Dhepe Wada

Dhepe Wada 'Dhepewada' an ideal location for destination wedding, engagement and overnight stay,day tour etc.
(12)

सर्व भारतीयांना ढेपेवाडा परिवारा तर्फे जागतिक वारसा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!आपल्या देशातील विविध राज्यात  अस्तित्वात...
18/04/2024

सर्व भारतीयांना ढेपेवाडा परिवारा तर्फे जागतिक वारसा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आपल्या देशातील विविध राज्यात अस्तित्वात असलेल्या पारंपारिक वास्तुरचनांची नावे ढेपेवाड्याच्या
फोटोखाली दिली आहेत.

26/02/2024

आजच्या तरुणाईला केलेले प्रेमळ आवाहन!!!
संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी युट्युब वर saurabh bhosale show जरूर पाहावा !!!

ढेपेवाडा संकल्पनेबाबत श्री.नितीन व सौ. ऋचा ढेपे यांनी श्री.सौरभ भोसले यांना अत्यंत मोकळेपणाने  दिलेली मुलाखत जरूर पहा!!!
08/02/2024

ढेपेवाडा संकल्पनेबाबत श्री.नितीन व सौ. ऋचा ढेपे यांनी श्री.सौरभ भोसले यांना अत्यंत मोकळेपणाने दिलेली मुलाखत जरूर पहा!!!

Release Date: February 6, 2024 on Our Official YouTube Channel.ढेपेवाडा नुसता पाहण्यासाठी उपलब्ध नाही , बुकिंग करून येणाऱ्या लोकांनाच इथे प्रवेश दिला ज....

नवव्या वाढदिवसातही नवलाई टिकवून ठेवलेली वास्तू , ढेपेवाडा !!!फ्लॅट संस्कृतीच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन ठामपणे उभे राहत लोका...
18/12/2023

नवव्या वाढदिवसातही नवलाई टिकवून ठेवलेली वास्तू , ढेपेवाडा !!!

फ्लॅट संस्कृतीच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन ठामपणे उभे राहत लोकांना वाडा संस्कृतीची पुन्हा नव्याने ओळख करून देणाऱ्या ढेपे वाड्याच्या वास्तूला आज नऊ वर्षे पूर्ण झाली!!!

नव्याची नवलाई ओसरल्यानंतर कुठल्याही गोष्टींचे नवे पण टिकणं ही तशी अवघड गोष्ट असते किंवा ते नवेपण टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.

ढेपेवाड्याच्या वास्तुबाबत मात्र तसं काही घडलेलं नाही, उलट नऊ वर्षानंतरही उत्तरोत्तर या वास्तूची नवलाई फक्त टिकूनच राहिली नाहीये तर ती जोमाने वाढते आहे.

ढेपेवाड्याच्या वास्तू बाबत आजही आधीच्या एवढीच किंबहुना त्यापेक्षा थोडी जास्तच क्रेझ लोकांच्या विशेषतः तरुणाईच्या मनात आहे ही आनंदाची बाब आहे.

भारतीय संस्कृतीतील पारंपरिक वास्तूरचनांचा वारसा पुढे नेण्याचे आणि त्या वारशाची समृद्धी दाखवून देण्याचे काम ढेपेवाड्याची वास्तु करत आहे आणि पुढील अनेक वर्षे, अनेक पिढ्यांपर्यंत नेण्याचे काम करत राहील. अर्थातच हे काम ढेपेवाड्याच्या वास्तुला अत्यंत मायेने सांभाळणाऱ्या ढेपेवाडा परिवारातील सर्व सहकाऱ्यांच्या साथीने आणि
तुम्हा सर्वांसह आमच्या आप्तांच्या, अतिथींच्या, मित्रांच्या आशिर्वादाने निश्चित पुढे जाईल आणि या वास्तूचे सौंदर्य यापुढील अनेक वर्ष असेच खुलत राहील याची खात्री वाटते !!!

नितीन ,सौ ऋचा ढेपे

ढेपेवाडा परिवार.

