Suparna Mangal

Suparna Mangal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Suparna Mangal, Wedding Venue, Aranyeshwar chowk, near RUTURANG Soc. Beside H. D. F. C. Bank, Pune.
(23)

24/03/2024
सन्माननीय ग्राहक, आप्तेष्ट आणि सुहृद मंडळी यांस सस्नेह नमस्कार. 🙏🏻वसुबारसेने आज तेजोमय दीपावली सणाची सुरुवात होताना आपणा...
09/11/2023

सन्माननीय ग्राहक, आप्तेष्ट आणि सुहृद मंडळी यांस सस्नेह नमस्कार. 🙏🏻
वसुबारसेने आज तेजोमय दीपावली सणाची सुरुवात होताना आपणास आणि कुटुंबियांस त्रिविक्रम उद्योग, जोशी-गोखले परिवाराकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!🪔

मान्यवर ग्राहक, सप्रेम नमस्कार.'दीपावली आनंदोत्सव: स्वरुची भोजन' या त्रिविक्रम उद्योग आयोजित उपक्रमास आपण नेहमीच आपुलकीन...
27/10/2023

मान्यवर ग्राहक, सप्रेम नमस्कार.

'दीपावली आनंदोत्सव: स्वरुची भोजन' या त्रिविक्रम उद्योग आयोजित उपक्रमास आपण नेहमीच आपुलकीने प्रतिसाद देऊन दाद देत आला आहात. आपल्या सर्वांच्या ह्या जिव्हाळ्याच्या उपक्रमाचे यंदा सातवे वर्ष!
नात्यांचा गोडवा जपणारा हा स्वरुची भोजन दीपावली आनंदोत्सव यंदा पाडव्याच्या दिवशी म्हणजे मंगळवार, दि. १४ नोव्हेंबर २०२३ आणि भाऊबीजेच्या दिवशी म्हणजे बुधवार, दि. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी आपल्या आवडत्या सुपर्ण सभागृहामध्ये संपन्न होत आहे.

सोबत स्वरुची भोजनाचा मेनू आपल्याला कळवत आहोतच. दि. १ नोव्हेंबर २०२३ पासून नावनोंदणीही सुरू होत आहे. नेहमीप्रमाणे लवकरात लवकर आरक्षण प्रक्रिया पूर्ण करू आणि सुग्रास व सात्विक भोजनाचा आस्वाद घेत दीपावली पाडवा-भाऊबीज आपल्या सुहृदांसह उत्साहाने साजरी करू.

आपले स्वागतोत्सुक,
जोशी-गोखले परिवार, त्रिविक्रम उद्योग.
सुपर्ण सभागृह, अरण्येश्वर, पुणे.

नमस्कार.शनिवार दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी महालक्ष्मी पूजन आणि घागरी फुंकणे दरवर्षीप्रमाणे सुपर्ण सभागृह, अरण्येश्वर येथे स...
21/10/2023

नमस्कार.
शनिवार दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी महालक्ष्मी पूजन आणि घागरी फुंकणे दरवर्षीप्रमाणे सुपर्ण सभागृह, अरण्येश्वर येथे संपन्न होत आहे. दर्शनाची वेळ संध्याकाळी ७:०० पासून आहे. आपण सहकुटुंब दर्शनाला यावे.🙏🏻🌸
धन्यवाद.
जोशी-गोखले परिवार, त्रिविक्रम उद्योग.🌸

06/10/2023
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा – सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...
19/09/2023

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा – सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
गणपती बाप्पा मोरया 🌸

!!पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय!! 👏👏
29/06/2023

!!पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय!! 👏👏

04/11/2022

Gautam Golande PhotographyPUNE,MAHARASHTRA.Photography | Cinematography CONTACT & WHATSAPP : +91 9175520785

*दीपावली आनंदोत्सव २०२२*सुपर्ण सभागृह, अरणेश्वर, पुणे येथे दरवर्षी दीपावली आनंदोत्सव संपन्न होत असतो. या दीपावली आनंदोत्...
04/11/2022

