17/09/2021
एका कुटुंबाची व्याख्या काय असते.
नवरा बायको आणि त्यांची मुलं आणि मध्यमवर्गीय कुटुंब म्हटलं की नवरा आणि बायको दोघेही कामानिमित्त दिवसभर घराबाहेर राहून राब राब राबतात पण आमच्याकडे थोडस वेगळा आहे.
माझी बायको सौ स्वाती अभिजित पटवर्धन ही लहानाची मोठी अशा घरातून झाली जिथे व्यवसायाचा बाळकडूच जणू तिला मिळालं.
2000 साली लग्न होऊन माझ्या आयुष्यात आली ते सुद्धा एका व्यावसायिक च्या घरी जिथे तिचे सासरे (माझे वडील), दीर, आजे सासरे (माझे आजोबा) यांच्याकडून व्यवसाया मधल्या बारीक बारीक गोष्टी अवगत करत घरातला सराफी आणि आंब्याचा व्यवसायच धनुष्य सुद्धा लीलया उचललं.
2013 साली आजोबांच छत्र डोक्यावरून गेल्यानंतर स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा असा मनात पक्का निर्णय घेऊन “रुचिमधुरा” या नावाने विले पार्ले येथे घरगुती पदार्थ विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरवातीला संध्याकाळी वेगवेगळे चमचमीत पदार्थ देत लोकांची वाह वा मिळवत लोकाग्रहास्तव सकाळ आणि संध्याकाळसाठी “टिफिन सर्विस” सुरू केली. मनमोकळा गोड स्वभाव, हसतमुख चेहरा यामुळे आपोआप लोक जोडत गेली आणि व्यवसाय हळू हळू वृद्धिंगत होत गेला.
Corona च्या काळात तिने दिलेल्या सर्विस बद्दल तिच कौतुक करावं तेवढा थोड आहे. Patient नी दिलेली कौतुकाची थाप ही विशेष बाब आहे.
तिने अशा पद्धतीने एका Frontline warrier च काम केलं आहे.
त्याचीच पावती म्हणून की काय
“आम्ही पार्लेकर”या नियतकालिकेनी तिच्या कामाची दखल घेऊन तिच्यावर लेख प्रसिद्ध केला आहे.
प्रत्येक बाईने स्वतःचा छोटा का असेना पण व्यवसाय सुरू करावा आणि आपल्या पायावर उभा राहावं याच हे उदाहरण आहे.