 
                                                                                                    08/08/2025
                                              
 
 
 
युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो आयोजित
07 आॕगस्ट 'श्री सखी' भव्य प्रदर्शन 
याचा बोरीवलीत पहिलाच दिमाखदार शुभारंभ 
🎊🎊🎊🎊
प्रमुख उदघाटक: श्री कुणाल माईणकर साहेब,
सुप्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले.
भाटिया हाॕल, बोरीवली (प.)
युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो आयोजित 'श्री सखी' भव्य प्रदर्शन याचा पहिलाच दिमाखदार शुभारंभ मनसेचे श्री कुणाल माईणकर साहेब व सुप्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले या दोघांच्या शुभहस्ते दिनांक 07 आॕगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न झाला. या प्रसंगी मनसेचे पदाधिकारी व महिला आघाडीचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. 
या प्रदर्शनाचे माननीय पाहुणे यांनी खास कौतुक करताना सांगितले की मराठी उद्योजक मोठी स्वप्नं पहायला शिकला आहे व युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो व्यासपीठाच्या सहकार्याने या सर्वांची उत्तम भरारी चालू आहे. यात युनिव्हर्सल ट्रेड एक्सपोचे खूप मोठे योगदान आहे. भार्गवी चिरमुले यांनी सांगितले की मी गेली अनेक वर्ष अशा काही प्रदर्शनाला ग्राहक म्हणून भेट देत आली आहे. पण इथले 'श्री सखी' प्रदर्शनातले वैशिष्ट्य वेगळं पहावयास मिळाले. स्टाॕलधारक व आयोजक यांचा एकमेकांशी कनेक्ट खूपच अधोरेखीत करण्यासारखा आहे. यांचे काम खूप चांगले आहे. या ठिकाणी स्टाॕल्सची विविधता बघावयास मिळते. तसेच मांडणी अतिशय सुरेख आहे. घरचा फिल येतो या ठिकाणी शाॕपिंग करताना. 
ग्राहकांना फिरताना कुठलाही त्रास होत नाही, तसेच एकही स्टाॕल भेट देताना चुकत नाही. 
युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो चे संचालक व श्री सखी प्रदर्शनाचे आयोजक अमित गोडबोले व सरीता सोमण यांनी माहिती दिली की यात ८०% महिला या प्रदर्शनात सहभागी झालेल्या आहेत. सणासुदीसाठी लागणाऱ्या अनेक सुंदर वस्तू या एकाच छताखाली सर्वांना वाजवी दरात उपलब्ध आहेत. त्यामुळे सणासुदीच्या मनोसोक्त खरेदीसाठी लवकर 
'श्री सखी' या प्रदर्शनाला बोरीवलीकरांनी आवर्जून भेट द्यावी. 
हे प्रदर्शन 7 ते 10 आॕगस्ट 2025 असे एकूण 4 दिवस दररोज सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत, 
पत्ता: भाटिया हाॕल, वीर सावरकर गार्डन समोर, बोरीवली (प.) येथे सुरु आहे.                                        
 
                                                                                                     
                                                                                                     
                                                                                                     
                                                                                                     
                                                                                                     
                                         
   
   
   
   
     
   
   
  