Leena's Kitchen

Leena's Kitchen Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Leena's Kitchen, Caterer, Panvel.

गोड गोड तेलपोळी खाल्ली की काहीतरी तिखट नाष्ट्याला हवेचं न!!! म्हणुन हा चिवडा.
09/03/2023

गोड गोड तेलपोळी खाल्ली की काहीतरी तिखट नाष्ट्याला हवेचं न!!! म्हणुन हा चिवडा.

March 23 tel poli for holi 6 th March 2023
09/03/2023

March 23 tel poli for holi 6 th March 2023

Oh wow first attempt and done.Potato tower stand high 😄😄Next time will try to make it more thin. 👍🏻👍🏻
07/03/2023

Oh wow first attempt and done.
Potato tower stand high 😄😄
Next time will try to make it more thin. 👍🏻👍🏻

Kolambi lipte with blooming onion.
25/02/2023

Kolambi lipte with blooming onion.

Egg biryani!!!इथे अति वृष्टी मुळे बोटी आत नाही जातं आणि मला फिश नाही मिळत चिकन परवाच झाले म्हणुन आज सोपा सुटसुटीत आळशाचा...
23/09/2022

Egg biryani!!!

इथे अति वृष्टी मुळे बोटी आत नाही जातं आणि मला फिश नाही मिळत चिकन परवाच झाले म्हणुन आज सोपा सुटसुटीत आळशाचा मेनू अंडा बिर्याणी आणि रायता, नारळाचे सुप, आणि मेथी वड्या अर्थात हा माझा आणि निराजाचा पूर्ण दिवसाचा मेनू आहे पण मला आताच मूड झाला म्हणुन कूकिंग दिन साजरा केला बास बाकी काहीच नाही मी काय बोलू?? 😄😄🙏🏻

अंडा बिर्याणी…
साहित्य..
अंडी 6 उकडवलेली साले काढून.
250 ग्राम तांदूळ बासमती
6 कांदे 4 बारीक कापून , 2 उभे लांब कापून तळण्या साठी.
4 टोमॅटो बारीक कापून
आले लसूण पेस्ट 2-3 छोटे चमचे
2 tspoon टोमॅटो केचप
अख्खा गरम मसाला फोडणी साठी
हळद 1 tsp.
तिखट 2 tsp.
4 hirvya मिरची बारीक कापून
कोथिंबीर बारीक कापलेली
आवडी नुसार काजू बेदाणे
गरम मसाला पावडर
मीठ
कृती..
1..तांदूळ तुपावर अख्खा गरम मसाला घालून तांदूळ घालून छान परतवून घेऊन ⅓ rd शिजवून घेणे.
सोललेल्या अंड्याना फॉर्क नी छोटे छोटे टोचून अथवा भोक करून घेणे
2..तूप व तेल पॅन मध्ये घेऊन त्यावर हिंग , बारीक कापलेला कांदा टोमॅटो घालून परतवून घेणे कांदा मऊ झाला की त्यात
आले लसूण पेस्ट, हळद तिखट, गरम मसाला, मीठ, टोमॅटो केचप घालून छान परातून घेणे मग त्यात अंडी घालून परत परतवणे अगदी थोडे पाणी घालून त्याला वाफ येऊ द्यावी
3.. उभा कापलेला कांदा गोल्डन फ्राय करून घ्यायचा
काजू बेदाणे तुपवर परातून घेणे
आता बिर्याणी असेम्बल करणे
पसरड्या जाड बुडाच्या भांड्यात खाली थोडे बारीक चिरलेले कांदा टोमॅटो घालणे
त्यावर भात मग त्यावर अंडे व मसाला असे लेयरस तयार करणे
मध्ये मध्ये चिरलेले मिरची कोथिंबीर घालणे,
काजू बेदाणे, थोडेसे केशर दूध घालून 1 tbsp तूप सोडून बिर्याणीला वाफ आणून घेणे सर्व्ह करताना तळलेला कांदा घालून मिक्स करून करणे. आणि पोटभर खाणे.