हि दिपावली आपणास व आपल्या परिवारास सुखसमृद्धीची , आनंददायी, यशदायी व आरोग्यवर्धक जावो !!!उनसावल्या येतील जातीलकोंब जपावे...
10/11/2023

हि दिपावली आपणास व आपल्या परिवारास सुखसमृद्धीची , आनंददायी, यशदायी व आरोग्यवर्धक जावो !!!

उनसावल्या येतील जातील
कोंब जपावे आतील हिरवे,
चला दिवाळी आली आहे,
ओंजळीत घ्या चार दिवे!

पहिला लावा थेट मनातच
तरच राहील दुसरा तेवत,
घरात आणि प्रियजनांच्या
आयुष्यावर प्रकाश बरसत!

तिसरा असुदे इथे अंगणी
प्रकाश आल्यागेल्यानाही,
चौथा लावा अशा ठिकाणी
जिथे दिवाळी माहीत नाही!


🍃🌹श्री नितिन ,सौ ऋचा ढेपे आणि ढेपेवाडा परिवारातर्फे तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🍃🌹

ढेपेवाड्यात आदल्या रात्री वास्तव्यास येऊन आपल्या कुटुंबातील लग्न ,मुंज तसंच दिवसभरासाठी येऊन साखरपुडा , दिवाळसण , राखी, ...
21/10/2023

ढेपेवाड्यात आदल्या रात्री वास्तव्यास येऊन आपल्या कुटुंबातील लग्न ,मुंज तसंच दिवसभरासाठी येऊन साखरपुडा , दिवाळसण , राखी, मंगळागौर, इत्यादी शुभकार्ये पारंपरिक पध्दतीने साजरी करा !!!
आरक्षणासाठी संपर्क :-
9822640599,9763276232

अधिक माहितीसाठी www.dhepewada.com ह्या वेबसाईटला भेट द्यावी.

Youtube व Instagram वर dhepewada सर्च करून विविध व्हिडीओ देखील नक्की पहा

Google वर शोधल्यास अधिक माहिती मिळू शकेल.

स्मृतिगंध... भारतीय पारंपारिक शुभकार्यांचा !!!

स्मृतिगंध... भारतीय पारंपारिक सणांचा !!!

स्मृतिगंध... वाड्याच्या वास्तूमधील कार्ये आणि सणांचा !!!

आपला,
ढेपेवाडा परिवार
[email protected]

ढेपेवाड्यात ' सुभेदार ' हा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील चित्रपटाचा काही भाग चित्रित झाला आहे. दिग्दर्शक दिग्पा...
24/08/2023

ढेपेवाड्यात ' सुभेदार ' हा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील चित्रपटाचा काही भाग चित्रित झाला आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अत्यंत कष्टाने आणि चिकाटीने हा चित्रपट साकारला असून त्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. 💐💐

चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट
जरूर पहावा ही सर्व मित्रांना विनंती🙏
Trailer

अखेर निसटे शिवहस्तांतुनि तीरचि तान्हाजीप्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी.. सादर करत आहोत....सुभेदार लघुदर्शन ( ट्रे...

'वाडा' भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील महत्त्वाचे पान !!!महाराष्ट्रातील 'वाडा ', गुजरात ,राजस्थान, मध्य प्रदेश तसेच उ...
15/08/2023

'वाडा' भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील महत्त्वाचे पान !!!

महाराष्ट्रातील 'वाडा ', गुजरात ,राजस्थान, मध्य प्रदेश तसेच उत्तरेकडील राज्यांमधील 'हवेली' पश्चिम बंगालमधील 'राजबारी' दक्षिणेकडील वीड , थरवाड, मांडुवा लोगीस ह्या अत्यंत अल्प प्रमाणात शिल्लक राहिलेल्या आपल्या पारंपारिक भारतीय वास्तूरचना भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या इतिहासाच्या सर्वात मोठ्या साक्षीदार आहेत !

