Raagi Events

Raagi Events Online events for the betterment of society!

सुट्टी संपत आली. सुट्ट्यांमध्ये खूप मजा केली आणि आता लवकरच शाळा सुरू होणार.  म्हणून रागी इव्हेंट्सने लहान मुलांसाठी अभिन...
24/05/2024

सुट्टी संपत आली. सुट्ट्यांमध्ये खूप मजा केली आणि आता लवकरच शाळा सुरू होणार. म्हणून रागी इव्हेंट्सने लहान मुलांसाठी अभिनय कार्यशाळा आयोजित केली आहे. ज्यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री राधिका देशपांडे या मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे नवीन गोष्टी शिकण्यासाठी कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा.

12/11/2023

अथर्वशीर्ष मंडळ आणि रागी इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी पहाट- २०२३ हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पडला.

*अथर्वशीर्ष मंडळ खराडी आणि रागी इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित*           *सुरेल सुमधुर गीतांची मैफिल*      ...
07/11/2023

*अथर्वशीर्ष मंडळ खराडी आणि रागी इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित*


*सुरेल सुमधुर गीतांची मैफिल*
*दिवाळी पहाट*
वर्ष चौथे

*दिपावली निमित्त सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.*

आपले खराडी नगर बहुभाषिक असले तरी, आपण पुण्यात राहत असल्यामुळे, आपल्याभागात मराठी कार्यक्रम व्हावे अशी या भागातील बऱ्याच नागरिकांची इच्छा असते. आणि म्हणून दिवाळी पहाट कार्यक्रमाचे पहिले दोन वर्ष ऑनलाईन आणि गेल्या वर्षी प्रत्यक्ष सादरीकरण आम्ही केले होते.

कळविण्यास आनंद होतो की दिवाळी निमित्त यावर्षी देखील, सुरेल सुमधुर गाण्यांची मैफिल आम्ही आयोजित केली आहे.

या मैफिलीची विशेषता म्हणजे, सर्व गायक-गायिका-वादक पुण्याच्या पूर्व भागातील संगीत क्षेत्रातील उत्तम कलाकार आहेत.

*कार्यक्रम दिनांक -*
*शनिवार, ११ नोव्हेंबर २०२३*

*कार्यक्रमाची वेळ-*
*सकाळी ठीक ६ ते ८*

*कार्यक्रमाचे स्थान -*
*मियो प्लाझो सोसायटी*
*मे फेयर व डी मार्ट समोर,*
*श्रीराम चौक, खराडी, पुणे*

*गायक कलाकार -*
हिमांगी विश्वरुप, समीर मोहिते, डॉ.गौरी जोशी, अंजली जोशी, नीता गंगापुरकर, अनिरुध्द गद्रे, सुषमा देसाई

*संवादिनी साथ* -प्रिया केळकर गांगुली
*तबला संगत* -राम भालेकर
*सूत्रसंचालन* - ऋचा मुळे

*कार्यक्रमाचा व दिवाळी निमित्त अल्पोपहार-चहाचा आस्वाद घ्यायला, आपण सहपरिवार परिचितांसह यावे* याकरिता हे आग्रहाचे निमंत्रण.


उन्हाळी सुट्टी सुरू झाली की पालकांना मुलांसाठी मोठा प्रश्न असतो रोज नवीन असं काय शिकवायच ?तुमचा हा प्रश्न आम्ही दूर करत ...
07/05/2023

उन्हाळी सुट्टी सुरू झाली की पालकांना मुलांसाठी मोठा प्रश्न असतो रोज नवीन असं काय शिकवायच ?

तुमचा हा प्रश्न आम्ही दूर करत आहोत आणि तुमच्या पाल्यांसाठी खास *रागी इव्हेंट्स तर्फे उन्हाळी कार्यशाळा*

१३ आणि १४ मे रोजी दुपारी ३ ते ६ ही कार्यशाळेची वेळ आहे. गाणी, ड्रॉइंग, नृत्य, खेळ अशा विविध गोष्टींनी ही कार्यशाळा रंगणार आहे.

तुमच्या पाल्यांना या धमाल कार्यशाळेत नक्की पाठवा.