22/09/2022

स्मृती गंध 🙏🏻🙏🏻
राजमा हा काही महाराष्ट्रीयन पदार्थ नाही.... तरी बरे माझेच वाक्य आहे जेवणाला जातं पात धर्म, प्रांत नसतो तरी आपले मीच बोलते. माझे लग्न होई पर्यंत मी कधीच राजमा खाल्ला नव्हता. राजमा सारखी दिसणारी चावळी आवडीने खाल्ली होती सासरी कळले सासू ला चवळी चालत नाही आवडत नाही म्हणुन घरात नाही करायची मग नवऱ्याला तरी त्याची चव कशी समजणार 😀😀
माझी नणंद त्यागी तिने राजमा केला होता आम्हाला प्रथम जेवायला बोलावले तेव्हा आणि तो माझा पहिला राजमा उष्टावणे प्रोग्राम 🤣🤣🤣🤣खुप आवडला ( तसें मला कोणीही कसेही आयते जेऊ घातले की ते मला खुप म्हणजे खुप आवडते मी कधीच नावे ठेवत नाही )कसे करायचे विचारून घेतले आणि नंतर घरी प्रयोग सुरु झाले 3-4 प्रयत्नांन नंतर यश आले आणि पप्पू पास झाला नमा खुप लहान होती पण साबा साबू नवरोबा जाम
खुश आणि कौतुकाचा अतिरेक म्हणजे नणंदेला फोन गेला आणि सांगितले दी.. आपसे यम्मी राजमा तो लीना बना लेती हैं. आप आजाए सभी खानेपे 😂😂😂.
नणंद रुसली 😂😂
तुंगारे यांच्या कडे गौर नसते पण इथे सासरी गौर, गणू, नवरात्र सारेच काही असते. मम्मी नी सांगितले गौरीला आंबटवरण, लाल मठाची भाजी, ती येते तेव्हा करायची मी आंबट वरण केले, भाजी त्यांच्या पद्धतीने प्रमाणे कुंबून केली आणि आवडू लागली पप्पा मम्मी ला म्हणाले लीना चे आंबट वरण म्हणजे एकदम एक नम्बर असे म्हणजे त्यांच्या मोठ्या आईसारखे,जमत नाही कोणाला 🤣🤣🤣🤣 ओहो ओहो ओहो काय तो उद्रेक झाला पारा चढला त्या नन्तर मम्मी नी कधीच घरात आंबट वरण केले नाही 😀😀😀ते आपले तूच कर म्हणायची झाले सासू रुसली 😄😄😄
मसूर म्हणजे माझे कडचे राजा कडधान्य मी यांना सांगून ठेवले आहे 13व्याला मसूर आमटी ठेवरे नाही तर जाम प्रॉब्लेम होईल कावळा नाही येणार 🤣🤣
एकदा मसुरची आमटी खूपच यम्मी झाली खुप आवडीने आम्ही सर्वानी खाल्ली खुप कौतुक पण केले सगळ्यांनी आता कहर म्हणजे नवऱ्याने काय सांगितले असेल लीना मसूर फ्रिजर मध्ये ठेऊन दे इतके यम्मी झालेत कावळा बनून तू नक्की आवडीने खाशील 🤣🤣
एकदा रणदिवे gtg होते मी सगळ्यात धाकटी सून, माझ्या मुली लहान पावसाळी दिवस लीना नंदूला त्रास नको म्हणुन gtg तिथेच करूयात झाले ठरले सारे ठाण्याच्या कर्णिक यांच्या कडे ऑर्डर दिली पण खास फर्माईश म्हणुन गोडाची फणसाची खीर लीना तूच कर ती तुलाच जमते झाले मी कामाला लागली नंतर सगळे नरेनला ओरडळे पण अरे छोटी किती लहान आहे लीना कसे दोन्ही करेल आणि बरेच काही..... अखेरीस मी खीर केलीच जेवणे झाली वडे मटण, मसूरची आमटी, वरण भात जिलेबी फणसाची खीर सगळ्यांनी आवडीने सारे काही खाल्ले मी तर कौतुकात न्हाऊन निघाले पण नरेन नी खीर खाल्ली आणि पटकन बोलला मीठ कमी आहे सगळे सिनिअर्स विचार करत राहिले अरे आपल्याला कसे नाही समजले.
आहाहा मज्जा,एका क्षणात कळले मम्मीला आणि नणंदेला काय वाटले असेल ते 😀😀😀
नीला रणदिवे.
3/09/22.

