Merak Events

Merak Events Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Merak Events, Event Planner, .

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा,दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा...🏮🪔 दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🪔  ...
14/11/2023

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा,
दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा...
🏮🪔 दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🪔

__________________________________
Follow Merak Events

#लग्न

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळूदे आकाश,ही दिवाळी घेऊन येवो  सुखाचा प्रकाश!🏮🪔 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔    ________________...
12/11/2023

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळूदे आकाश,
ही दिवाळी घेऊन येवो सुखाचा प्रकाश!
🏮🪔 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔

__________________________________
Follow Merak Events

#लग्न

दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी...धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टीधनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!  __...
10/11/2023

दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी...
धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

__________________________________
Follow Merak Events

#लग्न

💐 सर्व रंगकर्मी तसेच तुम्हा नाट्य रसिकांना  मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐__________________________________Fo...
05/11/2023

💐 सर्व रंगकर्मी तसेच तुम्हा नाट्य रसिकांना मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐
__________________________________

Follow Merak Events

#लग्न

बंध नात्यांचे.. रंग ऋणानुबंधांचे... नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्ही नऊ रंग पाहिले, सोबत स्त्रिला जोडून ठेवणारी नऊ नाती पाह...
24/10/2023

बंध नात्यांचे..
रंग ऋणानुबंधांचे...

नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्ही नऊ रंग पाहिले, सोबत स्त्रिला जोडून ठेवणारी नऊ नाती पाहिली. या नात्यांमधले भाव पहिले. प्रत्येक
छटेतली तुमची पसंती तुम्ही दिलखुलास पणे सांगितली. नवरात्री साठी मेराक इव्हेंट ने केलेला हा पहिला वहिला प्रयत्न तुम्ही मनापासुन स्विकारलात ... तुम्हां रसिक प्रेक्षकांचे आभार कसे मानावे...

हा संपूर्ण प्रोजेक्ट म्हणजे एक दोघांचं काम नाही. या साठी खूप मेहेनत घेणारी आमची मेराक टीम ....
प्रत्येक चेहऱ्यावरचा भाव अचूक टिपणारा आमचा फोटोग्राफर योगेश रावराणे.
फोटोग्राफीत असिस्ट करणारा नितेश चारी.
सगळ्या सख्या सुंदर दिसण्यासाठी नित्य प्रयत्नशील असणारी आसावरी गोखले.
सुंदर दागिन्यांनी सजवणारे श्रीकांत बाबुराव हरचेकर ज्वेलर्स चे मनीषा आणि केदार हरचेकर,
उत्तम लेखणीने देवीची माहिती पुरवणाऱ्या सौ. धनश्री लेले, फुलांची सुंदर जोड देणारे श्याम भगत, देवीच्या फोटोची उत्तम डिझाईन्स बनवणारे शिरीष खांडेकर ( निर्मिती ग्राफिक्स),
या सगळ्या फोटोज् ना एका छान रिल मध्ये बसवणारा राजेंद्र कदम.
या रिल्स ना आपला आवाज देणारे आमचे कलाकार मिञ ( तुषार दळवी, मधुरा वेलणकर, कुणाल रेगे, योगेश सोहनी, स्मिता गवाणकर, राजन जोशी, समीरा गुजर, भक्ती वर्तक, विघ्नेश जोशी )
आणि हे छान प्रोजेक्ट तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवणारे स्मृतीगंधचे अमित टिल्लू, रोहित शुक्ला, दिव्येश बापट शिवाय मेराक इव्हेंट्सचं सोशल पेज सांभाळणारा आमचा अभिजीत एदलाबादकर. संपूर्ण पोजेक्ट मध्ये A पासून Z पर्यंत सगळ्या गोष्टी सांभाळणारे निशांत खानविलकर , मिथील दळवी. सगळ्यांना छान खाऊ पिऊ घालणाऱ्या सौ. वृंदा हरिदास.
शूट साठी लागणाऱ्या बऱ्याच टेक्निकल गोष्टी सांभाळणारे योगेश फाळके, संदीप कदम, परेश, बबन, गावडे दादा आणि या न त्या कारणाने ज्यांचा हातभार लागला आहे ते सगळे सहकारी.
तुम्हां सगळ्यांना सलाम...