अधिक माहितीसाठी संपर्क -
श्वेता - 8087501625
ऋचा - 9423766644

रागी इव्हेंट्स आयोजित सायबर सिक्युरिटीचे अनेक कार्यक्रम आणि व्याख्यानं घेण्यात आली. पण आनंद होतो जेव्हा त्याची दखल प्रसा...
22/02/2023

रागी इव्हेंट्स आयोजित सायबर सिक्युरिटीचे अनेक कार्यक्रम आणि व्याख्यानं घेण्यात आली. पण आनंद होतो जेव्हा त्याची दखल प्रसार माध्यमांतर्फे घेतली जाते आणि माहिती जास्त लोकांपर्यंत पोहोचते.

सायबर सिक्युरिटी म्हणजे काय ? यामार्फत फ्रॉड का होतात? आपण कुठे क्लिक करावे आणि कुठे करू नये ? शिवाय काळजी कशी घ्यावी याबद्दल सुरजची मुलाखत घेण्यात आली. रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओवर आरजे शुभम यांनी ही मुलाखत घेतली.

रेडिओ विश्वास, आरजे शुभम, रुचिता ठाकूर आणि मंदार ठाकूर सगळ्यांचे मनःपूर्वक आभार !😀

रागी इव्हेंट्सतर्फे आतापर्यंत खास ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सिक्युरिटी या विषयावर व्याख्यानं आयोजित करण्यात आली होती पण...
16/02/2023

रागी इव्हेंट्सतर्फे आतापर्यंत खास ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सिक्युरिटी या विषयावर व्याख्यानं आयोजित करण्यात आली होती पण नुकतेच नाशिक येथे पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींना सुरज मुळे यांनी मार्गदर्शन केले.

पत्रकारिता करताना सायबर सिक्युरिटी संदर्भात काय अडचणी येऊ शकतात आणि त्यावर पर्याय काय आहेत हा प्रामुख्याने विषय होता. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या या सगळ्या व्यक्ती वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या स्तरातील माध्यमांमध्ये पत्रकार आहेत.

ही संधी दिल्याबद्दल प्राचार्य श्रीकांत सोनवणे यांचे मनापासून आभार !

रागी इव्हेंट्स आणि सेतू अभिवाचन मंच आयोजित व्ही.जे. डेव्हलपर्स प्रस्तुत नूर-ए-अख्तरीएखादा सोहळा संपन्न व्हावा तसा कालचा ...
21/01/2023

रागी इव्हेंट्स आणि सेतू अभिवाचन मंच आयोजित

व्ही.जे. डेव्हलपर्स प्रस्तुत

नूर-ए-अख्तरी

एखादा सोहळा संपन्न व्हावा तसा कालचा नूर-ए-अख्तरी कार्यक्रमाचा दुसरा प्रयोग बालशिक्षण मंदिर या ठिकाणी झाला.

रसिकांची प्रत्येक क्षणी दाद मिळत होती आणि ही दाद म्हणजेच खरं तर कलाकारांसाठी महत्त्वाची असते.
खासदार श्रीनिवास पाटील, आनंद माडगूळकर आणि हर्षादा माडगूळकर यांची उपस्थिती लाभली. 😀🎶🎼

19/01/2023

रागी इव्हेंट्स आणि सेतू अभिवाचन मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सादर होत आहे -

नूर – ए - अख़्तरी (प्रयोग दुसरा) - बेगम अख्तर यांचा सामान्य मुलगी ते पद्मभूषण बेगम अख्तर हा जीवनप्रवास व त्यांनी गायलेल्या गझला नि ठुमऱ्या यांचे सादरीकरण - Remembering Begum Akhtar.....

दिनांक - 20 January 2023

कार्यक्रमाचे ठिकाण - M.E.S. Auditorium, Mayur Colony, Kothrud, Pune

वेळ - संध्याकाळी 6:00 वाजता

देणगी प्रवेशिका मूल्य - 300/- आणि 250/-
देणगी प्रवेशिका कार्यक्रमस्थळी उपलब्ध होतील.

फोन बुकिंगसाठी संपर्क -
रागी इव्हेंट्स : 094237 66644

रागी इव्हेंट्स आणि सेतू अभिवाचन मंच आयोजितनूर – ए - अख़्तरी शुभारंभाचा दिमाखदार प्रयोग झाला आणि त्याला अप्रतिम प्रतिसाद ...
17/01/2023

रागी इव्हेंट्स आणि सेतू अभिवाचन मंच आयोजित

नूर – ए - अख़्तरी

शुभारंभाचा दिमाखदार प्रयोग झाला आणि त्याला अप्रतिम प्रतिसाद मिळाला. मग अनेकांनी सांगितलं की लगेच दुसरा प्रयोग ठेवा.
प्रेक्षकांचं बोलणं रागी इव्हेंट्स आणि सेतू अभिवाचन मंच यांनी मनावर घेतलं आणि येत्या 20 जानेवारीला घेऊन येत आहोत दुसरा प्रयोग.

