आम्रवन महाविहार देवगाव फाटा सेलू .जिल्हा परभणी

  • Home
  • India
  • Selu
  • आम्रवन महाविहार देवगाव फाटा सेलू .जिल्हा परभणी

आम्रवन महाविहार देवगाव फाटा सेलू .जिल्हा परभणी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आम्रवन महाविहार देवगाव फाटा सेलू .जिल्हा परभणी, Performance & Event Venue, देवगाव फाटा. ता. सेलू. परभणी, Selu.

18/01/2023

भारत जोड़ो यात्रा
महानाट्या नंतरचा परिणाम.
परभणी ते चैत्यभूमी(दादर) मुंबई.
धम्म पदयात्रा.
नाट्यमयरीत्या काही निवड़क राजकीय दलालांनी स्वतःच्या लाभासाठी काँग्रेसच्या दावणीला समाजाला बांधण्याचे चित्र दिसत आहे.
बौद्ध समाज याला मान्यता देईल का ?
जर इतिहास वाचला तर लक्षात येऊ शकते की,कॉंग्रेस आणि
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कधीच जमले नाही.
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढवलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनेच त्यांचा पराभव केला.
नंतर मंत्री म्हणून संधी दिली.
बिनविरोध निवडून आणूनही डॉ.बाबासाहेबांना मंत्री करता आले असते. तोच त्यांच्या विद्वत्तेचा सन्मान ठरला असता.
पण तसे काँग्रेसने नाही.
ज़्या काँग्रेसने दलित चळवळी उधवस्त केल्या.काय झालं? आंबेडकरी जनतेची फ़सवणुक केली .
आज Congress चे काही दलित नेते (दलाल) यांना हाताशी धरून (पद व पैसा पुरवूण) धम्माला कलंकित
क़रीत आहे,
हे मनाला पटत नाही.
अशा प्रवृत्ती थांबल्या पाहिजेत...!

*करुणामय रुप...!! *गौतम बुद्ध...!!!*        क्रोधाला प्रेमाने जिंकता येते,    लोभाला त्यागाने,असत्याला सत्याने जिंकता ये...
27/07/2021

*करुणामय रुप...!! *गौतम बुद्ध...!!!*

क्रोधाला प्रेमाने जिंकता येते,
लोभाला त्यागाने,
असत्याला सत्याने जिंकता येते
हे सांगणारा, शिकवणारा,
सिद्धार्थ गौतम बुद्ध...!!!

कुणावर अपार प्रेम नाही,
कुणाचा तिरस्कार नाही,
मनात प्रत्येकाबद्दल करुणा
असणारं निरामय रुप,
तथागत
गौतम बुद्ध...!!!

कुणाचा अतिसन्मान नाही,
अतिप्रशंसा नाही,
कुणाचा अपमानही नाही...
तटस्थपणे चिकित्सा करणारा,
महामानव
गौतम बुद्ध...!!!

कुणाला आशीर्वाद नाही ,
कुणाला शाप अथवा वरदान नाही,
'माणूस' म्हणून जगण्याचा,
मार्ग दाखवितो,
महामानव
गौतम बुद्ध...!!!

अल्प नाही,अती नाही...
सम्यक , मधला मार्ग शिकवितो,
सूक्ष्म अणू ते अकाशाऐवढा मोठा,
संपूर्ण विश्व व्यापून उरणारा,
तथागत गौतम बुद्ध...!!!

आथांग असून शाश्वत सत्य सांगतो
अभेद्य विचार मांडतो,
नाही कोणता अवतार ,
नाही तो कल्पीत देव वगैरे...
जो शुद्ध , प्रकाशमय तो बुद्ध...!!!

एक संतुलीत दृष्टीकोनचा,
जन्म , मृत्यु , आजारपण ,
म्हातारपण असणारा,
आपल्यासारखाच माणूस,
म्हणजे गौतम बुद्ध...!!!

मानव कल्याणाचा मार्ग सांगणारा,
विश्वाला दया , क्षमा , शांती
शिकविणारा विवेकी मानव,
तथागत गौतम बुद्ध..!!!

अष्टांगमार्ग , त्रीशरण आणि
पंचशीलाने मानवी जीवन,
सुखी करण्याची शिकवण देणारे सर्वोत्तम भूमिपूत्र,
म्हणजे गौतम बुद्ध..!!!

बुद्धम् सरणम् गच्छामि..!!!

