Aa Ba Ka Da Cultural Group

Aa Ba Ka Da Cultural Group With the faith in hearts that music is the need of society, AaBaKaDa is an organization committed to AaBaKaDa is a cultural group.
(4)

The alphabets represent an initial introduction to the Marathi language. New learners of the language grapple with these letters in their infancy. The group would like to use this very same concept to help initiate audiences to experiment and experience the ecstasy of theatre, music and dance. Once upon a time, the city of Sangli was known as 'Natya Pandhari'. Unfortunately, Sangli of `Natyapandha

ri’ fame had disappeared. It was a time when disappointed theatre lovers turned their back on drama, music and dance in despair. We came together to fill this void. Deep down we knew that music is the need of any society. On November the sixth 1990 the organization was inaugurated by eminent theatre personality Shri Nilu Phule and distinguished dramatist Late Shri Vasant Kanetkar. AaBaKaDa is an organization committed to preserve the tradition of the performing arts both old and new. This is an appeal for financial assistance to support our endeavor to construct the ‘Aa Ba Ka Da’- The Creative Arts Center complex in Sangli.

26/04/2023
13/04/2023
13/04/2023

महान तपस्वी गायक....
*पं वसंतराव देशपांडे*
"आज मै अकेली हू"
राग : बरवा
हार्मोनियम साथ :
*गोविंदराव पटवर्धन*
तबला साथ :
*पं वसंतराव आचरेकर*
संकलन : शरद मगदूम
*अबकड कल्चरल ग्रुप*
सांगली 🪀 *9422622626*

African Sacred Ibis (Threskiornis aethiopicus) in flight by  Hisao Kanno
07/02/2023

African Sacred Ibis (Threskiornis aethiopicus) in flight by Hisao Kanno

*आज २१ सप्टेंबर* प्रतिभावान संगीतकार व गायक *पं. जितेंद्र अभिषेकी* यांची जयंती!जितेंद्र अभिषेकींचे मूळ आडनाव नवाथे. पण म...
21/09/2022

*आज २१ सप्टेंबर*

प्रतिभावान संगीतकार व गायक *पं. जितेंद्र अभिषेकी*
यांची जयंती!

जितेंद्र अभिषेकींचे मूळ आडनाव नवाथे. पण मंगेशाला अभिषेक करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आला अन् ते अभिषेकी बनले. पण ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊनही त्यांचे मित्र मात्र समाजाच्या सर्व थरांतले होते. नाव जितेंद्र पण मंगेशीतले सर्वजण त्यांना ‘गंपू’ म्हणून हाक मारायचे. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरवात केली.

संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण २१ गुरु केले व प्रत्येक गुरुकडून नेमकं तेवढंच घेतलं. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. संगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. ते संस्कृतचे पदवीधर होते. त्यांचे वाचन अफाट होते. संस्कृतपासून ते उर्दु शेरोशायरी पर्यंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते. सुस्पष्ट उच्चार, लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेऊन मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचं मर्म होतं.

अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. विद्याधर गोखल्यांच्या नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून रंगभूमी पुन्हा टवटवित झाली ती १९६४ साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशननिर्मित "संगीत मत्स्यगंधा" या नाटकामुळे.या नाटकातल्या पदांचं संगीत अभिषेकींचे होतं. त्यांनी एकूण १७ नाटकांना संगीत दिलं. गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. उदा. मैलाचा दगड ठरलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्राया नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारं होतं.

अभिषेकींनी जसं स्वत: संगीत दिलं तसं दुसऱ्याच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणी साठी केलेल्या ‘बिल्हण’ या संगीतिकेत पु.लं.च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती. तर वैशाख वणवा या चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले गोमू माहेरला जाते हो नाखवा हे गीतही त्यांनी म्हटले.

आकाशवाणी वर असतांना त्यांनी अनेक कोकणी गाण्यांनाही संगीत दिलं.

१९९५ सालच्या नाटयसंमेलनाचे अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. जितेंद्र अभिषेकी यांचे निधन ७ नोव्हेंबर १९९८ रोजी झाले.
पं. जितेंद्र अभिषेकी यांना विनम्र अभिवादन !
▪️संकलन : शरद मगदूम
*अबकड कल्चरल ग्रुप*
सांगली. 🪀 94226 22626

Address

चिंतामणी नगर सांगली
Sangli
416416

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aa Ba Ka Da Cultural Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aa Ba Ka Da Cultural Group:

Videos

Share

Nearby event planning services


Other Performance & Event Venues in Sangli

Show All