Indrani Group, Pune

  • Home
  • Indrani Group, Pune

Indrani Group, Pune Most popular group based in Pune, Maharashtra for family function like Baby Shower, Naming Ceremony,

 #807-808Indrani Group, Pune Sarita Limaye Mrudula Abhyankar Sucheta Adkar Shobha G. Patilवर्ष भर सतत आमचे वेगवेगळे कार्...
06/11/2023

#807-808
Indrani Group, Pune Sarita Limaye Mrudula Abhyankar Sucheta Adkar Shobha G. Patil

वर्ष भर सतत आमचे वेगवेगळे कार्यक्रम सादरीकरण चालू असते. त्यातल्या त्यात पितृ पक्ष ही आम्हा इंद्राणी साठी काही दिवसांची सुट्टी असते.
घट स्थापने पासून परत कार्यक्रमांचा ओघ सुरु होत असतो.
यंदा ही हीच परंपरा कायम राखत नव्या जोमाने संपूर्ण महाराष्ट्र गाजवायला सज्ज असलेल्या
आम्ही इंद्राणी..!!

#डोहाळे #परंपरा

श्री सूक्त पठणयंदा आदिमाया आदि शक्ती च्या कृपेने पठणाचे 11कार्यक्रम झाले.🙏😊लवकरच हा ही कार्यक्रम शेकडो चा आकडा पार करेल ...
24/10/2023

श्री सूक्त पठण

यंदा आदिमाया आदि शक्ती च्या कृपेने पठणाचे 11कार्यक्रम झाले.🙏😊

लवकरच हा ही कार्यक्रम शेकडो चा आकडा पार करेल हे नक्की.

#पठण #मराठी #आवर्तन #डोहाळे

Indrani Group, Pune Sucheta Adkar Sarita Limaye Shobha G. Patil Sangeeta Shevade Mrudula Abhyankar Medha Valvekar

 #796-801अधिक सांगणे नाही लगे..आम्ही इंद्राणीIndrani Group, Pune Sangeeta Shevade Sucheta Adkar Shobha G. Patil Mrudula ...
04/09/2023

#796-801

अधिक सांगणे नाही लगे..

आम्ही इंद्राणी
Indrani Group, Pune Sangeeta Shevade Sucheta Adkar Shobha G. Patil Mrudula Abhyankar Sarita Limaye Snehal Majgaonkar

 #792-794जयदेवी मंगलागौरी 🙏😊दणक्यात सुरवात यंदाच्या श्रावणाला 😊 #डोहाळे                  Indrani Group, Pune Sucheta Adk...
23/08/2023

#792-794

जयदेवी मंगलागौरी 🙏😊

दणक्यात सुरवात यंदाच्या श्रावणाला 😊

#डोहाळे

Indrani Group, Pune Sucheta Adkar Shobha G. Patil Sangeeta Shevade Mrudula Abhyankar Sarita Limaye

 #791 बस नाम ही काफी है... 😀😀😀काही प्रतिक्रियाआमच्या यजमानांकडून आलेल्या 🙏😊मोडनिंब, सोलापूर791व्या यशस्वी सादरीकरणा नंतर...
19/08/2023

#791


बस नाम ही काफी है... 😀😀😀

काही प्रतिक्रिया
आमच्या यजमानांकडून आलेल्या 🙏😊

मोडनिंब, सोलापूर
791व्या यशस्वी सादरीकरणा नंतर
आता प्रतीक्षा मंगळागौर खेळांची.

तुमच्या अशाच प्रेमाची, प्रतिसादाची आणि प्रोत्साहनाची कायमच अपेक्षा आणि खात्री असणाऱ्या
आम्ही इंद्राणी 😊😊

Indrani Group, Pune Shobha G. Patil Sarita Limaye Sangeeta Shevade Sucheta Adkar Mrudula Abhyankar Snehal Majgaonkar

 #790संपूर्ण महाराष्ट्र भर दौरे करतकाही दिवसांपूर्वी 790वा कार्यक्रम यशस्वी रित्या सादर करणाऱ्या'आम्ही इंद्राणी'आता प्रत...
31/07/2023

#790

संपूर्ण महाराष्ट्र भर दौरे करत
काही दिवसांपूर्वी 790वा कार्यक्रम यशस्वी रित्या सादर करणाऱ्या
'आम्ही इंद्राणी'

आता प्रतीक्षा मंगळागौर खेळांची..

यंदा अधिक श्रावण मासातल्या पहिल्या गुरुवारी श्री दत्तगुरुचे आशीर्वाद घेऊन मंगळागौर खेळांच्या सरावाला विधिवत सुरवात केली 🙏😊

एकीकडे #डोहाळेजेवण #बारसे #भक्तीरंग हे कार्यक्रम दौरे ही सुरू आहेतच.

