अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या कारकिर्दीवर आधारित 'मराठी सिनेतारका' मालिकेचा भाग करताना किती आणि कोणकोणती गाणी ऐकवू असा प्रश्न पडला. प्रत्येक गाणे ऐकताना जयश्री बाईंचा सुंदर चेहरा आणि टपोरे डोळे आठवतात. नृत्यकुशल अभिनेत्री म्हणून जयश्री बाई ओळखल्या जातात. ही सर्व गाणी आणि जयश्री गडकर यांचा अभिनय प्रवास जरूर ऐका.
आकाशवाणी मुंबई
मराठी अभिनेत्रींच्या कारकीर्दीचा वेध घेणारी मालिका
मराठी सिनेतारका - भाग 9
अभिनेत्री जयश्री गडकर विशेष
लेखिका- सिने अभ्यासक, अनिता पाध्ये
निवेदन- डॉ समीरा गुजर जोशी
रविवार दिनांक 28 फेब्रुवारी दुपारी 12.10 वाजता
Mw 537.6 metres अस्मिता वाहिनीवर आणि NewsonAir app on Air Marathi Asmita channel.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांतिकार्यात त्यांच्या कुटुंबातील तीन स्त्रियांनी मोलाची साथ दिली. माई, येसु वहिनी आणि शांताबाई सावरकर ह्या तिघींनी हालअपेष्टा, उपासमार आणि पतीचा विरह सोसून घर संसार सांभाळून महिलांचं संघटन, देशभक्ती जागवण्याचं काम केलं. त्यांनी सहन केलेलं प्रचंड दडपण, ताण आणि अनिश्चितता याची कल्पनाही करणं कठीण आहे.
ह्या तिघिंच्या कार्याची ओळख नाट्य रुपात करून देणारी अभिनेत्री, अपर्णा चोथे. डॉ शुभा साठे यांच्या 'त्या तिघी' ह्या पुस्तकावर आधारित एकपात्री नाट्य प्रयोग अपर्णा साकारते. ह्यातून प्रेरणा घेऊन अभ्यासून तिने 'तू धैर्याची अससी मूर्ती' हे येसु वहिनीचं चरित्र लिहिलं.
सावरकर कुटुंबातील ह्या अज्ञात समिधांच्या कार्याविषयी Aparna Chothe हिची मुलाखत जरूर ऐका, शुक्रवारी 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.10 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीवर.
Also
श्यामची आई, मराठीतला पहिला सुवर्णकमळ विजेता चित्रपट. यातील शीर्षक भूमिकेमुळे रसिकांच्या कायम स्मरणात आहेत, अशा अभिनेत्री वनमाला.
लाखाची गोष्ट, मधील अभिनेत्री बहिणींची जोडी, रेखा चित्रा. मेळ्यात नृत्य करणाऱ्या या भगिनी नाटक आणि चित्रपटात नायिका म्हणून लोकप्रिय झाल्या आणि यशाच्या शिखरावर पोहोचल्या.
या तिघींच्या कारकीर्दीचा वेध घेऊया मराठी सिनेतारका मध्ये.
वनिता मंडळ
मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रींच्या कारकीर्दीचा वेध घेणारी मालिका -
*मराठी सिनेतारका*
भाग पाच
अभिनेत्री वनमाला आणि रेखा चित्रा विशेष
लेखिका - सिने अभ्यासक, अनिता पाध्ये
निवेदन - डॉ समीरा गुजर जोशी
विशेष सहभाग - माधव वझे आणि advocate राजेंद्र पै
रविवार दि 31 जानेवारी दुपारी 12.10 वाजता Mw 537.6 मीटर्स
अस्मिता वाहिनीवर आणि News on Air app वर
यमुनाजळी खेळू खेळ हे गाणं म्हणजे अभिनेत्री मीनाक्षी बाई शिरोडकर आणि वंदित राधाबाला हे गोपालकृष्ण चित्रपटातलं गाणं ऐकलं की शांता बाई आपटे यांचे सुंदर चेहरे डोळ्यासमोर येतात. अत्यंत धाडसी, गुणी आणि तडफदार अशा या अभिनेत्रींच्या आठवणींना उजाळा देऊया.
