Dhepewada heritage home & destination wedding

  • Home
  • Dhepewada heritage home & destination wedding

Dhepewada heritage home & destination wedding Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dhepewada heritage home & destination wedding, Event Planner, .

'बाल गणेश' आमची कन्या सौ.राधिका हिने स्वहस्ते साकारलेली मूर्ती!
08/09/2024

'बाल गणेश' आमची कन्या सौ.राधिका हिने स्वहस्ते साकारलेली मूर्ती!

हे राष्ट्र देवतांचे,हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो,स्वातंत्र्य भारताचे🙏🏻कर्तव्यदक्ष भूमी,सीतारघुत्तमाची,रामा...
15/08/2024

हे राष्ट्र देवतांचे,
हे राष्ट्र प्रेषितांचे,
आचंद्र सूर्य नांदो,
स्वातंत्र्य भारताचे🙏🏻

कर्तव्यदक्ष भूमी,
सीतारघुत्तमाची,
रामायणे घडावी,
येथे पराक्रमाची.
शीर उंच उंच व्हावे,
हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो
स्वातंत्र्य भारताचे🙏🏻

येथे नको निराशा,
थोडया पराभवाने,
पार्थास बोध केला,
येथेच माधवाने,
हा देश स्तन्य प्याला,
गीताख्य अमृताचे,
आचंद्रसूर्य नांदो,
स्वातंत्र्य भारताचे🙏🏻

जेथे परंपरांचा,
सन्मान नित्य आहे,
जन शासनातळीचा,
पायाच सत्य आहे,
येथे सदा निनादो,
जयगीत जागृताचे,
आचंद्रसूर्य नांदो,
स्वातंत्र्य भारताचे 🙏🏻

– ग.दि. माडगुळकर

श्री.नितीन ढेपे लिखित एक मनोरंजक मिश्कीलिका 'द न्यू आदर्श सोसायटी'!!!सर्वसाधारपणे महाराष्ट्रातील सर्व सोसायट्यांमध्ये ने...
20/07/2024

श्री.नितीन ढेपे लिखित एक मनोरंजक मिश्कीलिका 'द न्यू आदर्श सोसायटी'!!!

सर्वसाधारपणे महाराष्ट्रातील सर्व सोसायट्यांमध्ये नेटके, गबाळे ,शहाणे, वाकडे, वेडे, भोळे, गुंड, चिडके, किरकिरे, गंभीर अशा स्वभाव आणि आडनावात साधर्म्य असलेल्या व्यक्ती आढळून येतात. या व्यक्तींमुळे प्रत्येक सोसायटीत अनेक मनोरंजक आणि काही तणावाच्या घटना घडत असतात.

*द न्यू आदर्श सोसायटीत देखील अशाच आपला स्वभावधर्म कसोशीने पाळणाऱ्या व्यक्ती रहात असून सहाजिकच या व्यक्तींच्या सहवासात द न्यू आदर्श सोसायटीत देखील काही मनोरंजक तर काही तणावाच्या घटना घडत असतात*

*कालांतराने मात्र द न्यू आदर्श सोसायटीत हीच मंडळी एक नवा इतिहास घडवतात.!!!*

पुस्तक घरपोच मागवण्यासाठी संपर्क :
परेश एजेंसिज 020 2445 91 90, 91 0982 0982

पुस्तकाचा अभिप्राय नक्की कळवा 🙂

आपला,
नितीन ढेपे

📱 Please download Grantham App. You can buy and get it delivered at your place 😊
🎁 Shipping in India only.

*Android :*
http://bit.ly/2JCoWdS

*iOS :*
https://apps.apple.com/in/app/grantham/id1434956087

प्रवाहा विरुद्ध जाऊन नवव्या वाढदिवसातही नवलाई टिकवून ठेवलेली वास्तू , ढेपेवाडा !!!फ्लॅट संस्कृतीच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन...
18/12/2023

प्रवाहा विरुद्ध जाऊन नवव्या वाढदिवसातही नवलाई टिकवून ठेवलेली वास्तू , ढेपेवाडा !!!

फ्लॅट संस्कृतीच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन ठामपणे उभे राहत लोकांना वाडा संस्कृतीची पुन्हा नव्याने ओळख करून देणाऱ्या ढेपे वाड्याच्या वास्तूला आज नऊ वर्षे पूर्ण झाली!!!

नव्याची नवलाई ओसरल्यानंतर कुठल्याही गोष्टींचे नवे पण टिकणं ही तशी अवघड गोष्ट असते किंवा ते नवेपण टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.