अधिक माहिती आणि कार्यक्रम निश्चिती साठी लगेच संपर्क साधा 👍

#मंगळागौर #डोहाळे

13/06/2023

माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली रूप तुझे 🙏🙏😊😊

सर्व वारकरी व भक्तगणांस विनम्र अभिवादन 🙏😊
Indrani Group, Pune Sucheta Adkar Sangeeta Shevade Shobha G. Patil Sarita Limaye Mrudula Abhyankar Snehal Majgaonkar

#मंगळागौर #महाराष्ट्र #दिंडी #विठुराया #पंढरी

 #दिसलं_डेकोरेशन_केलं_फोटोसेशन_संघटनाIndrani Group, Pune Sucheta Adkar Sarita Limaye Sangeeta Shevade Mrudula Abhyankar ...
25/05/2023

#दिसलं_डेकोरेशन_केलं_फोटोसेशन_संघटना

Indrani Group, Pune Sucheta Adkar Sarita Limaye Sangeeta Shevade Mrudula Abhyankar Snehal Majgaonkar Shobha G. Patil

 #780 #781-782मे महिना म्हणजे खूप मुहूर्त..लग्नबारसे मुंजीडोहाळे जेवणआमच्या व्यस्तते मुळे सर्वाधिक कार्यक्रम रद्द करावे ...
17/05/2023

#780
#781-782

मे महिना म्हणजे खूप मुहूर्त..
लग्न
बारसे
मुंजी
डोहाळे जेवण

आमच्या व्यस्तते मुळे सर्वाधिक कार्यक्रम रद्द करावे लागलेला हा पहिला महिना 😀

खरतर सगळीकडे जाणं शक्य नाही होत त्या मुळे थोडी नाराजी असतेच..
पण इतक्या असंख्य लोकांची पहिली पसंती आपणच असल्याची जाणीव ही सुखदच..

मंगळागौरी शिवाय
एका दिवशी दोन दोन कार्यक्रम करण्याची परंपरा जपणाऱ्या
आम्ही इंद्राणी..!!

मंगळागौर कार्यक्रम बुकिंग सुरु झालंय हं मंडळी 😀
नंतरची निराशा टाळण्यासाठी आजच संपर्क साधा 🙏😊

Indrani Group, Pune Sangeeta Shevade Mrudula Abhyankar Sarita Limaye Shobha G. Patil Sucheta Adkar Snehal Majgaonkar

 #778भुसावळ #779बाणेरगेल्या तीन महिन्यात खूप लांबचे दौरे झालेत.Mouth publicity वर महाराष्ट्र भर मिळणाऱ्या अशा ओळखीने मना...
01/05/2023

#778भुसावळ
#779बाणेर

गेल्या तीन महिन्यात खूप लांबचे दौरे झालेत.
Mouth publicity वर महाराष्ट्र भर मिळणाऱ्या अशा ओळखीने मनापासून सुखावणाऱ्या
आम्ही इंद्राणी..

भुसावळला platform वर आल्यावर लक्षात आलं, निवेदन विसरलंय 😀
पण हार मानू त्या आम्ही इंद्राणी कसल्या.
लगेच पुण्याहून त्याचे फोटो मागवले
आणि दुसऱ्या दिवशी वेळ साजरी केली. 😀😀
ऐन उन्हाळ्यात Sleeper coach मधून केलेला प्रवास ही कायम लक्षात राहणारा.
'विश्वात भरून राहिलेले विविध दरवळ '
हा PhD चा विषय होऊ शकतो याची खात्री पटली 😀

परिस्थिती कशी ही असो, योग्य मार्ग काढतोच
आम्ही इंद्राणी
Indrani Group, Pune Sangeeta Shevade Mrudula Abhyankar Sarita Limaye Sucheta Adkar Kanchan Tapaswi Shobha G. Patil

 #774@bibwewadi pune  #775@jalgaon  #776@kothrud pune #777@kothrud puneतू चाल फुडं..तुला ग सखे भीती कशाची..Indrani Group...
17/04/2023

#774@bibwewadi pune
#775@jalgaon
#776@kothrud pune
#777@kothrud pune

तू चाल फुडं..
तुला ग सखे भीती कशाची..

Indrani Group, Pune Sucheta Adkar Sangeeta Shevade Shobha G. Patil Mrudula Abhyankar Sarita Limaye Kanchan Tapaswi Snehal Majgaonkar

 #दिसलं_डेकोरेशन_केलं_फोटोसेशन_संघटनाIndrani Group, Pune Sucheta Adkar  Sangeeta Shevade Shobha G. Patil Mrudula Abhyank...
08/04/2023

#दिसलं_डेकोरेशन_केलं_फोटोसेशन_संघटना

Indrani Group, Pune Sucheta Adkar Sangeeta Shevade Shobha G. Patil Mrudula Abhyankar Sarita Limaye Dhanashree Dhadphale Snehal Majgaonkar Meera Gadkari

 #771 खडकी #772 मांजरी #773 संगमनेरआर्थिक वर्ष संपता संपता अचानक हे कार्यक्रम आले आणि झाले ही 😀😀धमालमजामस्तीआणि भरपूर फो...
03/04/2023

#771 खडकी
#772 मांजरी
#773 संगमनेर

आर्थिक वर्ष संपता संपता अचानक हे कार्यक्रम आले आणि झाले ही 😀😀

धमाल
मजा
मस्ती
आणि भरपूर फोटो सह मार्च महिना साजरा झाला.