Mango delight chocolates, and mint chocolate.....नवरा शिप वरून येताना नेहमी after eight  ही चॉकोलेट आणायचा माझ्या खुप आव...
16/07/2022

Mango delight chocolates, and mint chocolate.....
नवरा शिप वरून येताना नेहमी after eight ही चॉकोलेट आणायचा माझ्या खुप आवडीची म्हणुन घरी प्रथमच मिन्ट चॉकोलेट बनवण्याचा प्रयत्न केला म्हणुन डार्क चॉकोलेट मिन्ट फील करून केली लागली मस्त पण अजून हवी तशी नाहीत जमली.पण काही हरकत नाही प्रयत्नांती परमेश्वर 🙏🏻🙏🏻.

चोकोमोका बर्फी आज घरात 2 kg कोको पावडर आहे हे आठवले 1 kg ब्रु इन्स्टंट अँड नेसकाफी आहे आठवलेआधी होममेड चॉकलेट करावे असे ...
17/05/2022

चोकोमोका बर्फी
आज घरात 2 kg कोको पावडर आहे हे आठवले 1 kg ब्रु इन्स्टंट अँड नेसकाफी आहे आठवले
आधी होममेड चॉकलेट करावे असे ठरवले मिल्कपावडर पण आणली पण हवे तसें कोकोनट ऑइल नाही मिळाले आणि आईसिंग शुगर नाही मिळाली सो चॉकोलेट बनवण्याची आयडिया कॅन्सल केली.
मग मी बेसन बर्फी च्या रेसेपी प्रमाणे कॉफी मोका बर्फी बनवली.
प्रथमच बनवली म्हणुन थोडीच बनवली
मी सर्व मापाला छोटी पळी वापरली.
6 चमचे साखर आणि 4 चमचे पाणी घालून साखरेचा एकतारी पाक केला. गॅस वरून खाली उतरवून घेतला
आवडी प्रमाणे ड्राय फ्रुटस क्रश करून घेतले. + 3 चमचे कोको पावडर + 1 चमचा कॉफी + 2 चमचे मिल्क पावडर हे सर्व साखरेच्या पाकात छान मिक्स करून घेतले.
मिश्रण परत गॅस वर लो फ्लेम वर ठेवले.1 चमचा तूप or अन्साल्टी बटर त्यात मुरवले भांड्याने कडा सोडल्या वर लगेच ट्रे मध्ये थापून गार केल्या सुंदर बर्फी 5-10 मिनिट मध्ये तयार.

आंबट वरण... एक माझी पद्धत....जेवणात जर आंबट वरण असेल तर... अहाहा चवीला फारशी कशाचीच गरज लागत नाही.फिश फ्राय, कोलंबीचे लि...
06/04/2022

आंबट वरण... एक माझी पद्धत....
जेवणात जर आंबट वरण असेल तर... अहाहा चवीला फारशी कशाचीच गरज लागत नाही.
फिश फ्राय, कोलंबीचे लिप्ते, आणि सुकी मच्छी जर जेवणात असेल तर आमच्या कडे आंबट वरण, हवेचं हवे.
तसे आंबट वरण पापड, लोणचे तूप आणि वाफे भरला गरम भात माझा सगळ्यात आवडता परिपूर्ण मेनू जेवण साठी.
तुरीची डाळ हळद हिंग घालून कुकर मधून शिजवून घ्यायची, डाळ छान मोडून त्यात हळद थोडी तिखट आणि धणे पावडर घालून घोटून घ्यायची. कढई मध्ये तेल घालून ग्यास चालू करणे हिंग,कधीपत्ता, मोहरी जिरे आणि सलासकट लसूण ठेचून मस्त घमघमित फोडणी तयार करून त्यात मोडलेल्या डाळीचे मिश्रण घालून मस्त उकळवायचे. त्यात आता चिंचेचा कोळ, चवी प्रमाणे मीठ आणि गुळाचा खडा चवी प्रमाणे घालून अजून थोडे उकळवून घेणे.
मस्त फोडणीच्या लसणाची चव तिखट गोड आणि नवा प्रमाणे आंबट.. आंबट वरण तयार.
आपली स्वतःची अशी चव मिळेलच.
चिंचेचा कोळ कमी अधिक करून त्यात चवी नुसार टोमॅटो, कच्ची कैरी, शेवगाच्या शेंगा घालून वारणाची लाज्जत वाढवता येते.

