ते आत्ताचा रॉकी और रानी अश्या विविध ढंगी विविध रंगी भूमिका करणारे धर्मेंद्र यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

मुंबई रिलीज ४ डिसेंबर २००९अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि विद्या बालन याच्या प्रमुख भूमिका असलेला, आर बाल्की यांनी दिग्दर...
04/12/2023

मुंबई रिलीज ४ डिसेंबर २००९

अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि विद्या बालन याच्या प्रमुख भूमिका असलेला, आर बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला 'पा' आजच्याच दिवशी प्रदर्शित झाला.
अमिताभ बच्चन यांना चित्रपटातील लक्षवेधी, सशक्त अभिनयामुळे राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि फिल्म फेअर पुरस्कार मिळाला

माहिती सौजन्य : दिलीप ठाकूर

#ग्रीनसिग्नल

होंठपे लिये हुवे दिल की बात हम, जागते रहेंगे और कितनी रात हम...असित सेन दिग्दर्शित 'खामोशी' चित्रपट १९६९ला आजच्याच(४ डिस...
04/12/2023

होंठपे लिये हुवे दिल की बात हम, जागते रहेंगे और कितनी रात हम...

असित सेन दिग्दर्शित 'खामोशी' चित्रपट १९६९ला आजच्याच(४ डिसेंबर) दिवशी प्रदर्शित झाला. वहिदा रेहमान, राजेश खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या संस्मरणीय चित्रपट. खूपच संवेदनशील पटकथा, दिग्दर्शकाची जागोजागी दिसणारी तरलता, गुलजार यांची अर्थपूर्ण गाणी आणि हेमंत कुमार यांचे तरल संगीत, वहिदा रेहमानने बोलके डोळे सगळेच संस्मरणीय होते. चित्रपटाचे अजून एक वैशिष्य म्हणजे कमल बोस यांची ब्लॅक अँड व्हाईट सिनेमेटोग्राफी, त्यामुळे चित्रपट वेगळा ठरला, त्यासाठी कमल बोस यांना बेस्ट सिनेमेटोग्राफरचे फिल्म फेअर मिळाले.

माहिती सौजन्य : दिलीप ठाकूर

#ग्रीनसिग्नल

"सरकारनामा" या चित्रपटाला २६ वर्षे   मराठीतील उल्लेखनीय राजकीय चित्रपटात आवर्जून उल्लेख होत असलेल्या प्रभावी, पुणे या चि...
04/12/2023

"सरकारनामा" या चित्रपटाला २६ वर्षे
मराठीतील उल्लेखनीय राजकीय चित्रपटात आवर्जून उल्लेख होत असलेल्या प्रभावी, पुणे या चित्रपट निर्मिती संस्थेच्या श्रावणी देवधर दिग्दर्शित 'सरकारनामा' (मुंबईत प्रदर्शन ४ डिसेंबर १९९७) च्या मुंबईतील प्रदर्शनास सव्वीस वर्षे पूर्ण होत आहेत. या चित्रपटाचा अतिशय विशेष असा प्रीमियर मेट्रो थिएटरमध्ये झाला होता. या चित्रपटाचे निर्माते विनित गनबोटे आणि अजेय झणकर होते. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद व गीते अजय झणकर यांचीच होती. या चित्रपटाला आनंद मोडक यांचे संगीत आहे. तर छायाचित्रण देबू देवधर यांचे आहे. या चित्रपटात यशवंत दत्त, दिलीप प्रभावळकर, अजिंक्य देव, अश्विनी भावे, सुकन्या कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर, जगदीश पाटणकर, आशुतोष गोवारीकर, यतीन कार्येकर, नंदू माधव, मकरंद अनासपुरे, शर्वरी जमेनीस, स्मिता ओक, श्रीकांत मोघे, उपेंद्र लिमये, किशोरी अंबिये, मिलिंद गुणाजी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील झाकोळलं झाकोळलं ढळलं आभाळ, अलवार तुझी चाहूल, केलं जीवाचं रान ही गाणी लोकप्रिय आहेत.
माहिती सौजन्य : दिलीप ठाकूर

'विधाता ' रिलीजला ४१ वर्षे  साठच्या दशकात ट्रॅजेडी किंग म्हणून इमेज असलेल्या दिलीपकुमारने 'राम और श्याम ' या चित्रपटापास...
03/12/2023

