15/12/2022
--------------------------------
मोरेश्वर सभागृह
१७बी/३, जोशी रेल्वे संग्रहालय जवळ, करिष्मा चौक
कोथरूड पुणे - ४११०३८
संपर्क - 9156172004 / 020 25460269
--------------------------------
व्रतबंध सोहळा @ मोरेश्वर सभागृह
‘मुंज’ अर्थात ‘उपनयन' किंवा 'व्रतबंध' संस्कार कुमाराच्या आयुष्यातील प्रमुख संस्कारांपैकी एक ! सोवळे नेसून, मुंडावळ्या बांधून सज्ज झालेल्या लहानग्या बटुची लोभस मूर्ती कार्यालयात अवतरते. सर्वांच्याच नजरा बटु वर खिळतात. आहा ! किती गोड, राजबिंडा दिसतोय ! लोभस दिसतोय ! असे शब्द उमटतात.
“छोटी छोटी पावलं टाकत घरभर फिरणारं हे बाळ इतकं मोठं कधी झालं?” हाच प्रश्न सर्वांच्या नजरेत असतो. आई-वडील कमालीच्या कौतुकाने बटुचे रूप डोळ्यात साठवत असतात. आणि या कौतुकसोहोळयात सर्वाधिक बोलक्या नजरा असतात त्या आजी-आजोबांच्या! आपल्या डोळ्यांदेखत आपल्या नातवाचे एक जबाबदार कुमारात रूपांतर होताना पाहण्याचे सुख कोणत्या शब्दात सांगावे ?
म्हणूनच कुठेही यत्किंचितही उणीव राहू नये यासाठी मोरेश्वर सभागृह नेहेमीच सज्ज असते. सनईच्या मंगलमय सुरांच्या साथीने, पारंपरिक दृश्यांच्या आकर्षक सजावटीने आणि सुग्रास आणि चविष्ट भोजनाने.
या आधुनिक युगात आपल्या परंपरांचा मान राखण्याच्या तुमच्या या प्रयत्नात आमचा हा खारीचा वाटा !
आम्हाला खात्री आहे नवीन वर्षात तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला सेवेची संधी द्याल!
वाट पाहतोय तुमचे कार्य अविस्मरणीय करण्याची
आजच नोंदणी करा. आणि निश्चिंत व्हा !
२०२३ च्या निवडक तारखा उपलब्ध
--------------------------------
मोरेश्वर सभागृह
१७बी/३, जोशी रेल्वे संग्रहालय जवळ, करिष्मा चौक
कोथरूड पुणे - ४११०३८
संपर्क - 9156172004 / 020 25460269
--------------------------------