28/03/2022
आज थोडे मनातले 😄😄आज  एकदम पहिली वाहिली चिकन केली तशी चिकन करते आहे सो आज आईच्या ओरड्याची पदोपदी आठवण येते आहे.माझी आई हा...
27/03/2022

आज थोडे मनातले 😄😄

आज एकदम पहिली वाहिली चिकन केली तशी चिकन करते आहे सो आज आईच्या ओरड्याची पदोपदी आठवण येते आहे.
माझी आई हाडाची शिक्षिका होती.
प्रत्येक गोष्ट अशी म्हणजे अशी म्हणजे अशीच करा रे याचा ती खुप पाठपुरावा करायची.
आणि आम्ही किंवा मी शाळेतील नाठाळ विद्यार्थ्यां प्रमाणे वागायचीच.
तसें तिला चिकन मटण करताना खूपदा बघितले होते
चिकन मटण आणले का आधी त्ये परत कापा, हल्ली मी हे काम करतच नाही आहो तो खाटीकच हवे तसें छान तुकडे करून देतो न फोन वरून नुसते सांगितले तरी तो मला बाहेर आणून देतो. स्वच्छ धुवून त्याला हळद तिखट हिरवे वाटण मीठ लावून मूरवत ठेवायची, बारीक कांदा आणि खडा गरम मसाला फोडणी साठी तर उभा कापलेला कांदा, कांदा खोबरे गरम मसाला च्या तळल्या वाटणासाठी हे अगदी शेवटी घालायचे. तळला मसालायचे वाटण घालण्याचा आधीच टेस्टिंग चा एक जंगी प्रकार होत असे आमच्या कडे. टीका टिप्पणी करणे आणि….
आता आठवले का जरा वाईट वाटते किती आरामात आपण तिच्या मेहनतीला नावे ठेवत असू. आणि ती मात्र आमच्या आवडी प्रमाणे सदैव कमी अधिक करत राहायची, नव्हे तिला माहिती नव्हे खात्री होती सगळे जाम भारी बनले आहे पण आमचे मन राखण्या करता ह ह करतं सर्व ऐकायची. ती त्यात काही कमी अधिक करायची का नाही हे माहिती नाही पण जेवताना मात्र आम्ही तृप्त व्हयचो.
खरे तर ती मीठ तिखट बघायला सांगायची पण आम्ही सर्व संजीव कपूर बनून expert advise द्यायचो. 😂😂😂🙏🏻
असो कोंबड बकरं जात जिवा निशी मेला खाणारा म्हणतो वातूळ 😂😂😂बरोबर न??
चिकन मटण साजूक तुपातच फोडणी घालायची हा नियम पर्टिक्युलर कारण नाही माहित पण अनुभवाने एक नक्की सांगते टेस्टी लागते.
सासरी आले इथे पण तेच मम्मी जेवण खूपच टेस्टी बनवायच्या त्यांचे पण सेम नियम आईमुळे मला इथे त्याचा फायदाच झाला.
पण तरी सुद्धा आईची नजर चुकवून माहेरी शॉर्टकट करायची तसें इथे पण करायची. देव दयेने चवीत फरक करायचा नाही हे मात्र जमले. म्हणुन सगळेच खुश.