'विधाता ' रिलीजला ४१ वर्षे

साठच्या दशकात ट्रॅजेडी किंग म्हणून इमेज असलेल्या दिलीपकुमारने 'राम और श्याम ' या चित्रपटापासून आपली अष्टपैलू अशी इमेज एस्टॅब्लिज केली. तर कालांतराने अँग्री ओल्ड मॅनही त्याच क्षमतेने साकारला. त्याच टप्प्यावरील महत्वाचा चित्रपट सुभाष घई दिग्दर्शित 'विधाता' (रिलीज ३ डिसेंबर १९८२) च्या प्रदर्शनास आज यशस्वी ४१ वर्षे पूर्ण होत आहेत. या चित्रपटाची निर्मिती त्रिमूर्तीं फिल्मच्या गुलशन राॅय यांनी केली आणि त्यांच्याच माॅडर्न मुव्हीज या वितरणने हा चित्रपट प्रदर्शित केला. या चित्रपटात दिलीपकुमार आणि संजीवकुमार यांच्या अभिनयाचा सामना पाहण्यास मिळाला. या चित्रपटात शम्मी कपूर, संजय दत्त, पद्मिनी कोल्हापूरे, मदन पुरी, डाॅ. श्रीराम लागू आणि अमरीश पुरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच सारिका, सुरेश ओबेराॅय, टाॅम अल्टर, गौतम सरीन, विजू खोटे, जगदीप, कृष्ण धवन, मुकरी, सुधीर, सुधा शिवपुरी यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची गीते आनंद बक्षी यांची असून संगीत कल्याणजी आनंदजी यांचे आहे. या चित्रपटातील हाथो की चंद लकीरो का, साथ सहेलिया खडी खडी, उडी बाबा ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटाची कन्नड (पितामह), मल्याळम (Alakadalinakare) आणि तमिळ (Vamsa Vilakku) अशी तीन भाषेत रिमेक करण्यात आली आहे. यशस्वी चित्रपटाचे हेच तर वैशिष्ट्य आहे. तो इतर भाषेतही निर्माण केला जातो.
'विधाता'ने मुंबईत मेन थिएटर राॅक्सीमध्ये रौप्यमहोत्सवी यश संपादले.
शम्मी कपूरला सर्वोत्कृष्ट सहायक भूमिकेचं फिल्म फेअर मिळालं.

माहिती सौजन्य : दिलीप ठाकूर

पांडू - मनोरंजनाच्या पेटीपॅक नजराण्याची २ वर्ष
03/12/2023

पांडू - मनोरंजनाच्या पेटीपॅक नजराण्याची २ वर्ष

‘पडोसन’ (रिलीज २९ नोव्हेंबर १९६८. मुंबईत मेन थिएटर लिबर्टी)विनोद ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. टायमिंग चुकलं, उच्चार ब...
29/11/2023

‘पडोसन’ (रिलीज २९ नोव्हेंबर १९६८. मुंबईत मेन थिएटर लिबर्टी)

विनोद ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. टायमिंग चुकलं, उच्चार बदलला तरी अर्थ बदलून अनर्थ ओढवू शकतो. हसं होऊ शकते.
पिक्चरच्या नावापासूनच खळाळून हसवायला तसा प्लाॅट हवा, थीम हवी असा पिक्चर आठवला तरी हंसू येते.
कोणत्याच प्रकारचा चित्रपट ठरवून जमून येत नाही. वा चांगला बनत नाही. अनेकांच्या सहकार्यातून त्याची ‘भट्टी’ जमते. चित्रपट हे टीमवर्क असून दिग्दर्शक त्याचा कर्णधार आहे.

‘पडोसन’ आठवला तरी त्याच्या पोस्टरपासून गाण्यांपर्यंत आणि त्यातील अनेक बडबड करणार्‍या विनोदी प्रसंगापासून अनेक व्यक्तीरेखांच्या लूकपर्यंत असा काही आठवतो की, आपण मनसोक्त मनमुराद मनापासून हसणारच. आपण कितीही वेळा (आणि अगदी कुठूनही) तो एन्जाॅय केला तरी आजही आपण तो पुन्हा पाहून फ्रेश होऊ. त्याच्या प्रदर्शनास तब्बल पंचावन्न वर्ष होऊन देखील तो धमाल अनुभव देतो यातच या पिक्चरचं भारी यश आहे.(Padosan)
टीमवर्कने हे मजेशीर पिक्चर आकाराला येत गेले. राजेन्द्र कृष्ण यांनी पटकथा, संवाद व गीतलेखन केले. राहुल देव बर्मन संगीतकार.
विद्यापती किशोरकुमारनेच साकारावा अशी मेहमूदची कितीही इच्छा असली तरी त्याचं म्हणणं होतं, मी फक्त पार्श्वगायन करेन. कसंही करुन मेहमूदला किशोरकुमारच हवा होता. बरेच दिवस वाट पाहून मेहमूदने काय करावे? मेहमूदने किशोरकुमारच्या जुहू येथील गौरी कुंज या बंगल्याबाहेर एक तंबू ठोकून एक रात्र काढली तेव्हा कुठे किशोरकुमार हो म्हणाला.
विद्यापतीच्या गेटअपवर बरीच चर्चा रंगल्यावर किशोरकुमारने ठरवलं मी हा प्रश्न सोडवतो. त्याने आपले काका धनंजय बॅनर्जी यांचं रुपडं घेतलं आणि ते साॅलीड रंगवले. चित्रपटाचे शूटिंग जवळपास संपल्यावर किशोरकुमारला पिक्चरमध्ये गाण्यासाठी एक सिच्युएशन सापडली. भोला उदास होऊन बसलाय. त्याला खुलवायचं. तेथे गाणे आले, मेरी प्यारी बिंदू… हे सगळे होईपर्यंत चित्रपटाच्या गाण्याची तबकडी विक्रीला आल्याने त्यात हे गाणे नव्हते.