तुम्ही येत आहात ना?

16/01/2023

रागी इव्हेंट्स आयोजित आनंद भाटे यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेत सहभागी रसिक विद्यार्थी !!

अप्रतिम प्रतिसाद !

पुढील सांगीतिक वाटचालीसाठी शुभेच्छा !

आनंद भाटे यांची संगीत कार्यशाळादिवस पहिला रागी इव्हेंट्स आयोजित  सांगीतिक कार्यशाळेला उदंड आणि श्रवणीय प्रतिसाद मिळाला. ...
14/01/2023

आनंद भाटे यांची संगीत कार्यशाळा

दिवस पहिला

रागी इव्हेंट्स आयोजित सांगीतिक कार्यशाळेला उदंड आणि श्रवणीय प्रतिसाद मिळाला. फक्त पुण्यातून नाही तर महाराष्ट्रातून अनेकांचा सहभाग या कार्यशाळेसाठी लाभला. 🎶🎼

10/01/2023

For registration - 9423766644

For Registration, contact 9423766644रागी इव्हेंट्समार्फत संगीत कार्यशाळासंधी सारखी ठोठावत नाही म्हणून आधी ती ओळखणं महत्त...
24/12/2022

For Registration, contact 9423766644

रागी इव्हेंट्समार्फत संगीत कार्यशाळा

संधी सारखी ठोठावत नाही म्हणून आधी ती ओळखणं महत्त्वाचं. त्यामुळे ही सांगीतिक संधी अजिबात सोडू नका. प्रवेश मर्यादित आहे. 🎶🎼

20/12/2022

शास्त्रीय संगीत म्हणजे अथांग समुद्र. जितके खोलात जाऊ तितकं सतत नवीन काहीतरी हाती लागतं. म्हणूनच संगीतप्रेमींसाठी खास ही कार्यशाळा 🎶

आनंद भाटे म्हणजेच आनंद गंधर्व स्वतः मार्गदर्शन करणार मग अजून काय हवं ? बाकी माहिती लवकरच कळेल.

प्रवेश मर्यादित आहेत.

*आणि शुभारंभाच्या प्रयोगाला टाळ्यांचा कडकडाट*       शेवटची गझल झाली आणि 2 मिनिटं सभागृह शांत. मग सगळे जण उभे राहून पुढे ...
28/11/2022

*आणि शुभारंभाच्या प्रयोगाला टाळ्यांचा कडकडाट*

शेवटची गझल झाली आणि 2 मिनिटं सभागृह शांत. मग सगळे जण उभे राहून पुढे 5 मिनिटं फक्त टाळ्या वाजवत होते. नूर- ए- अख्तरी या कार्यक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग. अगदी अंगावर शहारे आले आणि सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू. हे अनुभवता आलं फक्त बेगम अख्तर यांच्यामुळे.

आयुष्यात संगीत हेच सत्य ज्यांना वाटलं, कितीही अडचणी आल्या तरी त्यांच्यासाठी संगीत हाच उपाय होता अशा बेगम अख्तर साहेबांवर रागी इव्हेंट्स आणि सेतू अभिवाचन मंच यांच्या संयुक्त विद्यमाने नूर- ए- अख्तरी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शुभारंभाचा प्रयोग न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड या ठिकाणी संपन्न झाला.

बेगम अख्तर यांच्या आयुष्यातील प्रसंग आणि त्यांच्या गझल, ठुमरी आणि चैती यांचे सादरीकरण करण्यात आले. फारच हृदयाला भिडले असे सादरीकरण झाले.

