02/12/2023
आर.के. मंगल कार्यालय मॅरिज गार्डन लॉन,
परिसरातील फक्त सर्वात मोठे नाही तर सर्व सुविधा युक्त मंगल कार्यालय आहे, सर्वात जलद गतीने प्रसिद्ध झालेले, बहुचर्चित असे 3 स्टेज असलेले एकमेव R.K Banquet Hall & Marriage Garden - मंगल कार्यालय , नाविन्यपूर्ण संकल्पना, सुविधा, मनुष्यबळ आणी आजूबाजूला 7 रोड असलेले एकमेव कार्यालय..
आटपाडी, खानापूर, माण अन खटाव तालुक्यातील जवळपास 60 गाव-वाड्याना सोईस्कर आणि मध्यवर्ती ठिकाण असल्याने कलेढोण, खरसुंडी, सांगोला, दिघंची, खानापूर, विटा, म्हसवड, मायणी, लेंगरे, आटपाडी, मादळमुठी , भिवघाट, नेलकरंजी, बनपुरी, गोमेवाडी भागातल्या पाहुण्यांना कार्यालय वर येणे सोप्पे होते. दूरच्या पाहुण्यांच्या मुक्कामाची सोय कार्यालय स्टाफ चांगल्या प्रकारे करत असतो. AC अन नॉन AC गेस्ट रूम्स उपलब्ध आहेत. रात्रीच वाहनांची, dj च्या बस ची सेफ्टी च ध्यान ठेवता कार्यालयाच्या बाहेर पार्किंग न करता कार्यालयात आत मध्येच लगझरी बसा सुद्धा पार्क करता येतात असा प्रशस्त आवार आत मध्ये पण आहे,
रोड टच प्रशस्त पार्किंग असून मालक स्वतः मोनेटरींग देखरेख करत असल्याने कार्यालयाला मिळत असलेलं प्रेम जस दिवसोंदिवस वाढतच जात आहे तसच सुविधा पण वाढतच जाणार आहेत..
लग्नादिवशी मालकासह 8 जणांचा स्टाफ सेवेला असल्याने लग्न मालकाने कोण आलं कोण जेवायचं राहील फोटो शूट आहेर-माहेर असल्या गोष्टी बघायच्या अन कार्याचा आनंद लुटायचा बाकीच हॉल मॅनेजमेंट बघते.
ओपन किचन कन्सेप्ट असल्याने गरम तर होतच नाही शिवाय आपलं जेवण कस बनतय माल ब्रँडेड आहे की नाही स्वच्छता राखली जात आहे की नाही हे सुद्धा बघता येतं..😊
जेवण बनवण्यासाठी हौदात स्टोर केलेले पाणी न वापरता ताजे पाणी वापरत असल्याने जेवण हायजेनिक अन चविष्ट बनते.
कार्यालय प्रसिद्धीस येण्यामागे सर्वात प्लस पॉईंट जेवण क्वालिटी उत्तम असल्याचं कारण आहे शिवाय देवस्थान आणि मोठ्या गावापासून दूर असल्याने आमंत्रित लोकांव्यतिरिक्त कुणी जेवायला येत नसल्याने लग्न मालकावर अतिरिक्त व्यर्थ विनाकारणाचा आर्थिक बोझा होत नाही..
बिल्डिंग मध्ये VVIP डायनींग हॉल आहे, पाहिजे असेल तर हलकस डेकोरेशन करून त्यात VIP गेस्ट या जेवताना नवरा-नवरी फोटो शूट अन नातेवाईकांना जेवायची सोय होऊ शकते..
स्टेज च्या दोन्ही बाजूला 2 नवरा-नवरी AC रूम attached let bath, वऱ्हाडी मंडळी साठी ही attached let bath 2 मोठ्या रूम्स आहेत. शेजारी साउंड रूम मध्ये एक माणूस कमी जास्तीला बसलेला असतो.
जस हॉल च मेन प्रवेशद्वार सुंदर अन रुंद आहे तसंच आत मध्ये पण सेकंड प्रवेशद्वारासमोर स्वागत मंडप अन डेकोरेशन साठी मोकळी जागा आहे आणी डेकोरेशन नाही केलं तरी दिल आकाराच्या कमानी, हॉल चा फ्रंट आणी स्वागत मंडप एव्हडा सुंदर आहे की बिना डेकोरेशन च पण कार्यालय देखणं दिसत. संपूर्ण वास्तुशास्त्र प्रमाणे बांधकाम असल्याने उत्तर दिशेला भिंत बांधून पॅक न करता मोकळी जागा ठेवली आहे त्यामुळे हवादार हॉल अन नैसर्गिक व्हीव आहे. डायनिंग हॉल ला पण खिडक्या लावून पॅक न करता हवादार बनवला आहे,
भरपूर सेल्फी पॉईंट्स असलेले, राजस्थानी शैलीचे स्वयंभू हनुमान मंदिर,निसर्गरम्य वातावरण, सेपरेट पार्किंग, मॉडर्न वॉशरूम्स, वॉटर फाउंटनस.