माहिती सौजन्य : दिलीप ठाकूर

१९७० आणि ८० च्या दशकातील हिंदीसिनेसृष्टीचा सुवर्णकाळ! जिथे एका बाजूला   चा Era चालू होता तर दुसरीकडे व्यावसायिक प्रेक्षक...
24/11/2023

१९७० आणि ८० च्या दशकातील हिंदीसिनेसृष्टीचा सुवर्णकाळ!
जिथे एका बाजूला चा Era चालू होता तर दुसरीकडे व्यावसायिक प्रेक्षक आणि ला सुद्धा आपलंसं करत होते. अश्यात एक मराठी तरुणाचा चेहरा भारतातील प्रत्येक घराघरात पोहोचला तो म्हणजे ‘अमोल पालेकर’. हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील एक नामवंत कलाकार ज्यांनी त्यांच्या प्रसिद्धीच्या काळात गोलमाल, छोटी सी बात, चितचोर, रजनीगंध, बातो बातो में असे अनेक चित्रपट प्रेक्षकांना दिले. भारतातील जनमानसातील एक आपलासा वाटणारा पडद्यावर इतक्या सहजतेने आणि निरागसतेने उभा करणाऱ्या ह्या अभिनेत्यानी अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
पुढे मराठीत सुद्धा भूमिका ह्या चित्रपटातून त्यांनी अभिनेत्री स्मिता पाटील सोबत स्क्रीन शेअर करत बनगरवाडी, ध्यासपर्व अश्या मराठी सिनेमातून दिग्दर्शन, लेखन आणि अभिनय कौशल्य जपले.
२००५ साली सुपरस्टार शाहरुखला सोबत घेऊन त्यांनी दिग्दर्शित केलेला "पहेली" हा चित्रपट आजही एक उत्कृष्ट लोककलेवर आधारित चित्रपट म्हणून पहिला जातो. अभिनिता, निर्माता, दिग्दर्शक अश्या चित्रपटातील विविध प्रोफेशनवर काम करून झाल्यावर आत्ता अमोल पालेकर आपल्यातला चित्रकार जोपासताना दिसून येतात.
आज “अमोल पालेकर” या बहुआयामी कलाकाराला वाढदिवसाच्या 70MM शुभेच्छा!!


मुंबई रिलीज १३ नोव्हेंबर १९८७...  मेन थिएटर ऑपेरा हाऊस.१९८७ सालचा ऍक्शन ड्रामा चित्रपटात जॅकी श्रॉफ, रजनीकांत आणि माधुरी...
18/11/2023

मुंबई रिलीज १३ नोव्हेंबर १९८७... मेन थिएटर ऑपेरा हाऊस.

१९८७ सालचा ऍक्शन ड्रामा चित्रपटात जॅकी श्रॉफ, रजनीकांत आणि माधुरी दीक्षित याच्या भूमिका होत्या.
हा चित्रपट यश चोप्रा दिग्दर्शित 'त्रिशूल' या चित्रपटाचा रिमके आहे.

माहिती सौजन्य : दिलीप ठाकूर

#ग्रीनसिग्नलएंटरटेंनमेंट

हार कर जीतने वालों को 'बाजीगर' कहते है हेअक्षय कुमार, अनिल कपूर, सलमान खान या दोघांनी नाकारलेला, क्रूर हिरोचा शेवटी मृत्...
18/11/2023

हार कर जीतने वालों को 'बाजीगर' कहते है हे

अक्षय कुमार, अनिल कपूर, सलमान खान या दोघांनी नाकारलेला, क्रूर हिरोचा शेवटी मृत्यू दाखवला गेलेला "बाजीगर" या सुपर हिट चित्रपटाला, १२ नोव्हेंबरला ३० वर्ष झाली.
'बाजीगर' एक जणू ॲसिड टेस्ट होता. तसं बघायला गेलं तर चित्रपटाला 'स्टार व्हॅल्यु' काहीच नव्हती. शाहरुख काजोल तसे नवीनच होते. ह्या जोडीचा हा पहिलाच चित्रपट. शिल्पा शेट्टीचाही हा पहिलाच चित्रपट. त्यामुळे बऱ्याच जणांना चित्रपट यशस्वी होईल की नाही यावर विश्वास नव्हता. बऱ्याच समीक्षकांनी तर असं ही सांगितलं की 'गलवार खळी' असलेला मुलगा अँटी हिरो म्हणून प्रेक्षक स्वीकारणारच नाहीत. गाणी आधीच हिट झाल्याने चित्रपटाची हवा मात्र झाली होती.
पण पब्लिक्ला चक्क निगेटीव्ह भूमिका साकारलेला 'हीरो' आवडला.
चित्रपटाला १० पैकी ४ फिल्म फेअर पुरस्कार मिळाले अर्थात त्यात सर्वोत्कृष्ट संगीत, पार्श्व गायक, पटकथेबरोबरच सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख होताच.
अब्बास मुस्तानला 'कुछ हट के करते है' असं म्हणून आव्हान स्वीकारत शाहरुख खान 'बाजीगर' झाला.

माहिती सौजन्य : दिलीप ठाकूर

#ग्रीनसिग्नलएंटरटेंनमेंट

He Adds To Records !!We Record Ads !!
15/11/2023

He Adds To Records !!
We Record Ads !!

