22/09/2022
स्मृती गंध 🙏🏻🙏🏻
राजमा हा काही महाराष्ट्रीयन पदार्थ नाही.... तरी बरे माझेच वाक्य आहे जेवणाला जातं पात धर्म, प्रांत नसतो तरी आपले मीच बोलते. माझे लग्न होई पर्यंत मी कधीच राजमा खाल्ला नव्हता. राजमा सारखी दिसणारी चावळी आवडीने खाल्ली होती सासरी कळले सासू ला चवळी चालत नाही आवडत नाही म्हणुन घरात नाही करायची मग नवऱ्याला तरी त्याची चव कशी समजणार 😀😀
माझी नणंद त्यागी तिने राजमा केला होता आम्हाला प्रथम जेवायला बोलावले तेव्हा आणि तो माझा पहिला राजमा उष्टावणे प्रोग्राम 🤣🤣🤣🤣खुप आवडला ( तसें मला कोणीही कसेही आयते जेऊ घातले की ते मला खुप म्हणजे खुप आवडते मी कधीच नावे ठेवत नाही )कसे करायचे विचारून घेतले आणि नंतर घरी प्रयोग सुरु झाले 3-4 प्रयत्नांन नंतर यश आले आणि पप्पू पास झाला नमा खुप लहान होती पण साबा साबू नवरोबा जाम
खुश आणि कौतुकाचा अतिरेक म्हणजे नणंदेला फोन गेला आणि सांगितले दी.. आपसे यम्मी राजमा तो लीना बना लेती हैं. आप आजाए सभी खानेपे 😂😂😂.
नणंद रुसली 😂😂
तुंगारे यांच्या कडे गौर नसते पण इथे सासरी गौर, गणू, नवरात्र सारेच काही असते. मम्मी नी सांगितले गौरीला आंबटवरण, लाल मठाची भाजी, ती येते तेव्हा करायची मी आंबट वरण केले, भाजी त्यांच्या पद्धतीने प्रमाणे कुंबून केली आणि आवडू लागली पप्पा मम्मी ला म्हणाले लीना चे आंबट वरण म्हणजे एकदम एक नम्बर असे म्हणजे त्यांच्या मोठ्या आईसारखे,जमत नाही कोणाला 🤣🤣🤣🤣 ओहो ओहो ओहो काय तो उद्रेक झाला पारा चढला त्या नन्तर मम्मी नी कधीच घरात आंबट वरण केले नाही 😀😀😀ते आपले तूच कर म्हणायची झाले सासू रुसली 😄😄😄
मसूर म्हणजे माझे कडचे राजा कडधान्य मी यांना सांगून ठेवले आहे 13व्याला मसूर आमटी ठेवरे नाही तर जाम प्रॉब्लेम होईल कावळा नाही येणार 🤣🤣
एकदा मसुरची आमटी खूपच यम्मी झाली खुप आवडीने आम्ही सर्वानी खाल्ली खुप कौतुक पण केले सगळ्यांनी आता कहर म्हणजे नवऱ्याने काय सांगितले असेल लीना मसूर फ्रिजर मध्ये ठेऊन दे इतके यम्मी झालेत कावळा बनून तू नक्की आवडीने खाशील 🤣🤣
एकदा रणदिवे gtg होते मी सगळ्यात धाकटी सून, माझ्या मुली लहान पावसाळी दिवस लीना नंदूला त्रास नको म्हणुन gtg तिथेच करूयात झाले ठरले सारे ठाण्याच्या कर्णिक यांच्या कडे ऑर्डर दिली पण खास फर्माईश म्हणुन गोडाची फणसाची खीर लीना तूच कर ती तुलाच जमते झाले मी कामाला लागली नंतर सगळे नरेनला ओरडळे पण अरे छोटी किती लहान आहे लीना कसे दोन्ही करेल आणि बरेच काही..... अखेरीस मी खीर केलीच जेवणे झाली वडे मटण, मसूरची आमटी, वरण भात जिलेबी फणसाची खीर सगळ्यांनी आवडीने सारे काही खाल्ले मी तर कौतुकात न्हाऊन निघाले पण नरेन नी खीर खाल्ली आणि पटकन बोलला मीठ कमी आहे सगळे सिनिअर्स विचार करत राहिले अरे आपल्याला कसे नाही समजले.
आहाहा मज्जा,एका क्षणात कळले मम्मीला आणि नणंदेला काय वाटले असेल ते 😀😀😀
नीला रणदिवे.
3/09/22.