गुढी पाडव्याच्या दिवशी कार्यक्रम करून या नवं हिंदू वर्षाचे,
परंपरा आणि उत्सवी स्वागत करणाऱ्या
आम्ही इंद्राणी..

आज एका अनोळखी रसिक प्रेक्षकाने ही link पाठवली.'या तुम्हीच आहात ना..,'असं म्हणून खूप जुन्या छान आठवणी उजळून टाकल्या..सुख ...
20/03/2023

आज एका अनोळखी रसिक प्रेक्षकाने ही link पाठवली.
'या तुम्हीच आहात ना..,'
असं म्हणून खूप जुन्या छान आठवणी उजळून टाकल्या..

सुख म्हणजे अजून काय असतं?

खूप जुना आहे हा व्हिडीओ पण बघा नक्की 😊🙏

10 X12 ची एक खोली
अगदी मोजकी प्रेक्षक संख्या
अतिशय आपलेपणा भरून राहिलेल्या
अशा घरगुती मंगळगौरीची आराधना करणाऱ्या
आम्ही इंद्राणी..

Mangalagaur dance on August 2012 by Indrani Group Pune,Kothrud, Kshama Kshirsagar

05/03/2023
 #767-770पुणेठाणेबुलढाणा...मराठवाडा आणि खान्देश झाल्यावर उत्सुकता होती विदर्भ वारीची..अतिशय अगत्य आणि आपले पणाने भारावून...
05/03/2023

#767-770
पुणे
ठाणे
बुलढाणा...

मराठवाडा आणि खान्देश झाल्यावर उत्सुकता होती विदर्भ वारीची..

अतिशय अगत्य आणि आपले पणाने भारावून गेलेल्या
आम्ही इंद्राणी..!!

दोन दिवस मस्त trip plan करूनच गेलो होतो आम्ही
मेहकर चा 'शारंग बालाजी'
'नरसिंह मंदिर'
लोणीचा 'सखाराम महाराज मठ'
आणि एक जगतरहस्य असणारे असे
'लोणार सरोवर' प्रदक्षिणा.. एक खास अनुभव!!
त्या नंतर शेगाव ग्रामी 'महाराज'चरणी माथा टेकून पुण्या कडे वापसी करणाऱ्या
आम्ही इंद्राणी!!

कार्यक्रम करता करता वाढत जाणारा इंद्राणी चा परिवार आणि त्या निमित्ताने भटकंती प्रिय सख्यांबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी भेटी, मंदिर व देव दर्शन आणि
अविभाज्य असे फोटो सेशन..
सगळं काही मनापासून enjoy करणाऱ्या
आम्ही इंद्राणी..!!

 #763 भक्तीरंग- पुणे #764 हळद/ संगीत- पुणे #765 डोहाळे जेवण - वाकड #766 मंगळागौर- वडगाव शेरीआपली परंपरा, रीती, संस्कार य...
12/02/2023

#763 भक्तीरंग- पुणे
#764 हळद/ संगीत- पुणे
#765 डोहाळे जेवण - वाकड
#766 मंगळागौर- वडगाव शेरी

आपली परंपरा, रीती, संस्कार योग्य पद्धतीने पुढील पिढीकडे प्रवाहित करणं हाच आम्हा इंद्राणींचा उद्देश.
हाच उद्देश मनात ठेवून आम्ही वाटचाल करतोय अथक गेली १४ वर्ष ..
पारंपरिकता आणि नविनतेचा मेळ घालत कार्यक्रम सादर करण्याचे कसब कुटुंबातील तीन पिढ्यांनाही तितकेच आवडते
हेच इंद्राणीचे यश..
म्हणूनच फारशी जाहिरात न करताही एवढा टप्पा गाठू शकलोय
आम्ही इंद्राणी..
फक्त मराठीच नव्हे तर इतर भाषिक कुटुंबेही इंद्राणीच्या परीवारात जोडली गेली आहेत.

उत्तर प्रदेशातील वर आणि त्याच्या आप्त गणांस महाराष्ट्रातील लग्न सोहळ्याची विधीवत परंपरा समजावी म्हणून सादर केलेला 'हळदीचा' कार्यक्रम असो
किंवा
नववधू ही पंजाबी कुटुंबातील असल्याने तिच्या माहेरच्यांसाठी म्हणून आवर्जून 'मंगळगौर' खेळणं असो
किंवा
नवीन वास्तू प्रवेशाचा क्षण मंगलमयी व संस्मरणिय व्हावा म्हणून आपल्या मित्र स्वकीयांना खास आमंत्रित करुन झालेला
'भक्तीरंग'
किंवा
नणंद भावजयीच नाजूक नातं निभावताना सरप्राईज गिफ्ट म्हणून झालेला आमचा
'डोहाळे जेवणाचा' कार्यक्रम
हे आणि असे शेकडो कार्यक्रम सादरीकरणासाठी अनेकजण परत परत निवड करतात
इंद्राणीचीच..

