08/02/2024
सूत्रसंचालन.... रोखठोक १० वा वर्धापन दिन...
थोपटे लॉन्स, रहाटणी, पिंपरी चिंचवड येथे रोखठोकच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या रोखठोक पुरस्कार सोहळ्यास उपस्थित होते. साहस, शिक्षण, युवक, महिला, उद्योग, योग, कृषी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनेक वेळा पुरस्काराने माणूस मोठा होतो, कित्येक वेळा माणसांमुळे पुरस्कार मोठा होतो पण आज या सोहळ्यातील पुरस्कार आणि पुरस्कारार्थी दोन्ही मोठे आहेत कारण त्यांचं कार्य तेवढं मोठं आहे. या कार्यक्रमात हरीश माने यांना शौर्यरत्न, शामराव हुलावळे यांना मुळशीरत्न, प्रा. शैलेश कुलकर्णी यांना विद्यारत्न, उमेश काटे यांना युथ आयकॉन, रुपाली भोजने-दत्तात्रय भोजने यांना आदर्श जोडीरत्न, भारती विनोदे व भाग्यश्री देवकर यांना दुर्गारत्न, वर्षा मरकड यांना उद्योगरत्न निशा बिरदा यांना योगारत्न व ज्ञानेश्वर नढे यांना कृषिरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, पिंपरी चिंचवडचे DCP बापू बांगर साहेब, रोखठोकचे संपादक गणेशजी हुंबे, पिंपरी चिंचवडचे मा. विरोधीपक्ष नेते विठ्ठल नाना काटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पिंपरी चिंचवड अध्यक्षा कविताताई आल्हाट, भाजपा शहर जिल्हाप्रमुख शंकर जगताप, मा. नगरसेविका सविता खुळे, मा. नगरसेविका मायाताई बारणे, मा. नगरसेवक कैलास थोपटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहर उपाध्यक्षा अश्विनीताई तापकीर, रोखठोकच्या उपसंपादक यशोदा नायकोडे, हिंदकेसरी पै. अमोल बुचडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस चिंचवड विधानसभा अध्यक्षा संगिताताई कोकणे, युवती अध्यक्षा वर्षाताई जगताप, ह.भ.प. शेखर महाराज जांभुळकर, सूरज कैवार, विश्वजित श्रीरंग बारणे व इतर मान्यवर उपस्थित होते.