25/12/2021
भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत श्री अटल बिहारी वाजपेयी यांना ‘भारत रत्न’ प्रदान करण्याचा औपचारिक कार्यक्रम राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पार पडला होता त्यानंतर सर्वप्रथम “सीबीडी फाऊंडेशन”ने शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०१५ रोजी श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी “अटल रत्न” हा कार्यक्रम, रवींद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर तसेच महाराष्ट्राचे तत्कालीन गृहनिर्माण मंत्री श्री प्रकाश मेहता यांच्या उपस्थितीत हा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला होता. इतरही अनेक मान्यवर या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. दृक-श्राव्य स्वरूपातील या कार्यक्रमात आजच्या अनेक आघाडीच्या गायकांनी, श्री कमलेश भडकमकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली अटलजींच्या निवडक कविता सादर केल्या होत्या. सुप्रसिद्ध कलाकार श्री सुबोध भावे, श्रीमती मधुर वेलणकर आणि ज्येष्ठ निवेदक श्री प्रदीप भिडे यांचे खणखणीत निवेदन हे या कार्यक्रमाचे आणखीन एक वैशिष्ठ्य. “एबीपी माझा” या आघाडीच्या मराठी वृत्तवाहिनीने हा कार्यक्रम प्रक्षेपित करण्याचे सौजन्य दाखविले होते.
अटलजींच्या जन्मदिनानिमित्त, अटलजींच्या काही निवडक भाषणांची झलक आणि त्यांच्या जीवनातील काही विलक्षण प्रसंगांचे पैलू यासह हा कार्यक्रम आपल्यासाठी “सीबीडी फाऊंडेशन” च्या वतीने येथे सादर करत आहोत.
(५ भागात …. in 5 parts)
Part 1
https://youtu.be/tWjyNQDHCJM
Part 2
https://youtu.be/l_95JgDV8g0
Part 3
https://youtu.be/6eWJAK8mc_A
Part 4
https://youtu.be/Z2BKBS6SjR8
Part 5
https://youtu.be/syWKlHmdrK8
CBD Foundation's "ATAL RATNA" (Full Version) - Part 5 presented on Friday 16 October 2015 at Ravindra Natya Mandir.