हमरी अटरिया, ए मोहोब्बत तेरे अंजाम पे, वो जो हम मे तुम मे करार था या गझलांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. गालिब, बदयुनी, कैफी आझमी या गझलकरांच्या गझला सादर केल्या गेल्या. कार्यक्रम इतका रंगला की शेवटी फक्त टाळ्या आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

नूर-ए-अख्तरी या कार्यक्रमाची संहिता, निर्मिती, अभिवाचन गीतांजलि जोशी यांनी केले. सहवाचिका दीपाली दातार यांनी उत्तम साथ दिली. हिंदी/ऊर्दू शब्दांचा लहेजा ही अभिवाचनाची खास मांडणी कार्यक्रमाचे दिग्दर्शक, सूत्रधार आणि वाचक श्री. अनिरुद्ध दडके यांनी केली. श्रुती विश्वकर्मा-मराठे यांच्या गझलेने कार्यक्रमाला अगदी चार चांद लावले. जवारीदार आवाजाची आणि घरंदाज गझल-ठुमरी गायकीचा प्रत्यय आला. तबलासाथ विनायक कुडाळकर , संवादिनीवादक स्वानंद कुलकर्णी आणि सारंगीवादक वनराज शास्त्री यांच्यामुळे कार्यक्रम अधिक खुलला. संयोजन मुकुंद दातार यांनी केले.

या कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली. ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे, ज्येष्ठ पत्रकार लेखक डॉ. विजय कुवळेकर , सुप्रसिद्ध अभिनेत्री विभावरी देशपांडे, गायक ओमकार खाडिलकर, मयुरी ढवळे, हेल्वोइट कंपनीचे अधिकारी अविनाश कपूर आणि पुण्यातील अनेक विशेष मान्यवर व्यक्ती यांच्यामुळे सोहळा अधिक अभूतपूर्व झाला.

हा शुभारंभाचा प्रयोग ऋचा आणि सुरज मुळे यांनी आयोजित केला होता पण यामध्ये अनेकांचा मोलाचा हातभार आहे. खासकरून अंजली देशपांडे, शिल्पा कुलकर्णी, सौरभ कुलकर्णी, मानसी जोशी, अमेय गोंगले, बागेश्री पारनेरकर यांचे कार्यक्रमस्थळी विशेष सहकार्य लाभले. रसिकांचे भरभरून आशीर्वाद आणि प्रतिसाद कार्यक्रमाला मिळाला. सगळ्या आठवणी फोटोज मार्फत जपण्याचे काम शुभंकर हवेले यांनी केले.

(फोटो मध्ये डावीकडून अनिरुद्ध दडके, विनायक कुडाळकर, स्वानंद कुलकर्णी, गीतंजलि जोशी, प्रतिभा रानडे, दीपाली दातार, श्रुती विश्वकर्मा- मराठे, वनराज शास्त्री.
खाली डावीकडून सुरज मुळे, ऋचा दीक्षित-मुळे, मुकुंद दातार)

Shubhankar Havele
Rucha Dixit - Mulay
Shruti Vishwakarma Marathe
Geetanjali Joshi
Deepali Patki Datar
Aniruddha Dadke
Bageshree Parnerkar
Anjali Deshpande
Shilpa Vaidya Kulkarni

कोणताही कार्यक्रम झाला की प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या.नूर- ए- अख्तरीच्या पहिल्या प्रयोगानंत...
28/11/2022

कोणताही कार्यक्रम झाला की प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या.

नूर- ए- अख्तरीच्या पहिल्या प्रयोगानंतर गायक ओमकार खाडिलकर यांनी एक देखणा लेख लिहिला.देखणा लेख हा शब्द यासाठी वापरला कारण त्याच्या लेखणीतून कार्यक्रम नेमकं कसा झाला हे डोळ्यासमोर उभं राहिलं. Omkar Khadilkar तुमचे मनापासून आभार.

गायक आणि आशाताई खाडिलकर यांचे सुपुत्र ओमकार खाडिलकर यांचा हा लेख-

काहीवेळा लग्नाच्या जेवणाचा मेनू माहीत नसला तरी 'आज आपल्या आवडत्या बासुंदी पुरीचा बेत नक्की असणार बरं!' ,असं मनाशी धरून आपण एखाद्या लग्नसमारंभाच्या पंगतीत बसण्यासाठी सज्ज होतो. आणि मग अचानक समोर बासुंदीबरोबरच पंचपक्वान्नांनी भरलेली अशी काही अफाट थाळी येते, की भोजन सुरू कुठून करावं ह्याबद्दल मनात कल्ला होतो.

तसंच काहीसं झालं आज बरेच महिन्यांनी .

निमित्त होतं, रागी इव्हेंट्स आणि सेतू अभिवाचन मंच प्रस्तुत "नूर-ए-अख्तरी" ह्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या, पुण्यातील न्यू इंग्लिश स्कुलच्या सभागृहात सादर झालेल्या शुभारंभाच्या प्रयोगाचं.