आमच्यावर असणारा आपला स्नेह असाच वृद्धिंगत होवो हीच मनापासून इच्छा !!

 #759 कोथरुड #760 मांजरी #761 शिक्रापूर #762 कर्वेनगरजानेवारी २०२३ ची सुरूवात तर दणक्यात झालीय. पुन्हा एकदा सकाळ संध्याक...
20/01/2023

#759 कोथरुड
#760 मांजरी
#761 शिक्रापूर
#762 कर्वेनगर

जानेवारी २०२३ ची सुरूवात तर दणक्यात झालीय.
पुन्हा एकदा सकाळ संध्याकाळ एकाच दिवशी दोन कार्यक्रम करण्याचा अनुभव आला.
दोन वेगवेगळ्या पद्धती आणि परंपरा
परंतु उद्देश एकच.
येणाऱ्या नवागताचे स्वागत!!

शिक्रापुरचा अनुभव तर फारच भावनिक होता. मोठ्या बहिणीचे डोहाळे जेवण आम्हीच करुनही ७ वर्ष झालेली. अगदी आठवणीने परत आम्हाला धाकटया बहिणीकडेही आमंत्रण होतं. कारण मोठीच्या वेळेस वडिलांनी पुढाकार घेऊन ठरवलेला होता कार्यक्रम आणि त्यांना खूपच आवडलेलाही.
चारच महिन्या पूर्वी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्यावतीने मोठीने धाकटीचे केलेले हे कौतुक खरच मनाला भावलं ही आणि नकळत डोळे पाणावूनही गेलं..

कर्वेनगरची तर वेगळीच गंमत .
मधे मधे सतत येत असणारा व्यत्यय आणि
ढिसाळपणे झालेले सादरीकरण.. आम्हीच मनातून नाराज झालेलो पण जमलेले समस्त आप्तेष्ट मात्र आमचं कौतुक करकरुन थकेनात.. ही पण एक मज्जाच..
मनापासून जोपासलेली आणि सादर केलेली कलाकृती अंशात्मक पद्धतीने साकार झाली तरी त्याला मनापासून दाद ही मिळतेच..
असच काहीसं..

 #758    छकुला आणिक छकुली मध्येकोण आवडे अधिक तुला?सांग मला ग सांग मला..संसार वेल बहरू लागल्यावर येऊ घातलेल्या नवागताची च...
29/12/2022

#758



छकुला आणिक छकुली मध्ये
कोण आवडे अधिक तुला?
सांग मला ग सांग मला..

संसार वेल बहरू लागल्यावर येऊ घातलेल्या नवागताची चाहूल मोहरुन टाकणारी असते.
या काळात स्त्री च्या शरीरातील बदल तिच्या मानसिकतेवर अधिक अवलंबून असतात.
म्हणूनच डोहाळे लागले की तिला काय हवं काय नको याची दखल समस्त कुटुंब घेतं आणि तिच्या आवडी निवडीही पुरवतं.

या काळात तिने सतत हसत, समाधानी रहावं
पौष्टिक आणि पूरक अन्न सेवन करावं
याची काळजी घरातील प्रत्येक जण घेतच असतो.

मुलगा की मुलगी?? यावर चर्चा रंगतात
येणाऱ्या चिमुकल्या सभासदाचं नाव काय असावं हे ठरवताना दिवसही अपुरा पडतो..
आणि योग्य वेळेस स्वारीचं आगमन होतं

सगळी जनता या इवल्याश्या जीवापुढे नतमस्तक होते..
नवचैतन्याने नव्या उमेदिने या नवागताचे स्वागत करायला सगळे सज्ज होतात.

१२/१३ वा दिवस किंवा एखादा सुमुहूर्त बघून बाळाचे नामकरण केले जाते आणि
या जगात त्याला त्याचं स्वतंत्र व्यक्तीत्व बहाल केलं जातं..

बारशाला ही एका छानशा संकल्पनेवर आधारित रंजक सादरीकरण करणाऱ्या आम्ही इंद्राणी..

Indrani Group, Pune Sarita Limaye Shobha G. Patil Mrudula Abhyankar Snehal Majgaonkar Sangeeta Shevade
19/12/2022

Indrani Group, Pune Sarita Limaye Shobha G. Patil Mrudula Abhyankar Snehal Majgaonkar Sangeeta Shevade

केस..भारतीय सौंदर्य शास्त्राच्या निकषातील एक महत्त्वाचे लक्षण 'केस'..केस, केश, बाल, गेसूं, अलकै, जुल्फ, लट, जटा, कलाप अश...
19/12/2022

केस..
भारतीय सौंदर्य शास्त्राच्या निकषातील एक महत्त्वाचे लक्षण 'केस'..

