फेसबुकवर आम्हा दोघी मैत्रिणींना लोकांचं भरभरून प्रेम मिळालं आणि आजही मिळत आहे. 'तुमचं लिखाण आवडतं', 'आम्हाला तुमच्या पोस्टशी रिलेट करता येतं', 'तुमच्या खुसखुशीत पोस्ट्स मुळे आमचे ताणतणाव दूर होतात', 'आजची पोस्ट वाचली आणि अर्धा तास फक्त हसत होतो मी' अशा अनेक प्रतिक्रियांमुळे आम्हाला अधिकाधिक लिहायला प्रोत्साहन मिळालं. जेव्हा वाचकांनी, 'आम्हाला तुम्हा दोघींना भेटायचं आहे', 'तुमच्याशी गप्पा मारायच्या
आहेत' असं सांगितलं तेव्हा आम्ही ठरवलं की सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्मवर भेटलेल्या या मित्र मैत्रिणींसाठी आपण काहीतरी वेगवेगळे उपक्रम करत राहू. त्यायोगे आपण त्यांच्याशी अधिकाधिक जोडलेले राहू आणि आम्हालाही आमच्या कल्पकतेला वाव देऊन नवनवीन प्रयोग करून नव्या गोष्टी शिकता येतील.
नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर ऑक्टोबर २०२१ रोजी आम्ही अशा उपक्रमांना सुरुवात केली. या उपक्रमांना देखील सगळ्यांनी उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद दिला.
म्हणूनच जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि फक्त सानगौर तर्फे होणाऱ्या उपक्रमांची माहिती सर्वांना एकाच ठिकाणी आणि सलग मिळावी यासाठी सानगौरच्या पेजची निर्मिती केली.
आशा आहे यालाही तुम्ही उत्तम प्रतिसाद द्याल.
धन्यवाद
सानिका वाडेकर आणि गौरी ब्रह्मे