ख्यातकीर्त गायिका बेगम अख्तरी ह्यांच्या नाट्यपूर्ण जीवनपटाचं मराठी-हिंदी-ऊर्दू भाषेचा बेमालूम वापर करून केलेलं प्रभावी संहितालेखन, त्याबरोबरीने ती कथा प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोचविणारं अतिशय प्रवाही अभिवाचन आणि त्यावर चढवलेल्या अत्युच्च कसदार गझल-ठुमरी गायकीच्या कोंदणानं आजची संध्याकाळ श्रीमंत झाली.

बेगम अख्तरी हे नाव, आपल्या पिढीच्या बहुतेकांना एक ज्येष्ठ गझल, ठुमरी गायिका म्हणून परिचित असलं , तरी त्यांचं आयुष्य किती दुःखांच्या शिदोरीतून तावून सुलाखून निघालं आणि गायनाच्या अतीव आर्त वेडानंच त्यांना त्यातून सतत कसं तारून नेलं, ह्याचा विलक्षण अनुभव देणारं हे अफलातून रसायन, माझ्यासारख्या अनेक उपस्थित रसिकांच्या मनाला भिडलं .

"नूर-ए-अख्तरी" ह्या संहितेच्या लेखिका गीतांजलीताई जोशी ह्यांचा, हा जीवनपट शब्दांकित करण्यामागचा प्रचंड अभ्यास, संशोधन, आणि त्यापलीकडे त्यांची बेगम अख्तरी ह्या व्यक्तीबद्दल असलेली प्रचंड आत्मीयता आणि भक्ती संहितेच्या प्रत्येक शब्दागणिक उठून दिसत होती.

सहवाचिका दीपाली दातार ह्यांनी वेळोवेळी उत्तम साथ दिलीच. पण आपल्या खर्जातील भारदस्त जादुई आवाजाने, रसपूर्ण शब्दफेकीने आणि हिंदी/ऊर्दू शब्दांचा लहेजा अचूक हेरून, अभिवाचनात विशेष नाट्यमयता आणली ती ह्या कार्यक्रमाचे दिग्दर्शक, सूत्रधार आणि वाचक श्री. अनिरुद्ध दडके ह्यांनी.

त्याबरोबरीने ह्या प्रयोगाच्या यशस्वी आविष्कारामध्ये विशेष उल्लेख करावाच लागेल , तो म्हणजे तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करण्याऱ्या श्रुती विश्वकर्मा-मराठे ह्या तडफदार आणि तयारीच्या गायिकेचा . श्रुती ह्यांनी बेगम साहेबांच्या मधाळ आणि जवारीदार आवाजाची आणि घरंदाज गझल-ठुमरी गायकीची आठवण क्षणोक्षणी करून दिलीच. परंतु उपशास्त्रीय गायकीतील ठेहराव, शब्द समजून घेऊन पल्लेदार हरकती घेताना भावपूर्णता कुठेही हरवणार नाही ह्यांच उत्तम भान ठेवल्यामुळे श्रुती ह्यांनी ह्या कार्यक्रमाला एक विशेष उंची प्राप्त करून दिली, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

उत्तम अभिवाचन आणि गायनाबरोबरच, सुयोग्य ठेका असलेली तबलासाथ , संवादिनीवादकाने गायनामध्ये पेरलेल्या अनुरूप हरकती, आणि गजल-ठुमरीचा प्राण असणाऱ्या आणि हल्ली दुर्मिळ असलेल्या सारंगीवादनाच्या दिलखेचक सुरावटीने, बेगमसाहिबांच्या अनेक उत्तम अजरामर रचना श्रोत्यांच्या मनावर पुन्हा एकदा कोरल्या गेल्या आणि त्यांच्या सुवर्णकाळाच्या साक्षीदार ठरल्या .

इतका उत्कृष्ट कार्यक्रम पाहायला दर्दी रसिकांबरोबरच, ज्येष्ठ पत्रकार , लेखक डॉ. विजय कुवळेकर , सुप्रसिद्ध अभिनेत्री विभावरी देशपांडे, पुण्यातील विशेष मान्यवर व्यक्ती आणि जाणकारांच्या उपस्थितीमुळे आणि अभूतपूर्व प्रतिसादामुळे बेगम अख्तरी ह्यांच्या कलेचा अलौकिक 'नूर' नक्कीच सर्वांच्या हृदयात आनंदाचं चांदणं शिंपडून गेला.

