कुस्ती हेच जीवन kustihechjivan

कुस्ती हेच जीवन kustihechjivan Wrestling Is My Life (कुस्ती हेच जीवन)
(6)

08/05/2024

धक्कादायक निकाल: तुल्यबळ लढतीत उप महाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकरची महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील वर मात | पेरीड कुस्ती मैदान 2024

विनम्र अभिवादन 🙏🏼
06/05/2024

विनम्र अभिवादन 🙏🏼

06/05/2024

ना कष्ट करण्याची गरज, ना घाम गाळण्याची गरज... कुस्ती मैदानातील आर्ध्या पैशावर डल्ला मारून.....
#कुस्तीतील_दलालच झालेत
पैलवान पेक्षाही श्रीमंत...!

05/05/2024

ब्रेकिंग न्यूज:
पैसे खाणाऱ्या दलालांना बेदम चोप.. 🤣

#आतली_बातमी

04/05/2024

पाकीटात चुकून जास्त पैसे आलेत परत द्या म्हणुन कुणाचा फोन आला तर समजून घ्या की हा हरामखोर कुस्तीतील #दलाल आहे..i

देवा थापा भारत केसरी... टायटल देणाऱ्याचा स्पेशल कोल्हापुरी जोड्याने सत्कार करायला हवा...i अरे नालायकानो जनाची नाही तर मन...
04/05/2024

देवा थापा भारत केसरी... टायटल देणाऱ्याचा स्पेशल कोल्हापुरी जोड्याने सत्कार करायला हवा...i

अरे नालायकानो जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा..i

महाराष्ट्राची मुकी कुस्ती बोलकी करणारे जेष्ठ कुस्ती निवेदक पैलवान जोतिराम वाजे सर आपणास कुस्ती हेच जीवन परिवार तर्फे वाढ...
04/05/2024

महाराष्ट्राची मुकी कुस्ती बोलकी करणारे जेष्ठ कुस्ती निवेदक पैलवान जोतिराम वाजे सर आपणास कुस्ती हेच जीवन परिवार तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सांगली जिल्ह्यातील कुस्तीचा आवाज म्हणजे आदरणीय जोतिराम वाजे सर. ज्यांनी आजतागायत शेकडो कुस्ती मैदानात आपल्या अमृत वाणीने लाखो कुस्ती शौकिनाना मंत्रमुग्ध केले आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील कुस्ती वाढसाठी देखील वाजे सरांचे खूप मोठे योगदान आहे.

*मौजे पेरीड (ता शाहूवाडी) येथे गोरक्षनाथ देवाच्या यात्रेनिमित्त दि ६ मे २०२४ रोजी होणार कुस्त्यांचा रणसंग्राम*. ...... न...
03/05/2024

*मौजे पेरीड (ता शाहूवाडी) येथे गोरक्षनाथ देवाच्या यात्रेनिमित्त दि ६ मे २०२४ रोजी होणार कुस्त्यांचा रणसंग्राम*. ......

नंबर एकला लढणार
*पै पृथ्वीराज पाटील* विरुद्ध *पै प्रकाश बनकर* ........
-----------------

शाहूवाडी तालुक्यातील पेरीड या गावात सालाबादप्रमाणे गोरक्षनाथ देवाच्या यात्रेनिमित्त ग्रामस्थांनी कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे.

शाहूवाडी तालुक्यातील पेरीड म्हटलं की फक्त एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे पैलवानकीतुन घडलेलं गांव..... कुस्तीवर श्रद्धा असणारे गाव..... . राजकीय वारसा लाभलेले गाव या गावाला अनेक वाड्या आहेत कडवी नदीच्या तीरावर वसलेल्या या गावाला सव्वाशे वर्षाची कुस्तीची परंपरा आहे ती आजही कायम आहे. कुस्ती वर प्रेम करणारी अनेक मंडळी या गावात असून वयक्तिक देणगीतून ही मंडळी हे मैदान पार पाडणार आहेत. खासकरुन म्हणायचे झाले तर देणगीदारांच्या अमूल्य देणगीतून हे मैदान होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पेरीड गावचे हे अग्रगण्य मैदान असून सुंदर संयोजन आणि नियोजन केले आहे . गतवर्षी पासून आंतरराष्ट्रीय नियमानुसार मातीतील कुस्ती या मैदानात होत आहे . सहा मिनिटात कुस्ती निकाली झाली नाही तर कुस्ती गुणावर घेतली जाणार आहे. मैदानी कुस्तीतील गतीमानता वाढवण्यासाठी पेरीडकरांनी हा निर्णय घेतला आहे. पंचवीस हजार लोकांची बसण्याची क्षमता असणारे हे पेरीड चे मैदान आहे.