*दीपावली आनंदोत्सव २०२२*
सुपर्ण सभागृह, अरणेश्वर, पुणे येथे दरवर्षी दीपावली आनंदोत्सव संपन्न होत असतो. या दीपावली आनंदोत्सवाचे यंदा सहावे वर्ष अधिकच उत्साहात साजरे झाले.
सहा वर्षांपूर्वी या अनोख्या उपक्रमाचा विचार करताना मुख्यतः गृहलक्ष्मींच्या गरजांचा विचार केला गेला. नोकरी, व्यवसाय सांभाळत दिवाळीची तयारी करता-करता सगळेच आणि मुख्यत्वे गृहलक्ष्मी खरोखर दमतात आणि तेव्हाच दीपावली पाडवा, भाऊबीज हे नाती जपणारे सण आनंदाने व स्वस्थतेने साजरे करण्याचीही सगळ्यांचीच मनापासून इच्छा असते.
सुपर्ण सभागृहाच्या दीपावली आनंदोत्सवामध्ये औक्षणापासून ते छायाचित्रे काढण्यासाठी सुंदर background पर्यंत आणि बासरीच्या सुरांच्या साथीत आप्तेष्टांसहीत सुग्रास भोजन घेण्यासाठी खास आपल्या कुटुंबासाठी reserve केलेले table अशा बरकाव्याने केलेल्या जय्यत तयारीनीशी सभागृह आपल्या स्वागतासाठी सज्ज असते. यंदाच्या आनंदोत्सवाची झलक बघण्यासाठी सोबत video पाठवत आहे.
पुढील नावीन्यपूर्ण उपक्रमांना आपण असाच उत्तम प्रतिसाद द्याल याची खात्री आहे. आपल्या या स्नेहशील प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.
जोशी-गोखले परिवार
सुपर्ण सभागृह, त्रिविक्रम उद्योग.

Gautam Golande PhotographyPUNE,MAHARASHTRA.Photography | Cinematography CONTACT & WHATSAPP : +91 9175520785

सन्माननीय ग्राहक, सप्रेम नमस्कार.सुपर्ण सभागृहामध्ये यंदाचा दीपावली आनंदोत्सव आपल्या आप्तेष्ट आणि सुहृदांच्या उपस्थितीत ...
28/10/2022

सन्माननीय ग्राहक, सप्रेम नमस्कार.
सुपर्ण सभागृहामध्ये यंदाचा दीपावली आनंदोत्सव आपल्या आप्तेष्ट आणि सुहृदांच्या उपस्थितीत जल्लोषात संपन्न झाला. आपला उत्साह आणि ह्या दीपावली आनंदोत्सवास आपण दिलेली मनापासूनची दाद ह्याची झलक video मधून दिसेलच; क्षणचित्रे लवकरच share करू.
आपले स्नेहांकित,
जोशी-गोखले परिवार,
त्रिविक्रम उद्योग.

🪔 शुभ दीपावली 🪔
22/10/2022

🪔 शुभ दीपावली 🪔

मान्यवर ग्राहक, सप्रेम नमस्कार.'दीपावली आनंदोत्सव : स्वरुची भोजन' या त्रिविक्रम उद्योग आयोजित उपक्रमास आपण नेहमीच आपुलकी...
14/10/2022

मान्यवर ग्राहक, सप्रेम नमस्कार.

'दीपावली आनंदोत्सव : स्वरुची भोजन' या त्रिविक्रम उद्योग आयोजित उपक्रमास आपण नेहमीच आपुलकीने प्रतिसाद देत आला आहात. यंदा आपल्या सर्वांच्या ह्या जिव्हाळ्याच्या उपक्रमाचे सहावे वर्ष.
नेहमी दीपावली पाडवा आणि भाऊबीज अशा दोन्ही दिवशी चालणारा हा आनंदोत्सव यंदा बुधवार,
दि. २६ ऑक्टोबर २०२२ रोजी आपल्या आवडत्या
सुपर्ण सभागृहामध्ये संपन्न होत आहे.
सोबत मेनू आपल्याला कळवत आहोतच.
दि. १७ ऑक्टोबर पासून नावनोंदणीही सुरू होत आहे. नेहमीप्रमाणे लवकरात लवकर आरक्षण प्रक्रिया पूर्ण करू आणि सुग्रास भोजनाचा आस्वाद घेत पाडवा-भाऊबीज आपल्या सुहृदांसह
उत्साहाने साजरी करू.