असा वैविध्यपूर्ण प्रायोगिक आविष्कार इतक्या सुंदर रीतीने रंगमंचित केल्याबद्दल ,सेतू अभिवाचन मंच ह्याचं , रसिकांसमोर हा कार्यक्रम प्रस्तुत करण्याचं धाडस केल्याबद्दल रागी इव्हेंट्सच्या ऋचा-सूरज मुळे ह्याचं आणि कार्यक्रमाला पडद्यामागे सक्रीय हातभार लावणाऱ्या सर्वच संस्था-व्यक्ती ह्याचं विशेष कौतुक आणि मनःपूर्वक आभार.

ह्या उपक्रमाचे अधिकाधिक प्रयोग विविध ठिकाणी होवोत आणि ही शब्द-स्वर-लय-भाव-नाट्यपूर्णतेच्या पंचपक्वानांनी नटलेली नवरससंपन्न थाळी, लवकरच जास्तीत जास्त रसिकांना माझ्यासारखीच तृप्त करो, हीच स्नेहमय सदिच्छा.

- ©ओंकार खाडिलकर

Shruti Vishwakarma Marathe
Deepali Patki Datar
Geetanjali Joshi

26/11/2022

एखाद्या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळतो तेव्हा आनंद होतोच पण रसिकांचे आशीर्वाद मिळाले की जास्त आनंद होतो.

नूर - ए - अख्तरी हा कार्यक्रम म्हणता म्हणता उद्यावर येऊन ठेपला आहे. यासाठी आम्ही promotional activity करत होतो. कार्यक्रमाची झलक दाखवण्यासाठी आम्ही 2 videos shoots केले आणि त्यातला एक वापरू असं ठरवलं. पण तो एक झलक असणाऱ्या video ला रसिकांचा आशीर्वाद मिळाला. नेमकं असं झालं, काही जणांचे म्हणजे साधारण 10 ते 15 जणांचे calls, messages किंवा प्रत्यक्ष भेटल्यावर एक suggest करू का असं म्हणून एक suggestion आलं की अजून एखादा झलक असणारा video नक्की बघायला आवडेल. पहिला video फार सुंदर झाला. तसं आम्ही कार्यक्रमाला येत आहोतच पण बघा जमलं तर. कार्यक्रम पुण्याला आहे पण मुंबई हुन देखील खास लोकं यासाठी येत आहेत.

म्हणून खास रसिकांच्या प्रेमाखातर नूर - ए - अख्तरी या कार्यक्रमाची झलक दाखवणारा दुसरा video.

आता हा कार्यक्रम नेमका कसा आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कार्यक्रमाला नक्की या.

रागी इव्हेंट्स आणि सेतू अभिवाचन मंच
यांच्या संयुक्त विद्यमाने

नूर - ए - अख्तरी

दिनांक - 27 नोव्हेंबर 2022

कार्यक्रमाचे ठिकाण - गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल (इंग्रजी माध्यम), टिळक रस्ता, पुणे.

वेळ - संध्याकाळी 5:30 वाजता

देणगी प्रवेशिका मूल्य - 200/-
देणगी प्रवेशिका कार्यक्रमस्थळी उपलब्ध होतील.

फोन बुकिंगसाठी संपर्क -
रागी इव्हेंट्स : 9423766644

23/11/2022

नूर - ए - अख्तरी या कार्यक्रमाची छोटीशी झलक ..

रागी इव्हेंट्स आणि सेतू अभिवाचन मंच
यांच्या संयुक्त विद्यमाने

नूर - ए - अख्तरी

दिनांक - 27 नोव्हेंबर 2022

कार्यक्रमाचे ठिकाण - गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल (इंग्रजी माध्यम), टिळक रस्ता, पुणे.

वेळ - संध्याकाळी 5:30 वाजता

देणगी प्रवेशिका मूल्य - 200/-
देणगी प्रवेशिका कार्यक्रमस्थळी उपलब्ध होतील.

फोन बुकिंगसाठी संपर्क -
रागी इव्हेंट्स : 9423766644

22/11/2022

नूर- ए- अख्तरी कार्यक्रमाला अभिनेत्री विभावरी देशपांडे यांनी देखील रसिकांना कार्यक्रमाला येण्याचे आवाहन केले आहे.

