26/10/2022
दिवाळीच्या बालपणातील आठवणी म्हणताच आठवतात ते दिवस, ज्या दिवसात शाळेच्या सहामाही परीक्षा संपण्याची वाट यासाठी पाहायचो की सुट्टी लागताच मामाच्या गावाला जायचे असायचे, दिवाळीची खरेदी करायची असायची, पणत्या रंगवायच्या असायच्या, सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त आणि फक्त खेळणे,गप्पा-गोष्टी, भटकणे, मातीत रमून जाऊन किल्ले तयार करणे, त्या किल्ल्यांवर महाराजांची छोटीशी मूर्ती ठेवणे...मावळे उभे करणे, गड सर करण्याचे खेळ खेळणे, भातुकलीचा खेळ मांडणे, आणि संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेस रांगोळ्या काढून, पणत्या लावून, फटाके उडवून उद्याच्या दिवसाची आणि मजा मस्तीची वाट पाहणे.
या सगळ्यात आपले साथीदार असतात ती आपली भावंडं... ह्याच बहीण भावांच्या नात्याच्या सोहळ्याच्या म्हणजेच
भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
Order online | Call us on +91 788 788 8247