या वास्तूंनी फक्त भारतीय स्वातंत्र्य अनुभवलं आहे असं नाही तर स्वातंत्र पूर्व काळ म्हणजेच पारतंत्र देखील अनुभवलं आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक क्रांतिकारकांचे वास्तव्य या वास्तूंनी अनुभवले आहे. क्रांतिकारकांच्या चळवळींचे त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांचे साक्षीदार ह्या पारंपारिक वास्तू आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वसामान्य माणसांची होत असलेली घुसमट त्यांच्यावर होणारे अन्याय आणि त्यातून सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेली प्रखर राष्ट्रभक्ती देखील त्यांनी अनुभवली आहे. त्या प्रखर राष्ट्रभक्तीमुळे निर्माण झालेल्या जनरेट्यामुळे मिळालेल्या स्वातंत्र्याच्या उगवणाऱ्या सूर्याची किरणे या वास्तुंनी स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळवली आहेत.

स्वातंत्र्योत्तर काळातल्या भारतीय कला, संस्कृती व सात्विक राहणीमान बहरतानाच्या सुवर्णकाळाची अनुभूती या वास्तूंनी घेतली आहे.

ग्लोबलायझेशन नंतर मात्र स्वतःच्या 'पडत्या ' 😞 काळात या वास्तूं मधील राहणीमान व एकत्र कुटुंब पद्धती लयाला जाण्याचे दुःख देखिल या वास्तुंनी पचवले आहे.

भौतिक प्रगतीचा मार्ग चोखळताना मात्र भारतीयांकडून या पारंपरिक वास्तुरचनांकडे दुर्लक्ष झाले आणि आता तर ह्या वास्तु नामशेष होण्याकडे वाटचाल सुरू आहे.

भारतीय स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष ह्या वास्तु पाहू शकतील की नाही अशी आज परिस्थिती आहे.
पण ते काही असलं तरी या वास्तूरचनांचा वारसा सांगणारा 'ढेपेवाडा' मात्र शताब्दी वर्ष नक्की पाहिल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू कारण मला पूर्ण खात्री आहे आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या दीडशेव्या वर्षी पर्यंत भारतीय संस्कृतीतील या पारंपरिक वास्तूरचना पुन्हा उभारल्या जातील आणि त्यात पूर्वीप्रमाणेच बालगोपाळांची किलबिल आणि थोरामोठ्यांचं एकत्र राहणं अनुभवायला मिळेल!!!

नितीन ढेपे
[email protected]
www.dhepewada.com

ढेपेवाड्यात रात्रीच्या मुक्कामासाठी किंवा दिवसभराच्या सहलीसाठी तसेच लग्न , साखरपुडा,मुंज, बारसं , वाढदिवस इत्यादी  समारं...
05/08/2023

ढेपेवाड्यात रात्रीच्या मुक्कामासाठी किंवा दिवसभराच्या सहलीसाठी तसेच लग्न , साखरपुडा,मुंज, बारसं , वाढदिवस इत्यादी समारंभ पारंपारिक पद्धतीने साजरे करण्यासाठी जरूर या !!! अधिक माहितीसाठी 9822640599 या क्रमांकाशी संपर्क
साधावा.

27/06/2023

रात्रीच्या मुक्कामात किंवा दिवसभराच्या सहलीत पाऊस अनुभवण्यासाठी ढेपेवाड्यात या !!! अधिक माहितीसाठी 9822640599 या क्रमांकाशी संपर्क
साधावा.