मीनाक्षी बाईंची आमच्या संग्रहातली ध्वनिफीत आणि नयना आपटे यांनी सांगितलेल्या आईच्या म्हणजे शांताबाईंच्या आठवणी जरूर ऐका.
वनिता मंडळ
मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रींच्या कारकीर्दीचा वेध घेणारी मालिका -
*मराठी सिनेतारका*
भाग चार
अभिनेत्री शांता आपटे आणि मीनाक्षी शिरोडकर विशेष
लेखिका - सिने अभ्यासक, अनिता पाध्ये
निवेदन - डॉ समीरा गुजर जोशी
विशेष सहभाग - जयप्रकाश कर्नाटकी आणि नयना आपटे
रविवार दि 24 जानेवारी दुपारी 12.10 वाजता Mw 537.6 मीटर्स
अस्मिता वाहिनीवर आणि News on Air app वर
मराठी सिने तारका मालिकेत, कृष्ण धवल चित्रपट सृष्टीत चमकलेल्या तारकां च्या कारकीर्दीचा वेध आपण सध्या घेत आहोत.
सांगत्ये ऐका, या चित्रपटातून यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्री, हंसा वाडकर. अत्यंत रूपसंपन्न आणि ग्लॅमरस अभिनेत्री.
आता कशाला उद्याची बात, असं गाणाऱ्या शांता हुबळीकर. यशस्वी अभिनेत्री शांताबाईंना उत्तर आयुष्यात मात्र संघर्ष करावा लागला.
बहुतेकांना खलनायिका म्हणून ठाऊक असलेल्या ललिता पवार यांच्या कारकिर्दीची सुरुवात नायिका म्हणून झाली होती.
या तीन अभिनेत्रींच्या आठवणींना उजाळा देऊया.
मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रींच्या कारकीर्दीचा वेध घेणारी मालिका -
*मराठी सिनेतारका*
भाग तिसरा
अभिनेत्री हंसा वाडकर, शांता हुबळीकर आणि ललिता पवार विशेष
लेखिका - सिने अभ्यासक, अनिता पाध्ये
निवेदन - डॉ समीरा गुजर जोशी
विशेष सहभाग - जयप्रकाश कर्ना
अगदी जुनी 1940 च्या दशकातली चित्रपटगीते आज ऐकताना थोड हसू येतं. काहीशी संथ रेंगाळणारी गाणी पण त्या स्वरातला गोडवा मात्र भावतो. त्या शब्दातील साधेपणा आवडतो. याबरोबरच त्यातील अभिनेता आणि विशेषतः अभिनेत्रीचं साधं सोज्वळ रूप, लाजणे, मुरकणे सगळं नैसर्गिक वाटतं.
याच काळातील 3 अभिनेत्री - लीला चिटणीस, स्नेहप्रभा प्रधान आणि शोभना समर्थ यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा *मराठी सिनेतारका* मालिकेचा भाग दुसरा जरूर ऐका. यामध्ये आमच्या संग्रहातील शोभना समर्थ यांचं ध्वनिमुद्रण ऐकण्याची संधी मिळेल. शिवाय काही दुर्मीळ हिंदी मराठी गाणी सुद्धा ऐकता येतील.
मराठी सिनेतारका भाग 2
लेखिका - सिने अभ्यासक, अनिता पाध्ये
निवेदन - डॉ समीरा गुजर जोशी
रविवार दिनांक 10 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12.10 वाजता mw 537.6 मीटर्स अस्मिता वाहिनीवर.
Also on News on Air app on Air Marathi Asmita channel.
सीमा देव, जयश्री गडकर, उषा किरण, सुलोचना दीदी ही नुसती नावं घेतली तरी त्यांचे ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातले सुंदर चेहरे डोळ्यासमोर येतात. बोलके डोळे, तरतरीत नाक आणि माफक मेकअप मध्ये त्यांचं सौंदर्य अतिशय खुलून दिसे. त्यांच्याही मागच्या पिढीचा विचार केला तर, दुर्गाबाई कामत, कमलाबाई गोखले, स्नेहप्रभा प्रधान, दुर्गा खोटे, वनमाला, शोभना समर्थ यांनी तर समाजाचा विरोध पत्करून चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं आणि महिलांसाठी अभिनय क्षेत्र खुलं केलं. खऱ्या अर्थाने ते क्रांतिकारी पाऊल होतं.