या आभार युक्त लेखात दोन नाव अगदी विसरता न येणारी, अंकित हेटे आणि शिवानी महाडकर. तुमचा खारीचा वाटा मोलाचा होता.

आणि सगळ्यात शेवटी ज्यांची संकल्पना आणि संयोजन मेराक च्या सौ. मंजिरी हेटे, प्रसाद महाडकर, प्रिया साटेलकर...

स्वामी कृपा अखंड राहो... 🙏🏻
दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
....

23/10/2023

बंध नात्यांचे...
रंग ऋणानुबंधाचे...

नवरात्रीच्या नवव्या दिवशी पूजन करायचं सिद्धिदात्री देवीचं…

ब्रम्हा, विष्णु, महेश या त्रिदेवांची निर्मिती सिद्धिदात्री देवीने केली. या तिघांनी तपश्चर्या केली. तेव्हा प्रसन्न होऊन दुर्गा देवीने त्यांना दर्शन दिलं ते सिद्धिदात्री रुपात...

ही देवी आपल्याला सिद्धी देते पण त्याचा वापर कसा करायचा हे गुरू शिकवतो. एखाद्या गोष्टीतलं तत्व जो उलगडून सांगतो आणि त्या सगळ्याकडे पाहण्याची सुंदर दृष्टी देतो तो गुरू.
स्त्रिया जास्तीत जास्त वेळ स्वयंपाकघरात असतात, तिथे त्यांची आई, सासू , तर कधी अगदी कामवाली बाई सुद्धा या गुरूच्या भूमिकेत असतात. . केवळ आम्ही असं करत आलो आहोत म्हणून किंवा शास्त्र असतं ते, असं न म्हणता त्यातलं खरं शास्त्र, विज्ञान काय आहे हे जो सांगतो, तो त्यातला गुरू...
गुरू प्रमाणेच सर्वसमावेशकता हे वैशिठ्य मोरपंखी रंगाचं… हिरव्या रंगामुळे सर्जनशीलता, तर निळ्या रंगाचं विशालपण ह्या दोन्ही गोष्टींचा त्यात छान संगम पाहायला मिळतो.
मोरपंखी रंग म्हंटला की स्मृतिपटलावर मुरलीधर सुद्धा दिसू लागतो. खरंतर एक मोरपीस श्री कृष्णाच्या मुकुटात असतं पण या रंगाचं नातंच जुळून गेलं श्रीकृष्णाशी.. मोराच्या पिसाऱ्याचा रंग किती नेत्र सुखद असतो.
ऐश्वर्य दाखवणारा हा रंग! एक घरंदाजपण, एक प्रकारचा ठेहेराव दाखवणारा हा रंग..! ती "गुरू" आणि ती "शिष्या" या नात्याला स्त्रीपणाचा जसा एक वेगळा आयाम आहे अगदी तसाचं..

आजची देवी जशी सिद्धिदात्री तशीच गुरू ही असते …सिद्धिदात्री… अशा सर्व स्त्रियांच्या ठायी असणाऱ्या गुरुत्वाला मनापासून वंदन !

नववं नातं : गुरू - शिष्या
गुरू : सोनाली मंदार कर्णिक
शिष्या : इरा रेले
प्रियंका मंत्री
अनुष्का फाटक

संकल्पना / संयोजन :
मेराक इव्हेंट्स
मंजिरी हेटे, प्रसाद महाडकर, प्रिया साटेलकर
लेखन : धनश्री लेले
व्हॉईस ओव्हर : कुणाल रेगे
डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
छायाचित्र : योगेश रावराणे
रंगभूषा : आसावरी गोखले ,पॅशन - अंधेरी, पूर्व
दागिने : श्रीकांत बाबुराव हरचेकर ज्युवेलर्स ,विलेपार्ले -पुर्व
डिझाईन : निर्मिती ग्राफिक्स
फुलांची सजावट : श्याम पांडुरंग भगत,दादर
रील डिझाईन : राजेंद्र कदम

....