'Excellent concept about preserving and promoting  Indian culture' या पुरस्काराने ढेपेवाड्याच्या वास्तूला 'लोकमत' वृत्तप...
31/05/2023

'Excellent concept about preserving and promoting Indian culture' या पुरस्काराने
ढेपेवाड्याच्या वास्तूला 'लोकमत' वृत्तपत्र समूहाच्या वतीने दुबई येथे झालेल्या इंटरनॅशनल अवॉर्ड्सच्या सोहळ्यात सांस्कृतिक मंत्री सुधीरजी मुनगंटीवार, लोकमत समूहाचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी दर्डा , सुप्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरूचा, दुबई स्थित शेख अब्दुल रेहमान यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

भारतीय कला,संस्कृती, पारंपारिक वास्तूरचना तसेच त्यातील राहणीमानाचा समृद्ध वारसा जपणाऱ्या आणि त्या संकल्पनेबद्दल भारत सरकारकडून बौद्धिक स्वामित्व हक्क (IP rights) प्राप्त झालेल्या ढेपेवाड्याच्या वास्तूला मिळालेला हा पुरस्कार आम्ही गेल्या 30-40 वर्षात वेगाने
लयाला गेलेल्या 'हवेली, विड ,थरवाड, मांडूवा लोगीस, राजबारी आणि वाडा ' ह्या पारंपरिक भारतीय वास्तूरचनांना तसेच त्यात एकत्र कुटुंब पद्धतीने नांदलेल्या अनेक पिढ्यांना समर्पित केला.

ढेपेवाड्याच्या या यशात तुम्हा सर्वांसह , आमचे हजारो अतिथी तसंच ढेपेवाडा अत्यंत प्रेमाने उभारण्याऱ्या आणि अत्यंत मायेने
सांभाळण्याऱ्या अनेक मोलाच्या हातांचा वाटा आहे. तुम्हा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

नितिन व सौ. ऋचा ढेपे आणि ढेपेवाडा परिवार.

साप्ताहिक सकाळ विशेषांकातील लेख, जरूर वाचा !!!
07/02/2023

साप्ताहिक सकाळ विशेषांकातील लेख, जरूर वाचा !!!

वाड्यातील नाटक प्रत्यक्ष वाड्यातच अनुभवा!!! श्री प्रदीप वैद्य  निर्मित, दिग्दर्शित 'काजव्यांचा गाव' ह्या नाटकाचा शंभरावा...
03/02/2023

वाड्यातील नाटक प्रत्यक्ष वाड्यातच अनुभवा!!! श्री प्रदीप वैद्य निर्मित, दिग्दर्शित 'काजव्यांचा गाव' ह्या नाटकाचा शंभरावा प्रयोग व इतर कार्यक्रम एका अनोख्या पद्धतीने १८,१९ फेब्रुवारी रोजी ढेपेवाड्यात सादर होणार आहे, एका वेगळ्या अनुभवासाठी जरूर यावे!
कार्यक्रमाचा दर :-

१८ फेब्रुवारी :-
१ नाटक + १ अभिवाचन + चहापान + भोजन = १४०० ₹+५%GST

१९ फेब्रुवारी
ब्रेकफास्ट + १ अभिवाचन + भोजन + चहापान= १४०० ₹+५%GST

बुकिंग साठी संपर्क :- 9822640599

आज ढेपेवाड्याचा अनंत आठवणींचा आठवा वाढदिवस !!! होय वाढदिवसच! वर्धापन दिन नव्हे! कारण ढेपेवाडा ही वास्तू  सजीव असल्याचेच ...
20/12/2022

आज ढेपेवाड्याचा अनंत आठवणींचा आठवा वाढदिवस !!!
होय वाढदिवसच! वर्धापन दिन नव्हे! कारण ढेपेवाडा ही वास्तू सजीव असल्याचेच आम्ही मानतो. आजवर फक्त आमच्याच नव्हे तर ईथे येणाऱ्या अतिथींच्या देखील सुखदुःखात सामील होणारी ही वास्तू आहे!

इथे साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक कार्यात अत्यंत सकारात्मकतेने ती रंग भरते.

लग्नकार्यात वऱ्हाडींच्या स्वागतास अतिशय नटून थटून आणि अत्यंत प्रसन्नपणे ही सज्ज असते आणि तितकीच नववधूच्या पाठवणीच्या क्षणाच्या वेळी तिच्या माहेरच्या लोकांच्या दुःखात देखील ती सहभागी असते.