ढेपेवाड्याच्या वास्तुबाबत मात्र तसं काही घडलेलं नाही, उलट नऊ वर्षानंतरही उत्तरोत्तर या वास्तूची नवलाई फक्त टिकूनच राहिली नाहीये तर ती जोमाने वाढते आहे.

ढेपेवाड्याच्या वास्तू बाबत आजही आधीच्या एवढीच किंबहुना त्यापेक्षा थोडी जास्तच क्रेझ लोकांच्या विशेषतः तरुणाईच्या मनात आहे ही आनंदाची बाब आहे.

भारतीय संस्कृतीतील पारंपरिक वास्तूरचनांचा वारसा पुढे नेण्याचे आणि त्या वारशाची समृद्धी दाखवून देण्याचे काम ढेपेवाड्याची वास्तु करत आहे आणि पुढील अनेक वर्षे, अनेक पिढ्यांपर्यंत नेण्याचे काम करत राहील. अर्थातच हे काम ढेपेवाड्याच्या वास्तुला अत्यंत मायेने सांभाळणाऱ्या ढेपेवाडा परिवारातील सर्व सहकाऱ्यांच्या साथीने आणि
तुम्हा सर्वांसह आमच्या आप्तांच्या, अतिथींच्या, मित्रांच्या आशिर्वादाने निश्चित पुढे जाईल आणि या वास्तूचे सौंदर्य यापुढील अनेक वर्ष असेच खुलत राहील याची खात्री वाटते !!!

नितीन ,सौ ऋचा ढेपे

ढेपेवाडा परिवार.

  Independence Day
15/08/2023

Independence Day

आज ढेपेवाड्याचा अनंत आठवणींचा आठवा वाढदिवस !!! होय वाढदिवसच! वर्धापन दिन नव्हे! कारण ढेपेवाडा ही वास्तू  सजीव असल्याचेच ...
18/12/2022

आज ढेपेवाड्याचा अनंत आठवणींचा आठवा वाढदिवस !!!
होय वाढदिवसच! वर्धापन दिन नव्हे! कारण ढेपेवाडा ही वास्तू सजीव असल्याचेच आम्ही मानतो. आजवर फक्त आमच्याच नव्हे तर ईथे येणाऱ्या अतिथींच्या देखील सुखदुःखात सामील होणारी ही वास्तू आहे!

इथे साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक कार्यात अत्यंत सकारात्मकतेने ती रंग भरते.

लग्नकार्यात वऱ्हाडींच्या स्वागतास अतिशय नटून थटून आणि अत्यंत प्रसन्नपणे ही सज्ज असते आणि तितकीच नववधूच्या पाठवणीच्या क्षणाच्या वेळी तिच्या माहेरच्या लोकांच्या दुःखात देखील ती सहभागी असते.

आपल्या समृद्ध भारतीय संस्कृतीचा वारसा जपत असल्याचा आनंद व अभिमान तर तिला आहेच परंतु त्यापेक्षा जास्त आनंद व अभिमान आजची तरुण पिढी तिच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होते आहे याचा आहे. कारण ज्या साठी केला होता अट्टाहास तो सफल होताना तिला उघड्या डोळ्यांनी दिसत आहे.

माणसांची सारखी वर्दळ असून देखिल ती कधी थकल्या सारखी दिसत नाही उलट येणाऱ्या अतिथींचे अधिक जोमाने,आनंदाने आदरातिथ्य करण्यासाठी सज्ज असते.

मला वाटतं भारतीय संस्कृतीतील पारंपरिक वास्तूरचनांची देखिल ही खासियतच होती आणि तोच वारसा पुढे नेण्याचे आणि त्या वारशाची समृद्धी दाखवून देण्याचे काम ढेपेवाड्याची वास्तु करत आहे आणि पुढील अनेक वर्षे, अनेक पिढ्यांपर्यंत नेण्याचे काम करत राहील.

अर्थातच हे काम ढेपेवाड्याच्या वास्तुला अत्यंत मायेने सांभाळणाऱ्या ढेपेवाडा परिवारातील सर्व सहकाऱ्यांच्या साथीने आणि आमच्या आप्तांच्या, अतिथींच्या, मित्रांच्या आशिर्वादाने निश्चित पुढे जाईल आणि या वास्तूचे सौंदर्य यापुढील अनेक वर्ष असेच खुलत राहील याची खात्री वाटते !!!