बंध नात्यांचे...रंग ऋणानुबंधाचे...नवरात्रीच्या नवव्या दिवशी पूजन करायचं सिद्धिदात्री देवीचं…ब्रम्हा, विष्णु, महेश या त्र...

22/10/2023

बंध नात्यांचे...
रंग ऋणानुबंधाचे...

नवरात्री मधला आठवा दिवस हा महागौरीच्या स्मरणाचा...
असुरांशी युद्ध करताना शुंभ - निशुंभ या राक्षसांचा वध केल्यावर दुर्गेने गंगेत स्नान केलं आणि ती तिच्या मूळ रुपात आली. तिच्या गोऱ्या रंगावर गंगेच्या पाण्याची धवलता हळूहळू चढू लागली आणि ती गौरी न राहता महागौरी ठरली...
दुर्गेची एवढी वेगवेगळी रूपं, त्यांच्या कथा - महिमा हे सगळं लहानपणापासून आजी नातीला सांगत आली आहे.
नुसत्या कथाचं नाही तर त्यामागची श्रद्धा, जिव्हाळा आणि भावना ती नातीकडे सोपवत असते. म्हणून नातीला सुद्धा आजीचा लळा अधिक असतो. आजी तिला आपल्या मैत्रिणी सारखी वाटते.
आजीचा उत्साह म्हणजे निळा रंग आणि नातीमधलं चैतन्य म्हणजे लाल रंग... हे दोन्ही रंग एकत्र आले की जांभळा रंग तयार होतो.
हा रंग मन स्थिर करून एकाग्रता वाढवणारा… लक्ष खेचून घेणारा आणि श्रीमंती सूचित करणारा...
कास पठारावर जशी जांभळी कारवी फुलावी तशीचं आजीच्या संस्कारात नात फुलत असते... आजचा दिवस या नात्यासाठी...

आठवं नातं : आजी - नात
आजी -सुजाता संजय खळे
नात -अनिशा सुशांत मांजरेकर

व्हाईस ओव्हर : स्मिता गवाणकर

बंध नात्यांचे...रंग ऋणानुबंधाचे... नवरात्री मधला आठवा दिवस हा महागौरीच्या स्मरणाचा...असुरांशी युद्ध करताना शुंभ - निशुंभ...

21/10/2023

बंध नात्यांचे... रंग ऋणानुबंधाचे...

देवी महागौरीचं सातवं
रूप म्हणजे कालरात्री देवी…

नावाप्रमाणेच ही देवी काळ्या रंगाची.
महिषासुराशी युद्ध सुरु असताना अनेक असुरांना या कालरात्रीदेवीने यमसदनाला धाडले. जणू त्या असुरांसाठी तो दिवस काळरात्रीचा ठरला!
या देवीची आठवण होते आणि तपकिरी रंग आठवतो. हा पृथ्वीचा रंग मानला जातो.कारण तो पृथ्वीवर जवळजवळ सर्वत्र आढळतो आणि स्थिरता दर्शवतो.
असचं एक स्थिर नातं
विहिणी-विहिणीचं…
या नात्याला पूर्वी एक वेगळा आयाम होता. पण आता मात्र विहिणी या विहिणींपेक्षा मैत्रिणींच्या नात्याने अधिक वागतात. नात्यांमध्ये आलेला मोकळेपणा हे ही त्याचच एक कारण आहे. तसचं हल्ली लग्न झाल्यावर मुलगा आणि मुलगी नोकरीनिमित्ताने परदेशात असतात. अशा वेळेला इकडे विहिणी-विहिणींची छान मैत्री होते. मुला-मुलीच्या संसारात सुनेचं बाळंतपण करायला दोघी जणी अगदी मनापासून एकत्र तयारीला लागतात. त्यामुळे हा मायेचा ओलावा सगळ्या कुटुंबात झिरपतो.
हळूहळू बदललेलं, मैत्रीच्या पातळीवर गेलेलं हे नातं आज बदलत्या काळाची, भवतालची जाणीव करून देतं.

नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीला मन:पूर्वक वंदन..!!