दिनांक - 27 नोव्हेंबर,2022

कार्यक्रमाचे ठिकाण - गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल (इंग्रजी माध्यम), टिळक रस्ता, पुणे.

वेळ - संध्याकाळी 5:30 वाजता

देणगी प्रवेशिका मूल्य - 200/-
देणगी प्रवेशिका कार्यक्रमस्थळी उपलब्ध होतील.

फोन बुकिंगसाठी संपर्क -
रागी इव्हेंट्स : 9423766644

रागी इव्हेंट्स आणि सेतू अभिवाचन मंच यांच्या संयुक्त विद्यमाने  सादर होत आहे -नूर- ए- अख्तरी - बेगम अख्तरRemembering Begu...
22/11/2022

रागी इव्हेंट्स आणि सेतू अभिवाचन मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सादर होत आहे -

नूर- ए- अख्तरी - बेगम अख्तर
Remembering Begum Akhtar

सामान्य मुलगी ते पद्मभूषण बेगम अख्तर हा जीवनप्रवास व त्यांनी गायलेल्या गझल आणि ठुमऱ्या यांचे सादरीकरण.

दिनांक - 27 नोव्हेंबर 2022

कार्यक्रमाचे ठिकाण - गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल (इंग्रजी माध्यम), टिळक रस्ता, पुणे.

वेळ - संध्याकाळी 5:30 वाजता

देणगी प्रवेशिका मूल्य - 200/-
देणगी प्रवेशिका कार्यक्रमस्थळी उपलब्ध होतील.

फोन बुकिंगसाठी संपर्क -
रागी इव्हेंट्स : 9423766644*

कार्यक्रमाला आवर्जून या.

21/11/2022

नूर- ए- अख्तरी कार्यक्रमाला गायक ओमकार खाडिलकर (आशाताई खाडिलकर यांचे सुपुत्र) यांनी देखील रसिकांना कार्यक्रमाला येण्याचे आवाहन केले आहे.

दिनांक - 27 नोव्हेंबर,2022

कार्यक्रमाचे ठिकाण - गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल (इंग्रजी माध्यम), टिळक रस्ता, पुणे.

वेळ - संध्याकाळी 5:30 वाजता

देणगी प्रवेशिका मूल्य - 200/-
देणगी प्रवेशिका कार्यक्रमस्थळी उपलब्ध होतील.

फोन बुकिंगसाठी संपर्क -
रागी इव्हेंट्स : 9423766644

18/11/2022

दिनांक - 27 नोव्हेंबर,2022

कार्यक्रमाचे ठिकाण - गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल (इंग्रजी माध्यम), टिळक रस्ता, पुणे.

वेळ - संध्याकाळी 5:30 वाजता

देणगी प्रवेशिका मूल्य - 200/-
देणगी प्रवेशिका कार्यक्रमस्थळी उपलब्ध होतील.

फोन बुकिंग संपर्क - रागी इव्हेंट्स : 9423766644

16/11/2022

खास तुमच्यासाठी नवीन कार्यक्रम घेऊन येत आहोत. नेमका कार्यक्रम काय आहे जाणून घ्यायचंय ? लवकरच कळेल. 😊

अथर्वशीर्ष मंडळ व परिमल खराडी तथा रागी इव्हेंट्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरेल सुमधुर गाण्यांची मैफिल रंगली आणि त...
23/10/2022

अथर्वशीर्ष मंडळ व परिमल खराडी तथा रागी इव्हेंट्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरेल सुमधुर गाण्यांची मैफिल रंगली आणि त्याचे काही फोटोज.

यावर्षी संयुक्त रित्या कार्यक्रम घेण्याचे हे तिसरे वर्ष. तुमच्या शुभेच्छा अशाच पाठीशी असू द्या.

अथर्वशीर्ष मंडळ व परिमल खराडी तथा रागी इव्हेंट्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने          *सुरेल सुमधुर गाण्यांची मैफिल* ...
22/10/2022

अथर्वशीर्ष मंडळ व परिमल खराडी तथा रागी इव्हेंट्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने

*सुरेल सुमधुर गाण्यांची मैफिल*
*दिवाळी पहाट*

कोव्हिड संकटामुळे गेली दोन वर्ष *दिवाळी पहाट* कार्यक्रम ऑनलाईन झाला होता. या वर्षी मात्र, सुरेल सुमधुर मराठी-हिंदी गाण्यांची पहिली मैफिल खराडी परिसरात आयोजित केली आहे. .