12/11/2023

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

मुंबई रिलीज ७ नोव्हेंबर १९६९... मेन थिएटर राॅक्सी.... शक्ती सामंता यांचा म्युझिकल गोल्डन ज्युबिली हिट "आराधना". या चित्र...
07/11/2023

मुंबई रिलीज ७ नोव्हेंबर १९६९... मेन थिएटर राॅक्सी....

शक्ती सामंता यांचा म्युझिकल गोल्डन ज्युबिली हिट "आराधना". या चित्रपटात राजेश खन्ना, शर्मिला टागोर, अशोक कुमार यांचा भूमिका होत्या.
१७ व्या फिल्म फेअर पुरस्कार सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, किशोर कुमार यांना पार्श्वगायक आणि शर्मिला टागोर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हे पुरस्कार मिळाले.
असं म्हणतात की "रूप तेरा मस्ताना" गाण्याचा ३.३० मिनिटांचा सिक्वेन्स एका टेक मध्ये शूट केला आहे.
एस डी बर्मन यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत. चित्रपटात राजेश खन्ना यांना मोहोम्मद रफी आणि किशोर कुमार या दोघांनी आवाज दिला.
मेरे सपनोंकी रानी गाण्याच्या शूट साठी राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्या एकत्र तारखा मिळत नव्हत्या त्यामुळे राजेश खन्नाचं जीप मधलं शूट दार्जिलिंग इथे केलं आणि नंतर मुंबईत शर्मिला टागोर यांचं शूट ट्रेनचा सेट लावून केलं गेलं.

माहिती सौजन्य : दिलीप ठाकूर

#ग्रीनसिग्नलएंटरटेंनमेंट

रिलीज ३० ऑक्टोबर १९९७ शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांचा दिल तो पागल है या प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या म्युझ...
31/10/2023

रिलीज ३० ऑक्टोबर १९९७

शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांचा दिल तो पागल है या प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या म्युझिकल रोमँटिक चित्रपटाला ३० ऑक्टोबर रोजी २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. इतकी वर्षे होऊनही हा चित्रपट अजूनही तरुण, रसरशीत आहे.
चित्रपटाचे मूळ नाव "मैने तो महोब्बत कर ली" आणि "तेवर" असे होते.
उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेली आणि आनंद बक्षी यांनी लिहिलेली १० गाणी प्रचंड गाजली.

माहिती सौजन्य : दिलीप ठाकूर

#ग्रीनसिग्नलएंटरटेंनमेंट

मुंबई रिलीज 28 ऑक्टोबर 1983नासिरुद्दीन शाह, शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका असलेला १९८३ सालचा मासूम चित्रपट दिग्दर्शक श...
28/10/2023

मुंबई रिलीज 28 ऑक्टोबर 1983

नासिरुद्दीन शाह, शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका असलेला १९८३ सालचा मासूम चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांचा पहिलाच चित्रपट.
गुलझार यांनी चित्रपटाची कथा, पटकथा आणि गाणी लिहिली होती आणि आर डी बर्मन यांचं संगीत होतं.
चित्रपटाची सगळीच गाणी अजूनही हिट आहेत.

या चित्रपटाला फिल्म फेअरचे ५ पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट चित्रपट(समीक्षक), अभिनेता नासिरुद्दीन शाह, संगीतकार आर डी बर्मन, गीतकार गुलझार, पार्श्वगायिका आरती मुखर्जी(दो नैना और एक कहानी).

माहिती सौजन्य : दिलीप ठाकूर

#ग्रीनसिग्नलएंटरटेंनमेंट

१९५७ साली २५ ऑक्टोबरला रिलीज झालेला मदर इंडिया हा चित्रपट मेहबूब खान यांनी दिग्दर्शित केला होता. नर्गिस, सुनील दत्त, राज...
28/10/2023

१९५७ साली २५ ऑक्टोबरला रिलीज झालेला मदर इंडिया हा चित्रपट मेहबूब खान यांनी दिग्दर्शित केला होता. नर्गिस, सुनील दत्त, राजेंद्र कुमार आणि राज कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपट राधा (नर्गिस) नावाच्या एका गरिबीने पिचलेल्या खेड्यातील स्त्रीची ही कथा आहे, जी आपल्या पतीच्या अनुपस्थितीत आपल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी संघर्ष करते.
हा बॉलिवूडचा सर्वात महागडा चित्रपट होता आणि त्या वेळी ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसला सर्वाधिक कमाई केली.
दिवाळीच्या वेळी 25 ऑक्टोबर 1957ला मुंबईतील लिबर्टी सिनेमात त्याचा प्रीमियर झाला; तो लिबर्टी येथे एका वर्षाहून अधिक काळ सतत चालू होता
२३ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात चित्रपटाचा प्रीमियर झाला त्याला तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान जवाहरलाल नेहेरु आणि इंदिरा गांधी हे उपस्थित होते.
मेहबूब खान यांना भारतीय वंशाचा हॉलिवूड स्टार साबू दस्तगीरला बिरजूच्या भूमिकेत कास्ट करायचे होते. पण शूटिंग सुरू करण्यात वर्क परमिट मिळण्यात विलंब झाल्याने साबू दस्तगीर चित्रपटातून बाहेर पडले. नंतर दिलीप कुमार यांची निवड करण्यात आली पण नर्गिस आणी दिलीप कुमार यांनी बरेच याआधी रोमँटिक चित्रपट केल्याने या चित्रपटात आई आणि मुलगा यांच्या भूमिकेत शोभणार नाही म्हणून दिलीप कुमार बाहेर निघाले. शेवटी सुनील दत्त यांची बिरजूच्या रोल साठी वर्णी लागली.