आपले स्वागतोत्सुक,
जोशी-गोखले परिवार, त्रिविक्रम उद्योग.
सुपर्ण सभागृह, अरण्येश्वर, पुणे.

🍁🍁श्री. महालक्ष्मी पूजन 🍁🍁
02/10/2022

🍁🍁श्री. महालक्ष्मी पूजन 🍁🍁

नमस्कारआज पासून नावनोंदणी सुरू होत आहे.🙏🙏
19/09/2022

नमस्कार
आज पासून नावनोंदणी सुरू होत आहे.
🙏🙏

चैतन्याची खेळून रंगपंचमी अन् अनारोग्याची करून होळीफुटली पालवी मनास, फुलला नववर्षाच्या स्वागताचा मारवाउभारुन मनी आयुर्दाय...
02/04/2022

चैतन्याची खेळून रंगपंचमी अन् अनारोग्याची करून होळी

फुटली पालवी मनास, फुलला नववर्षाच्या स्वागताचा मारवा

उभारुन मनी आयुर्दायी सात्विकतेची गुढी

साजरा करू हा हर्षदायी गुढीपाडवा!

#गुढीपाडवा
🚩🚩🚩🚩🚩🚩

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळामाझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळाहिच्या संगाने जागल्या, दर्‍याखोर्‍यांतील शिळा ...
27/02/2022

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्‍याखोर्‍यांतील शिळा

#मराठीभाषा #मराठीसाहित्य #मायमराठी

#मराठीभाषागौरवदिन

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभनिर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदावक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभनिर्विघ्नं क...
04/02/2022

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.

नमस्कार मंडळी.आपल्या 'सुपर्ण सभागृह' मधील ओल्या कचऱ्याचे विघटन आपण सुपर्णच्याच गच्चीत करतो.खरकटे अन्न हे बायोगॅस प्रकल्प...
02/02/2022

नमस्कार मंडळी.
आपल्या 'सुपर्ण सभागृह' मधील ओल्या कचऱ्याचे विघटन आपण सुपर्णच्याच गच्चीत करतो.
खरकटे अन्न हे बायोगॅस प्रकल्पात, तर उर्वरीत ओला कचरा गच्चीवरील बागेत आपण जिरवतो.
जोशी-गोखले परिवारातील श्री. मकरंद गोखले हे अनेक तज्ञांचे मार्गदर्शन घेत प्रायोगिक तत्वावर हे प्रयत्न करीत आहेत. आमच्या सर्वच कर्मचारी वर्गाचे सहकार्य नेहमीच मनापासून असते. श्री. विनोद नाडनकर, श्री. निवृत्ती सग्रोळे व श्री. प्रवीण सकट ह्या कर्मचा-यांचा ह्या प्रकल्पातील रोजच्या कामात सहभाग असतो.
ह्या प्रयत्नांतून आपल्या सुपर्ण सभागृहातील गच्चीवरील ही मातीविरहित बाग आता सुरेख फुलू लागली आहे. त्यातून आपल्याला सद्ध्या टोमॅटो, वांगी, मिरची, लिंबू, फ्लॉवर, कोबी, सुरण, अळू, केळी, रताळी, कोथिंबीर,ओली हळद असा सेंद्रिय भाजीपाला मिळत आहे. ह्याचे काही फोटो पाठवत आहेच, परंतु ही बाग प्रत्यक्ष पहायलाही आपण जरूर या!
सुपर्ण सभागृह
जोशी-गोखले परिवार

७३ व्या प्रजासत्ताक दिनच्या आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !*🇮🇳
26/01/2022

७३ व्या प्रजासत्ताक दिनच्या आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !*🇮🇳

*आगतं दीपावली पुण्या सकलार्थ प्रदायिनी।**शुभं भवतु सर्वेषां सा दिव्या विश्वमोहिनी॥*भावार्थ :- पुण्यकारक अन् सगळ्यांना सग...
04/11/2021

*आगतं दीपावली पुण्या सकलार्थ प्रदायिनी।*
*शुभं भवतु सर्वेषां सा दिव्या विश्वमोहिनी॥*

भावार्थ :- पुण्यकारक अन् सगळ्यांना सगळी सुखं देणारी, विश्वाला मोहून टाकणारी, दिव्य अशी दीपावली आली आहे.
ही दिवाळी आपणास आणि आपल्या सर्व कुटुंबियांना सुख समृध्दची,आरोग्यदायी आणि भरभराटीची जावो हीच शुभेच्छा आणि शुभकामना !
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
🚩🪔🚩🪔🚩🪔🚩

