22/06/2022
#ब्रह्मसखी चे असे पालकाकरवी झालेले कौतुक...
आपल्या सर्वांसोबत शेयर केल्याशिवाय रहावले नाही....
नाव फक्त..कट केलेले आहे....🙏🙏🙏🙏
नमस्कार,आपणास कळविण्यात आनंद होतो की माझी मुलगी चि. सौ.का. .......व .........यांचा विवाह 16 जून 2021 रोजी संपन्न झाला.
आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे. मी तीन मुलींचा बाप पहिल्या मुलीचं लग्न झालं ती जवळच आप्ता घरी दिलं तिचा आंनद आहे. आता दुसरी मुलगी लग्नाला आली एक दोन स्थळ पहिली ति मनासारखी नव्हती, मी विचार करू लागलो आपल्या समाजामध्ये मुली कमी आहेत तर मूल तरी कुठे आहेत, एके दिवशी मला माझ्या मोठ्या मुलीचा फोन आला व म्हणाली बाबा ब्रम्ह सखी नावाने चार महिलांनी मिळून ग्रुप तयार केला आहे, त्यांच्याशी आपण संपर्क करू सर्व मुला-मुलींची स्थळ त्यांच्या ग्रुप वर आहेत त्यांच्या कडूनच आपणास योग्य स्थळ मिळतील व ब्रम्ह सखीला जोडल्या गेल्या मुळेच....कुटुंबाशी आमचे ऋणानुबंध जुळून आले आम्हाला सुसंकृत सज्जन मानस मिळाली, ते आमच्या कुटुंबाचे स्नेही झाले ते केवळ आपल्या मुळेच तरी आपले शतशः आभार, ज्या नावातच एवढं बल तेज व सामर्थ्य आहे 'वेद पुराण व शास्त्रात ब्रम्हगाठ, ब्रम्हज्ञान, ब्रम्हदेव या ब्रह्मांडात ब्रम्हसखी' रामदास स्वामी म्हणतात।। सामर्थ्य आहे जयाचे जे जे करील तयाचे।। आपुलकी, जिव्हाळा समाजाविषयी असणारी तळमळ व समाजाची चिंता संपवणारी व आनंद मिळवुन देणारी व घर बसल्या स्थळ पाठवून समाजाचे जणू आपल्यावर काही रूनच आहे या उदार अंतःकरण पूर्वक भावनेने आपण महिला निस्वार्थ पने कार्य करीत आहेत तुमचे कितीही कौतुक केले तरी आमच्या मनात अपूर्णतेचीच भावना राहते, वर्ष दीड वर्षं पासून काळ वाईट आलेला आहे मूल-मुली उपवर झालेले आहेत रात्रंदिवस आई-वडील चिंतेत आहेत अश्यांची चिंता संपवून त्यांची चिंता नाहीशी करणारी ब्रम्हसखी म्हणजेच चिंता मनीचा खडा, तुकाराम महाराज म्हणतात
।। चिंता मणी आलीया हाता मग चिंता कशाची।।
तशा तुम्ही #चार_स्त्रिया म्हणजे आमच्या साठी जणू #चिंतामनीच आहेत, आम्हाला योग्य अस स्थळ पाहिजे तस स्थळ तुमच्या मुळेच मिळाले तुमचे शतशः आभार...
कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी आवड जेे मणी पुरविती ।।हे तिन्ही जेथ एकवटले। ते ह्या ब्रम्हसखीया माजी पाहिले।।
तुम्हाला परमेश्वर उदंड आयुष्य देवो व तुमच्या कडून असेच समाजाचे पवित्र कार्य घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना , धन्यवाद!
एका मुलीचे पालक...