या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी ऑल इंडिया सर्टिफिकेट ऑफ मेरिट, 1957 चा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आणि नर्गिस आणि मेहबूब खान यांनी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि साऊंड डिझायनिंगचे पुरस्कार जिंकले. याला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मसाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला पहिला भारतीय चित्रपट ठरला.

माहिती सौजन्य : दिलीप ठाकूर

दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा
24/10/2023

दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा

मुंबई रिलीज 19 ऑक्टोबर 1949....... ७४ वर्ष पूर्ण
20/10/2023

मुंबई रिलीज 19 ऑक्टोबर 1949....... ७४ वर्ष पूर्ण

यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनात देव आनंदने भूमिका साकारल्याचा हा एकमेव चित्रपट. त्याच्या मुंबईतील प्रदर्शनास (१९ ऑक्टोबर १...
20/10/2023

यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनात देव आनंदने भूमिका साकारल्याचा हा एकमेव चित्रपट. त्याच्या मुंबईतील प्रदर्शनास (१९ ऑक्टोबर १९७३) पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत.

दिग्गज अभिनेत्री   यांना त्यांच्या ६८व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
17/10/2023

दिग्गज अभिनेत्री यांना त्यांच्या ६८व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

मुंबई रिलीज 13 ऑक्टोबर 1972... मेन थिएटर मेट्रो
14/10/2023

मुंबई रिलीज 13 ऑक्टोबर 1972... मेन थिएटर मेट्रो

मुंबई रिलीज २८ सप्टेंबर १९७३... मेन थिएटर मेट्रो....पन्नास वर्ष पूर्ण
28/09/2023

मुंबई रिलीज २८ सप्टेंबर १९७३... मेन थिएटर मेट्रो....पन्नास वर्ष पूर्ण

35 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी 70 रू वारले होते. Sachin Pilgaonkar ashoksarafofficial   #बनवाबनवी
23/09/2023

35 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी 70 रू वारले होते. Sachin Pilgaonkar ashoksarafofficial

#बनवाबनवी

20/09/2023

बाप्पाला प्रसन्न करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आपल्या आजूबाजूचं वातावरण प्रसन्न करणे. हा व्हिडीओ आपण आपल्या कॉन्टॅक्ट मधल्या सगळ्या लोकांना पाठवा. फेसबुक, इन्स्टा, watsapp जिथून शक्य तिथून पॉझिटिव्हिटी पसरवूयात. बोला गणपती बाप्पाSSSS मोरया.
Viju Mane

सगळ्या गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
19/09/2023

सगळ्या गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

आज हिंदी दिवस.... चुपके चुपकेमधील हिंदी भाषेतला एक गमतीदार प्रसंग- कौन है?- हम हैं साहेब- खड़े खड़े क्या कर रहे हो?- खड़...
14/09/2023

आज हिंदी दिवस.... चुपके चुपकेमधील हिंदी भाषेतला एक गमतीदार प्रसंग

- कौन है?
- हम हैं साहेब
- खड़े खड़े क्या कर रहे हो?
- खड़ा खड़ा कुछ नहीं कर रहा, बस आके आके खड़े हुए हैं
- आके आके क्या होता है?
- आपने खड़े खड़े का दो बार प्रयोग किया, अच्छा लगा, इसीलिए हमने भी उसी छंद में आके आके बोलकर कविता का रस ले लिया

माहिती सौजन्य : दिलीप ठाकूर

#ग्रीनसिग्नलएंटरटेंनमेंट

मुंबई रिलीज १३ सप्टेंबर १९७४. मेन थिएटर आकाशवाणी आजच्याच दिवशी म्हणजे १३ सप्टेंबर १९७४ रोजी बासू चॅटर्जी दिग्दर्शित, अमो...
13/09/2023

मुंबई रिलीज १३ सप्टेंबर १९७४. मेन थिएटर आकाशवाणी

आजच्याच दिवशी म्हणजे १३ सप्टेंबर १९७४ रोजी बासू चॅटर्जी दिग्दर्शित, अमोल पालेकर, विद्या सिन्हा आणि दिनेश ठाकूर यांच्या भूमिका असलेला "रजनीगंधा" प्रदर्शित झाला....
मुंबईत या चित्रपटाने दक्षिण मुंबईतील आकाशवाणी थिएटर, जेमिनी (वांद्रे), मायनाॅर (अंधेरी) अशा तीन चित्रपटगृहात रौप्यमहोत्सवी यश संपादन केले.
अमोल पालेकरांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट होता. ह्या चित्रपटानंतर अमोल पालेकर आणि बासु चॅटर्जी जोडीचे लागोपाठ २ चित्रपट छोटीसी बात(१९७५) आणि चितचोर(१९७६) या चित्रपटांनी रौप्य महोत्सवी यश संपादन केले.
विद्या सिन्हाचा यांचा पहिलाच चित्रपट होता.
सलील चौधरी यांचं सुमधुर संगीत आणि कवी योगेश यांनी लिहिलेली सुंदर गाणी आजही हिट आहेत. "कई बार यूही देखा है" आणि "रजनीगंधा फुल तुम्हारे" या चित्रपटाला चार चांद लावतात.
गायक मुकेश यांना "कई बार यूही देखा है" या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
ह्या पुरस्कारावैतिरिक्त "सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक" बासू चॅटर्जी आणि "सर्वोत्कृष्ट चित्रपट" असे दोन पुरस्कार मिळाले.