सातवं नातं : विहिणबाईंचं
शामल संजय बोरकर
निशा प्रशांत रामनाथकर

व्हाईस ओव्हर : कुणाल रेगे

बंध नात्यांचे... रंग ऋणानुबंधाचे...देवी महागौरीचं सातवंरूप म्हणजे कालरात्री देवी…नावाप्रमाणेच ही देवी काळ्या रंगाची.महिष...

20/10/2023

नवरात्रातील सहावा दिवस कात्यायनी देवीचा...

चंद्रहासोज्जवलकरा शार्दूलवरवाहना ।
कात्यायनी शुभं दध्यात् देवी दानवघातिनि ॥

चंद्रकांतिसमान जिची कांती आहे आणि जी पशुश्रेष्ठ अशा सिंहावर आरूढ झाली आहे अशी दानवांचा नाश करणारी कात्यायनी देवी आपल्यासाठी शुभ फळ धारण करो.
ब्रम्हा, विष्णु, महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश दिला आणि महिषासुराच्या वधासाठी एका देवीला उत्पन्न केलं. या देवीची सर्वप्रथम पूजा कात्यायन ऋषिंनी केली म्हणून हिचे नाव कात्यायनी. अशी ही देवी कात्यायनी… सौभाग्य देते आणि सांभाळते.
या सौभाग्याचा रंग हिरवा.
हिरवा रंग म्हंटल्यावर डोळ्यासमोर उभी राहते, हिरवा चुडा भरलेली सवाष्ण, सौभाग्यवती..!
हिरवा रंग म्हंटलं की आठवते पावसाळ्यानंतर हिरव्या रंगाने नटलेली धरणी. असा हा हिरवा रंग निसर्गाचा, पानांचा - झाडांचा...
साहजिकच हा हिरवा रंग वैभवाचा आणि समृद्धीचा...!
हीच समृद्धी घरात घेऊन येतात त्या गृहलक्ष्मी... दोन घरातल्या दोन लेकी… ज्या असतात स्वभावाने वेगळ्या, पण जणू पाठीला पाठ लावून आलेल्या… या नात्याला थोरली आणि धाकली जाऊ म्हणतात... यांची युती झाली की मात्र ती अभेद्य असते. मग घरातले सण, समारंभ अगदी दणक्यात, हसत-खेळत होतात. यांच्यातला हा समंजसपणाचं दोघींचीही शक्ति वाढवतो. असं हे नातं… आजचा दिवस या नात्यासाठी...

सहावं नातं : जाऊबाई
शैलजा संजय गायकवाड
नेहा गायकवाड

व्हाईस ओव्हर : समीरा गूजर

नवरात्रातील सहावा दिवस कात्यायनी देवीचा...चंद्रहासोज्जवलकरा शार्दूलवरवाहना ।कात्यायनी शुभं दध्यात् देवी दानवघातिनि ॥चंद्...

19/10/2023

बंध नात्यांचे...
रंग ऋणानुबंधाचे...

नवरात्रातील पाचवा दिवस, स्कंदमाता देवीचा.

स्कंद म्हणजे कार्तिकेय आणि त्याची आई म्हणजे पार्वती.
दुर्गेचं हे पाचवे रूप मोठं लोभस आणि वात्सल्याने परिपूर्ण आहे. कारण कुमार संभवात असे वर्णन आहे की आपल्या मुलाला हातात घेतल्यावर प्रेमाने, वात्सल्याने पार्वतीच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आणि तिच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या.
याच दुधावर जेव्हा साय धरते तेंव्हा त्याचा रंग किंचित पिवळसर असतो.
पिवळा रंग ऐश्वर्याचं आणि बहराचं प्रतीक मानला जातो.
कृष्णाच्या पितांबराचा रंग पिवळा... आणि नववधूच्या नव्या नात्यात कोमल तनुवर लागणारा हळदीचा रंग ही पिवळा..
ही हळद लेऊन जेव्हा मुलगी लग्नकरून नव्या घरी जाते, तेंव्हा वेगवेगळ्या नात्यांना आपलंसं करते. यातलचं एक आंबट गोड नातं, नणंद भावजयीचं.
याच नात्याने संसाराला चव येते. कधी नणंद म्हणून वहिनीची बाजू घ्यावी तर कधी बहीण म्हणून भावाला साथ द्यावी.
नणंदा भावजया दोघी जणी| घरात नव्हते तिसरे कोणी| शिंक्यावरच लोणी खाल्लं कोणी?
मी नाही खाल्लं वाहिनीने खाल्लं.
आता माझा दादा येईल ग, दादाच्या मांडीवर बसेन ग, वहिनीच्या चहाड्या सांगेन ग...
असं म्हणत म्हणत ही नणंद तिच्या घरी जाऊन कधी वहिनीची जागा घेते हे तिलाही कळत नाही.
भोंडल्याच्या गाण्यात या नात्याचं असचं सुरेख प्रतिबिंब पडलेलं दिसतं.