आपल्या कार्यालयावर आलेल्या लहान मुलांचा आनंद बघण्यासारखा असतो, पालकांना पण मुले रोड ला जातील याची टेंशन नसते, कारण परिसर एव्हडा मोठा आहे की रोड पासून बरेच आत मध्ये मुलांना खेळण्याची सोय केलीय, अगदी तुम्ही तांदूळ टाकत या कार्यक्रमाचा आनंद घेत सुद्धा त्यांच्यावर लक्ष ठेवू शकता..
5 स्टार हॉटेल सारखी इन अँड आऊट सेपरेट VIP एन्ट्री असल्याने गाडी वळवावी लागत नाही, आमदार खासदार VIP गेस्ट, नवरा-नवरी, वयोवृद्ध व्यक्तीना याचा लाभ घेता येतो.
दक्षिणेला एक रोड सोडल्याने नवरीला आंदण दिलेल्या सामानाची गाडी डायरेक्ट आत स्टेज ला जाते अन सामान उतरायला चढवायला त्रास होत नाही. मंगल कार्यालय च्या पायऱ्या बनवताना महाताऱ्या लोकांना चढायला त्रास होऊ नये अशा बनवल्या आहेत, उंच आणि जास्त पायऱ्या असल्या कि त्रास होतो.
मॅनेजमेंट ने अश्या प्रत्येक लहान वाटणाऱ्या गोष्टीवर सुद्धा काम केलं असल्याने काही अडचण नाही येणार.
आत आवार प्रशस्त असल्याने आत मध्येच ओपन थिएटर आहे ज्याची बैठक क्षमता 900 लोक बसण्याची आहे, विदेशात पॉप्युलर असलेलं हे कन्सेप्ट आपण आपला परिसर मोठा असल्याने बनवून घेतल आहे. सांगली जिल्ह्यातील एकमात्र प्रायव्हेट ओपन एअर ऑडिटोरियम चा उपयोग हळदी साठी, प्रीवेडिंग व्हिडीओ शूट बघायचा असेल, प्रोजेक्ट वर फिल्म, हम साथ साथ वाला फॅमिली डान्स, मेहंदी-संगीत, गदरिंग,वाढदिवस, डोहाळे जेवण, रिसेप्शन, लावणी शो, ऑर्केस्ट्रा, ऍनिव्हर्सरी, मीटिंग, सभा व अजून बरेच असे डे अन नाईट शो साठी होणार आहे.. लवकरच फ्री वायफाय सेवा चालू होईल, कार्यालय बिगरशेती NA केले असल्याने रोड पासून भरपूर आत आहे त्यामुळं एकदम रोड वर भेटी गाठी साठी गर्दी होत नाही किंवा लहान मुलं रोड वर येण्याची शक्यता ही नाही. एकदम सेफ सुरक्षित शुभकार्याची दक्षता..
उन्हाळ्यातील लग्नासाठी स्टेज ला फॅन,जम्बो सीमफनी कुलर, नवरा-नवरी रूम ला AC, हॉल मध्ये पाहुण्यांसाठी फॅन अन डबल डेकर कुलर उपलब्ध आहेत. कार्यालया वर ऑफिस आहेच शिवाय सहज सुलभ बुकिंग साठी खरसुंडी मध्ये बलवडी चौकात पण ऑफिस आहे..
नाविन्यपूर्ण लग्नासाठी अगोदर भेट द्या, तुमच्या आवडीच्या मंगल कार्यालयाशी कमपेयर (तुलना) करा मग पसंद आलं तरच बुक करा..
आटपाडी, खानापूर, माण, खटाव तालुक्यातील एक सर्वसुविधायुक्त मंगल कार्यालय..👍
विशेष म्हणजे आर. के मंगल कार्यालय आपल्या माणसाचं आहे..
खरसुंडी- झरे मेन रोड, #घाणंद
Sanjaykumar Marutirao Shingade Maruti Gorad Vijayraj Shingade Sunil Garale Sanjay Kolekar Dinesh Mane Vishal Deshmukh Sanjay Salunkhe Sushant Jadhav Prakash Pujari Parshuram Sarak Pandharinath Gorad Jagannath Kolape Netaji Awate Suraj Jankar Vinay Misal APLI Gharniki Ashok Thorat Sunil Khandekar Amit Pawar Pralhad Burle गिरीश विजय सावंत उमेशराजे अनुसे Kashinath Chopade 094211 25475