27/01/2020
चित्रांगण- एक प्रवास
मी सुयोग पटवर्धन, पेशाने IT तज्ञ.. भूगोल विषय आणि त्यामध्ये जरा हटके असलेलं क्षेत्र...अनेक वेळा नाट्य, गायन,वादन कला प्रकारांमधून कलाकार म्हणून तुमच्या सर्वांच्या समोर आलो आहे. त्यामुळे आयोजन कसे करावे,कार्यक्रम कसा सादर करावा, नव नवीन संकल्पना कश्या समोर आणाव्या ह्याबाबत चांगली माहिती होती. गरज होती ती नवीन काहीतरी स्वतःच आपल्या माणसांना घेऊन करण्याची.
सहज बोलता बोलता मी माझी बायको शुभदा आणि तिचे सर अभिजित सुर्वे ह्यांना बोलून दाखवलं. काहीतरी हटके करायचंय , आणि सगळे तयार झाले. संकल्पना समोर मांडल्या..मग हळू हळू एक एक मेंबर समाविष्ट होत गेले.दीपाली ताई असेल किंवा आमचे गणेश शेटकर काका असतील.ग्रुप तर तयार झाला. आता हटके काय करायचं ह्याच्या चर्चा सुरू झाल्या.
दीपाली ताई ने सांगितलं आजकालची लहान मुलं नुसती मोबाईल, टीव्ही ला चिकटलेली असतात त्यांच्यासाठी काहीतरी करूया ,जेणेकरून ती मुले समाजात आपल असा एक स्थान बनवतील.
लवकरच सुट्टी पडणार होती नाताळ ची.गोव्यामध्ये नाताळ हा सण फार उत्साहात साजरा करतात. म्हटलं हीच ती वेळ.
मग काय सगळे कामाला लागलो. आणि लहान मुलांसाठी पैंटिंग, क्राफ्ट्स, पॉट पैंटिंग, नाट्य प्रशिक्षण शिबीर घेयच अस ठरला.
आमच्यापैकी कोणालाच कसलाच अनुभव नव्हता. जाहिरात कशी करायची, नेमका कार्यशाळा घेयची म्हणजे काय करायचं? ....मग जो काही अनुभव गाठीशी होता त्याने उतरायचं ठरवलं ...बघता बघता 40 मुलांनी आपला नाव 8 दिवसाच्या कार्यशाळेत नोंदवलं. माशेल तस खेडेगाव.पण इथल्या सर्वांनी खूप साथ दिली..आणि अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला.
कोणी खाऊ दिला तर कोणी छान आशीर्वाद..
पालक सुद्धा खूप खुश होते, कारण रोज मोबाईल साठी हट्ट करणारे मुले आज मस्त पैंटिंग चा ब्रश,नातूकले ,पॉट,क्राफ्ट हीच चर्चा करत होते.
स्वतःच स्वतःची प्रॉपर्टी कशी आणायची, स्वतःच विचार करून सुंदर चित्र कस काढायचं... आणि स्वतःचा कल्पनाविस्तार वापरून कथेचं रूपांतर नाटूकल्यात कस करायचं ...मूल स्वतःच डोकं वापरायला लागली...
नव्या पिढीकडे खूप टॅलेंट आहे पण गरज आहे ती त्यांना चांगल्या मार्गदर्शनाची.. त्यांना वावरूदेत त्यांच्या कल्पनेत..मग कशाला हवेत ते मोबाइल आणि व्हिडीओ गेम्स...
सुरुवात तर छान झाली....
पुढे खूप काही करायचं आहे...अनेक नवीन विषय हाताळायचे आहेत...
नव्या पिढीला समृद्ध करायचे आहे...
प्रवास सुरु झालाय.....