याच गावातील जुन्या काळातील सुप्रसिद्ध पैलवान, ज्यांना या पैलवानकीतुनच आपले आयुष्य पालटून या लाल मातीने एक आदराचे नाव दिले ते म्हणजे डी वाय एस पी, पोलीस खात्यातील राष्ट्रवादी पदक मिळवलेले पै बाजीराव पाटील साहेब पेरीडकर....
त्याचबरोबर पैलवानकीतुनच राजकीय क्षेत्रात आपली छाप पाडली, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती , जिल्हा बॅंकेचे मा संचालक, मा बाजीराव पाटील यांचे छोटे बंधू मा सर्जेराव पाटील दादा.... खरंच खूप मोठे काम आहे त्या व्यक्तीचे.. भागातील अनेक कुस्ती मैदान ला त्यांची विशेष भेट असते.

मा बाजीराव पाटील यांच्या सहकार्याने व मा सर्जेराव दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान होणार आहे.

सरपंच उपसरपंच, यात्रा कमिटी अध्यक्ष, ग्रा पं सदस्य, ग्रामस्थ, मुंबई कर आणि त्यांच्या वाडीवस्ती वरील सर्व ग्रामस्थांनी हे मैदान यशस्वी पार पाडण्यासाठी गेली महिनाभर कंबर कसली आहे.

पेरीड गावचे कुस्ती मैदान म्हटले की कुस्ती शौकिनांचा अलोट जनसागर असतोच...
हे कुस्ती मैदान वेळेत चालु होणार असून वेळेतच संपणार आहे अशी माहिती नवी मुंबई पोलीस *मा पै सचिन पाटील* व ऑल इंडिया चॅम्पियन *पै रंगराव पाटील पेरीडकर* यांनी 'कुस्ती हेच जीवन' शी बोलताना स्पष्ट केले आहे.

सदर मैदान *कुस्ती हेच जीवन* या अधिकृत युट्युब चॅनेल वर Live दाखवण्यात येणार आहे.

*नियोजित कुस्त्या खालील प्रमाणे* 👇

1️⃣ *पै पृथ्वीराज पाटील* महाराष्ट्र केसरी ❌ *पै प्रकाश बनकर* उपमहाराष्ट्र केसरी

2️⃣ *पै कालीचरन सोलनकर* गंगावेश तालीम कोल्हापूर ❌ *पै ओमकार चौगुले* सेनादल

3️⃣ *पै अमर पाटील* बिळाशी, गंगावेश ❌ *पै अजित पाटील* सावे, शाहूवाडी

4️⃣ *पै कर्तार कांबळे* पेरीड ❌ *पै सुदर्शन पाटील* वि कु सं कोल्हापूर

5️⃣ *पै सचिन महागावकर* पेरीड ❌ *पै प्रतिक म्हेतर* राशिवडे

यासह अनेक काटा कुस्तीचा थरार आपल्याला पहायला मिळणार आहे.

🎥सदर कुस्ती मैदान *कुस्ती हेच जीवन* या अधिकृत युट्युब चॅनेल वर Live दाखवणार येणार आहे.

🎤🎤कुस्ती निवेदक
पै इश्वरा पाटील सर- वारणा,
पै सुरेश जाधव सर - चिंचोली

🥁हलगी- अक्षय आवळे आणि सहकारी गारगोटी

⭕ मैदान स्थळ
कै पै मारुती भाऊ पाटील कुस्ती आखाडा, पेरीड ता शाहूवाडी...

मैदान संयोजन
पेरीड ग्रामस्थ, पुणे आणि मुंबईकर मंडळी
--------------------------
धन्यवाद ✍️
पै अशोक सावंत पाटील
*कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य*
अध्यक्ष शाहूवाडी तालुका
मो 9702984006

सावर्डे बुद्रूक कुस्ती मैदान
30/04/2024

सावर्डे बुद्रूक कुस्ती मैदान

*मौजे सावे (ता शाहूवाडी) याठिकाणी बुधवार दि १ मे २०२४ रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान*  *निनाईदेवी यात्रा महोत्सव २०२...
30/04/2024

*मौजे सावे (ता शाहूवाडी) याठिकाणी बुधवार दि १ मे २०२४ रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान*
*निनाईदेवी यात्रा महोत्सव २०२४*
-----------------
नियोजित कुस्त्या खालील प्रमाणे

1️⃣ *पै अजित पाटील* सावे, हनुमान कुस्ती संकुल शाहूवाडी ❌ *पै शेखर दोडके* मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे

2️⃣ *पै अमर पाटील* बिळाशी, गंगावेश तालीम कोल्हापूर ❌ *पै उदय खांडेकर* कणदुर

3️⃣ *पै ओमकार पाटील* मोतीबाग तालीम कोल्हापूर ❌ *पै अजय शेडगे* शेडगेवाडी

4️⃣ *पै कर्तार कांबळे* पेरीड ❌ *पै करण दोडके* कडेगाव

5️⃣ *पै सयाजी जाधव* शाहूवाडी ❌ *पै सुनिल करवदे* कडेगाव

6️⃣ *पै गोरख पाटील* फुपिरे ❌ *पै सुदर्शन पाटील* कोल्हापूर

⏩ *पै सचिन महागावकर* पेरीड ❌ *पै शुभम पवार* कडेगाव

⏩ *पै प्रताप माने* कोपार्डे वि *पै पृथ्वीराज पवार* कोल्हापूर

यासह अनेक काटा कुस्तीचा थरार आपल्याला पहायला मिळेल.

🎥 सदर कुस्ती मैदान *कुस्ती हेच जीवन* या अधिकृत युट्युब चॅनेल वर लाईव्ह दाखवले जाणार आहे.

🎤कुस्ती निवेदक
श्री ईश्वरा पाटील सर वारणा

🥁हलगी
सचिन कांबळे आणि सहकारी बोरगाव.

संयोजक
यात्रा कमिटी , ग्रामपंचायत, ग्रामस्थ सावे ता शाहूवाडी जि कोल्हापूर.

29/04/2024

राहुरी कुस्ती मैदान २०२४

https://www.youtube.com/live/pTKh_hrSRDo?si=wu_FsYIO3VrM7XUV
29/04/2024

https://www.youtube.com/live/pTKh_hrSRDo?si=wu_FsYIO3VrM7XUV

------------------------------------------------------नमस्कार, कुस्ती हेच जीवन kusti hech jivan या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. कुस्ती क्षेत्रातील महत्वाच्...

29/04/2024

आजच्या राहुरी कुस्ती दंगलीचे थेट लाईव्ह प्रक्षेपण पहा कुस्ती हेच जीवन You Tube चॅनल वरती..

28/04/2024

राहुरी कुस्ती मैदान 29 April 2024 | Harshad Sadagir Vs Mauli Kokate प्रेक्षणिय लढत

28/04/2024

देशातील सर्वात मोठी कुस्ती दंगल | *महाराष्ट्र मैदान Yellur (बेळगाव)* | दिनांक 2 May 2024 रोजी.

सविस्तर माहिती पहा 👉🏾
https://youtu.be/liLwBsy__98

श्री हनुमान जन्मोत्सव बेनापुर आयोजित भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान..i
28/04/2024

श्री हनुमान जन्मोत्सव बेनापुर आयोजित भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान..i

100k You Tube Subscribers..✌🙏🏼
28/04/2024

100k You Tube Subscribers..✌🙏🏼

27/04/2024

धक्कादायक निकाल: Pruthaviraj Mohol Vs Hasan Patel

26/04/2024

देशातील सर्वांत मोठा कुस्ती दंगल Yellur (बेळगांव) दिनांक 2 May 2024

25/04/2024

महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख.. धन्यवाद #कुस्ती_हेच_जीवन Subscribe 🙏🏼✌

100K You Tube Family....सर्वांचे मनःपूर्वक आभार...🙏🏼
25/04/2024

100K You Tube Family....सर्वांचे मनःपूर्वक आभार...🙏🏼

24/04/2024

100K You Tube Subscribe Complete | पै.निखिल माने याने कुस्ती हेच जीवन परिवारला दिल्या खास शुभेच्छा..
https://youtube.com/shorts/RBMJDZkEJ3U?feature=share

#कुस्ती_हेच_जीवन

https://youtu.be/ZyxqHRPYrtk
24/04/2024

https://youtu.be/ZyxqHRPYrtk

धक्कादायक निकाल: हसन पटेलची पैलवान पृथ्वीराज मोहोळ वर मात | उचगाव (कोल्हापूर) कुस्ती दंगल 2024 #कुस्ती

24/04/2024

Harshad Sadgir Vs Mauli Kokate.. उचगाव कुस्ती मैदान २०२४

22/04/2024
**उचगाव (कोल्हापूर) कुस्ती मैदान 2024*कुस्ती मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण पहा *कुस्ती हेच जीवन You Tube चॅनल* वरती👉🏾https:/...
22/04/2024

**उचगाव (कोल्हापूर) कुस्ती मैदान 2024*

कुस्ती मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण पहा *कुस्ती हेच जीवन You Tube चॅनल* वरती👉🏾
https://www.youtube.com/live/glNzR49IdE4?si=GyEVMudV1LwoLb9K

