Successfully delivered order of 25 people Menu
Mini Batata Vada
Veg Biryani
Matar Paneer
Bhindi Masala
Chutney
Koshimbir
Papad
Poli
Mutton biryani - Today's Order
*नैवेद्याची राणी*
*पुरणाची पोळी*
🥳😀😋😋😋
पुरणासारखा पवित्र मंगलकारक नैवेद्य नाही. ताट भरून,तोंड भरून,पोट भरून.🥰😋चारीठाव असलेले ताट,डावी बाजू,उजवी बाजू भरभक्कम.षडरसयुक्त व highest protin, vitamin असलेला तरीही टेस्टी असणारा स्वयंपाक😂combinationतर इतके perfect आणि ठरलेले.काय करावे ही नेहमीची चिंता नाही.😩😩( नाही तर अर्धे डोके ह्यात चालवावे लागते की कोणता पदार्थ केला की त्याच्या सोबत दुसरे काय करावे.अर्थात सणांचे स्वयंपाक ठरलेले असतात.पण काही गोड पदार्थांना काहीच सूट होत नाही.उदाहरण मोदक त्याला आजूबाजूला काही मॅच होत नाही )यासाठी पूर्वजांचे आभार🙏😀
पण नैवेद्य असावा पुरणाचाच. कटाची आमटी,काकडीची कोशिंबीर,मेतकूट किंवा ओल्या नारळाची किंवा दाण्याची चटणी,बटाट्याची पिवळी भाजी तळण भजी.नैवेद्य म्हणले की बघूनच तृप्त व्हावं असा *सात्विक,सोज्वळ सगळ्यात दिमाखदार नैवेद्य*. जेवणाऱ्याला समाधान आणि केलेल्याला समाधान.स्त्रियांसाठी खास सुविधा, सकाळी साध्या पोळ्या केल्या की म्हणजे रात्री नुसता भात लावले की काम झाले 😍😍परत स्वयंपाक घराकडे बघायचे नाही.😋
जरी कोणाला हा राडा वाटत असला तरी त्याच महत्व अबाधितच. इतर गोड पदार्थ न आवडणारे अनेक जण. पण पुरण पोळी न आवडणारा विरळाच.पुरणाचे ताट जसे दृष्टी सुख देते तसे बाकीचे नैवेद्य देत नाहीत.ते भरलेले ताट बघून देवांनासुद्धा आपल्याला हे फक्त बघायला मिळते खायला नाही असे वाटत असेल.😂😂कदाचित त्याबदल्यात ते अमृत देतील😀😀
सध्या अनेक पदार्थांचे उदात्तीकरण होत आहे. तो उत्तम यायलाच हवा म्हणून सारखे आदळत ही आहे. पण ..................…........….अतिशय मेणासारखे शिजलेले मऊ पुरण तेलमीठ भरपूर लावून चुरून ठेवलेली थोडी पिवळसर पांढरी कणिक, तिचा उंडा लहान लिंबाएवढा घेवून त्यात दुप्पट किंवा दीडपट जायफळ,वेलची पूड असलेले पुरण भरताना सुगरणीचे कौशल्य पणाला लागते. अतिशय हलक्या हाताने भरलेले तो पुरणाचा पिवळसर गोळा एकरूप होऊन अलगद कणकेत विसावतो. तीही त्याला घट्ट पांघरूण घालते.हळूहळू पोळपाटावर तांदुळाची पिठी,सोजीच्या चाळणीने चाळलेली कणिक किंवा मैदा यावर हा गोळा फिरू लागतो कोणी कोणी पोळपाटावर कपडा बांधतो मग तो लोटाण्याने हळूवार सरकतो. शेवटच्या कडापर्यंत पोहचणे हे कौशल्य. पण पुरण,कणिक योग्य असेल तर त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. त्यातील पुरण बाह
पुरणपोळी - गौरी पूजनाच्या दिवशी नैवद्य पुरणपोळीचा असतो ,तसेच अनेक विविध पदार्थ नैवेद्याच्या पानाची शोभा वाढवतात.