(दक्षिण मुंबईतील आकाशवाणीचं आपलं एक चित्रपट थिएटर होते. बहुतेक १९८५ सालापर्यंत सुरु असावे. अशा चित्रपटांना उपयुक्त होते)

माहिती सौजन्य : दिलीप ठाकूर

#ग्रीनसिग्नलएंटरटेंनमेंट

"मधुमती" रिलीजला ६५ वर्षे पुनर्जन्माची थीम असलेला, बासष्ट वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजे १२ सप्टेंबर १९५८ला रिलीज झाले...
12/09/2023

"मधुमती" रिलीजला ६५ वर्षे

पुनर्जन्माची थीम असलेला, बासष्ट वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजे १२ सप्टेंबर १९५८ला रिलीज झालेला "मधुमती" हा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक बिमल रॉय यांनी निर्मिलेल्या त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा यशस्वी चित्रपटआहे. या चित्रपटाची कथा ऋत्विक घटक यांची आहे. या चित्रपटात दिलीपकुमार, वैजयंतीमाला, जाॅनी वाॅकर, जयंत, तरुण बोस आणि प्राण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे संवाद राजेन्द्रसिंग बेदी यांचे आहेत तर छायाचित्रण दिलीप गुप्ता यांचे आहे. संकलन ह्रषिकेश मुखर्जी यांचे आहे. कला दिग्दर्शन सुधेन्दू राॅय यांचे असून या चित्रपटाची एक व्यक्तिरेखा म्हणून ते आहे.
या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला. तसेच नऊ फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त झाले. या चित्रपटाची गीते शैलेन्द्र यांची असून संगीत सलिल चौधरी यांचे आहे.
या चित्रपटातील 'सुहाना सफर और ये मौसम हंसी' या मुकेशने गायलेल्या गाण्यात निसर्गाच्या सानिध्यात पक्ष्यांची किलबिलाट, बासरीचा वापर आणि खोल दरीमध्ये 'ओहो' या आवाजाचा प्रतिध्वनी, छायाचित्रण वगैरे अफलातून आहे. तर 'मधुमती'च्या विरहात मोहम्मद रफीनच्या आवाजात 'टुटे हुवे ख्वाबों ने हमको ये सिखाया हैं हे दर्द गीत गातो तेव्हा संपूर्ण अंधारमय देखावा नायकाच्या दुःखाची तीव्रता वाढवतो. जेव्हा मधुमती(वैजयंतीमाला) 'घडी घडी मोरा दिल धडके' हे गाणे एका विशिष्ट नादात गात, नृत्य करत येते तेव्हा बिमलदांनी या पार्श्वभूमीवर नैसर्गिक धबधब्यांमधून खळखळाटाने नृत्य करत वाहणाऱ्या पाण्याचे अतिशय प्रभावी सादरीकरण केलं आहे.
'दिल तडप तडप के कह रहा है' हे देवेंद्र (दिलीपकुमार) आणि मधुमती प्रेमींनी गायलेले एकमेव युगल गीत आहे. 'आजा रे परदेसी' या गाण्याचे पिक्चरायझेशन देखील उत्तम आहे, या गाण्यात देवेंद्र मधूमतीला एका उंचीपासून दूरवरुन पाहतो, प्रथम तिची आकृती खाली एका ओढ्याखाली आहे व खाली येता येता तिचे निरीक्षण करतो. 'बिचुआ' हे कोरस गाणे व देवेंद्र दूरवरुन कौतुकाने पहात असलेला ग्रुप डान्समधील 'जुल्मी संग आंख लडी' हे गाणे देवेंद्र माणसांच्या रांगेतून पुढे येऊन मधुमतीच नृत्य पाहतो. मधुमतीने त्याला पाहिल्यावर तिचा चेहरा उजळतो आणि तिच्या नृत्याला याहून अधिक बहर येतो. तात्पर्य, गाण्याच्या रुपेरी सादरीकरणात दिग्दर्शक दिसतो असे म्हणता येईल.
'जंगल में मोर नाचा' या गाण्यात जॉनी वॉकर याने रंग भरलाय. 'हम हाल-ए-दिल सुनायेंगे सुनिये के ना सुनिये'. हे मुबारक बेगमचे कोठीवरील गाणेही लक्षात राहते. थीम, अभिनय, संगीत यामुळे हा चित्रपट आजही लोकप्रिय आहे. विशेषतः लोकप्रिय गाण्यांमुळे एका पिढीतील हा चित्रपट पुढील अनेक पिढ्या ओलांडूनही हिट आहे.