आपल्या समृद्ध भारतीय संस्कृतीचा वारसा जपत असल्याचा आनंद व अभिमान तर तिला आहेच परंतु त्यापेक्षा जास्त आनंद व अभिमान आजची तरुण पिढी तिच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होते आहे याचा आहे. कारण ज्या साठी केला होता अट्टाहास तो सफल होताना तिला उघड्या डोळ्यांनी दिसत आहे.

माणसांची सारखी वर्दळ असून देखिल ती कधी थकल्या सारखी दिसत नाही उलट येणाऱ्या अतिथींचे अधिक जोमाने,आनंदाने आदरातिथ्य करण्यासाठी सज्ज असते.

मला वाटतं भारतीय संस्कृतीतील पारंपरिक वास्तूरचनांची देखिल ही खासियतच होती आणि तोच वारसा पुढे नेण्याचे आणि त्या वारशाची समृद्धी दाखवून देण्याचे काम ढेपेवाड्याची वास्तु करत आहे आणि पुढील अनेक वर्षे, अनेक पिढ्यांपर्यंत नेण्याचे काम करत राहील.

अर्थातच हे काम ढेपेवाड्याच्या वास्तुला अत्यंत मायेने सांभाळणाऱ्या ढेपेवाडा परिवारातील सर्व सहकाऱ्यांच्या साथीने आणि आमच्या आप्तांच्या, अतिथींच्या, मित्रांच्या आशिर्वादाने निश्चित पुढे जाईल आणि या वास्तूचे सौंदर्य यापुढील अनेक वर्ष असेच खुलत राहील याची खात्री वाटते !!!

नितीन ,सौ ऋचा ढेपे

ढेपेवाडा परिवार.

'वाडा' भारतीय स्वातंत्र्याचा सर्वात जुना साक्षीदार!!!महाराष्ट्रातील 'वाडा ', गुजरात ,राजस्थान, मध्य प्रदेश तसेच उत्तरेकड...
13/08/2022

'वाडा' भारतीय स्वातंत्र्याचा सर्वात जुना साक्षीदार!!!
महाराष्ट्रातील 'वाडा ', गुजरात ,राजस्थान, मध्य प्रदेश तसेच उत्तरेकडील राज्यांमधील 'हवेली' पश्चिम बंगालमधील 'राजबारी' दक्षिणेकडील वीड , थरवाड, मांडुवा लोगीस ह्या अत्यंत अल्प प्रमाणात शिल्लक राहिलेल्या आपल्या पारंपारिक भारतीय वास्तूरचना भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या इतिहासाच्या सर्वात मोठ्या साक्षीदार आहेत !

या वास्तूंनी फक्त भारतीय स्वातंत्र्य अनुभवलं आहे असं नाही तर स्वातंत्र पूर्व काळ म्हणजेच पारतंत्र देखील अनुभवलं आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक क्रांतिकारकांचे वास्तव्य या वास्तूंनी अनुभवले आहे. क्रांतिकारकांच्या चळवळींचे त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांचे साक्षीदार ह्या पारंपारिक वास्तू आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वसामान्य माणसांची होत असलेली घुसमट त्यांच्यावर होणारे अन्याय आणि त्यातून सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेली प्रखर राष्ट्रभक्ती देखील त्यांनी अनुभवली आहे. त्या प्रखर राष्ट्रभक्तीमुळे निर्माण झालेल्या जनरेट्यामुळे मिळालेल्या स्वातंत्र्याच्या उगवणाऱ्या सूर्याची किरणे या वास्तुंनी स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळवली आहेत.

स्वातंत्र्योत्तर काळातल्या भारतीय कला, संस्कृती व सात्विक राहणीमान बहरतानाच्या सुवर्णकाळाची अनुभूती या वास्तूंनी घेतली आहे.

ग्लोबलायझेशन नंतर मात्र स्वतःच्या 'पडत्या ' 😞 काळात या वास्तूं मधील राहणीमान व एकत्र कुटुंब पद्धती लयाला जाण्याचे दुःख देखिल या वास्तुंनी पचवले आहे.