नितीन ,सौ ऋचा ढेपे

ढेपेवाडा परिवार.

03/11/2022
नव्या रंगात रंगलो मी ||नव्या रूपात सजलो मी ||दिव्यांच्या प्रकाशात न्हालो मी ||अतिथींच्या स्वागतास सज्ज मी..... ढेपेवाडा ...
23/10/2022

नव्या रंगात रंगलो मी ||
नव्या रूपात सजलो मी ||
दिव्यांच्या प्रकाशात न्हालो मी ||
अतिथींच्या स्वागतास सज्ज मी..... ढेपेवाडा

तुम्हा सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐🙏

श्री नितीन,सौ ऋचा ढेपे आणि ढेपेवाडा परिवार

मोलाचे हात:- कुठलीही वस्तू , कलाकृती किंवा वास्तु निर्माण करण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात, परंतु सगळ्यात महत्त्वाचा आ...
17/10/2022

मोलाचे हात:-
कुठलीही वस्तू , कलाकृती किंवा वास्तु निर्माण करण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात, परंतु सगळ्यात महत्त्वाचा आणि मोलाचा घटक म्हणजे ती वस्तू किंवा वास्तु घडवणारे किंवा उभे करणारे मजूर/कामगार !

खरंतर अत्यंत मेहनतीचं आणि कलाकुसरीचं काम हा कामगार वर्ग करत असतो. बहुतांश कामगार वर्ग हा रोजंदारीवर काम करणारा असतो म्हणजेच
हातावर पोट असणारा असतो, त्यांनी रोज काम केलं तरच त्याच्या मजुरीचे मोल त्याच्या पदरात पडतं.

त्याला कुठल्याही प्रकारची आर्थिक सुरक्षा किंवा सामाजिक सुरक्षा उपलब्ध नसते. तापलेल्या उन्हात घाम गाळत, कडाक्याच्या थंडीत गारठलेल्या अवस्थेत, बरसणाऱ्या पावसात चिंब भिजत त्याला कष्टाच काम करायला लागतं. सणसुद हा प्रकार त्याच्यासाठी गौण असतो किंबहुना रोजच्या प्रमाणेच त्याचा रोजगाराचा तो दिवस असतो.

उद्याचे काय हा प्रश्न त्याला कायम भेडसावत असतो कारण रोजच मोलमजुरी मिळेल याची शाश्वती नसते. परंतु काम मिळालेल्या दिवसात आपलं सर्व कसब वापरून चांगलं काम करणं हे त्याचं ध्येय असतं.

राहायला स्वतःचं चांगलं घर नसताना, घालायला चांगले कपडे नसताना, अनेक कौटुंबिक
प्रश्न असताना स्वतःची दुःख बाजूला ठेवून लोकांच्या सुखासाठी आनंदासाठी हे कामगार/मजूर राबत असतात.

त्यांना कुठल्याही प्रकारची समाज मान्यता नसते. त्यांच्यावर कधीही कुठल्याही प्रकारचा प्रकाशझोत नसतो. समाजाकडून सर्वात दुर्लक्षित घटक जो असेल तर तो हा मोलमजुरी करणारा वर्ग आहे. समाजाकडून कधीही त्यांच्या अडीअडचणी, त्यांचे वैयक्तिक किंवा कौटुंबिक प्रश्न हाताळायचा प्रयत्न होत नाही उलटपक्षी त्यांच्याकडूनच जास्तीत जास्त अपेक्षा ठेवली जाते.

हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे मी गेली अनेक वर्ष व्यवसायाच्या निमित्ताने मजुरांच्या संपर्कात असतो. त्यांचे प्रश्न मी जवळून पाहतो शक्य असेल तिथे त्यांना योग्य तो सल्ला, मार्गदर्शन देतो , शक्य होईल तेवढी मदत करतो.मला आजवर व्यवसायाच्या निमित्ताने जेवढा काही कामगार वर्ग भेटला आहे किंवा पाहायला मिळाला आहे त्यांचं निरीक्षण करताना मला वर नमूद केलेल्या गोष्टी जाणवल्या. विशेषतः ढेपे वाड्याचं काम करताना या गोष्टी अधिक प्रकर्षाने जाणवल्या कारण ढेपेवाड्याचं काम पुण्यापासून 40 किलोमीटर लांब असून सुद्धा अत्यंत इमानदारीने,अत्यंत मेहनतीने ,अत्यंत कलाकुसरीने ढेपे वाड्याची देखणी वास्तू उभारण्यात या मजुरांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे. ढेपेवाडा उभारल्यानंतर ती वास्तु अत्यंत मायेने सांभाळणाऱ्या अनेक सहकाऱ्यांचे देखील मोलाचे योगदान आहे. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे किंवा त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलू

'वाडा' भारतीय स्वातंत्र्याचा सर्वात जुना साक्षीदार!!!महाराष्ट्रातील 'वाडा ', गुजरात ,राजस्थान, मध्य प्रदेश तसेच उत्तरेकड...
13/08/2022

'वाडा' भारतीय स्वातंत्र्याचा सर्वात जुना साक्षीदार!!!
महाराष्ट्रातील 'वाडा ', गुजरात ,राजस्थान, मध्य प्रदेश तसेच उत्तरेकडील राज्यांमधील 'हवेली' पश्चिम बंगालमधील 'राजबारी' दक्षिणेकडील वीड , थरवाड, मांडुवा लोगीस ह्या अत्यंत अल्प प्रमाणात शिल्लक राहिलेल्या आपल्या पारंपारिक भारतीय वास्तूरचना भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या इतिहासाच्या सर्वात मोठ्या साक्षीदार आहेत !

या वास्तूंनी फक्त भारतीय स्वातंत्र्य अनुभवलं आहे असं नाही तर स्वातंत्र पूर्व काळ म्हणजेच पारतंत्र देखील अनुभवलं आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक क्रांतिकारकांचे वास्तव्य या वास्तूंनी अनुभवले आहे. क्रांतिकारकांच्या चळवळींचे त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांचे साक्षीदार ह्या पारंपारिक वास्तू आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वसामान्य माणसांची होत असलेली घुसमट त्यांच्यावर होणारे अन्याय आणि त्यातून सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेली प्रखर राष्ट्रभक्ती देखील त्यांनी अनुभवली आहे. त्या प्रखर राष्ट्रभक्तीमुळे निर्माण झालेल्या जनरेट्यामुळे मिळालेल्या स्वातंत्र्याच्या उगवणाऱ्या सूर्याची किरणे या वास्तुंनी स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळवली आहेत.

स्वातंत्र्योत्तर काळातल्या भारतीय कला, संस्कृती व सात्विक राहणीमान बहरतानाच्या सुवर्णकाळाची अनुभूती या वास्तूंनी घेतली आहे.

ग्लोबलायझेशन नंतर मात्र स्वतःच्या 'पडत्या ' 😞 काळात या वास्तूं मधील राहणीमान व एकत्र कुटुंब पद्धती लयाला जाण्याचे दुःख देखिल या वास्तुंनी पचवले आहे.

भौतिक प्रगतीचा मार्ग चोखळताना मात्र भारतीयांकडून या पारंपरिक वास्तुरचनांकडे दुर्लक्ष झाले आणि आता तर ह्या वास्तु नामशेष होण्याकडे वाटचाल सुरू आहे.

भारतीय स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष ह्या वास्तु पाहू शकतील की नाही अशी आज परिस्थिती आहे.
पण ते काही असलं तरी या वास्तूरचनांचा वारसा सांगणारा 'ढेपेवाडा' मात्र शताब्दी वर्ष नक्की पाहिल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू कारण मला पूर्ण खात्री आहे आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या दीडशेव्या वर्षी पर्यंत भारतीय संस्कृतीतील या पारंपरिक वास्तूरचना पुन्हा उभारल्या जातील आणि त्यात पूर्वीप्रमाणेच बालगोपाळांची किलबिल आणि थोरामोठ्यांचं एकत्र राहणं अनुभवायला मिळेल!!!

नितीन ढेपे
[email protected]
www.dhepewada.com

ढेपेवाड्यातील ह्या वर्षीचे  गुढीपूजन सुप्रसिद्ध तारका सोनाली कुलकर्णीच्या हस्ते !!!गुढी संस्कृतीची !गुढी चांगल्या परंपरा...
02/04/2022

ढेपेवाड्यातील ह्या वर्षीचे गुढीपूजन सुप्रसिद्ध तारका सोनाली कुलकर्णीच्या हस्ते !!!

गुढी संस्कृतीची !
गुढी चांगल्या परंपरांची !

या शुभदिनाच्या निमित्ताने„
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना *"मंगलमय" शुभेच्छा🚩🚩

13/02/2021

Address


Telephone

9822640599

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhepewada heritage home & destination wedding posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dhepewada heritage home & destination wedding:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Event Planning Service?

Share