केस, केश, बाल, गेसूं, अलकै, जुल्फ, लट, जटा, कलाप अशा विविध शब्दरुपांनी सजलेले हे सौंदर्य लक्षण

या केसांना कधी रेशीम बंध म्हणून नावाजले जाते तर कधी काळी सर्पिणी म्हणून..
लांब काळे घनदाट केशसंभार आणि फुलं हे तर खासच समीकरण ..

विविध भाषांमधे विविध साहित्यिक या सौंदर्य लक्षणाचे वर्णन खूप मनोहारी पद्धतीने करताना दिसतात.

वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या अधेमधे स्वतःची छबी वेळेच्या बंधनात बद्ध करताना अशाच काही 'नायिका' आम्हाला गवसतात
आणि एक छानसा काव्यात्म छायाचित्रपट तयार होऊन जातो.

बघा
कसा वाटतोय सांगा..

 #756"रंगात मिसळले रंग नवे,साधले चित्र जे मला हवे.."२७ नोव्हेंबरला रात्री  पुण्यात शिवाजी नगरला ७५५ वा कार्यक्रम करुन घर...
30/11/2022

#756

"रंगात मिसळले रंग नवे,
साधले चित्र जे मला हवे.."

२७ नोव्हेंबरला रात्री पुण्यात शिवाजी नगरला ७५५ वा कार्यक्रम करुन घरी यायला अकरा वाजून गेले.
लगेच २८ ला पहाटे ५ वा पुढील कार्यक्रमासाठी सोलापूरला रवाना
आम्ही इंद्राणी..

तोच उत्साह आणि तशीच ऊर्जा ..

साडेदहाला कार्यक्रम सुरू करायचा आहे असं आम्हाला सांगितलं गेलं होतं.
त्या मुळे तिथे पोचताच झटपट तयार होऊन आम्ही कार्यक्रम स्थळी आलो.
पण नेहमीप्रमाणे काही वेगळेच गेम्स इ. गोष्टी चालू होत्या.
मग काय..
वेळेचा सदुपयोग कायमच करतो
आम्ही इंद्राणी...

येताना प्रवासात ही 'थिमेटिक फोटोसेशन' केलेलच. हाॕलवर तर काय .. मस्त डेकोरेशन ही केलेलं शिवाय भरपूsssssर वेळ आणि प्रचंड हौशी अशा
आम्ही इंद्राणी..

 #754'घाणा भरीला, सवाखंडीगहू, नवर्या मुलीला गोत बहू, गणराज!!''सयांना सया पुसं गं, काय अबदुल वाजतय?पहाटचं दळण, मायलेकीला ...
25/11/2022

#754
'घाणा भरीला, सवाखंडीगहू, नवर्या मुलीला गोत बहू, गणराज!!'

'सयांना सया पुसं गं, काय अबदुल वाजतय?
पहाटचं दळण, मायलेकीला सजतयं!'

संगीत हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटकच. जात्याच्या लयबद्ध घर्षणध्ननी च्या तालावर सुरेल सहज ओवीनेच दिवसाची सुरूवात होणं ही खरी परंपरा.
कालपरत्वे काही बदल झाले. आणि या अशा सांगितिक वारशाला आपण पारखे होऊ लागलो.
पण अशा परंपरांचं जतन करणं हाच ध्यास घेतलेल्या
आम्ही इंद्राणी..

अलिकडे लगीनघरी 'संगीत- मेंदी' असा सोहळा साजरा होतो.
इथेही आघाडीवर असणाऱ्या
आम्ही इंद्राणी..

गाणी
मग ती हळदीची असोत
घाण्याची असोत
असोत जात्यावरच्या ओव्या
किंवा आधुनिक प्रथेनुसार 'संगीत' ...
परंपरा आणि नवतेचा छानसा मेळ घालत आपली छाप सोडणार्या
आम्ही इंद्राणी..

जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें..ये जमीं चाँद से बेहतर नजर आती है हमें.. #751@लोणीत्या आधी #749@ औरंगाबाद  #750@...
02/11/2022

जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें..
ये जमीं चाँद से बेहतर नजर आती है हमें..

#751@लोणी
त्या आधी
#749@ औरंगाबाद
#750@टेंभुर्णी

थोडक्यात काय? तर.. सगळं परत पूर्वी प्रमाणे सुरू झालय..
बाहेरगावचे अनेक कार्यक्रम रांगेत आहेत.
ठिकाण कोणतही असो, कार्यक्रमा आधी आणि नंतर ही मस्त मज्जा करतो
आम्ही इंद्राणी..

त्यात
हिरवंगार लाॕन
तरल थंड वातावरण
छानसा चंद्र
प्रचंड दाद मिळालेला कार्यक्रम आणि तो ही ७५१ वा
आणि
आम्ही इंद्राणी

फोटोंना वेगळा विषय शोधायची गरजच नाही. प्रत्येक फोटो हा एक story होऊ शकतो इकडे.