पाचवं नातं : नणंद -भावजय
मनीषा केदार हरचेकर
अश्विनी आनंद बाजपेयी

व्हाईस ओव्हर : योगेश सोहनी

बंध नात्यांचे...रंग ऋणानुबंधाचे...नवरात्रातील पाचवा दिवस, स्कंदमाता देवीचा.स्कंद म्हणजे कार्तिकेय आणि त्याची आई म्हणजे प...

18/10/2023

बंध नात्यांचे...
रंग ऋणानुबंधांचे...

नवरात्रातील चौथा दिवस कुष्माण्डा देवीचा.

देवीच्या उपासकांमध्ये असं मानलं जातं की या जगाची निर्मिती देवीनेच केली आहे. जेव्हा सर्वत्र अंधार होता तेव्हा एक प्रकाश सर्वत्र पसरला, त्या प्रकाशाने नंतर एका देवतेचे रूप घेतलं. तीच ही देवी कुष्माण्डा..
दुर्गेच्या याच रूपाने नंतर महालक्ष्मी आणि महासरस्वती यांना निर्माण केल. साऱ्या विश्वाची निर्माती म्हणून हिला आदिशक्ती असे म्हणतात.
झाडाचा कोंब जसं उष्णता, प्रकाश आणि पाणी यामुळे फुटतो... वाढतो, तसं हे ब्रम्हांड विस्तारतं आणि जीवन अस्तित्वात येतं. त्याच प्रमाणे घरात आलेली गृहलक्ष्मी त्या घराची वंशावळ वाढवते आणि तिला या घरात मायेचं पाठबळ असतं ते तिच्या सासूचं.
सासू म्हणते,
लेक माझी लाडाची दिली सासूरा धाडोनी ।
तहान भागवाया सून आनली प्रेमानी ॥
आणि सून सांगते..
सासू ग गंगामाई हाये निर्मल चांगली ।
आईच्या मायेची जणू तहान भागली ॥
थोडक्यात काय तर दोघीही माऊली आपल्या निळ्या सावळ्या कृष्णाला, रामाला घडवत असतात. निळा रंग म्हणजे आकाश...त्याची लोभस निळाई...
निळा रंग म्हणजे समुद्र... त्याची अथांगता...
या रंगातच विशालता आहे. विश्वासाचं,श्रद्धेचं, आत्मियतेचं
प्रतीक म्हणजे निळा रंग.
मन आकर्षून घेणारा हा रंग सासू सुनेच्या नात्याला घट्ट विणतो... आणि त्यातला ओलावा वाढवतो.

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्माण्डा देवीला मनःपूर्वक वंदन । 🙏🏻

चौथ नातं : सासू - सून
अरुणा नरेंद्र हेटे
मंजिरी अमेय हेटे

दागिने : श्रीकांत बाबुराव हरचेकर ज्वेलर्स ,विलेपार्ले -पुर्व
डिझाईन : निर्मिती ग्राफिक्स
फुलांची सजावट : श्याम पांडुरंग भगत,दादर
रील डिझाईन : राजेंद्र कदम

....

बंध नात्यांचे... रंग ऋणानुबंधांचे...नवरात्रातील चौथा दिवस कुष्माण्डा देवीचा.देवीच्या उपासकांमध्ये असं मानलं जातं की या ज...

17/10/2023

बंध नात्यांचे...
रंग ऋणानुबंधांचे…

नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा देवीचा...