मैदानातील प्रमुख लढत 👉🏾
▪️ *पैलवान हर्षद सदगिर* ❌ *पैलवान माऊली कोकाटे*
▪️ *पैलवान पृथ्वीराज पाटील* ❌ *पैलवान भारत मदने*
▪️ *पैलवान पृथ्वीराज मोहोळ* ❌ *पैलवान हसन पटेल*

🙏🏼 धन्यवाद 🙏🏼
*कुस्ती हेच जीवन सोशल मीडिया टीम*

*मौजे विरळे (ता शाहूवाडी) येथे बुधवार दि २४ एप्रिल रोजी जोतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त होणार जंगी कुस्ती मैदान*....--...
22/04/2024

*मौजे विरळे (ता शाहूवाडी) येथे बुधवार दि २४ एप्रिल रोजी जोतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त होणार जंगी कुस्ती मैदान*....
-----------------

विरळे गाव शाहूवाडी तालुक्यातील एक गाव आहे. अनेक वर्षांपासून या गावात कुस्ती मैदानाची व बैलगाडा शर्यतीची परंपरा आहे. जुन्या काळात अनेक पैलवान या गावात घडलेले आहेत. विरळे गावचे ग्रामदैवत श्री जोतिर्लिंग देवाच्या मंदिराचे काम दोनच वर्षांपुर्वी झाले आहे. खूपच सुंदर आणि सुसज्ज असणार्‍या या मंदिराच्या कामासाठी गावातील अनेक दानशुन व्यक्तींनी सढळ हाताने मदत केली आहे. त्याचबरोबर गावाच्या उत्तर दिशेला चोपडाई देवीचे जागृत देवस्थान आहे. या चोपडाई देवीला जाण्यासाठी पुर्वी जंगलातून पायवाट होती, परंतु आता येजा करण्यासाठी मोठा रस्ता बनवण्यात आला आहे. ग्रामदैवत श्री जोतिर्लिंग देवाबरोबर चोपडाई देवीवर सुद्धा विरळे ग्रामस्थांची अपार श्रद्धा आहे.

गावाच्या मध्यभागी कुस्तीचा आखाडा आहे. जोतिर्लिंग देवाच्या आणि आई चोपडाई देवीच्या आशिर्वाने विरळे गाव गुण्यागोविंदाने नांदत आहे.

पुर्वी पासुन चालत आलेली ही कुस्ती मैदानची परंपरा अलिकडच्या लोकांनी जपली आहे. महाराष्ट्रातील खुपच तगडे मल्ल या गावात लढले आहेत. चालू वर्षी होणारे हे मैदान यशस्वी पार पाडण्यासाठी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ व मुंबईकर मंडळींनी विशेष मेहनत घेतली आहे.
त्याचबरोबर विरळे गावच्या परंपरेनुसार दि २३ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १ वाजलेपासून भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. भरघोस अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
अनुक्रमे १२ हजार, १० हजार, ७ हजार, ५ हजार, व ३ हजार अशी बक्षीसे असणार आहेत.

🎥 सदर कुस्ती मैदान *कुस्ती हेच जीवन* या अधिकृत युट्युब चॅनेल वर (Live) थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे.

▪️नियोजित कुस्त्या खालील प्रमाणे 👇

⏩ *पै कुमार पाटील* शित्तुर मोतीबाग तालीम कोल्हापूर ❌ *पै पृथ्वीराज शिंदे* पुणे

⏩ *पै अभिजित भोसले* शित्तुर, मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी ❌ *पै संदीप बंडगर* इस्लामपुर

⏩ *पै सुरज पाटील* मोतीबाग तालीम ❌ *पै सोहेल मोहिते* कोल्हापूर

⏩ *पै प्रदिप पाटील* शित्तुर ❌ *पै दादा कदम* कापशी

⏩ *पै साहिल पाटील* सोंडोली, जय हनुमान कुस्ती संकुल शाहूवाडी ❌ *पै रोहन पाटील* कोल्हापूर

स्थानिक मल्ल :
पै तेजस पाटील विरळे, विद्यापीठ चॅम्पियन पुणे.
पै अमर आसुळकर विरळे.

त्याचबरोबर ५० रुपये पासून ४००० रु पर्यंत च्या कुस्त्या मैदानात जोडल्या जाणार आहेत.

मैदान संयोजन यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ विरळे.
-----------------
धन्यवाद
पै अशोक सावंत/पाटील
*कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य*
अध्यक्ष शाहूवाडी तालुका
मो 9702984006

21/04/2024

राहुरी कुस्ती मैदान 2024

Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when कुस्ती हेच जीवन kustihechjivan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to कुस्ती हेच जीवन kustihechjivan:

Videos

Share


Other Kolhapur event planning services

Show All

You may also like