कार्यक्रमा आधीची लगबग उत्साहाने साजरी करणाऱ्या आणि नंतरचा वेळ शांतपणे रीलॕक्स होणाऱ्या
आम्ही इंद्राणी...

माझ्झ्या कपाळीचं कुंकूकौतुकानं किती बाई निरखू??आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा एक अविभाज्य घटक म्हणजे कुंकूकुंकू, सिंदूर, बि...
19/10/2022

माझ्झ्या कपाळीचं कुंकू
कौतुकानं किती बाई निरखू??

आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा एक अविभाज्य घटक म्हणजे कुंकू
कुंकू, सिंदूर, बिंदी, टिका, गंध, माथाटिकी, टिकली..
किती तरी नावं
आणि अनेक पद्धती आरेखनाच्या.

हळदीचे कुंकू, चंदन टिका, अष्टगंध, कस्तुरी हे पूर्वापार चालत आलेले काही प्रकार प्रचलित आहेत.

भाळावरील एका ठराविक ठिकाणी ठराविक पद्धतीने दाब दिल्यास सप्तचक्रापैकी महत्त्वाचे असे आज्ञाचक्र कार्यरत होते.

योगोपचार, रंगोपचार अशा काही उपचार पद्धती मधे कुंकू आरेखना बद्दल विशेष माहिती मिळू शकते.

कोणत्याही दागिन्या पेक्षा ही केवळ बोटभर कुंकू भाळी रेखाटण्याने स्त्रीचे सौंदर्य सर्वाधिक खुलून दिसते.

कुंकू म्हणजेच माथाटिकी रेखांकन करणे आणि ते मिरवणे ही.. या ही बाबतीत प्रयोगशील असणाऱ्या
आम्ही इंद्राणी...

 #748     'नमस्कार! ओळखलत का मला?'हसून समोर आलेल्या एक जण अगदी कौतुकाने माझ्याकडे बघत विचारत होत्या.हो म्हणू की नाही .. ...
15/10/2022

#748





'नमस्कार! ओळखलत का मला?'
हसून समोर आलेल्या एक जण अगदी कौतुकाने माझ्याकडे बघत विचारत होत्या.
हो म्हणू की नाही .. पंचाईतच झाली माझी..
'अहो अंमळनेरला नाही का कार्यक्रम केला होतात तेव्हा भेटलो होतो आपण..'

मी हसून हो हो आठवलं वगैरे म्हणाले
पण खरतर ७-८ वर्ष झाली त्याला
शेकडो कार्यक्रम ही झाले

आमचे चेहरे आणि आम्हालाही लक्षात ठेवून आवर्जून भेटणारी आणि भरभरून कौतुक करणारी मंडळी हीच काय ती आमच्या कामाची पावती..

नेहमीच्या नौवारी पेक्षा जरा वेगळ्या पोशाखात फोटोसेशन करुन डिपीसाठी मटेरीयल गोळा करणाऱ्या
आम्ही इंद्राणी..

       कोजागिरीशारदिय नवरात्रीची अर्थपूर्ण सांगता..नवरात्रीच्या पहिल्याच माळेला रोटरी क्लब तर्फे 'भक्तीरंग' या कार्यक्रम...
09/10/2022






कोजागिरी
शारदिय नवरात्रीची अर्थपूर्ण सांगता..
नवरात्रीच्या पहिल्याच माळेला रोटरी क्लब तर्फे 'भक्तीरंग' या कार्यक्रमात आदिमायेचरणी आम्हाला आमची कलापुष्पमाला चढवायची संधी मिळाली.

संपूर्ण नवरात्र 'श्रीसूक्त पठणात' व्यस्त असलेल्या
आम्ही इंद्राणी..

आजच्या कोजागिरीच्या दिवशी दोन ठिकाणी सप्तशती पाठ
त्या नंतर बालाजी मंदिर महिला मंडळात ' भोंडला आणि संस्कृती' चे सादरीकरण करुन
वाकडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करायला सिद्ध
आम्ही इंद्राणी..

नेहमीप्रमाणे वेळेआधी पोचल्यावर तोंडभर हसून यजमानिण बाईंनी स्वागत केले.
थोडासा वेळ आहे हं, आधी एक बड्डे करुन घेऊयात.. म्हणत पुढे सांगितलेल्या वेळेच्या पुढे किमान पाऊण तास गेल्यावर शेवटी आम्हाला माईक हातात घ्यावाच लागला.

एक नवयौवना मात्र अतिशय चढेल स्वरात आमच्याशी बोलत होती. तिचा सूर तिचा अविर्भाव खरतर अजिबातच पटणारा नव्हता...
पण त्या कुटुंबातील आमचा आजचा ६वा कार्यक्रम होता.
इतकं प्रेम, असा प्रतिसाद मिळत असेल तर काही गोष्टी मुद्दामच नजरेआड करत पुढे वाटचाल करणाऱ्या
आम्ही इंद्राणी...