आता शॉर्टकट सांगते सगळी वाटणे घाटणे एकत्र करून आधीच कुकरमध्ये तूप तेलावर फोडणी घालून छान परतवून घेते म्हणजे कांदा, खोबरे लसूण मिरची आले गरम मसाला यांचा कच्चा वास जातो मस्त सुगंध दरवळतो मग त्यात हळद तिखट मीठ लावलेले चिकन अथवा मटण घालून मस्त सवटाळून मसाला छान प्रत्येक तुकड्याला लागला पाहिजे एवढे
मोजकेच पाणी घालून सरळ सरळ कुकरच्या शिट्ट्या काढायचे चिकन ला 2 तर मटण ला जरा जास्तच. आई खुप भडकायची पण मग चला निदान करायला तरी प्रयत्न करते ना झाले तर मग.
आता वर्षांमागून वर्षे गेली मी पण आई सासू झाले आणि आता जाणवले मी पण आई व मम्मी झाले आहे.
कुकर मलाही नको वाटतो.. त्यांच्या सारखेच, तीच चव आणण्याचा माझा खटाटोप 😃😃😃 आज धाकटीने जबरदस्त माझ्याच सारखे चिकन शॉर्टकट केली चिकन,आणि माझे डोळे गरगरू लागले पण आता ठरवले आहे चिडचिड नाही करायची ती निदान करते तरी आहे ना?? प्रोत्साहन द्यायचे ती पण तिची चव तिची पद्धत शोधेलच. मी जाम खुश आहे, मेहेमदाबादी शाही चिकन मिल मला आयते मिळणार यातच आणि माझ्या शाकाहारी मुलीने चक्क चिकन बनवली खुप मेहेनत घेतली आहे तिने, म्हणुन माझी नसलेली कॉलर जरा टाईटच झाली 😃😃
काकडी कांदा टोमॅटो कोशिंबीर, कडेला कांदा लिंबू चिरून मला भाकरी आणि तिला स्वतःला पाव असा फक्कड बेत आज….

मी इथे मनिपाल ला वास्तव्यास येऊन आता बराच काळ झाला पण मला सांबार मला हवा तसा जमत नाही याची कायम खंत होती. खुप ट्रायल आणि...
25/03/2022

मी इथे मनिपाल ला वास्तव्यास येऊन आता बराच काळ झाला पण मला सांबार मला हवा तसा जमत नाही याची कायम खंत होती. खुप ट्रायल आणि एरर करून आज मला हवा तसा माझ्या मनातल्या चावीचा सांबार मला जमला.
बरेच ब्रँड चे सांबार मसाले वापरले वेगवेगळ्या पद्धतीने सांबार करून बघितला पण माझी चव काही येत नव्हती.
पण आज अखेरीस जमले मला हवे तसे सांबार करायला. म्हणुन लगेच प्रीमिक्स चा घाट घातला. आणि 100% result लागला yummiest सांबार नक्कीच बनणार. आता मी माझी पद्धत इथे देत आहे.
सांबार प्रीमिक्स.

1 कप धणे
1 कप तुरीची डाळ
½ कप चणाडाळ
¼ कप उडद डाळ,
¼ cupतांदूळ (ब्राउन or व्हाईट )
¼ कप डाळे
1 tsp. हिंग
2 tsp जिर
1tsp. काळे मिरे
1tsp. मेथी दाणे
1.5 tsp बडीशोप
10 बेडगी मिरची
10 काश्मिरी मिरची
1tsp. हळद
वरील सर्व गोष्टी ड्राय भाजून घ्यायच्या त्यातील बाष्प सगळे निघून गेले पाहिजे. त्याचा रंग थोडा बदलेल.
सगळे सुके भाजून झाले की गार झाल्यावर मिक्सर मासुन सुके वाटून घ्यावे. वाटताना त्यात 4 चमचे मीठ घालावे.

पातेल्यात तेल घालावे त्यात चिमूटभर हिंग, मोहरी कडीपत्ता फोडणी करून आवडी प्रमाणे भाज्या घालून परतवून घ्याव्या भाजी पुरता मीठ घालावे व पाणी घालून शिजू द्याव्या.
एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात प्रीमिक्स घालून छान मिक्स करून घ्यावे मग ते मिश्रण भाज्यांच्या मिश्रणत मिक्स करावे. प्रीमिक्स तुम्हाला हवे तसें मिक्स करावे. जाड किंवा पातळ आवडीनुसार करावे.
मीठ प्रीमिक्स मध्ये घतले आहे म्हणुन मीठ घालताना काळजी घ्यावे चाखून मिठाचा अंदाज घ्यावा.
चिंच, आणि छोटा तुकडा गुळाचा घालावा. नारळ चा किस घालावा,
टीप. आपण चिंच पण भाजून घालू शकतो. चिंच खोबरे किस खरपूस भाजून एकत्र वाटून घालता येते
½ कप चिंच
½ कप खोबरे किस एकत्र वाटले तरी चालते.
पण मला असे वाटते प्रीमिक्स चे शेल्फ लाईफ कमी होईल मग ते फ्रिज मध्ये ठेऊन द्यावे लागेल म्हणुन मी घालत नाही ते सांबार तयार करते तेव्हा घालते.