ही देवी धन, आनंद, ऐश्वर्य, सौभाग्य आणि आरोग्य प्रदान करणारी आहे. तीचं रूप सौम्य असलं तरी ते दुर्गेचे रूप असल्याने ती वाघावर आरूढ आहे. तिच्या हातात विविध शस्त्र आहेत. अतिशय सुंदर अंगकांती असणाऱ्या या देवीने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले आहे..

शिवाची आराधना करण्यासाठी देवी पार्वती जेव्हा घरातून बाहेर पडली तेव्हा तिच्या आईने, तुझ्या समवेत दोन सख्यांना घेऊन जा, म्हणजे आम्हाला तुझी काळजी राहणार नाही अशी विनंती केली. मैत्रिणींमधला हा विश्वास लाल रंग दर्शवतो. हा तेजाचा रंग... चैतन्याचा रंग... आपल्या शरीरातील सप्तचक्रांपैकी मुलाधार चक्राचा रंग हि लाल मानला जातो. तसचं प्रेमाचा, विश्वासाचा रंग ही लाल मानला जातो.
म्हणूनच घट्ट मैत्रीण असल्यासारखं भाग्य नाही. मनाचा गोंधळ उडत असेल तर तिला विश्वासाने सांगावं. अडीअडचणीच्या वेळी जिला हक्काने हाक मारावी. खूप आनंदात असताना जिला घट्ट मिठी मारावी, अशी ही मैत्रीण..
या मैत्रीचा कलश विश्वास, आपलेपणा, प्रेम, सचोटी या चौरंगावर शोभून दिसतो.

नवरात्रीतला आजचा एक दिवस आपल्या घट्ट मैत्रिणीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी...

तिसरं नातं : मैत्रीणी

स्मिता उदय गवाणकर
प्रिया प्रसाद साटेलकर
मनश्री मंदार शहाडे

व्हाईस ओव्हर : मधुरा वेलणकर

बंध नात्यांचे... रंग ऋणानुबंधांचे…नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा देवीचा...ही देवी धन, आनंद, ऐश्वर्य, सौभाग्य आणि आरोग्य...

16/10/2023

बंध नात्यांचे...रंग ऋणानुबंधाचे

नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवीचा.
हातात कमंडलु आणि जपमाळ घेतलेली, पांढर फिक वस्त्र नेसलेली अशी ही ब्रह्मचारिणी देवी...
शुद्धता, सात्विकता, शांतता, सरळ स्वभाव,
वृत्तीतला ठेहेराव हे सगळं ब्रह्मचारिणी देवीला शोभून दिसत. आणि हे सारं दाखवण्याची, व्यक्त करण्याची क्षमता असते ती पांढऱ्या रंगात..
ब्रह्मचारीणी देवी हे पार्वतीचे रूप... पार्वती
आणि गंगा हिमालयाच्या दोन्ही कन्या . या सख्ख्या बहिणी ..
म्हणून आजच नातं हे बहिणींच..
पूर्वीच्या काळी मोठया - लहान बहिणीची जोडी प्रत्येक घरात असायची. दोघींचे कपडे सारखे वेण्या अगदी तशाच.. एकीला झाकावं आणि दुसरीला काढावं,
जसं
अक्काची ग चोळी| येते माझ्या अंगा|आम्ही दोघी बहिणी| एका वेलीच्या ग दोन शेंगा||
पौर्णिमेच्या दिवशी भूमीवर येणाऱ्या चंद्र किरणांच्या धवलधारा पाहिल्या की बहिणींचं आणि पांढऱ्या रंगाचं नातं उलगडतं.

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुर्गेच्या ब्रह्मचारीणी रूपाला मनःपूर्वक वंदन ॥

दुसरं नातं : बहिणी -बहिणी
मंजिरी अमेय हेटे
अंजली शैलेश टेमुर्णीकर

व्हाईस ओव्हर : राजन जोशी

बंध नात्यांचे...रंग ऋणानुबंधाचे नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवीचा. हातात कमंडलु आणि जपमाळ घेतलेली, पांढर फिक वस्...

Address

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Merak Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Event Planning Service?

Share