या कार्यक्रमाचा, *दिवाळी फराळासह,* *आस्वाद घ्यायला आपण सहपरिवार यावे* ह्यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण.

दिनांक:- रविवार, २३, ऑक्टोबर
वेळ:- सकाळी ६.३० ते ८

कार्यक्रमाचे स्थान:-
मियो प्लाझो सोसायटी लॉन,
श्रीराम चौक, खराडी, पुणे

*विशेष सूचना:- पाऊस असल्यास कार्यक्रम सोसायटीच्या हॉल मध्ये होईल*

गायक कलाकार - सर्व सुश्री दीप्ती नेने, केतकी देशमुख, डॉ. अनुपमा परदेशी, किरण कुलकर्णी, अंजली जोशी, डॉ. गौरी जोशी, रितू माथूर, श्री शैलेश अरोरा, चि. वेदांत पाटोदकर व चि. मितांश देशमुख

संवादिनी: श्री किशोर माने
तबला: श्री राम भालेकर

आयोजक,

श्री. सुरेश कुलकर्णी. परिमल खराडी, पुणे

सौ. ऋचा सुरज मुळे. रागी इव्हेंट्स, पुणे

सौ. शुभाली चं. कुलकर्णी. अथर्वशिर्ष मंडळ

रागी इव्हेंट्स आयोजित सायबर सिक्युरिटी अवेअरनेस बद्दल *सुरजने* अथश्री मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याख्यान दिलं आणि त्या...
09/10/2022

रागी इव्हेंट्स आयोजित सायबर सिक्युरिटी अवेअरनेस बद्दल *सुरजने* अथश्री मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याख्यान दिलं आणि त्याची आजच्या सकाळ मध्ये आलेली बातमी 😊

रागी इव्हेंट्समार्फत नवरात्रीनिमित्त अथश्री बाणेर  *गरबा आनंद* हा कार्यक्रम घेतला.अथश्री मध्ये माझ्यासोबत तालावर थिरकणाऱ...
04/10/2022

रागी इव्हेंट्समार्फत नवरात्रीनिमित्त अथश्री बाणेर *गरबा आनंद* हा कार्यक्रम घेतला.

अथश्री मध्ये माझ्यासोबत तालावर थिरकणाऱ्या या सगळ्या काकूंच वय म्हणजे कमीत कमी 60 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त पण उत्साह म्हणजे अमाप. तुम्हा सगळ्यांच कौतुक करावं तितकं कमी आहे.😀

यावेळी खास या सगळ्यांना गरबा शिकवायला * Choreographer Amey Marathe* होता. त्यामुळे जास्त मजा आली.

नवरात्रीनिमित्त या खऱ्या देवीचं आणि त्यांचा उत्साहाचं दर्शन झालं 😀

सायबर सिक्युरिटी हा विषय हल्ली फार महत्त्वाचा झाला आहे. त्याची गरज आणि त्याबद्दल सगळ्यांना सजग करण्याची गरज आहे हे जाणून...
01/10/2022

सायबर सिक्युरिटी हा विषय हल्ली फार महत्त्वाचा झाला आहे. त्याची गरज आणि त्याबद्दल सगळ्यांना सजग करण्याची गरज आहे हे जाणून *रागी इव्हेंट्सने* खास ज्येष्ठ नागरिकांसाठी *सायबर सिक्युरिटी अवेअरनेस* हा कार्यक्रम घेतला.

सायबर सिक्युरिटी अवेअरनेस कार्यक्रमात तज्ञ श्री. सुरज मुळे यांनी मार्गदर्शन केले. सुरज मुळे यांची स्वतःची कोडिटिंग (Coditing) नावाची कंपनी आहे.

अथश्री, बाणेर या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला. अनेक प्रश्न यावेळी विचारण्यात आले. सायबर सिक्युरिटी याबद्दल वेगवेगळ्या उदाहरणांमार्फत माहिती देण्यात आली ज्यामुळे अनेक प्रश्नांची उकल सोप्या पद्धतीने केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा भेंडे यांनी केले. मान्यवरांचा सत्कार नामदेव खामिटकर आणि आभारप्रदर्शन प्रकाश पानसे यांनी केले. नागरिकांचा उत्तम प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला.

Address

Pune
411027

Telephone

+919423766644

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raagi Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category


Other Event Planners in Pune

Show All