तथागतांच्या बोधि बलाने आपले सर्वांचे मगलं हो...!!! आषाढ(गुरु)पौर्णिमे     निमित्त मंगलमय शुभेच्छा...!!!💐💐💐
23/07/2021

तथागतांच्या बोधि बलाने आपले सर्वांचे मगलं हो...!!!
आषाढ(गुरु)पौर्णिमे
निमित्त
मंगलमय शुभेच्छा...!!!💐💐💐

*अस्तित्व हे विनम्रतेत नेहमी उच्च स्थानावर आरूढ असते...!! मी कोणाच्या समोर झुकत नाही,असे जे आपण म्हणतो त्याने अहंकार वाढ...
21/07/2021

*अस्तित्व हे विनम्रतेत नेहमी उच्च स्थानावर आरूढ असते...!!
मी कोणाच्या समोर झुकत नाही,असे जे आपण म्हणतो त्याने अहंकार वाढीस लागतो. पण झुकणे हे कमीपणाचे नाही तर नात्यातील ओल टिकवण्यासाठी एकप्रकारचा बांध असतो.
समोरच्याच्या मनात आपले स्थान आपसूकच उच्च बनते. मग ते भले ही समोरून अमान्य दाखवत असले तरीही.... !!!

भगवान बुद्ध कहते है दूसरे पर आरोप करने वाले व्यक्ति ने यह विचार करना चाहिए की, मै स्वयम शूध्द आचरण वाला हूं की नहि..!यदी...
20/07/2021

भगवान बुद्ध कहते है दूसरे पर आरोप करने वाले व्यक्ति ने यह विचार करना चाहिए की, मै स्वयम शूध्द आचरण वाला हूं की नहि..!
यदी वह शुध्द आचरनवाला नहि हें तो, उसपर व्यंग्य करने वाले ऐसा व्यक्ती मिल जायेंगे...!
जो उसको कहेंगा की पहले आप स्वयं इन गुनोंसे युक्त होईयें.. !!!

भगवान गौतम बुद्ध के अनमोल वचन...!!इंसान के भीतर ही शांति का वास होता है, इसे बाहर ना खोजे। इस पूरी दुनिया में इतना अन्धक...
12/07/2021

भगवान गौतम बुद्ध के अनमोल वचन...!!
इंसान के भीतर ही शांति का वास होता है, इसे बाहर ना खोजे।
इस पूरी दुनिया में इतना अन्धकार नहीं है कि वो एक छोटे से दीपक के प्रकाश को मिटा सके। नफरत से नफरत कभी खत्म नहीं हो सकती। नफरत को केवल प्यार द्वारा ही समाप्त किया जा सकता है।

***मैत्रि आणि घृणा हे जीवनाचे सारस्य आहेत***  _आयुष्यात जगताना मैत्रि भावना नेहमी आपल्याला उदात्त, सुंदर जीवनाचे रूप दाख...
11/07/2021

***मैत्रि आणि घृणा हे जीवनाचे सारस्य आहेत***

_आयुष्यात जगताना मैत्रि भावना नेहमी आपल्याला उदात्त, सुंदर जीवनाचे रूप दाखवते...!
घृणा कधीही आपल्याला स्वास्थ्य लाभू देत नाही..!!
मैत्रि कधीच हारत नाही तर घृणा कधीच जिंकत नाही...!!!
आपल्याला फक्त निवड करता यायला हवी इतकंच...!!!

*अस्तित्व हे विनम्रतेत नेहमी उच्च स्थानावर आरूढ असते...*** मी कोणाच्या समोर झुकत नाही असे जे आपण म्हणतो, त्याने अहंकार व...
09/07/2021

*अस्तित्व हे विनम्रतेत नेहमी उच्च स्थानावर आरूढ असते...***

मी कोणाच्या समोर झुकत नाही असे जे आपण म्हणतो, त्याने अहंकार वाढीस लागतो. पण झुकणे हे कमीपणाचे नाही तर नात्यातील ओल टिकवण्यासाठी एकप्रकारचा बांध असतो. समोरच्याच्या मनात आपले स्थान आपसूकच उच्च बनते. मग ते भले ही समोरून अमान्य दाखवत असले तरीही.... !!!🙏

बारकाईने विचार केला तर या निसर्गात प्रत्येक गोष्टीचे आपापल्या ठिकाणी महत्व सिद्ध आहे. पण तरीही आपण एकमेकांना कमी समजण्या...
08/07/2021

बारकाईने विचार केला तर या निसर्गात प्रत्येक गोष्टीचे आपापल्या ठिकाणी महत्व सिद्ध आहे. पण तरीही आपण एकमेकांना कमी समजण्याचा मूर्खपणा करतोच. असे केल्याने आपण स्वतःचे तर नुकसान करतोच करतो इतरांना ही क्लेश देत असतो जे पूर्णतः चुकीचेच आहे..!!

