माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली रूप तुझे 🙏🙏😊😊
सर्व वारकरी व भक्तगणांस विनम्र अभिवादन 🙏😊
Indrani Group, Pune Sucheta Adkar Sangeeta Shevade Shobha G. Patil Sarita Limaye Mrudula Abhyankar Snehal Majgaonkar
#dohalejevan #babyshower #mangalagaur #मंगळागौर #महाराष्ट्र #mimarathi #bhakti #दिंडी #विठुराया #पंढरी
फुलले रे क्षण माझे...
#indranigroup
#pune
#fulalerekshanmaze
कार्यक्रम तर चालूच असतात...
पण त्यातही वेळात वेळ काढून छानसं काही करणार्या
आम्ही इंद्राणी.
#babyshower #namingceremony #wedding #mangalagaur #dohalejevan #pune
रखुमाई रखुमाई..!!
#Indrani group
सतत वेगवेगळ्या नृत्य रचनेतून एक स्वतंत्र ठसा उमटवणार्या आम्ही इंद्राणी.
लाॕकडाऊन मधे फारसं कुठे आणि कुणाच्या संपर्कात न येता अनेक छान उपक्रम राबवले गेले.
अशाच एका समूहासाठी केलेला हा नृत्य प्रपंच.
संपूर्ण जगाची माऊली असणारी विठाई अगदी ममत्वाने आपल्या भक्तांसाठी सतत उभी असते.
पण या माऊलीलाही पूर्णत्व ते नाहीच..
त्याचे अर्धांग म्हणजेच रखुमाई ही जेव्हा त्याच्या समवेत असते तेव्हाच खरतर ते संपूर्ण तत्व साकारतं.
प्रत्येक स्त्री मधे उपजतच असणाऱ्या या रखुमाईत्वाला आमचा सादर प्रणाम..!!
आगोटा पागोटा..
#indranigroup
#इंद्राणी गृप
आगोटाss पागोटा
घालीन म्हणते झिंगोटा..
पावसाची चाहूल लागतानाच वेध लागतात श्रावणाचे.
आणि सुरू होतो रीयाज आमच्या खेळांचा.
वर्षभर किती ही नाचलो तरी मंगळागौरीच्या खेळांची तयारी मात्र गेल्या बारा वर्षात कधीही चुकली नाही आम्हा इंद्राणींची.
अगदी घरबसल्या ही सहजपणे तनामनाला संपूर्ण व्यायाम घडवणारी ही कला.. हो कलाच..
आजकाल फारसे येतात कुठे हे पारंपरिक खेळ सगळ्यांना ??
म्हणून आम्ही या खेळांचं शास्त्रोक्त प्रशिक्षण ही देतो बरं का!!
शिवाय यंदाच्या श्रावणातलं बुकिंग ही सुरू झालय.
नंतर हिरमोड होऊ नये म्हणून आजच संपर्क साधा आणि निश्चिंत व्हा आपली मंगळागौर संस्मरणिय होण्याबाबत.
वाट बघतेय.. तुमच्या reply ची आणि comments ची..
आपलीच इंद्राणी
#mangalagaur #mangalagaurichekhel #mimarathi #maharashtramaza #dohalejevan #babyshower #pune #marathimulgi #culture #marathisanskruti
गाठोडं
आम्ही इंद्राणी..!!
दिसायला सोपा पण करायला तितकाच अवघड प्रकार म्हणजे 'लोळण फुगडी'.
काही वेळा 'गाठोडं' म्हणून ही सादर होणारा हा खेळ.
सहजासन, सुखासन यापैकी जमेल ते आसनात बसून हाताने पायाचे अंगठे पकडायचे आणि शरीर स्वतः भोवती ३६० अंशात फिरवत बरोबर तालातच समेला म्हणजे मूळ स्थितीत यायचे.
मजेशीरही आणि कस लावणाराही हा खेळ
बघा करुन..
#namingceremony #mangalagaur #dohalejevan #babyshower #culture #maharashtramaza #mimarathi #marathistri #Pune
परंपरेस लावून नाविन्याची झालर, जुन्या नव्याचा घालतो मेळ,
इंद्राणी गृप सादर करत आहे.. मंगळागौरीचे खेळ..!!
हेच आमचं ब्रीदवाक्य.
काही वर्षांपूर्वी पर्यंत केवळ श्रावणातच मंगळागौरीचे खेळ खेळले जात.
पण आता बरेचदा काही सामाजिक उपक्रमांचा भाग म्हणून किंवा सांस्कृतिक महोत्सवातून ही या सादरीकरणांसाठी आम्हाला आमंत्रित केलं जातं.
नुकताच एका रोटरी क्लबने खास वैशिष्ट्य पूर्ण मंगळागौरीच्या खेळांचं सप्रयोग व्याख्यान ( lecture - demostration) देण्यासाठी बोलावलं होतं.
त्या पैकीच हा एक खेळ..
*कंबर फुगडी*
#mangalagaur #dohalejevan #namingceremony #babyshower #pune #culture #mimarathi #marathistri #maharashtramaza
किकीचं पान..
परंपरेस लावून नाविन्याची झालर,
जुन्या नव्याचा घालतो मेळ,
इंद्राणी गृप सादर करीत आहे.. मंगळागौरीचे खेळ..!
असं ब्रीद वाक्य घेऊन २०११ साली आमच्या गृपची स्थापना झाली. आणि आज ६८५ सादरीकरणाचा अनुभव पदरी घेत आमची वाटचाल सुरुच आहे. लोक आग्रहास्तव आम्ही डोहाळे जेवण, बारसे, संगीत मेंदी अशा कौटुंबिक सोहळ्यांसाठीही सादरीकरण करु लागलो.
अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रात आणि गोवा व मध्यप्रदेशातील उज्जैन मधेही आम्हाला आमची कला सादर करता आली.
असेच आपले प्रोत्साहन , प्रेम , शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी सदोदित रहाव्यात!!
#babyshower #namingceremony #Mangalagauri #punecity #maharashtra #dohalejevan #barse #marathi #mimarathi #cultralevents #parampara #marathisanskruti