✨दीपावली आनंदोत्सव 2021✨दरवर्षी प्रमाणेच या ही वर्षी उत्तम प्रतिसाद मिळाल्याने फक्त स्लॉट क्रमांक 1 (१२:१५)  साठी काही ज...
01/11/2021

✨दीपावली आनंदोत्सव 2021✨

दरवर्षी प्रमाणेच या ही वर्षी उत्तम प्रतिसाद मिळाल्याने
फक्त स्लॉट क्रमांक 1 (१२:१५) साठी काही जागा शिल्लक,

"बुकिंग करिता शेवटचे दोन दिवस" .

सर्वाँना मनःपूर्वक धन्यवाद 🙏
आपण सर्वाँना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

शुभ दीपावली

#दीपावलीआनंदोत्सव२०२१ #सुपर्णसभागृह

नमस्कार मंडळी, प्रतिक्षा संपली, आपला" दीपावली पाडवा आनंदोत्सव"सौस्मरणीय करण्यासाठी आम्ही सज्ज झाले आहोत.सदर समारंभाचे बु...
21/10/2021

नमस्कार मंडळी, प्रतिक्षा संपली,
आपला" दीपावली पाडवा आनंदोत्सव"
सौस्मरणीय करण्यासाठी आम्ही सज्ज झाले आहोत.
सदर समारंभाचे बुकिंग दिनांक.२५ ऑक्टोबर पासून
"सुपर्ण सभागृह" येथे सुरू होत आहे.
जागा मर्यादित असल्याने लवकरात लवकर बुकिंग करावे.
आभारी आहोत.
(पार्सल सेवा क्षमस्व)

#दीपावलीआनंदोत्सव२०२१

#सुपर्णसभागृह

#जोशीगोखले

मंद प्रकाश चंद्राचात्यात गोड स्वाद दुधाचाविश्वास वाढू द्या नात्यांचात्यात गोडवा असू दे साखरेचाकोजागिरी पौर्णिमेच्या हार्...
19/10/2021

मंद प्रकाश चंद्राचा
त्यात गोड स्वाद दुधाचा
विश्वास वाढू द्या नात्यांचा
त्यात गोडवा असू दे साखरेचा

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

✨✨दीपावली आनंदोत्सव 2021✨✨  शासकीय नियमांचे पालन करून आप्तेष्ट व मित्रमंडळी समवेत साजरा करा दीपावली पाडवा @ सुपर्ण सभागृ...
17/10/2021

✨✨दीपावली आनंदोत्सव 2021✨✨

शासकीय नियमांचे पालन करून आप्तेष्ट व मित्रमंडळी समवेत साजरा करा दीपावली पाडवा @ सुपर्ण सभागृह.
आपल्या आवडीचा मेनू लवकरच........
(पार्सल सेवा क्षमस्व)
💫⭐💫⭐💫⭐💫

#सुपर्णसभागृह.

#दीपावलीआनंदोत्सव२०२१.

#जोशीगोखले

बांधू तोरण दारी,काढू रांगोळी अंगणी..उत्सव सोने लुटण्याचा…करुनी उधळण सोन्याची,जपू नाती मनाची, दसरा शुभेच्छा.🍁☘️🍁☘️🍁☘️🍁☘️
14/10/2021

बांधू तोरण दारी,
काढू रांगोळी अंगणी..
उत्सव सोने लुटण्याचा…
करुनी उधळण सोन्याची,
जपू नाती मनाची, दसरा शुभेच्छा.
🍁☘️🍁☘️🍁☘️🍁☘️

Address

Aranyeshwar Chowk, Near RUTURANG Soc. Beside H. D. F. C. Bank
Pune
411009

Opening Hours

Monday 9am - 7:30pm
Tuesday 9am - 7:30pm
Wednesday 9am - 7:30pm
Thursday 9am - 7:30pm
Friday 9am - 7:30pm
Saturday 9am - 7:30pm
Sunday 9am - 7:30pm

Telephone

+912024231616

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suparna Mangal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Suparna Mangal:

Share

Category


Other Wedding Venues in Pune

Show All