भौतिक प्रगतीचा मार्ग चोखळताना मात्र भारतीयांकडून या पारंपरिक वास्तुरचनांकडे दुर्लक्ष झाले आणि आता तर ह्या वास्तु नामशेष होण्याकडे वाटचाल सुरू आहे.

भारतीय स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष ह्या वास्तु पाहू शकतील की नाही अशी आज परिस्थिती आहे.
पण ते काही असलं तरी या वास्तूरचनांचा वारसा सांगणारा 'ढेपेवाडा' मात्र शताब्दी वर्ष नक्की पाहिल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू कारण मला पूर्ण खात्री आहे आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या दीडशेव्या वर्षी पर्यंत भारतीय संस्कृतीतील या पारंपरिक वास्तूरचना पुन्हा उभारल्या जातील आणि त्यात पूर्वीप्रमाणेच बालगोपाळांची किलबिल आणि थोरामोठ्यांचं एकत्र राहणं अनुभवायला मिळेल!!!

नितीन ढेपे
[email protected]
www.dhepewada.com

ढेपेवाड्यात आदल्या रात्री वास्तव्यास येऊन आपल्या कुटुंबातील लग्न ,मुंज तसंच दिवसभरासाठी येऊन साखरपुडा , दिवाळसण , राखी, ...
02/07/2022

ढेपेवाड्यात आदल्या रात्री वास्तव्यास येऊन आपल्या कुटुंबातील लग्न ,मुंज तसंच दिवसभरासाठी येऊन साखरपुडा , दिवाळसण , राखी, मंगळागौर, इत्यादी शुभकार्ये पारंपरिक पध्दतीने साजरी करा !!!

आरक्षणासाठी संपर्क :-
9822640599,9763276232

अधिक माहितीसाठी www.dhepewada.com ह्या वेबसाईटला भेट द्यावी.

Youtube वरील https://youtu.be/mZYUGiCmGxU
ह्या लिंकवर जाऊन इतर व्हिडीओ देखील नक्की पहा

Google वर dhepewada शोधल्यास अधिक माहिती मिळू शकेल.

स्मृतिगंध... भारतीय पारंपारिक शुभकार्यांचा !!!

स्मृतिगंध... भारतीय पारंपारिक सणांचा !!!

स्मृतिगंध... वाड्याच्या वास्तूमधील कार्ये आणि सणांचा !!!

आपला,
ढेपेवाडा परिवार

20 लाख views !!! Nandi sisters ह्या नावाने सुप्रसिद्ध असलेल्या अंतरा व अंकिता ह्या भगिनींनी ढेपेवाड्यात चित्रित केलेल्या...
28/06/2022

20 लाख views !!! Nandi sisters ह्या नावाने सुप्रसिद्ध असलेल्या अंतरा व अंकिता ह्या भगिनींनी ढेपेवाड्यात चित्रित केलेल्या ' जुग जुग जीवे ललन वा 'https://youtu.be/Gh7BQnmZNoI ह्या भक्ती गीताला जगभरातून 20 लाख views मिळाले आहेत तुम्ही देखील बघावे.

Jug Jug Jiwe Lalanwa (Teaser) | Nandy Sisters | Antara Nandy, Ankita Nandy | New Shree Ram Bhajan Singer: Antara Nandy & Ankita Nandy (Nandy Sisters)Music Di...

ढेपेवाड्यासाठी सेल्स व मार्केटिंग संभाळणारा अनुभवी उमेदवार पाहिजे.  किमान पाच वर्षाचा अनुभव व इंग्रजीचे ज्ञान आवश्यक ! भ...
30/05/2022

ढेपेवाड्यासाठी सेल्स व मार्केटिंग संभाळणारा अनुभवी उमेदवार पाहिजे. किमान पाच वर्षाचा अनुभव व इंग्रजीचे ज्ञान आवश्यक !