माहिती सौजन्य : दिलीप ठाकूर

#ग्रीनसिग्नलएंटरटेंनमेंट

मुंबई रिलीज ४ सप्टेंबर १९७०...रेखा, नवीन निश्चल, रणजित यांचा पहिला चित्रपट. बॉक्स ऑफिसवर सुपर हिट.
05/09/2023

मुंबई रिलीज ४ सप्टेंबर १९७०...
रेखा, नवीन निश्चल, रणजित यांचा पहिला चित्रपट.
बॉक्स ऑफिसवर सुपर हिट.

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज दुःखद निधन झालं ८० हु...
24/08/2023

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज दुःखद निधन झालं
८० हुन अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...

मुंबई रिलीज २४ ऑगस्ट १९७३.. मेन थिएटर गंगा..पन्नास वर्ष पूर्ण१९७३ सालची आजच्या दिवशी रिलीज झालेला विनोदी चित्रपट "आज कि ...
24/08/2023

मुंबई रिलीज २४ ऑगस्ट १९७३.. मेन थिएटर गंगा..पन्नास वर्ष पूर्ण

१९७३ सालची आजच्या दिवशी रिलीज झालेला विनोदी चित्रपट "आज कि ताजा खबर" मध्ये किरण कुमार, राधा सलुजा, आसरानी आणि पेंटल यांच्या भूमिका होत्या.
हिरो म्हणून हिट झालेला किरण कुमारचा एकमेव चित्रपट.
मराठी मध्ये 'फेका फेकी' या नावाने ह्या चित्रपटाचा रिमेक झाला तर रोहित शेट्टी यांचा 'गोलमाल' ह्याच चित्रपटावर आधारित आहे.
विनोदी भूमिकेसाठी आसरानी यांना फिल्म फेअर पुरस्कार मिळाला.
चित्रपटादरम्यान आसरानी आणि मंजू बन्सल एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे जाऊन त्यांनी लग्न केलं.

माहिती सौजन्य : दिलीप ठाकूर

#ग्रीनसिग्नलएंटरटेंनमेंट

फार कमी लोकांना माहित आहे की उषा उथुप यांना हिंदी चित्रपटात गाण्याची पहिली संधी शशी कपूर यांच्या शिफारशीवरून मिळाली. तिन...
23/08/2023

फार कमी लोकांना माहित आहे की उषा उथुप यांना हिंदी चित्रपटात गाण्याची पहिली संधी शशी कपूर यांच्या शिफारशीवरून मिळाली. तिने आयव्हरी-मर्चंटच्या बॉम्बे टॉकीज (1970) मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्यामध्ये त्यांनी शंकर-जयकिशन यांच्या हाताखाली "गुड टाइम्स अँड बॅड टाइम्स" हा इंग्रजी क्रमांक गायला.
त्या आधी त्या एक क्लब गायिका म्हणून काम करत होत्या.
शशी कपूर आणि त्यांचा हा बोलका फोटो.

#ग्रीनसिग्नलएंटरटेंनमेंट

१९९८ साली २१ ऑगस्टला प्रदर्शित झालेला मणीरत्नम यांचा रोमँटिक थ्रिलर 'दिल से'. शाहरुख खान, मनीषा कोईराला आणि प्रीती झिंटा...
22/08/2023

१९९८ साली २१ ऑगस्टला प्रदर्शित झालेला मणीरत्नम यांचा रोमँटिक थ्रिलर 'दिल से'. शाहरुख खान, मनीषा कोईराला आणि प्रीती झिंटा यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
मणिरत्नमच्या सुरवातीच्या हिट "बॉम्बे", "रोजा" नंतर "दिल से" तिसरा बॉलीवूड चित्रपट.

दिल से चित्रपटात प्रेमाच्या सात छटांचा प्रवास दाखवला आहे ज्याचा उल्लेख प्राचीन अरबी साहित्यात आहे. त्या छटा आहेत आकर्षण, मोह, प्रेम, आदर, पूजा, ध्यास आणि मृत्यू अशी केली जाते. शाहरुख खानने साकारलेली व्यक्तिरेखा चित्रपटादरम्यान प्रत्येक छटामधून जाते.
संतोष सिवन यांच्या सिनेमेटोग्राफीने चित्रपट अजूनच छान दिसतो. गुलझार यांच्या लेखणीतून उतरलेली आणि ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेली चित्रपटात ६ गाणी होती सगळी गाणी आजही हिट आहेत. "छय्या छय्या" हे गाणं विशेष गाजलं.
चित्रपटाला फिल्मफेअरचे १० नॉमिनेशन्स होते त्यापैकी सिनेमॅटोग्राफी, संगीत, संगीतकार, सहायक अभिनेत्री असे एकूण ६ अवॉर्डस् मिळाले.

माहिती सौजन्य : दिलीप ठाकूर

#ग्रीनसिग्नलएंटरटेंनमेंट

मुंबई रिलीज ९ ऑगस्ट १९८५...रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला आजच्याच दिवशी रिलीज झालेला म्युझिकल रोमँटिक ड्रामा चित्रप...
09/08/2023

मुंबई रिलीज ९ ऑगस्ट १९८५...

रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला आजच्याच दिवशी रिलीज झालेला म्युझिकल रोमँटिक ड्रामा चित्रपट 'सागर'. या चित्रपटात ऋषी कपूर, डिम्पल कपाडिया आणि कमल हसन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. डिम्पल कपाडियाच्या कमबॅकचा हा चित्रपट पण मंजिल मंजिल, जखमी शेर आधी रिलीज झाले.
जावेद अख्तर यांनी चित्रपटाची स्टोरी, डायलॉग आणि गाणी लिहिली होती. आर डी बर्मन यांचं सुपर हिट संगीत होतं.
१९८५ सालचा सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला.
एकूण १० पैकी ४ फिल्फेअर पुरस्कार या चित्रपटाला मिळाले ज्यात सर्वोत्कृष्ट नायक कमल हसन, नायिका डिम्पल कपाडिया, गायक किशोर कुमार (सागर किनारे) आणि सिनेमेटोग्राफी यांचा समावेश आहे.

माहिती सौजन्य : दिलीप ठाकूर

#ग्रीनसिग्नलएंटरटेंनमेंट

रिलीज ०८ ऑगस्ट १९८०शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या 'निष्क्रिती' या कादंबरीवर आधारित बसू चॅटर्जी दिग्दर्शित 'अपने पराये' या...
09/08/2023

रिलीज ०८ ऑगस्ट १९८०

शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या 'निष्क्रिती' या कादंबरीवर आधारित बसू चॅटर्जी दिग्दर्शित 'अपने पराये' या १९८० सालच्या चित्रपटात अमोल पालेकर आणि शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सहायक भूमिकेत उत्पल दत्त, आशालता, गिरीश कर्नाड, भरती आचरेकर हे कलाकार होते.
भप्पी लाहिरी यांचं संगीत या चित्रपटाला होतं. योगेश यांनी गाणी लिहिली होती.

माहिती सौजन्य : दिलीप ठाकूर

#ग्रीनसिग्नलएंटरटेंनमेंट

मुंबई रिलीज ०७ ऑगस्ट १९७०असित सेन यांनी दिग्दर्शित केलेला 'सफर' हा १९७० सालचा हिंदी रोमँटिक ड्रामा चित्रपटात राजेश कांना...
08/08/2023

मुंबई रिलीज ०७ ऑगस्ट १९७०
असित सेन यांनी दिग्दर्शित केलेला 'सफर' हा १९७० सालचा हिंदी रोमँटिक ड्रामा चित्रपटात राजेश कांना, शर्मिला टागोर आणि फिरोझ खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हा चित्रपट असित सेन यांच्याच १९५६ च्या बंगाली चित्रपटाचा रिमके होता. राजेश खन्नाच्या १७ लागोपाठ हिट चित्रपटामधला हा एक चित्रपट. असित सेन यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्म फेअरचा पुरस्कार मिळाला.
मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज महेश कोठारे आणि सचिन दोघांनीही या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

माहिती सौजन्य : दिलीप ठाकूर

#ग्रीनसिग्नलएंटरटेंनमेंट

अभिमानला ५० वर्ष पूर्ण "अभिमान" ह्रिषीकेश मुखर्जीचा सुपर डुपर हिट म्युझिकल ड्रामा. चित्रपट प्रामुख्याने त्याच्या सदाबहार...
29/07/2023

अभिमानला ५० वर्ष पूर्ण

"अभिमान" ह्रिषीकेश मुखर्जीचा सुपर डुपर हिट म्युझिकल ड्रामा. चित्रपट प्रामुख्याने त्याच्या सदाबहार गाण्यांसाठी लक्षात ठेवला जातो.
ह्यात आर डी बर्मन यांनी अमिताभसाठी मनहर उधास, महोम्मद रफी आणि किशोर कुमार तिघांचा आवाज वापरला.
अमिताभचा १९७३ सालचा हा सुपर हिट चित्रपट होता.
ह्या चित्रपटात बिंदुची नेहेमीपेक्षा वेगळी, लक्षात राहणारी भूमिका होती.
जया बच्चनला आणि आर डी बर्मनला फिल्मफेअर पुरस्कार मिळाले

माहिती सौजन्य : दिलीप ठाकूर

#ग्रीनसिग्नलएंटरटेंनमेंट

मुंबई रिलीज २० जुलै १९९०... मेन थिएटर ड्रीमलॅन्डअमीर खान माधुरी दिक्षित यांच्या भूमिका असलेला "दिवाना मुझसा नही" चित्रपट...
20/07/2023

मुंबई रिलीज २० जुलै १९९०... मेन थिएटर ड्रीमलॅन्ड

अमीर खान माधुरी दिक्षित यांच्या भूमिका असलेला "दिवाना मुझसा नही" चित्रपट साली २० जुलैला रिलीज झाला.
चित्रपटाचं शूटिंग १९८९लाच पूर्ण झालं होतं पण एकही डिस्ट्रिब्युटर चित्रपट विकत घ्यायला तयार नव्हता.
जुन १९९०ला अमीर खान आणि माधुरी दिक्षितचा "दिल" रिलीज झाला आणि नंतर हा चित्रपट विकला गेला.

माहिती सौजन्य : दिलीप ठाकूर

#ग्रीनसिग्नलएंटरटेंनमेंट

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Greensignal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Greensignal:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Event Planning Service?

Share