14/09/2022




ऐलोमा पैलोमा (ऐल अम्मा पैल अम्मा) गणेश देवा
माझा खेळ मांडिला करीन तुझी सेवा...

गणेशोत्सव संपला की वेध लागतात नवरात्रीचे!

आदिशक्ती आदिमायेच्या पूजनाचे
घटस्थापनेचे..
कुंकूमार्चन, श्री सूक्तपठण, हळदी कुंकू, सवाष्णी पूजन असे अनेक सोपस्कार या काळात खास करुन महाराष्ट्रात केले जातात.

गुजरातेत गरबा खेळत(नाचत) नवरात्री जागवल्या जातात.
तर बंगालात दुर्गा पूजन करत कुंकुंम् खेला साजरा करत आदिशक्तीला पूजले जाते.

महाराष्ट्रात भोंडल्याची परंपरा जपली जाते.
समृद्धी , लक्ष्मी चे प्रतिक म्हणून
हस्त नक्षत्राचे प्रतिक
असे हत्ती चिन्ह मधोमध पूजले जाते आणि भोवताली रींगण करत गाणी म्हणत सख्या फेर धरतात.
तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब झळकणारी मजेशीर गाणी हे भोंडल्याचे खास वैशिष्ट्य
शिवाय शेवटी ओळखली जाणारी खिरापत हे तर सगळ्यात कौशल्याचे काम.
आपली खिरापत सर्वाधिक वेगळी हटके आणि एकमेव असावी अशी जणू चुरसच लागलेली असते.

श्रीसूक्त पठण, अथर्वशिर्ष आवर्तन , लघुरुद्र, सत्यनारायण, मंगळागौर पूजन अशा अनेक धार्मिक विधींचे
शास्त्र शुद्ध पद्धतीने पौरोहित्य करण्यात माहिर असणार्या आम्ही इंद्राणी..!

यंदाही नवरात्रीतील अनेक तारखा या कार्यात व्यस्त असणाऱ्या आम्ही इंद्राणी!


03/09/2022



'सोनियाच्या पावलाने लेक आली माहेराला,
पाहुनिया रुप तिचे भूल पडे चांदण्याला..!'

आज गौरी आगमन. त्या निमित्ताने एक छानशी रचना..

'बंधू येई गो माहेरी न्यायला
गौरी गणपती च्या सणाला..'

गौरी , ज्येष्ठ गौरी , महालक्ष्मी वगैरे नावाने भाद्रपद माहिन्यात पूजली जाणारी आदीशक्ती..
माहेरवाशिणच ..

मंगळागौर
ज्येष्ठ गौर
चैत्र गौर

रुप किंवा नाव काही असो भाव एकच स्त्री शक्ती..
मायेची लेकच की

अशा लेकीचं कोड कौतुक करायला शब्द ही अपुरे पडावेत.

लेकीबद्दलची ही भावना खास आम्हा इंद्राणींसाठी अतिशय सुंदर शब्दांत गुंफलीय सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार वैभव देशमुख यांनी.
जरुर बघा आणि कंमेट करा.
आपल्या आभिप्रायाची आणि प्रतिसादाची प्रतिक्षा करणाऱ्या
आम्ही इंद्राणी..

28/08/2022




कार्यक्रम तर चालूच असतात...
पण त्यातही वेळात वेळ काढून छानसं काही करणार्या
आम्ही इंद्राणी.

 #741   आपल्या रुढी, परंपरा आणि संस्कार मागील पिढीकडून पुढील पिढीपर्यंत पोचवण्याचा मनापासून प्रयत्न करणाऱ्या 'आम्ही इंद्...
24/08/2022

#741



आपल्या रुढी, परंपरा आणि संस्कार मागील पिढीकडून पुढील पिढीपर्यंत पोचवण्याचा मनापासून प्रयत्न करणाऱ्या
'आम्ही इंद्राणी' !!

प्रत्येक गोष्टीतील शास्त्र समजून घेऊन, स्वतः आनंद घेत केलं जाणारं सादरीकरण तेवढ्याच सकारात्मकतेने समोरच्या पर्यंत पोचतच.
आणि हाच आनंद आमच्या चेहऱ्यावर दिसतो.
असं जेव्हा समोरून सांगितलं जातं,
हाच आनंद आणि समाधान अजून ओसंडून वहातो.

नाही नाही म्हणत यंदा १६ कार्यक्रम झालेच मंगळागौरीचे.

आणि फायनली ७४१ वा यशस्वी कार्यक्रम सादर करुन यंदाचा श्रावण सुफळ संपूर्ण !!!

10/08/2022

Please do watch, like, comment and share...

Thanks!!

आला श्रावण श्रावण, रीतुमोहक मनभावन.. 718- बिबवेवाडी- बारसं719- कँम्प, पुणे-डोहाळेजेवण720-सीप्लासेंटर- मंगळागौरीचे खेळसलग...
01/08/2022

आला श्रावण श्रावण, रीतुमोहक मनभावन..
718- बिबवेवाडी- बारसं
719- कँम्प, पुणे-डोहाळेजेवण
720-सीप्लासेंटर- मंगळागौरीचे खेळ

सलग तीन वेगवेगळी सादरीकरणं.