मी यातील 4 tbsp. सांबार प्रीमिक्स, एकूण 5 ते6 कप पाणी आणि माझ्या कडे असलेल्या भाज्या घालून सांबार बनवले.
½ काकडी
½ सिमला मिरची
2 टोमॅटो
1 कांदा
सगळे कापून तेलावर हिंग मोहरी कडीपत्ता फोडणी घालून सावतळून घेतले त्यात भाजी पुरता मीठ घतले आणि 1.5 कप पाणी घालून भाजी शिजू दिली मग त्यात प्रीमिक्स व पाणी यांचे मिश्रण घतले.
8-10 मिनिटे उकळवले.2 tbsp. चिंच कोळ घातला आणि छोटा तुकडा गुळाचा घातला. तुम्ही हवे असल्यास खोबरे किस घालावा 2 मिनिटे उकळवले.
15-20 मिनिटात चविष्ट सांबार तयार.
या मापाने 1/2 kg प्रीमिक्स तयार होते साधारण 18-20 tbsp. म्हणजेच 7-8 वेळा चौघानपुरते सांबार बनू शकते.

झटपट चिकन खिमा बॉल्स …. Healthy dietwale…आमच्या कडे सगळेच जण खुप डाएट कॉनशिएस होतात कधी कधी सहजच आपले.यावेळी मी व्हायचे ...
06/03/2022

झटपट चिकन खिमा बॉल्स …. Healthy diet
wale…आमच्या कडे सगळेच जण खुप डाएट कॉनशिएस होतात कधी कधी सहजच आपले.

यावेळी मी व्हायचे ठरवले. घरातील आईचे डाएट म्हणजे घरातल्यांचे दुप्पट खाशी.
डाएट का डाएट आणि सगळ्यांच्या आवडीचे.
म्हणजे पुन्हा नव्याने काही करायला नको..

साहित्य..
बोनलेस चिकन ब्रेस्ट पिसेस ½ kg मिक्सर मधून खिमा करून घेणे अगदी पीठ भिजवल्या सारखा होतो.
मॅरीनेशन चे साहित्य.
10 ते 12 पाकळ्या लसनाच्या
एक इंच आले तुकडा कापून
1 छोटी वाटी कोथिंबीर कापून
1 छोटी वाटी पुदिना पाने कापून
5 हिरव्या मिरच्या
2चमचे गरम मसाला
1tsp हळद
2 tsp तिखट आपल्या आवडी नुसार
2tsp बडीशेप पावडर
2. Tsp. विनेगार
चवी पुरता मीठ
1 tbsp. हनी
4-5 ते tbsp. बेसन
2 tsp तेल
वरील सर्व साहित्य पाणी नं घालता बारीक वाटून चिकन च्या खिम्याला चोळून ठेवले ½ तास बाजूला त्याचे छान छोटे छोटे आवडी प्रमाणे पेढे छोटे लाडू एवढे आकार बनवले परत छान झाकून फ्रीझ मध्ये ठेऊन दिले.
प्रेहिट केलेल्या एअर्फरायर मध्ये ऑइल ब्रश करून 200°तापमानावर बेक करून घेतले.
वेळ आणि तापमान इलेक्ट्रिक वोल्टज, आणि एअर्फ्रायर च्या नुसार बदलू शकतात.
ऊत्तम म्हणजे 12 मिनिटे झाल्यावर तपासून बघणे. मला 15 मिनिटे लागली.
गॅस वर पॅन मध्ये ऑइल ब्रश करून सुद्धा छान होतात झाकण ठेऊन उलटून पालटून शिजवणे.
फ्रीझर मध्ये 8-10 दिवस सहज राहतात.

डीप फ्राय करायचे असतील तर ब्रेड क्रम्ब आणि अंडे मध्ये घोळून तळावे.

Address

Panvel

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919611755152

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Leena's Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category