भेटा 9075009212

सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी नुकताच ढेपेवाड्यासंबंधी एक सुंदर vlog चित्रित केला आहे, https://youtu.be/hkCiccAh...
25/05/2022

सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी नुकताच ढेपेवाड्यासंबंधी एक सुंदर vlog चित्रित केला आहे, https://youtu.be/hkCiccAhsEg ह्या link वर तो सर्वांनी जरूर जरूर पहावा व आवडल्यास आपल्या मित्रांनाही पाहण्यास सांगावा ही विनंती.

For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: [email protected]ढेपेवाडा Location : https://maps.app.goo.gl/...

गुढी संस्कृतीची !गुढी चांगल्या परंपरांची !या शुभदिनाच्या निमित्ताने„तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना "मंगलमय" शुभेच्छा🚩🚩ढ...
02/04/2022

गुढी संस्कृतीची !
गुढी चांगल्या परंपरांची !

या शुभदिनाच्या निमित्ताने„
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना "मंगलमय" शुभेच्छा🚩🚩

ढेपेवाड्यातील गुढीपूजन सुप्रसिद्ध तारका सोनाली कुलकर्णीकडून !!!

25/03/2022
सुप्रसिद्ध गायक जोडी रोहीत राऊत आणि जुईली जोगळेकर ह्यांनी ढेपेवाड्यात पारंपरिक पद्धतीने बांधली लग्नगाठ !!! लग्नाला सिद्ध...
05/02/2022

सुप्रसिद्ध गायक जोडी रोहीत राऊत आणि जुईली जोगळेकर ह्यांनी ढेपेवाड्यात पारंपरिक पद्धतीने बांधली लग्नगाठ !!! लग्नाला सिद्धार्थ व मिताली चांदेकर तसंच सर्व little champs सह मराठी सिनेसृष्टीतील अनेक स्टार्सनी लावली उपस्थिती !

ढेपेवाड्याची वास्तु आज जरा जास्तच प्रसन्न दिसते आहे कारण आज तिचा सातवा वाढदिवस आहे!!!तसं पाहिलं तर गेल्या काही वर्षांपास...
19/12/2021

ढेपेवाड्याची वास्तु आज जरा जास्तच प्रसन्न दिसते आहे कारण आज तिचा सातवा वाढदिवस आहे!!!

तसं पाहिलं तर गेल्या काही वर्षांपासून पासून ढेपेवाड्यामधली सकारात्मक ऊर्जा अजून वाढल्याचे जाणवते आहे आणि त्याची अनुभूती फक्त आम्हालाच नव्हे तर इथे येणाऱ्या कित्येक अतिथींना येते. खरंतर तिने देखील या सात वर्षात अनेक चढ-उतार बघितले आहेत पण तरीही त्याच्या कुठल्याही खुणा तिने आपल्या अंगावर ठेवलेल्या नाहीत.

तिच्यातल्या जिवंतपणाचा मागोवा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे तिच्या सहवासात आलेली माणसं ही सकारात्मक उर्जा घेऊन येतात.

ह्या वास्तूमध्ये अनेक जोडपी लग्नगाठ बांधत त्यांच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात करतात वाढदिवस, मुंज साखरपुडा डोहाळजेवण दिवाळसण इत्यादी अनेक कार्यक्रमांत द्वारे अनेक अतिथी खूप चांगले स्मृतीगंध इथे ठेवून जातात.

ह्या वास्तूमध्ये अनेक दिग्गज गायकांचे सप्तसूर घुमतात आणि त्या सुरांचे निनाद इथेच वास्तव्य करतात.

ह्या वास्तूच्या कुशीत अनेक तरुण, लहान मुलं,वयोवृद्ध माणसं आपल्या पारंपारिक वास्तु रचनेचीआणि त्यातील रहाणीमानाची अनुभूती घेत पहुडतात.

ह्या वास्तूमध्ये अनेक दिग्गज कलाकार,राजकीय , सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती , अनेक मोठे व्यावसायिक आपलं स्वत्व विसरतात.