'कार्यक्रमाची सुरूवात झाल्यापासूनच पाहुण्यांनी जो प्रतिसाद दिला ना.. मलाच फार छान वाटतय. बारसं म्हणजे काही गाणी म्हणाल असं वाटून जरा साशंक होते पण आता जो तो येऊन कौतुक करतोय हो, सुंदर कार्यक्रम ठेवला म्हणून ..'

ओटी भरणाच्या सादरीकरणात पाठवणीचा प्रसंग बघताना, समोर मधोमध बसलेल्या गर्भाशिणीचे पाणावलेले डोळे आणि
तिची भावावस्था ओळखून हलकेच तिचा हात हातात घेणारा तो
ही तर नेहमीचीच खूण .. कार्यक्रम रंगत जाण्याची..

बेभरवशाच्या आयुष्याचा हिशोबच जिथे थीटा पडतो
अशा कर्करुग्णांच्या चेहर्यावर पसरलेलं हसू,
डोळे उघडत नसतानाही गाणी ऐकून तालावर हलणारी बोटे, नेमक्या ठिकाणी वाजणारी टाळी, लुटूपुटूचं सासू सुनेचं भांडण बघून हाॕलभर उमटणारं हास्य,
अशा प्रकारची दाद ही केवळ आणि निव्वळ अनमोलच..
सर्व रुग्णांबरोबरच त्यांचे नातेवाईक, सेवक, परिचारीका आणि समस्त डाॕक्टर परीवार या सगळ्यांना काही काळ वेगळ्या विश्वात नेऊ शकतो ही भावनाच कोणत्याही मानापेक्षा किंवा धनापेक्षा श्रेष्ठ!!

श्रावणमासी हर्ष मानसी...सूप, लाटणी, कळशा,तवे, करवंट्या..आणि टिपर्या, घुंगरु..शिवायनारळ, ओटी, फुटाणे, गजरे..श्रावणाची आणि...
30/07/2022

श्रावणमासी हर्ष मानसी...

सूप, लाटणी, कळशा,तवे, करवंट्या..
आणि टिपर्या, घुंगरु..
शिवाय
नारळ, ओटी, फुटाणे, गजरे..

श्रावणाची आणि अनुषंगाने मंगळागौरीच्या खेळांची ही झाली तयारी सुरु..
मुळातच अगदी घरगुती साधनांमधूनच मनोरंजन आणि प्रबोधन ही हीच तर आपली परंपरा आणि संस्कृती.
श्रावणाची सुरूवात आणि पहिलाच वार शुक्रवार हा योग साधत आमच्या नेहमीच्या सामग्रीची साग्रसंगीत पूजा करुन मुहूर्त केला.
यंदा मंगळागौरी बरोबरच इतरही कार्यक्रम धरुन २५ हून अधिक कार्यक्रम ठरले आहैत फक्त श्रावणातच.
यंदाचा श्रावण जोरदारच आहे आम्हा इंद्रांणींसाठी.
साजरा तर होणारच..
आमचं ब्रीदवाक्यच आहे
'परंपरेस लावून नाविन्याची झालर, जुन्या नव्याचा घालतो मेळ, इंद्राणी गृप सादर करत आहे, मंगळागौरीचे खेळ..!!'

    खेळूया झिम्मा, धरुया फेरचला ग मंगळागौरीचा या करुया जागर..!!श्रावणाची चाहूल लागताच वेध लागतात मंगळागौरीच्या खेळांचे.ल...
28/07/2022





खेळूया झिम्मा, धरुया फेर
चला ग मंगळागौरीचा या करुया जागर..!!

श्रावणाची चाहूल लागताच वेध लागतात मंगळागौरीच्या खेळांचे.
लहानपणी गल्लीतल्या कोणाही नवविवाहितेची मंगळागौर असो शिवाय नागपंचमी, हरतालिका या सणांनाही अक्षरशः रात्र हे खेळ खेळत जागवली जायची.

कालपरत्वे अनेक गोष्टी बदलल्या.
आता कार्यालयात होतात पूजा, ते ही मर्यादित वेळेतच.
शिवाय आताशा हे पारंपरिक खेळ सगळ्यांना येतातच असं नाही.
पण शिकावेसे मात्र वाटतच असतात.
तेव्हा आवर्जून आम्हा इंद्राणींना आमंत्रित केलं जातं हे खेळ शिकवायला.

आजही तसाच योग जुळून आला.
पुढारी कस्तुरी क्लब तर्फे आज महिलांसाठी हे खास प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं.
खूप छान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सख्यांकडून.

पुढारी कस्तुरी क्लबच्या सर्व संचालिका आणि पदाधिकारी मैत्रिणींचे मनापासून आभार!!

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indrani Group, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Event Planning Service?

Share