27/04/2024
स्नेहमिलन सोहळ्यात 'सखीं'च्या कलागुणांची उधळण
स्नेहमिलन सोहळ्यात प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून प्रियदर्षणी महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा शीतल भोयर, तर परीक्षक म्हणून डॉ. किरण खडसे तर विशेष सहायक म्हणून मनोहर तुकारामजी ढोमणे ज्वेलर्सच्या संचालिका आकांक्षा व सोनल ढोमणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन पल्लवी पुरोहित यांनी केले. कार्यक्रमाला सखी मंच विभाग प्रतिनिधी व सदस्यांची उपस्थिती होती.
लोकमत सखी मंचच्या वतीने एकल नृत्य स्पर्धा, फॅशन शो,समूह नृत्य स्पर्धा तसेच लकी द्वाँचे आयोजन करण्यात आले होते. एकापेक्षा एक नृत्य बघून प्रेक्षक सखीही भारावून गेल्या होत्या. यावेळी समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक वुमेन्स ग्रुप ने पटकाविला यात अरुणा खेरडे, दिपाली नखाते, प्रज्ञा पाटील, शीला मुन, प्रणाली, छाया कांबळे यांचा समावेश होता. तर सह्याद्री ग्रुपने द्वितीय नंबर पटकाविला यात स्नेहा सावरकर, प्राची चापडे, सारिका गायकवाड, निकिता गोबडे, ऋतुजा दाभाडे, स्मिता खेडेकर यांचा समावेश होता. वैष्णवी ग्रुपने तृतीय क्रमांक मिळविला असून यात सुचिता देशमुख, निता बांगडे, अपर्णा डफळे,वंदना साटोणे,शुभांगी बांगडे, प्रिया काकडे, जयश्री तायवाडे, स्मिता काकडे यांचा समावेश होता. एकल नृत्य स्पर्धेत सोनल भानसे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर रीमा महल्ले यांनी द्वितीय तर स्मिता रोहकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
फॅशन शोमध्ये स्मिता निमजे, मीना ढवळे, वंदना डेकाते यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आला. महिला प्रेक्षकांमध्ये असलेल्या लकी ड्रॉमध्ये रेखा मसराम, धनश्री भांडेकर, रोशनी रामटेके, अर्चना पवार, योगिता थर, संगीता कावळे, मंगला निखाडे, रुपाली गायकवाड, सोनाली ठाकरे, समृध्दी मोहिजे या विजेत्या ठरल्यात.