ओ बाबा...!                                           ओ बाबासाहेब .......!!               आम्हीच पुजत व्हतो खंडोबा,जोतिबा...
14/04/2021

ओ बाबा...!

ओ बाबासाहेब .......!!

आम्हीच पुजत व्हतो खंडोबा,जोतिबा,म्हसोबा, इठोबाला, लयमठ्या, पिराला !
अन सोबतच मरीमाय, धुरपतमाय, आसराई, जोखाई,आन लयमठ्या आई !
बाबा ......

तुमचा जन्म झाला ..........

तसा आमच्या जीवनातला हजारो वर्षाचा......

अज्ञान अन अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा ........

अंधकार नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू झाली .........!

तुम्ही जसजसा एक एक बुकं शिकत गेलातं ......

तसंतशी तुमच्या ज्ञानाची भूक वाढतच गेली ..........!

य़ा ज्ञानाच्या भुकेपुढे तुम्ही पोटाची भूक मारून टाकलीत ....!

पावाच्या एका तुकड्यावर 18 / 18 तास विद्यार्जन केलेतं .....!

एम ए , पीएच डी , डी एस्सी , एल एल डी , डी लिट , बार अट लॉ .....!

जिथे अ का ढ वाचता येत नव्हता तिथे जागतिक पदव्याची आरास रचलीतं .....!

गेल्या हजारो वर्षात आणि येणाऱ्या कल्पकल्पान्त

वर्षात तुमचा बुद्धांक काऊंट केला जाऊ शकत नाही
कुठल्याच मापात ....!

महामाप सुद्धा अंडरवेट होईल तुमच्यापुढे ....!

तुमचा प्रत्येक श्वास अनमोल अन बहुमोल ......!

65 वर्षातल्या काटकसरीने जगलेल्या आयुष्यातील .....

780महिने .......23400 दिवस ......561600 तास .......

इन्फिनिट मिनिट आणि सेकंद .......!

तुम्ही जगलात फक्त आमच्यासाठी .......!

आमच्या हजारो पिढ्यांचा उद्धार करण्यासाठी ......!

आमच्या अविकसित मेंदूत भीमबळ निर्माण करण्यासाठी .....!

आम्हीही थोडा थोडा प्रयत्न करतोय तुम्ही

दाखविलेल्या मार्गावर धम्मप्रवास करण्याचा .....!

आज तुमच्या 130 व्या जयंती दिनी अभिवादन

करण्यासाठी जमतेय अलोट गर्दी .....!

गरिबापासून अतितेरा श्रीमंतांपर्यंत .....!

ग्लोबल पासून
लोकल पर्यंत ........!

वाजतायत तुमच्या नावाचे नगारे .....!
हार....फुले...मेणबत्ती.... अगरबत्ती .....
धुपबत्ती.......

जिकडे तिकडे तुमची अन तुमची कीर्ती ..........!

ओ बाबा .......!

माझ्या बापाचे
बाबा.....!!

ओ बाबासाहेब ....!!

माझ्या बापा ....

हे महामानवा.....

जगतपित्या......!

तुम्हा शतशः नमन .....!

ञिवार वंदन ......!!
विनम्र अभिवादन ......!!!

अशोक अंभोरे
संस्थापक/अध्यक्ष
सम्राट मित्र मंडळ
प्रमुख
डॉ.बी.आर.आंबेडकर
धम्म संस्कार केंद्र,
आम्रवन महाविहार
देवगाव फाटा
सेलू ता.सेलू जि.परभणी.
मो.
9422402818

Address

देवगाव फाटा. ता. सेलू. परभणी
Selu
431503

Telephone

+917058094807

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आम्रवन महाविहार देवगाव फाटा सेलू .जिल्हा परभणी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to आम्रवन महाविहार देवगाव फाटा सेलू .जिल्हा परभणी:

Share


Other Selu event planning services

Show All

You may also like