या सर्व माणसांची सारखी वर्दळ असून देखिल ती कधी थकल्या सारखी दिसत नाही उलट येणाऱ्या अतिथींचे अधिक जोमाने,आनंदाने आदरातिथ्य करण्यासाठी सज्ज असते.

मला वाटतं भारतीय संस्कृतीतील पारंपरिक वास्तूरचनांची देखिल ही खासियतच होती आणि तोच वारसा पुढे नेण्याचे आणि त्या वारशाची समृद्धी दाखवून देण्याचे काम ढेपेवाड्याची वास्तु करत आहे आणि पुढील अनेक वर्षे, अनेक पिढ्यांपर्यंत नेण्याचे काम करत राहील.

अर्थातच हे काम ढेपेवाड्याच्या वास्तुला अत्यंत मायेने संभाळणाऱ्या ढेपेवाडा परिवारातील सर्व सहकाऱ्यांच्या साथीने आणि आमच्या आप्तांच्या, अतिथींच्या, मित्रांच्या आशिर्वादाने निश्चित पुढे जाईल आणि या वास्तूचे सौंदर्य यापुढील अनेक वर्ष असेच खुलत राहील याची खात्री वाटते !!!

नितीन ,सौ ऋचा ढेपे

ढेपेवाडा परिवार.

उनसावल्या येतील जातीलकोंब जपावे आतील हिरवे,चला दिवाळी आली आहे,ओंजळीत घ्या चार दिवे!पहिला लावा थेट मनातचतरच राहील दुसरा त...
01/11/2021

उनसावल्या येतील जातील
कोंब जपावे आतील हिरवे,
चला दिवाळी आली आहे,
ओंजळीत घ्या चार दिवे!

पहिला लावा थेट मनातच
तरच राहील दुसरा तेवत,
घरात आणि प्रियजनांच्या
आयुष्यावर प्रकाश बरसत!

तिसरा असुदे इथे अंगणी
प्रकाश आल्यागेल्यानाही,
चौथा लावा अशा ठिकाणी
जिथे दिवाळी माहीत नाही!!!

🍃🌹श्री नितिन ,सौ ऋचा ढेपे आणि ढेपेवाडा परिवारातर्फे तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🍃🌹

10/10/2021

ढेपेवाड्याची आहे निराळीच स्टोरी,
आणि जिथे स्टोरी तिथे पार्ले मारी !!!
ढेपेवाडयात चित्रीत झालेली पार्ले बिस्कीट कंपनीची जाहिरात जरूर पहा !

नाशिकच्या श्री.विशाल फड ह्यांनीह्या वर्षी " ढेपेवाड्याची " पारंपरिक आरास फडांचा राजा" (वर्ष 23 वे)साठी साकार केली आहे. न...
19/09/2021

नाशिकच्या श्री.विशाल फड ह्यांनी
ह्या वर्षी " ढेपेवाड्याची " पारंपरिक आरास फडांचा राजा" (वर्ष 23 वे)
साठी साकार केली आहे.

नव्या पिढीला आपली वाडा संस्कृती आणि त्यातील राहणीमान कळावे हा ढेपेवाड्याचा जो उद्देश आहे त्याच उद्देशाने श्री विशाल फड यांनी ढेपेवाड्याची अगदी हुबेहूब आणि मोहक प्रतिकृती साकारली त्याबद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद!💐

श्री. विशाल फड ह्यांच्या ह्या छोट्या ढेपेवाड्याची दखल ABP माझा , झी 24 तास, लोकमत, पुण्यनगरी, दिव्य मराठी, आपलं महानगर, सन्मान News, नाशिक News , 9 News ह्या सर्वांनी घेतली त्याबद्दल त्यांचे खूप अभिनंदन💐💐

Youtube Video link :
https://youtu.be/DV93Vv4z5SE

Address

2 Yogeshwari Society, Erandwane
Pune

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 5pm

Telephone

9822640599

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhepe Wada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dhepe Wada:

Videos

Share


Other Pune event planning services

Show All