मराठी चित्रपट सृष्टीतील या अभिनेत्रींनी केवळ रूपाच्या जोरावर नव्हे तर उत्तम अभिनयाने रसिकांची मने जिंकली. ही परंपरा पुढे नेणाऱ्या अनेक अभिनेत्री नंतरच्या काळात चमकल्या. नायक प्रधान चित्रपट तर नेहमीच तयार होतात. परंतु त्यातही आपल्या अभिनयाची नाममुद्रा उमटवणा र्या तारकांच्
गोष्ट पस्तीस वर्षांपूर्वीची ....
ती लग्न होऊन अमेरिकेत गेली...
सुखात न्हालेलं आयुष्य... गोजिरवाणी मुलं.. प्रेम करणारा नवरा...
और क्या चाहिये लाईफ में....
पण लग्नानंतर सहा वर्षांनी तिच्या पतीला ल्युकेमियाचं निदान झालं...
आभाळ कोसळलं जणू....
पण ती हार मानणाऱ्यांपैकी नव्हतीच...
ती मग अमेरिकेतल्या bone marrow डोनेशन करणाऱ्या राष्ट्रीय संस्थेत गेली . तिथे निराशाच पदरी आली... त्यांच्या बॅंकेतला bone marrow आशियाई वंशाच्या तिच्या यजमानांना चालणार नव्हता....
मग तिने स्वतः आशियाई वंशाचे bone marrow देणगीदार शोधायला सुरुवात केली....
आणि काय म्हणावं bone marrow ची एक नवी bank तयार झाली...
आणि आता इतक्या वर्षानंतर साडेचार लाख देणगीदार झाले आहेत.... आणि जगभरातल्या ल्युकेमियाच्या रुग्णांना doner मिळावा यासाठी ती हे काम विनामूल्य करते आहे....
ती माधुरी मिस्त्री... पूर्वाश्रमीची सरदेसाई..
माधुरीने स्वतः वर कोसळलेल्या अभ
रोहन गुजर....
आकाशवाणीत आनंदाने येणारी तरुणाई....
एक होता कार्व्हर या पुस्तकाची आता सेहेचाळिसावी आवृत्ती निघाली आहे. या पुस्तकाने गेली एकोणतीस वर्ष अफाट लोकप्रियता मिळवली... आणि याचं श्रेय अर्थातच जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या भन्नाट प्रतिभेच्या कृषिशास्त्रज्ञाला तर आहेच पण वीणाताईंच्या सिद्धहस्त लेखनाला ही आहे...
कोरोनाने आपलं जगणं आणि जगण्याच्या संदर्भातल्या संकल्पना बदलल्या... शाश्वत जीवनपद्धतीचा अवलंब हाच अंतिम जीवनाधार ठरणार आहे... कार्व्हर ने हेच तर सांगितलं...आपल्या अत्यन्त सर्जनशील शेती प्रयोगातून त्याने शाश्वत जीवनशैलीचं स्वप्न साकारलं...
2001 मध्ये एक होता कार्व्हर वर आधारित नभोनाट्यमालिका वीणा ताईंनी आकाशवाणी साठी लिहुन दिली . आकाशवाणी मुंबई केंद्राच्या निर्मात्या सुषमा हिप्पळगावकर यांनी या मालिकेची निर्मिती केली. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आकाशवाणी च्या ब्रीदाचा फ़ार तळापासून विचार
शुभ दीपावली
दरवर्षीप्रमाणे श्रवण आनंद देणाऱ्या दर्जेदार मुलाखतींची मेजवानी आकाशवाणी मुंबई FM Rainbow 107.1 MHz वर. Also on News on Air app on FM Rainbow Mumbai channel.
नक्की आस्वाद घ्या. शब्द स्वरांची उधळण स्मरणात राहील.
नमस्कार.... शुभ दीपावली
FM Rainbow वरील कार्यक्रमांच्या रांगोळीची एक झलक....